Nagar News : अखेर मानोरीतील जबरी चोरीतील दोघे जेरबंद

राहुरी: पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरातील गणवाडी येथील एका वृद्ध महिला घरात एकटी असल्याचे पाहून दोघांनी जबरी चोरी केली होती. महिलेला रक्तभंबाळ करीत चोरट्यांनी तोंडामध्ये कापडी बोळा कोंबत गळ्यातील सोन्याचे दागिणे चोरून नेले होते. याप्रकरणी पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यात यश आल्याची माहिती पो. नि. धनंजय जाधव यांनी दिली.

गणपतवाडी (मानोरी) येथील लक्ष्मण खामकर हे महावितरणमध्ये अभियंता आहेत. त्यांचा बंगला शेती क्षेत्रात आहे. दि. 21 ऑक्टोंबर रोजी पत्नी व मुलीसमवेत पारनेर तालुक्यात तुकाई देवीच्या दर्शनास गेले होते. घरी वृद्ध आई असल्याचा लाभ घेत दोघे भामटे दुचाकीवर आले.


बंगल्याची बेल वाजविल्यानंतर सरुबाई खामकर (वय 65) यांनी दरवाजा उघडला. दोघांनी घरात प्रवेश करताच वृद्ध महिलेच्या तोंडात बोळा कोंबत बेदम मारहाण केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वृद्ध सरूबाई यांच्या गळ्यातील दागिणे ओरबडून नेत आरोपींनी धूम ठोकली. या घटनेनंतर तत्काळ पो. नि. धनंजय जाधव, उपनिरीक्षक पोपट कटारे, स. फौजदार म्हातारबा जाधव, पो. हवालदार प्रमोद ढाकणे यांनी घटनास्थळ गाठत घटनेची प्रत्यक्ष पाहणी केली होती. सीसीटिव्ही तपासणी केली असता खामकर यांच्या घरातील कॅमेरे 13 तारखेपासून बंद असल्याचे निदर्शनास आले. यामुळे पोलिसांपुढे घटनेतील आरोपींचा शोध लावणे मोठे आव्हानात्मक होते.


श्वान पथक, फॉरेन्सिक लॅब पथकाने पाहणी करूनही आरोपींचा माग मिळणे कठीण होता. पो. नि. जाधव यांनी घटनेबाबत तपास हाती घेत परिसरातून काही सीसीटिव्हीचे कॅमेर्‍यांची माहिती मागविली. यानंतर आरोपींवर संशक बळावल्यानंतर सोशल मीडिया व मोबाईल फोन वापराची माहिती घेतली. तांत्रिक विश्लेषन व लोकांकडून माहिती घेत पोलिसांनी आरोपींचे नावे निष्पन्न केली. रोहित एकनाथ कानडे (24 वर्षे) गणेश सुनिल लोंढे (22वर्षे) दोघे रा. चिंचोली, फाटा ता. राहुरी यांनी जबरीचोरी केल्याचे निष्पन्न झाले.


पो. नि. जाधव यांसह पो. उ. नि. कटारे, पो. हवालदार सोमनाथ जायभाय, पो. नाईक राठोड, अजिनाथ पाखरे, प्रमोद ढाकणे, महेश शेळके, सचिन ताजणे यांच्या पथकाने दोघा आरोपींना चिंचोली फाटा व श्रीरामपूर येथून ताब्यात घेतले. घरातील सीसीटिव्ही कॅमेरा बंद असल्याने पोलिसांचा संशय बळावला होता.


कानडे हा सरूबाई खामकर यांच्या नात्यात असल्याने पोलिसांनी आरोपीच्या दुरध्वनी क्रमांकाची तपासणी केली. अखेर पोलिसांचा संशय सत्य ठरला. चोरीमध्ये दोघा आरोपींचे नावे निष्पन्न होताच चिंचोली फाटा व श्रीरामपूर येथून त्यांना शिताफिने पकडण्यात आले. गणेश लोंढे यास न्यायालयात हजर केले असता 3 दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. रोहित कानडे यास उद्या न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पो. नि. जाधव म्हणाले. गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागिय अधिकारी डॉ. बसवराज शिवपुंजे यांच्या मार्गदर्शनात पो. उ.नि. कटारे करीत आहे.


हेही वाचा :



* राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्र संघाचे पदकाचे शतक साजरे; ४१ शिलेदार सुवर्णपदकाचे मानकरी

* Pune News : दौंडजला अपघातात 1 ठार, 2 जखमी






The post Nagar News : अखेर मानोरीतील जबरी चोरीतील दोघे जेरबंद appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SyB6Kn

Nagar News : अपघातात कुटुंब संपले ; लहान मुलगी तेवढी बचावली

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाटाजवळ ओढ्यात गाडी उलटून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना  रविवारी रात्री ११ च्या सुमारास घडली. या अपघातात एक चिमुकली बचावली. मयतांमध्ये आणखी एका चिमुकली सह तीन महिला व चालकाचा समावेश आहे. अपघातात मृत पावलेले सर्व व्यक्ती एकाच कुटुंबातील असून ते छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहेत. अपघाताची माहिती मिळताच नेवासा पोलिसांसह नेवासा फाटा परिसरातील नागरिकांनी बचाव कार्यासाठी मदत केली.


हायवेवर पडलेल्या टायरला धडकून चारचाकी गाडी त्रिमूर्ती शाळेच्या ओढ्यात पलटी झाली. या अपघातात वसीम हारूण मुल्ला (वय ४१) , अनसुरा बेगम हारूण मुल्ला (वय ४१), रेश्मा हलदार (वय ३५) ,हसीना बेगम हारूण पठाण (वय ५४), सामीया मोमीन हलदार (वय १४) सर्व रा. संभाजीनगर तसेच मासुमा हलदार मोमीन हलदार (वय  १३) ही मुलगी या अपघातातून बचावली आहे. संभाजीनगरचे हारूण अमीर मुल्ला यांनी नेवासा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ३०४ अ, २७९,४२७, १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा :



* Maratha Aarakshan : जुन्या कुणबी नोंदी आढळलेल्यांना प्रमाणपत्र देण्याचे सरकारचे आदेश

* सकारात्मक बातमी ! स्वमग्नता ओळखण्यासाठी आता एआयएमएलचा वापर !






The post Nagar News : अपघातात कुटुंब संपले ; लहान मुलगी तेवढी बचावली appeared first on पुढारी.


http://dlvr.it/Sy7Y0v

शेवगाव तालुका : चढावर थांबविली ब्रेकफेल बस! विद्यार्थी, प्रवाशी बालंबाल वाचले

शेवगाव तालुका; पुढारी वृत्तसेवा : एस.टी. बस चालकाच्या प्रसंगावधानाने विद्यार्थी अन् प्रवाशी बालंबाल वाचले आहेत. बसस्थानकात कर्मचार्‍यांनी प्रवाशांना बाजुला सावरताना चांगलीच धावपळ झाली; मात्र धैर्याने बसवर ताबा मिळविल्याने आगाराच्या चढावर बस थांबली अन् चालकाने निश्वास सोडला. ब्रेक फेल झाल्याने चालक महादेव बुधवंत यांनी सुखरुप उतरविल्याने प्रवाशांनी त्यांचे आभार मानले. नगर मुक्काम करून सकाळी पैठण फेरीसाठी गेलेली शेवगाव आगाराची पैठण-शेवगाव (एम.एच. 07 सी. 9247) बस सकाळी साडे दहा वाजता पैठणहून शेवगावात आली.


बसस्थानक अवघ्या काही अंतरावर असताना बस जुने प्राथमिक आरोग्य केंद्रा जवळ असताना बसचा ब्रेक फेल झाला. ही गोष्ट चालक महादेव बुधवंत यांच्या लक्षात आली. बसमध्ये विद्यार्थी, काही प्रवाशी तर रस्त्यावरील वर्दळ अशा परिस्थिती चालक घामाघुम झाले होते. मात्र, बसमधील प्रवाशी घाबरू नये म्हणून सावधगिरी बाळगून चालकाने फक्त बसमधील रमेश काकडे या वाहकास याची कल्पना दिली.

कुठलीही आरडाओरड न करता प्रसंगावधान ओळखून हळूवार बस स्थानकात आणली.


वाहकाने अगोदरच मोबाईलवरून स्थानकातील काही कर्मचार्‍यांना याची कल्पना दिल्याने बस स्थानकाच्या दिशेने येताच या कर्मचार्‍यांनी प्रवाशांना बाजुला हटण्यास सांगितले. मात्र, यामुळे धावपळ उडाली. चालकाने मोठ्या सावधानतेने बस आगाराच्या आवारात चढाच्या बाजुने घातली. चढाला वेग कमी झाल्याने बस जागेवरच थांबली. बस थांबताच चालकाने एकदाचा सुटकेचा निश्वास सोडला. अर्थात प्रवाशी सुखरुप उतरले त्यात रस्त्याने किरकोळ अपवाद वगळता कुठलाच अनुचित प्रकार घडू दिला नाही. चालत्या एस.टी.चा बिघाड झाल्यास कोणती सावधानता बाळगावी याचा प्रत्य निदर्शनास आणून दिल्याने चालक महादेव बुधवंत व वाहक रमेश काकडे यांची प्रसंशा करण्यात आली.


‘बसस्थानकातील अतिक्रमण डोके दुखी’




एस.टी. बसस्थानकात प्रवेश करताना किंवा बाहेर जाताना रस्त्यावर दुतर्फा असणारी खासगी वाहणे, रिक्षा, फळ विक्रते, हातगाडीवाले आदींचे अतिक्रमन धोक्याचे बनले आहे. यामुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत परिवहन विभागाने वेळोवेळी पोलिसांत लेखी तक्रारी दिल्या; मात्र त्याची दखल घेतली जात नाही, असे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.


हेही वाचा


मंत्री विखेंच्या हस्ते आज 41 कोटींच्या कामास प्रारंभ


शब्द दिल्याप्रमाणे आरक्षण त्वरित द्या : आ.कानडे


The post शेवगाव तालुका : चढावर थांबविली ब्रेकफेल बस! विद्यार्थी, प्रवाशी बालंबाल वाचले appeared first on पुढारी.


http://dlvr.it/Sy5hsH

व्हिडिओ व्हायरल झाला अन् चोरलेली गाय दारात

चिचोंडी पाटील : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे आठवड्यापूर्वी एका शेतकर्‍याची गाय चोरीस गेली होती. मात्र, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाल्यानंतर, त्याचे फुटेज ग्रामपंचायतीकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. हे फुटेज पाहून चोरट्यांनी शुक्रवारी सकाळी ती गाय पुन्हा चिचोंडी पाटील शिवारात आणून बांधली. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना न्याय मिळाल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून चिचोंडी पाटील येथे चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून, सोयाबीन, तसेच जनावरे, दुचाकी अशा अनेक चोर्‍या सध्या चिचोंडी पाटील येथे घडत असतानाही नगर तालुका पोलिसांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. चिचोंडी पाटील हे नगर तालुक्यातील बाजारपेठेचे गाव आहे. त्यामुळे येथे नेहमीच लोकांची वर्दळ असते. गावातील बंद पडलेली पोलिस चौकी पुन्हा सुरू करण्यासाठी सरपंच शरद पवार यांनी पोलिस अधिकार्‍यांना लेखी देऊनही, या पोलिस चौकीचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.


संबंधित बातम्या :



* Pune : शेटफळगढे गटात पुढार्‍यांना प्रवेशबंदी

* Pune : वेल्हे तालुक्यात 6 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू

* Pune News : हत्ती तलावाचे सौंदर्यीकरण रखडले






गेल्या आठवड्यात सोयाबीनच्या गोण्या चोरतानाही चोरट्यांना ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, पोलिसांचा वचक नसणे ही बाब गंभीर असून, यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

अनेक वर्षापासून चिचोंडी पाटील येथील पोलिस चौकी बंदच असून, तिची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. पोलिस चौकीसाठी ग्रामपंचायतीचा जागा उपलब्ध करून देण्यास तयार असून, वरिष्ठांनी याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे. मागील काही दिवसांपूर्वी गावात दुचाक्या चोर्‍यांचे सत्र सुरू असून, चोरट्यांचा तपास पोलिसांना लागत नसल्याने चोरीची तक्रार दिली जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी दाद मागायची कुठे? असा प्रश्न विचारला जात आहे.


जिल्हा बदलला की थंडावतो तपास

मागील अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यातील अनेक चोरट्यांनी नगर तालुक्यात चोर्‍या केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. मात्र, जिल्हा बदलल्यानंतर स्थानिक पोलिस ठाणे किंवा तपासी पोलिस अंमलदार याकडे दुर्लक्ष करत असल्याने नगर तालुक्यातील गुन्हेगारीमध्ये वाढ होत चालली आहे.


The post व्हिडिओ व्हायरल झाला अन् चोरलेली गाय दारात appeared first on पुढारी.


http://dlvr.it/Sy3z05

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क: माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे आज (दि.२७) निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मराठवाड्याच्या राजकारणातील कणखर नेतृत्त्व म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती. अहमदनगर, बीड जिल्ह्यात ढाकणे यांचा दांडगा जनसंपर्क होता. (Babanrao Dhakne)


जिल्हा परिषद सदस्य ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवास होता. वांबोरी चारीसाठी त्यांनी वीस वर्षे लढा दिला. 1978 मध्ये ते लोकांनी वर्गणी करून त्यांना पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून दिले. राज्याच्या सार्वभौम सभागृहात पाथर्डी तालुक्याच्या मूलभूतप्रश्नी पत्रके भिरकावल्याप्रकरणी सत्ताधारी पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्य असलेल्या ढाकणे यांना सात दिवसांची तुरूंगवासाची शिक्षा दिली होती. पुढे ते त्याच सभागृहाचे सदस्य झाले. 1981 ते 1982 या काळात ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते.


बॅरिस्टर अ.र.अंतुले, बाबासाहेब भोसले या दोन मुख्यमंत्र्यांच्या काळात त्यांनी विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळली. मंडल आयोगाच्या शिफारसी राज्याने तत्काळ स्वीकारव्यात याकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी मुंबईतील अधिवेशनात 25 जुलै 1983 रोजी अध्यक्षांसमोरील राजदंड पळविला होता. राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, विधानसभेचे उपाध्यक्ष, बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. शेवगाव-पाथर्डीत त्यांनी केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. निमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. मागील काही आठवड्यांपासून अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. यानंतर त्यांना हृद्यविकाराच्या झटक्याने आज त्यांचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.


हेही वाचा:





* Pimpri News : सध्या तरी दररोज पाणीपुरवठा नाही; महापालिका आयुक्त शेखर सिंह

* Nashik Weather : नाशिक जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहूल ; पुढील तीन दिवस धुक्याचा अंदाज

* Maratha Reservation : पीएम मोदींनी मराठा आरक्षणावर एकही शब्द काढला नाही : मनोज जरांगे पाटील 






The post माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन appeared first on पुढारी.


http://dlvr.it/Sy1gV3

शिर्डी मोदीमय ! हेलीपॅडवर जोरदार स्वागत ; पाहा फोटो

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी येथे आयोजित विविध कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी आज भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने काकडी (शिर्डी) विमानतळ येथे आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी विमानतळावरून साई संस्थान हेलिपॅड येथे आगमन झाल्यानंतर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्वागत केले.यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी शेखर पाटील यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.











The post शिर्डी मोदीमय ! हेलीपॅडवर जोरदार स्वागत ; पाहा फोटो appeared first on पुढारी.


http://dlvr.it/Sxz4d5

Uncle Singing Kya Hua Tera Waada In Train | Stereo India

Uncle Singing Kya Hua Tera Waada In Train | Stereo India


via YouTube https://www.youtube.com/watch?v=gs7r6uXrqbo

Nashik News : ऐतिहासिक महाबोधिवृक्षाच्या फांदीचे रोपण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; श्रीलंकेतील अनुराधापुरा येथील तब्बल २२५५ वर्षांची परंपरा लाभलेल्या एेतिहासिक महाबोधिवृक्षाच्या फांदीचे पाथर्डी शिवारातील त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध स्मारकात रोपण करण्यात आले. श्रीलंका, कंबोडिया, मलेशिया, थायलंड, नेपाळ येथील भन्ते, भिक्खूंच्या खास उपस्थितीत हा सोहळा पार पडला. बुद्धवंदनेच्या स्वरात या फांदीचे रोपण करण्यात आले.


महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सम्राट अशोक विजयादशमीनिमित्त हा सोहळा आयोजित केला होता. श्रीलंका, मलेशिया, थायलंड येथील भिक्खू नारायणपणावे, भिक्खू डॉ. पोंचाय पलावाधम्मो, भदंत खेमधम्मो महस्थवीर, हेमरथाना नायक थेरो, सरणंकरा महाथेरो यांच्यासह मुख्य संयोजक भन्ते सुगत थेरो, मुख्य निमंत्रक भिक्खू संघरत्न थेरो, भदंत आर्यनाग, भदंत यु नागधम्मो महाथेरो, के. आर. लामा, भदंत आर. आनंद, भदंत सुमनसिरी, भदंत काश्यप, भदंत धम्मरक्षित उपस्थित होते. याशिवाय श्रीलंकेचे धार्मिक आणि सांस्कृतिक मंत्री विदू विक्रम नायका, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे उपस्थित होते. सोहळ्याच्या प्रारंभी महाबोधिवृक्षाच्या फांदीची स्मारकाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भिक्खूंच्या उपस्थितीत पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर धम्म स्तुपातील भगवान गौतम बुद्ध यांच्या पंचधातूच्या मूर्तीसमोर महाबोधिवृक्ष ठेवून समस्त भिक्खूंच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेण्यात आली. पुढे भन्ते सुगत थेरो यांनी स्तूप ते रोपण स्थळापर्यंत फांदी डोक्यावर आणली. याठिकाणी बुद्ध उपासना घेऊन फांदीचे रोपण करण्यात आली. हा संपूर्ण सोहळा भन्ते, भिक्खूंच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी नाशिक जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील बौद्ध उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पौर्णिमेला महाबोधिवृक्षाचे दर्शन


महाबोधिवृक्षाच्या रोपाचे दर्शन घेता यावे याकरिता दर पौर्णिमेला ते उपासकांसाठी खुले केले जाणार आहे. म्हणजेच महिन्यातून एकदाच वृक्षाचे दर्शन घेता येईल. इतर दिवशी सुरक्षेच्या कारणास्तव ते बंदिस्तपणे ठेवले जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.


देशात दुसरा महाबोधिवृक्ष


उत्तर प्रदेशातील बोधगयानंतर नाशिक येथे महाबोधिवृक्षाचे उपासकांना दर्शन घेता येणार आहे. सम्राट अशोक यांची मुलगी संघमित्रा यांनी बोधगया येथून महाबोधिवृक्षाच्या फांदीचे श्रीलंकेतील अनुराधापुरा येथे रोपण केले होते. आता त्याच एेतिहासिक महाबोधिवृक्षाच्या फांदीचे नाशिकमध्ये रोपण करण्यात आले आहे. त्यामुळे महाबोधिवृक्ष असलेले नाशिक बोधगयानंतर दुसरे शहर बनले आहे.


१८ कोटींचा निधी


महाबोधिवृक्षाच्या फांदी रोपण सोहळ्यासाठी राज्य शासनाने १८ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून त्रिरश्मी लेणी येथे भिक्खू संघ निर्माण केला जाणार आहे. तसेच वृक्षाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि पोलिस चौकीही उपलब्ध करून दिली जाणार आहे.


पर्यटनवाढीला मिळेल चालना


धार्मिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये महाबोधिवृक्षाचे रोपण केले गेल्याने पर्यटनवाढीला चालना मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा वृक्षामुळे नाशिकचे नाव देशात-विदेशात पोहोचेल. वृक्षाच्या दर्शनासाठी जगभरातील उपासक याठिकाणी येण्याची शक्यता आहे.


The post Nashik News : ऐतिहासिक महाबोधिवृक्षाच्या फांदीचे रोपण appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SxwRdz

संगमनेरात रोजगार नाही ही शोकांतिका!

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यामध्ये औद्योगिक वसाहतीचे एमआयडीसीत रूपांतर न झाल्यामुळे मोठ्या औद्योगिक कंपन्या येथील औद्योगिक वसाहतीमध्ये आल्या नाहीत. म्हणून या तालुक्यात तरुणांना बाहेर जावे लागते, ही या तालुक्याची शोकांतिका असल्याचे टीकास्त्र महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी माजी महसूलमंत्री, आ. बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता सोडले. शिर्डी येथे श्रीसाईबाबांच्या पावनभूमीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पा. यांनी मालपाणी लॉन्स येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.


जिल्ह्यातील युवकांना जिल्ह्यातच रोजगार निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने नगर, शिर्डी व सुपा येथील औद्योगिक वसाहतींचा विस्तार करण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे असे सांगत, पुढील एक ते दीड वर्षात शिर्डी येथे विकसीत होणार्‍या औद्योगिक वसाहतीमधून किमान 10 हजार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा आराखडा तयार करण्यात येत असल्याचे मंत्री विखे पा. म्हणाले.


संगमनेर तालुक्यातून बहुसंख्येने नागरीकांनी या सभेत सहभागी होण्यासाठी पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन करुन, पंतप्रधान मोदी यांचा दौरा जिल्ह्याच्या विकासासह व युवकांच्या भविष्यासाठी मोठी संधी ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सभेच्या प्रचारार्थ रथाचा शुभारंभ मंत्री विखे पा. यांच्या हस्ते करण्यात आला.


यावेळी बापुसाहेब गुळवे, वसंतराव देशमुख, वसंतराव गुंजाळ, तालुकाध्यक्ष सतिष कानवडे, शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शिवसेना शहराध्यक्ष सोमनाथ कानकाटे, ज्ञानेश्वर कर्पे, जावेद जहागिरदार, अमोल खताळ, राम जाजू, किशोर नावंदर, राजेंद्र सांगळे, सदाशिव थोरात, राजेंद्र सांगळे, रविंद्र थोरात, अशोक कानवडे, शरद गोर्डे, बुवाजी खेमनर, शौकत जहागिरदार, रऊफ शेख, प्रशांत वामन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


मंत्री विखे पा. म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत आहे. या निर्णयांचा प्रत्येक लाभ गावपातळीपर्यंत मिळाला. कोविड संकटापासूनची सर्व परिस्थिती आपण अनुभवली. पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व खंबिरपणे उभे राहिल्यानेच देश या संकटातून बाहेर पडला. आज जगामध्ये देशाची प्रतिमा एक विकसनशिल भारत म्हणून निर्माण झाली. ‘जी 20’ परिषदेचे अध्यक्षपद हा संपूर्ण भारताचा गौरव असल्याचे मंत्री विखे पा. म्हणाले.


राज्यात महायुती सरकार निर्णय घेत आहे. 1 रुपयात पीक विमा योजनेसह आता पशुधनास पीक विमा योजना सुरु करण्याचा शासन विचार करीत आहे. खरेतर दूध संघांनी अशी योजना सुरु करायला हवी होती, पण ते त्यांच्याकडून न झाल्याने शासन या योजनेची अंमलबजावणी करेल, असे आश्वासन देत, मंत्री विखे पा. म्हणाले, केंद्र व राज्याच्या माध्यमातून जिल्हा विकासाचे काम सुरु आहे. वंदे भारत एक्सप्रेस, समृध्दी महामार्ग ही मोठी उपलब्धी विकासाच्यादृष्टीने झाली. या पायाभूत सुविधांचा उपयोग करुन, जिल्ह्यातील तरुणांना स्थानिक पातळीवरचं रोजगार निर्माण करणाचा प्रयत्न असल्याचे मंत्री विखे यांनी ठामपणे सांगितले.


शिर्डी येथे होवू घातलेली औद्योगिक वसाहत या भागात तरुणांना मोठी संधी ठरणार आहे. तब्बल 500 एकर जागा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. आय. टी. पार्क, महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा कंपनीसारखे मोठे प्रकल्प येथे यावे, यासाठी बोलणे झाले. त्यादृष्टीने आराखडा तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. येत्या एक ते दीड वर्षात किमान 10 हजार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास केंद्र व राज्य सरकारच्या स्तरावरुन काम सुरु झाल्याचे मंत्री विखे पा. यांनी ठणकावून सांगितले. यावेळी माजी आ. वैभव पिचड, शिवाजी धुमाळे, जलसंपदा, महसूल, व पोलिस अधिकारी उपस्थित होते.


पंतप्रधान मोदी करणार धरणाचे लोकार्पण..!




महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी निळवंडे येथे धरणस्थळी भेट देवून कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी धरणस्थळी धरणाचे लोकार्पण करणार आहेत. जल पुजन करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याने प्रशासनाने धरण स्थळी केलेल्या तयारीची पाहणी मसहूल मंत्री विखे पा. यांनी केली.


हेही वाचा


सप्तशृंगी गडाच्या शिखरावर फडकला कीर्तिध्वज, 500 वर्षांची परंपरा


स्वीडिश वर्कप्लेसमध्ये ‘फिका’ ब्रेकची सक्ती!


Nashik News : द्राक्षबागांवर डावण्या रोगाचा प्रादुर्भाव


The post संगमनेरात रोजगार नाही ही शोकांतिका! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SxsnH5

अहमदनगर : दिवंगत गोविंद पानसरे यांच्या नातवाचे अपघाती निधन

भेंडा : पुढारी वृत्तसेवा : नेवासा-शेवगाव राज्य मार्गावरील भेंडा येथे दोन वाहनांच्या धडकेत मोपेडस्वार ठार झाला. अमित बन्सी सातपुते (वय 33, रा. नजीक चिंचोली) असे त्याचे नाव आहे. ही दुर्घटना रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास घडली. मृत अमित हा अ‍ॅड. बन्सी आणि स्मिता पानसरे यांचा एकुलता एक मुलगा आणि दिवंगत नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांचा नातू होय.


 


The post अहमदनगर : दिवंगत गोविंद पानसरे यांच्या नातवाचे अपघाती निधन appeared first on पुढारी.


http://dlvr.it/Sxq0b1

नगर तालुका : मंडळाधिकारीसाठी ग्रामस्थ आक्रमक!

नगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील मोठे गाव असलेल्या जेऊरमध्ये कायमस्वरुपी तलाठी, तसेच मंडळाधिकारी नसल्याने नागरिकांच्या कामांचा खोळंबा होत आहे. मागणी करूनही कायमस्वरुपी मंडळाधिकार्‍याची नियुक्ती होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या अडमुठ्या भूमिकेविरोधात जेऊर ग्रामस्थ आक्रमण झाले असून, आठ दिवसांत कायमस्वरुपी मंडळ अधिकार्‍याची नियुक्ती झाली नाही, तर आंदोलनाचा इशारा दिला आहे.


जेऊर सारख्या मोठ्या गावात कायमस्वरुपी तलाठी, तसेच मंडळाधिकारी आवश्यक आहे. परंतु, सद्यस्थितीत जेऊरच्या तलाठ्याकडे मजले चिंचोली, आव्हाडवाडी व उदरमल या गावांचा अतिरिक्त पदभार आहे. तसेच, मंडळाधिकार्‍याकडेही जेऊरचा अतिरिक्त पदभार आहे. जेऊर मंडळासाठी कायमस्वरुपी मंडळाधिकारी नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून अतिरिक्त पदभारावर जेऊर महसूलचे कामकाज सुरू आहे.


जेऊर मंडळांतर्गत जेऊर, धनगरवाडी, ससेवाडी, बहिरवाडी, इमामपूर, पांगरमल, उदरमल, खोसपुरी, आव्हाडवाडी, मजले चिंचोली, मांजरसुंबा गड, डोंगरगण, अशी 12 गावे येतात. या गावातील महसूल विभागाची सर्व कामे तलाठी व मंडळाधिकार्‍यांच्यामार्फत चालतात.

मंडळातील शेतकरी, विद्यार्थी, तसेच शासनाच्या विविध योजनांसाठी लागणारे दाखले, विविध नोंदींसाठी कायमस्वरुपी तलाठी, मंडळाधिकारी असणे गरजेचे आहे.


अधिकार्‍यांअभावी नागरीकांची कामे रखडत असून, प्रत्येक कामाला विलंब होत असून, नागरिकांना हेलपाटे मारावे लागतेय. जेऊरला कायमस्वरुपी तलाठी व मंडळाधिकार्‍याची आठ दिवसांमध्ये नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी सदस्य विजय पाटोळे, भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष संगम पाटोळे, सनी गायकवाड, विकास म्हस्के, भानुदास मगर यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.


जेऊर मोठे गाव आहे. शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. येथे कायमस्वरुपी तलाठी व मंडळाधिकारी उपलब्ध असणे गरजेचे आहे. परंतु, याबाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांसह आंदोलन करण्यात येईल.


-विजय पाटोळे,

ग्रामपंचायत माजी सदस्य, जेऊर


गेल्या अनेक महिन्यांपासून जेऊर मंडळाधिकार्‍यांचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. तलाठीकडेही जेऊरसह इतर तीन गावांचा अतिरिक्त पदभार आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या कामांचा खोळंबा होत आहे.


-संगम पाटोळे,

अध्यक्ष, भीमशक्ती संघटना



हेही वाचा


अणुचाचणी टाळण्‍यासाठी बिल क्लिंटन यांना दिली होती पाच अब्‍ज डॉलरची ऑफर : नवाज शरीफ


कोल्हापुरात वृद्ध महिलेचा दगडाने ठेचून खून


न्यूझीलंडविरुद्ध शमी-सूर्याला संधी की, शार्दुल खेळणार? प्लेइंग 11 जाणून घ्या


The post नगर तालुका : मंडळाधिकारीसाठी ग्रामस्थ आक्रमक! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/Sxn6tk

नगर जिल्हा विभाजन दृष्टिपथात! आ. राम शिंदे

नगर : अनेक वर्षांपासून जिल्हा विभाजनाचा प्रश्न प्रलंबित आहे. जिल्हा विभाजन व्हावे असे माझेही मत आहे. अप्पर पोलिस अधीक्षक, अप्पर जिल्हाधिकारी पाठोपाठ आता महसुल भवनाची स्वतंत्र इमारत शिर्डीत होत असल्याने विभाजनाच्यादृष्टीने पडलेले ते आश्वासक पाऊल आहे. विभाजनाचा मुर्हूत फक्त बाकी असल्याचा दावा भाजप आ. राम शिंदे यांनी केला. शिर्डीत होत असलेल्या नव्या कार्यालयामुळे जिल्हा मुख्यालयाचा प्रश्नही निकाली निघाल्याचे सांगत त्यांनी शिर्डी मुख्यालयाचे संकेतही दिले.


नगर येथे आ. शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, अरुण मुंडे, सुवेंद्र गांधी यावेळी उपस्थित होते. अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालय उत्तरेत होते. काही दिवसांपूर्वी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीत झाले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीत 61 कोटी रुपयांची महसूल भवन इमारतीचे भूमिपूजन होत आहे. पोलिस, महसूलची कार्यालय शिर्डीत झाल्याने जिल्हा मुख्यालयाचा प्रश्न निकाली निघाल्याचे सांगत त्यांने शिर्डी जिल्हा मुख्यालयाचे संकेत दिले.


राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना खा. विखेंनी भाजप प्रवेशाची ऑफर दिल्याकडे लक्ष वेधत भूमिका काय असा प्रश्न शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांना विचारताच त्यांनीही पलटवार केला. विखे पाटील हे विकासात्मक कामे चांगली करत आहेत. त्यांनी त्यादृष्टीने आणखी प्रयत्न करावे, मात्र संघटनात्मक पातळीवरचा निर्णय शहर जिल्हा शाखेवर (आमच्यावर) सोडावा, अशी भूमिका मांडली.


शेळी-मेंढी पालन महामंडळाचे ढवळपुरी (ता. पारनेर) येथील कार्यालय स्थलांतराची प्रक्रिया सुरू झाल्याचे आ. राम शिंदे यांनी सांगितले. हे कार्यालय राज्याचे असून ते पारनेरच्या खेड्या गावात होत असल्याने दळणवळणाच्या दृष्टीने ते योग्य नाही. त्यामुळे ते स्थलांतर होत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.


हेही वाचा


चंद्रपूर: देह सोडलेल्या आईच्या कुशीत रात्रभर ढसाढसा रडला चिमुकला; पुलावरून पडून गर्भवती महिलेचा मृत्यू


नगरला अपर तहसील कार्यालय मंजूर; अध्यादेश जारी


Jammu Accident : जम्मू-श्रीनगर महामार्गावर अपघात; चार जणांचा मृत्यू


The post नगर जिल्हा विभाजन दृष्टिपथात! आ. राम शिंदे appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SxlKPG

चक्क शाळा सुरू असतानाच शाळेच्या आवारात वर्षश्राद्धाचा कार्यक्रम..!

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शाळा सुरू असतानाच शाळेच्या आवारात वर्षश्राद्धाचा कार्यक्रम घेण्यात आल्याची घटना संगमनेर तालुक्यातील निमोण शाळेत घडली. शाळा व्यवस्थापन समितीचा विरोध असतानाही वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाला परवानगी देणार्‍या मुख्याध्यापक व शिक्षकांना निलंबित करावे, अशी मागणी समितीचे उपाध्यक्ष अशोक वालझाडे यांनी गटविकास अधिकार्‍यांकडे केली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेतून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून, गटशिक्षणाधिकार्‍यांना चौकशीचे आदेश दिल्याचे सूत्रांकडून समजले.


संबंधित बातम्या :



* गव्हाची गोदामे रिकामी झाल्यामुळेच एमएसपी वाढ : काँग्रेसचा आरोप

* Pune News : शिकावू विमान टेकऑफ घेतल्यानंतर काही वेळातच कोसळले

* पंतप्रधान मोदी 26 ऑक्टोबरला शिर्डीत ! लाखभर लाभार्थींचे टार्गेट






गेल्या आठवड्यात निमोण शाळेत वर्षश्राद्धाचा कार्यक्रम झाला. मात्र शाळेच्या वेळेत कार्यक्रम घेतला, तर मुलांचे नुकसान होणार असल्याने शाळा व्यवस्थापन समितीचा विरोध होता. मात्र येथील दोघा शिक्षकांनी परस्पर या कार्यक्रमास परवानगी दिली. परिणामी, मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने संबंधित शिक्षकांना निलंबित करावे, अन्यथा 28 ऑक्टोबरपासून शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी संगमनेर पंचायत समितीसमोर उपोषणास बसणार असल्याचा लेखी इशारा वालझाडे यांनी गटविकास अधिकार्‍यांना दिला आहे.


सरपंचांची पालकमंत्र्यांकडे तक्रार

निमोणचे लोकनियुक्त सरपंच संदीप देशमुख यांनी याप्रकरणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिले असून, शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी शाळा सोडून मुलांना आमदारांच्या स्वागतासाठी उभे केल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरल्याचे त्यांनी म्हटले आहे.


चौकशी अहवाल जिल्हा परिषदेत देणार!

निमोण शाळेत सेवानिवृत्त शिक्षकाचे वर्षश्राद्ध झाले. त्याच कार्यक्रमात त्यांच्या नावाने शाळेला कुटुंबाने दिलेल्या कमानीचे व लोकवर्गणीतून बांधलेल्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन झाले. या संदर्भात सरपंचांनीही तक्रार केली आहे. जिल्हा परिषदेतूनही चौकशीच्या सूचना मिळाल्या आहेत. त्यानुसार विस्तार अधिकारी उद्या चौकशी करतील आणि अहवाल जिल्हा परिषदेकडे दिला जाईल, अशी माहिती संगरनेरचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड यांनी दिली.


The post चक्क शाळा सुरू असतानाच शाळेच्या आवारात वर्षश्राद्धाचा कार्यक्रम..! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SxgvKK

Nagar News : पिंपळगाव माळवी तलाव पाणीप्रश्न पेटणार!

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा :  पिंपळगाव माळवी तलावातील अनधिकृत पाणी उपशाचा प्रश्न चांगलाच पेटणार असल्याचे दिसून आहे. येथील पाणी उपसा तात्काळ बंद करावा, अन्यथा पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाजीराव गवारे यांनी दिला आहे. अनधिकृत पाणी उपशाबाबत परिसरातील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत.

जेऊर येथील सीना नदी, तसेच उपनदी खारोळीवर पिंपळगाव तलाव आहे. चालू वर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने परिसरात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या उद्भवणार आहे.


संबंधित बातम्या :



* पुणे जिल्ह्यात 1 हजार 451 हेक्टरवर कापसाची लागवड

* कापसाला अवघा 6 हजारांचा दर

* Nagar News : टँकर-ट्रकच्या धडकेत दोन ठार ; दोन जण गंभीर जखमी






चालू वर्षी पिंपळगाव तलावातील पाण्याची आवक वाढलीच नाही. सध्याच पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, उन्हाळ्यात तर पाण्यासाठी परिसरातील गावांचे अतोनात हाल होणार असल्याचे दिसत आहे. पिंपळगाव तलावातील पाणीसाठाही 30 टक्क्यांपेक्षा कमी राहिलेला आहे. त्यातच तलावातून अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू आहे. काही नागरिक टँकरद्वारे तलावातील पाण्याची विक्री करत असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे.


पिंपळगाव तलावातून जेऊर, धनगरवाडी, डोंगरगण, पिंपळगाव, मांजरसुंबा गड या गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या गावातील पाण्याच्या पाईपलाईन तलावातून आहेत. पाऊस नसल्याने या गावांसमोर पाणी टंचाईचे भीषण संकट उभे राहणार आहे. अशा परिस्थितीत तलावातील अनधिकृत पाणी उपसा थांबवणे गरजेचे आहे. शेकडो विद्युत पंपाच्या साहाय्याने 24 तास अविरतपणे पाणी उपसा सुरू आहे. बेसुमार पाणी उपसा प्रकरणी शिवप्रहार संघटनेच्या वतीने देखील निवेदन देऊन पाणी उपसा थांबविण्याची मागणी करण्यात आली होती.


उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ येणार आहे. पशुधन जगविणे अवघड होईल. त्यामुळे तलावातील अनधिकृत पाणी उपसा तात्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा जेऊर पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बाजीराव गवारे यांनी दिला आहे.


जेऊरला पिंपळगाव माळवी तलावातून पाणीपुरवठा होतो. दुष्काळी परिस्थितीमुळे भविष्यात तीव्र पाणीटंचाई जाणवणार आहे. त्यामुळे तलावातील अनधिकृत पाणी उपसा तात्काळ थांबविण्याची गरज आहे.

                                                                         – ज्योती तोडमल, सरपंच, जेऊर


पिंपळगाव तलावातून पाच गावांची तहान भागविली जाते. चालू वर्षी पाऊस झाला नाही. त्यामुळे पाण्याचे भीषण संकट उभे राहणार आहे. त्यामुळे तलावातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याची गरज आहे.

                                                            – श्रीतेश पवार, उपसरपंच, जेऊर


आदिवासी समाजाच्या वतीने तलावात मत्स्यबीज सोडून मासेमारी करण्यात येते. त्यावर समाजातील बहुतेक कुटुंबाची उपजीविका अवलंबून आहे. पाणी संपल्यास मासेमारी व्यवसायही अडचणीत येणार आहे.

                         – बाळासाहेब पवार, अध्यक्ष एकलव्य आदिवासी विकास संस्था


The post Nagar News : पिंपळगाव माळवी तलाव पाणीप्रश्न पेटणार! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SxdHwH

समलिंगी लग्नांबद्दल सुप्रीम कोर्टाने असं का व काय म्हटलंय ? | #samesexwedding | Somesh Kolge

समलिंगी लग्नांबद्दल सुप्रीम कोर्टाने असं का व काय म्हटलंय ? | #samesexwedding | Somesh Kolge

समलिंगी लग्नाबाबत सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलंय आणि असं का ??? #samesexwedding #supremecourt #someshkolge
via YouTube https://www.youtube.com/watch?v=ly48ZHsHj-A

Heramb kulkarni : हेरंब कुलकर्णी यांचे विद्यार्थिनींनी केले स्वागत

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शाळेच्या आवारातील गुटख्याची टपरी हटविण्यासंदर्भात तक्रार केल्याच्या रागातून मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. हल्ल्यानंतर सोमवारी पहिल्यांदा कुलकर्णी शाळेत दाखल झाले. त्यावेळी विद्यार्थिनी औक्षण करून स्वागत करीत आनंद व्यक्त केला. यावेळी शाळेचे चेअरमन मकरंद खेर, शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका बोगावत मॅडम, निवृत्त मुख्याध्यापक विलास साठे, भंडारी उपस्थित होत्या.


याप्रसंगी हेरंब कुलकर्णी यांनी कठीण प्रसंगात विद्यार्थी व शिक्षकांनी धैर्य दाखवले त्याबद्दल सर्वांचे कौतुक केले. महाराष्ट्रातील माध्यमे, सामाजिक संस्था, कार्यकर्ते मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्या पाठीशी उभे राहिल्या याबद्दल सर्वांनी आभार व्यक्त केले.

शाळेला वेढलेले अवैध धंदे रोखण्यासाठी इथून पुढे ही आक्रमक भूमिका घेतली जाईल. घडला प्रसंग दुःस्वप्न होते असे म्हणून विसरून जाऊ. शाळेत पुन्हा नव्याने उपक्रम राबवू, असे आवाहन हेरंब कुलकर्णी यांनी केले.


हे ही वाचा :



* माेठी बातमी : आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्‍यक्षांना दिली ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत

* धक्कादायक ! पिण्याच्या पाण्याच्या टाकीत टाकले रसायन






The post Heramb kulkarni : हेरंब कुलकर्णी यांचे विद्यार्थिनींनी केले स्वागत appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SxZkN2

अहमदनगर - आष्टी रेल्वेला भीषण आग ; सुदैवाने जीवित हानी नाही 

पुढारी ऑनलाईन : नगर-बीड-परळी रेल्वेमार्गावर वाळुंज शिवारात असलेल्या नगर-सोलापूर महामार्ग क्रॉसिंगच्या ठिकाणी सोमवारी (दि. १६) दुपारी रेल्वेगाडीला भीषण आग लागून गाडीचे ६ डबे भस्मसात झाल्याची घटना घडली आहे. रेल्वेगाडीत अवघे ३-४ प्रवासी होते, त्यांनी पटापट खाली उड्या टाकल्याने सुदैवाने कुठलीही जिवित हानी झाली नाही. मात्र या दुर्घटनेत रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे.

नगर-बीड-परळी रेल्वेमार्गावर रेल्वेची वाहतूक सुरू झालेली आहे. सोमवारी दुपारी आष्टीकडून नगरकडे येत असलेली रेल्वेगाडी नगर तालुक्यातील वाळुंज शिवारात असलेल्या नगर-सोलापूर महामार्ग क्रॉसिंगच्या ठिकाणी आली.



Maharashtra | Five coaches of an 8-coach DEMU train caught fire at 3 pm between Ahmednagar and Narayanpur stations. No injuries or death reported as all passengers debaorded the train when it caught fire. No person is trapped inside the burning coaches. Firefighters are called by…


— ANI (@ANI) October 16, 2023





तेथे गाडी थांबल्यावर अचानक इंजिनच्या पाठीमागील डब्याला भीषण आग लागली. ही आग नंतर पसरत जावून सहा डबे पेटले. गाडी उभी असताना आग लागल्याचे लक्षात आल्यावर गाडीत असलेले ३-४ प्रवासी तसेच इंजिन मध्ये असलेले चालक व इतर रेल्वे कर्मचारी यांनी पटापट गाडीच्या खाली उड्या घेतल्या. तेथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काही नागरिकांनी याबाबतची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांना कळविली. त्यांनी तातडीने रेल्वे पोलिस तसेच नगर तालुका पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती सांगितली. तसेच नगर-सोलापूर महामार्गाचे काम करणार्‍या ठेकेदार संस्थेच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून टँकरची व्यवस्था करण्याची विनंती केली. काही वेळात अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी पोहचले, मात्र तो पर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. या आगीत रेल्वेगाडीचे सहा डबे भस्मसात झाले असल्याचे सांगण्यात आले. आगीचे कारण उशिरापर्यंत समजू शकले नव्हते.


The post अहमदनगर - आष्टी रेल्वेला भीषण आग ; सुदैवाने जीवित हानी नाही  appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SxX5y6

कोळपेवाडी : जायकवाडीस पाण्याविरुद्ध वज्रमूठ! आ. काळेंचा पुढाकार

कोळपेवाडी; पुढारी वृत्तसेवा : कालबाह्य झालेल्या मेंढेगिरी समितीच्या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने 2014 आदेशाची अंमलबजावणी करू नये. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा फेर निर्णय येत नाही तोपर्यंत समन्यायी पाणी वाटपाच्या नावाखाली जायकवाडीला पाणी सोडू नये, अशी आग्रही मागणी आ. आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. नगर- नासिकच्या धरणातून समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या आधारे जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे जलसंपदा विभागाच्या विचाराधीन आहे.


त्याबाबत पुढील आठवड्यात (दि.17 रोजी) समन्यायी पाणी वाटप समितीची बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर आ. काळे यांनी स्वतःसह उर्ध्व गोदावरी खोर्‍यातील नगरचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा., अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ, माजी मंत्री, आ. बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आ. शंकरराव गडाख, माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे, आ. देवयानी फरांदे, आ. माणिकराव कोकाटे, आ. दिलीप बनकर, आ. लहू कानडे आदी नेत्यांसोबत उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री फडणवीस यांनी तत्काळ बैठक घेवून चर्चा करावी. त्यानंतर योग्य निर्णय घ्यावा, अशा आशयाचा पत्रव्यवहार केला आहे.


आ. काळे म्हणाले की, कोपरगाव, निफाड, येवला, सिन्नर, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा व राहुरी तालुक्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचे भवितव्य अवलंबून असलेल्या नगर- नासिकच्या धरणातून समन्यायी पाणी वाटप कायद्याने जायकवाडी धरणात प्राधिकरणाच्या 2014 च्या निर्णयाच्या आधारे पाणी सोडण्यासाठी बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे.


तत्पूर्वी समन्यायी पाणी वाटप कायद्याचा आधार घेण्यापूर्वी गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रासह इतर धरण क्षेत्रात नगर व नासिक जिल्ह्यातील आमदारांसमवेत बैठक घ्यावी. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच्या नव्या निकषांची अंमलबजावणी केल्याशिवाय पाणी सोडण्याचा निर्णय घेवू नये. यंदा कमी पर्जन्यमान झाल्याने जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास समन्यायी पाणी वाटप कायद्याचा आधार घेतला जाईल, अशी भीती होती.


यामुळे याबाबत सर्वप्रथम कर्मवीर काळे कारखान्याच्या सभासदांमार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत मेंढेंगिरी समितीचा अहवाल कालबाह्य झाल्यामुळे राज्य शासनाने ऑगस्ट 2023 मध्ये नवीन समितीची नेमणूक करुन उर्ध्व गोदावरी खोर्‍यातील पाणी वाटपाबाबत या समितीस सुधारित मार्गदर्शक तत्वे तयार करण्यास सांगितले. तो अहवाल येईपर्यंत जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेऊ नये, अशी जनहीत याचिका दाखल केली. यावर येत्या काही दिवसात निर्णय येणे अपेक्षित आहे. एकूण परिस्थितीचा विचार करून, नगर- नासिक जिल्ह्यातील आमदारांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा, असे आ. काळे यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री फडणवीस यांना पत्रात म्हटले आहे.


मागील दोन- तीन वर्षे नगर, नासिक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पाणी मुबलक होते, परंतु यंदा अपेक्षित पर्जन्यमान न झाल्याने सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती आहे. परतीच्या पावसाकडून अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली. कमी पर्जन्यमानामुळे शेती व्यवसायाचे भवितव्य धोक्यात आले आहेच, परंतु अशा बिकट परिस्थितीत धरणातून खाली पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यास पाण्याची अपव्यय होणारच आहे, परंतु भविष्यात जनावरांसह पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे आजवर सोसले, यापुढे सोसण्याची हिंमत राहिली नाही. आजवरचा अन्याय यापुढे होवू नये, यासाठी आ. काळे यांनी आमदारांची मोट बांधण्यास पुढाकार घेतला आहे.


लढाई लढत आहे..!




जायकवाडीला पाणी जावू नये, यासाठी कायदेशीर लढाई लढत आहे, परंतु वेळप्रसंगी जे शक्य असेल ते करणार आहे. पाणी खाली जाणार नाही याची काळजी घेवू, असे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.


हेही वाचा


Hardik Pandya Mantra : हार्दिक पंड्याने पुटपुटला ‘हा’ जादुई मंत्र! ‘स्वत:लाच शिवीगाळ करून..’


Mumbai News: पॅलेस्टाईन समर्थनार्थ निदर्शने, मुंबईत दोघांना अटक


कोल्‍हापूर : अंबाबाई मंदिरात घटस्थापनेने शारदीय नवरात्राैत्सवाला प्रारंभ


The post कोळपेवाडी : जायकवाडीस पाण्याविरुद्ध वज्रमूठ! आ. काळेंचा पुढाकार appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SxTg90

मोहटादेवी मंदिर नवरात्रोत्सवासाठी सजले !!

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर नवरात्र उत्सवा निमित्ताने मोहटादेवीच्या मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. देखण्या सुंदर रितीने मोहटादेवी मंदिराला वेगवेगळ्या रंगाची झगझगीत विद्युत रोषणाई केल्याने मंदिर आणि परिसर उजळून गेला आहे. गडावर येणाऱ्या रस्ताच्या दोन्ही बाजूने विद्युत रोषणाई केल्याने रात्री गडावर येणासाठी भाविकांना त्रास होणार नसून रस्तावर प्रखर असा उजेड पडला आहे. विद्युत रोषणाईमुळे देवीभक्तांना देवीचे मंदिर रात्रीच्या वेळी लांबवरून आकर्षित करणारी ठरणार आहे .


पहाटे आणि रात्रीच्या वेळी हि रोषणाई भाविक भक्तांना पाहावयास मिळत आहे. मोहटा देवीच्या मंदिरावर आकर्षक रोषणाई प्रमाणे मंदिर परिसरात कमी पाऊस झाला असला तरी मोहटा देवी देवस्थानने मंदिर व डोगर परिसरात लावलेली झाडे त्यांना पाणी देऊन जगवले आहे त्यामुळे ही झाडे हिरवीगार झाली असून या वृक्षामुळे मंदिर परिसर नटला गेला आहे. देवस्थाने आलेल्या भाविकांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचप्रमाणे ठीक ठिकाणी देवस्थान समिती, विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी,सामाजिक संघटना यांनी भाविकांच्या स्वागतेसाठी रस्त्यावर स्वागत कमानी तसेच स्वागताचे फ्लेक्स बोर्ड दिमाखात लावले आहेत.


 


 


The post मोहटादेवी मंदिर नवरात्रोत्सवासाठी सजले !! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SxRvlY

Good News ! सर्व ओबीसींना मिळणार घरे ; तीन वर्षांचे उद्दिष्ट मंजूर

नगर : पुढारी वृत्तसेवा :  मोदी आवास योजनेंतर्गत यादीमध्ये नावे असलेल्या 15 हजार ओबीसी, तसेच विशेष मागास प्रवर्गातील कुटुंबांना घरकुले मंजूर झाली आहेत. त्यामुळे पुढील तीन वर्षांत ‘सर्वांना घरे’ मिळणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यात 2023-24 मध्ये 4306 ओबीसींना आणि विशेष मागास प्रवर्गातील 50 कुटुंबांना घरकुले मिळणार असून, उर्वरित कुटुंबांनाही दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यात घरकुले दिली जाणार आहेत. त्यामुळे या योजनेचे स्वागत केले जात आहे. ‘सर्वांसाठी घरे-2024’ या शब्दपूर्तीसाठी ग्रामीण भागातील इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) कुटुंबांकरिता ‘मोदी आवास’ घरकुल योजना हाती घेण्यात आली आहे. 2011च्या सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय सर्वेक्षणात प्राधान्यक्रम यादीत ज्यांची नावे नव्हती, त्यांच्यासाठी ‘आवास प्लस’ सर्वेक्षण करण्यात आले होते. या यादीत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची नावे ‘ड’ यादीत घेतलेली होती. त्यानुसार ‘ड’ यादीतील लाभार्थ्यांना आता लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मात्र ओबीसी व विशेष मागास प्रवर्गासाठी शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.


ओबीसींसाठी पहिल्यांदाच स्वतंत्र योजना

घरकुल योजनेतून रमाई आवास योजना, शबरी आवास योजनांच्या माध्यमातून समाजातील मागासवर्गीय कुटुंबांना घरकुलाच्या स्वतंत्र योजना कार्यान्वित आहेत. मात्र ओबीसींसाठी स्वतंत्र योजना नव्हती. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात केंद्र व राज्य सरकारने ओबीसींसाठी ‘मोदी आवास घरकुल योजना’ सुरू केली. त्यानुसार घरकुलांच्या यादीतून ओबीसींची स्वतंत्र यादी तयार करण्यात आलेली आहे. त्या यादीत प्राधान्यक्रमानुसार लाभ दिला जाणार आहे.


अखेर हक्काची घरे

मोदी आवास योजना सुरू झाल्यानंतर पहिल्याच वर्षी जिल्ह्याला 4306 घरकुले मिळाली आहेत. आता 14 तालुक्यांत हे उद्दिष्ट वाटप केले जाणार आहे.


ओबीसी 14 हजार; सर्वसाधारण 165 कुटुंबे

जिल्ह्यातील ओबीसी सर्वेक्षणानुसार तयार केलेल्या यादीत 14354 कुटुंबे आहेत. यापैकी आता तीन वर्षांत या सर्व कुटुंबांना घरकुले मिळणार आहेत. तसेच सर्वसाधारणमध्ये 165 नावे आहेत. त्यांनाही तीन वर्षांत घरकुले मंजूर झाली आहेत. जिल्ह्यातील ओबीसींसाठी पहिल्या वर्षात 4360, तर विशेष मागास प्रवर्गासाठी 50 घरकुले उद्दिष्टे आली आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर सीईओंच्या मार्गदर्शनात योजनेची अंमलबजावणी केली जाईल.


हेही वाचा : 



* हमास-इस्रायल संघर्ष; राज्यभरातील ज्यू धर्मीयांची प्रार्थनास्थळे,वस्त्यांमधील सुरक्षेत वाढ

* Chandrasekhar Bawankule : बारामतीची जागा अजित पवारांना गेली तरी विजयासाठी काम करू; चंद्रशेखर बावनकुळे






The post Good News ! सर्व ओबीसींना मिळणार घरे ; तीन वर्षांचे उद्दिष्ट मंजूर appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SxQ0Gb

भाजपाच्या फसवेगिरीपासून सावध राहावे ; आमदार थोरातांचा तरुणांना सल्ला

संगमनेर विशेष : पुढारी वृत्तसेवा:  देशात व राज्यात भाजपाचे सरकार असून सोशल मीडियाच्या माध्यमातून भूलथापा देऊन ते युवकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. भाजपाच्या या फसवेगिरी पासून तरुणांनी सावध राहून राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहन आ. बाळासाहेब थोरात यांनी केले. कोळवाडे येथील नळ योजनेचे उद्घाटन व रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात आ.थोरात बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, मिलिंद कानवडे, कैलास पानसरे, विष्णू रहाटळ, काशिनाथ गोंदे, दशरथ वर्पे, संजय वामन, बाळासाहेब राहणे, भाऊसाहेब नवले, तुषार गुंजाळ, मंगेश वर्पे, दादासाहेब देशमुख, राजेंद्र देशमुख, अमोल वाकचौरे, सरपंच पुष्पा गुंजाळ, उपसरपंच बाबुराव गोंदे, सोपान वर्पे आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी आ. थोरात म्हणाले, की कोळवाडे गावातील आश्रम शाळे मधील विद्यार्थी मोठ मोठ्या शासकीय पदापर्यंत मजल मारतात म्हणून कोळवाडे गावाचे नाव राज्याच्या कानाकोपर्‍यात पोहोचले आहे. ही गोष्ट भूषणावह आहे. या गावांमध्ये अनेक विकास कामे झाली असून गावातील आदिवासी व सर्व घटकातील लोकांचे जीवनमान उंचावण्याचे काम झाले आहे.या गावाने कायम आपल्याला भक्कम पाठिंबा दिला आहे. तालुक्यातील कोळवाडे परिसरात सातत्याने रस्ते व विविध विकास कामांसाठी मोठा निधी मिळवून अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. नव्याने होणार्‍या नळ पाणीपुरवठा योजनेमुळे पुढील अनेक वर्षांची पिण्याच्या पाण्याची चांगली सुविधा होणार असल्याचे आ. थोरात यांनी सांगितले.


माजी आमदार डॉ.तांबे म्हणाले की, कोळवाडे गावाचे विकास कामांसाठी आमदार थोरात यांच्या माध्यमातून खूप काम झाले आहे. आदिवासी बहुजन समाजातील आपण लोक आहोत. आजच्या काळातील राजकारण म्हणजे सामान्य माणसाकडे लक्ष न देणे असे आहे. मुठभर उद्योगपतींसाठी हे सरकार काम करत आहे.आपल्याच पैशावर देशाचे उदरभरण चालते. आज आपल्या पैशावर उद्योगपतींची कामे चालतात. महागाई, बेरोजगारी, भाव वाढ यावर चर्चा न होण्यासाठी धार्मिक राजकारणाकडे लक्ष वेधण्याचे काम होत आहे. व्हाट्सअप, सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण पिढीला वाईट मार्गाला घेऊन जाण्याचे काम होत आहे. लोकशाहीची दिवसाढवळ्या हत्या करण्याचे काम हे सरकार करत आहे.


दशरथ वपेॅ म्हणाले की, कोळवाडे गाव नेहमीच आमदार थोरात यांच्या पाठीमागे भक्कम उभे राहिले आहे. आमदार थोरात यांनी या गावासाठी अनेक विकास कामे केली आहेत. येथील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केले आहे.पाण्याचा मोठा प्रश्न आ. थोरात यांच्या माध्यमातून मिटला आहे. रस्त्याचे कामही होत आहे. या गावासाठी अनेक शासकीय योजनांचा लाभ गोरगरीब लोकांना मिळाला आहे.


यावेळी वनिता साबळे, मंगल कुदळ, पोपट कडू ,श्रीपत कुदळ, मधुकर गोंदे, बबन घोडे, दत्तात्रय तारडे, मंगेश वपेॅ,योगेश गुंजाळ, गोरख कुदळ, विलास गुंजाळ आदीं उपस्थित होतेे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दशरथ वर्पे यांनी केलेे, सूत्रसंचालन दिलीप बाबळे व आभार कैलास गुंजाळ यांनी मानले. कार्यक्रमाकरिता गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


निळवंडेच्या कालव्यांमुळे परिसराला फायदा

निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून डावा कालवा पूर्ण झाला असून उजव्या कालव्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. उजव्या कालव्यामुळे कोळवाडे व परिसरात मोठी समृद्धी येणार असल्याचे मिलिंद कानवडे यांनी म्हटले आहे.


The post भाजपाच्या फसवेगिरीपासून सावध राहावे ; आमदार थोरातांचा तरुणांना सल्ला appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SxMTTx

I can't believe this Coca-Cola and EGG experiment

I can't believe this Coca-Cola and EGG experiment

Does Coke really do this to an egg? Let's test it out ===================================================== ➜ TheDadLab on Facebook: https://www.facebook.com/thedadlab/ ➜ TheDadLab on Instagram: https://www.instagram.com/thedadlab/ ➜ TheDadLab on Twitter: https://twitter.com/thedadlab ➜ TheDadLab on Pinterest: https://pinterest.com/thedadlab/ ➜ Website: https://thedadlab.com/ ===================================================== Please subscribe to see more upcoming videos http://bit.ly/ThedadlabOnYoutube
via YouTube https://www.youtube.com/watch?v=BrydDIXifRY

संगमनेरात दोन कत्तलखान्यांतून पोलि सांनी केले ३१०० किलो गोमांस जप्त

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघ चौरे यांच्या पथकाने छापा टाकून तब्बल ६ लाख २०हजार रुपये किमतीचे ३१००  किलो गोमांस आणि ५० हजार रुपये किमतीची ओमनी वाहन असा ६ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बहुचर्चित असलेल्या कत्तलखान्याच्या तीनही मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र पोलिस येण्याची चाहूल लागताच ते तीनही कत्तलखान्याचे मालक फरार झाले आहेत. संगमनेर शहरातील जमजम कॉलनी मध्ये सुरू असणाऱ्या बेकायदेशीर कत्तल खाण्यात गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची गुप्त माहिती खब-यामार्फत संगमनेर उपविभागाचे पोलीसउपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना समजली. त्यानंतर स्वतः पोलीस उपाधीक्षक वाघचौरे प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने शहराचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार तालुका महिला पोलीस निरीक्षक पल्लवी वाघ, पोलीस नाईक अनिल कडलग आणि शाम हासे आणि पशु वैद्यकीय अधिकारी यांच्यासह पथकाने थेट जमजम कॉलनी तील नवाज कुरेशी व जब्बार पटेल या दोघांच्या बेकायदेशीर चालणाऱ्या कत्तल खान्यांवर छापा टाकला.


संबंधित बातम्या :



* Nagar : हॉटेल सेलिब्रेशन मधील मारहाण आणि छेडछाड प्रकरणी अखेर गुन्हे दाखल

* Nagar Crime News : ग्रामसेवकास मारहाण करणा-यास ३ महीने सश्रम कारावास

* Nagar News : ‘नगररचना’त आता नाही राहिला ‘राम’






पोलिसांनी या कत्तलखान्यातून १ लाख ८० हजार रुपये किमतीचे कापून ठेवलेले २ हजार ९०० किलो गोमांस तसेच ५० हजार रुपये किम तीची हिरव्या रंगाची ओमनी कार असा २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी त्याच कॉलनीत बेकायदेशीरित्या सुरू असणाऱ्या वहीद कुरेशी याच्या कत्तलखान्यावरती छापा टाकला असता पोलिसांनी ४ लाख रुपये किमतीचे कापून ठेवलेले २००० किलो गोमांस जप्त केले. याबाबत उपविभागीय पोलीस अधि कारी कार्यालयातील पोलीस नाईक शामराव हासे यांनी संगमनेर शहरात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी बेकायदेशीर कत्तलखाना चालवणारा नवाज कुरेशी, जब्बार पटेल, आणि वाहिद कुरेशी राहणार संगमनेर या तिघांवरती गो हत्या बंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र कारवाईची माहिती समजतात हे तिघेही घटनास्थळावरून फरार झाले याबाबतचा अधिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करत आहे.


The post संगमनेरात दोन कत्तलखान्यांतून पोलि सांनी केले ३१०० किलो गोमांस जप्त appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SxJjFP

Nagar News : शिवसैनिकांनी रस्त्याचे काम पाडले बंद

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : शिवसैनिकांनी रात्रीचा रस्त्याचा खेळ बंद पाडला आहे. रात्री रस्त्याचे काम सुरू असल्याची खबर मिळताच शिवसेना शिंदे गटाच्या शिवसैनिक रस्त्यावर जमा होत त्यांनी सुरू असलेले काम बंद पाडले. तर, रात्री काम करण्याचा कोणता हेतू आहे, याचा जाब दुसर्‍या दिवशी सोमवारी (दि.9) अधिकार्‍यांना विचारला. गेल्या आठ महिन्यांपासून शेवगाव-तिसगाव राज्यमार्गातील शहर बसस्थानक ते भगूर असे काम सुरू होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला होता. या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले होते. तसेच, रस्त्यावर धुळीचे साम्रज्य होते. यामुळे वाहनचालकांना अनेक व्याधी बळावल्या असून, याबाबत शिवसेना शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. तर, मागील आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अधिकार्‍यांना घेरावा घातलात संताप व्यक्त केला होता. हे सर्व लक्षात घेता रविवारी (दि.8) रात्रीच आंबेडकर चौक येथून कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, याची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक रात्री त्यांनी हे काम बंद पाडले.


दुसर्‍या दिवशी सोमवारी (दि.9) सकाळी संतप्त शिवसैनिक व व्यापार्‍यांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या देऊन अधिकार्‍यांना धारेवर धरले. थातुर-मातुर काम करण्यासाठी रात्री काम करण्याची वेळ निवडल्याचा आरोप करत उपविभागीय अभियंता प्रल्हाद पाठक यांच्या समवेत कामाची पाहणी करून तहसील कार्यालय ते बसस्थानक हा रस्ता करावा, काही ठिकाणी फक्त खड्डे बुजविण्याचा देखावा करू नये, अशी मागणी केली. यावेळी जिल्हा युवा सेना प्रमुख साईनाथ आघाट, तालुका प्रमुख आशुतोष डहाळे, शहरप्रमुख विशाल परदेशी, अनिकेत पोटफोडे, जयकिसन बलदवा, संजय म्हस्के, मोसिन शेख, सुचेत भालसिंग, मनिष बाहेती, मुकुंद पलोड, अक्षय बाहेती, बाळू भंडारी, प्रकाश तिवारी, वैभव लांडे, दत्तात्रय फुंदे आदी उपस्थित होते.


‘तपासणीसाठी घेतले डांबराचे नमुने’

गत आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी क्वॉलिटी कंट्रोल मार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी शेवगाव- पैठण रस्त्याची शेवगाव बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता शैलेश साबळे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पाहणी केली. डांबर नमुने तपासणीसाठी जमा केले. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, तालुकाध्यक्ष अशोक भोसले, अमोल देवढे, हरिभाऊ कबाडी, विकास साबळे, नारायण पायघन, रामेश्वर शेळके, लक्ष्मण पालवे, वसंत गायके, पंडित थोरात आदी उपस्थित होते.


The post Nagar News : शिवसैनिकांनी रस्त्याचे काम पाडले बंद appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SxG5rd

प्रशासकामुळे 50 कोटींना ब्रेक..!

नगर : पुढारी वृत्तसेवा : मुदत संपलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर सध्या प्रशासक नियुक्त आहेत. त्यामुळे संबंधित संस्थांना दर वर्षी मिळणारा 15 व्या वित्त आयोगाचा निधी रोखण्यात आलेला आहे. नगर जिल्हा परिषदेतही प्रशासक असल्याने गेल्या दोन वर्षातील बंधित आणि अबंधितचा निधी न मिळाल्याने जिल्ह्याला सुमारे 50 कोटींचा फटका बसला आहे. केंद्र शासनाच्या 15 व्या वित्त आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्ह्याची लोकसंख्या आणि क्षेत्रफळाचा आधार घेऊन बंधित आणि अबंधित या दोन प्रकारात निधी दिला जातो. या निधीतून ग्रामपंचायत 80, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रत्येकी 10-10 टक्के निधीचे वाटप केले जाते.


आराखडे कागदावरच!

21 मार्च 2022 पासून जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. 14 पंचायत समितीतही प्रशासकच आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला मिळणारे 10-10 टक्केचा निधी शासनाने थांबविलेला आहे. हा निधी मिळत नसल्याने 15 व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीने तयार केलेले विकास आराखडे कागदावरच आहे. दोन वर्षांपासून झेडपीतून फक्त कोट्यवधीचे आराखडे तयार असून, पैसे नसल्याने सर्व कामे प्रलंबित आहेत. सन 2022-23 या आर्थिक वर्षात बंधित आणि अबंधितचे चार टप्प्यात अनुदान आले. मात्र या वर्षात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला एक रुपयाही आलेला नाही. उलट ग्रामपंचायतींना 80 टक्के निधी वेळोवेळी प्राप्त झालेला आहे. या वर्षीचा पहिला हप्ताही मिळाला नाही


जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला प्रत्येकी 24 कोटी 28 लाख 46 हजार 760 असा एकूण 49 कोटींचा फटका बसला आहे. तसेच दोन दिवसांपूर्वीच 2023-24 मधील पहिला हप्ता ग्रामपंचायतींना प्राप्त झाला, मात्र येथेही झेडपी व पंचायत समितीला निधी आलेला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे 50 कोटींपेक्षा अधिक निधी हा शासनाकडे देय असल्याचे पुढे आले आहे.


 हेही वाचा : 



* Manoj jarange : अन्यथा सरकारला जागा दाखवून देणार : मनोज जरांगे पाटील

* Heramb Kulkarni: सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला






The post प्रशासकामुळे 50 कोटींना ब्रेक..! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SxCX4c

Crime news : जुन्या वादाचा राग अन् मित्रानेच मित्राला संपविले !

नगर : पुढारी वृत्तसेवा :  मित्र आपल्या जिवलग मित्रासाठी जीव देण्याच्याही आणाभाका घेतात. परंतु, मित्रानेच जुन्या वादाचा राग मनात धरून मित्राचा खून केल्याची घटना श्रीरामपूर शहरातील संगमनेर रस्त्यावर बुधवारी (दि.4) सायंकाळी घडली. स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासांच्या आत दोन संशयितांना ताब्यात घेऊन गुन्ह्याची उकल केली. डोक्यात फरशीचे घाव घालून खून करणार्‍याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अशोक ऊर्फ बाबूरामा साळवे (रा. नॉर्दन ब्रँच, श्रीरामपूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला पिंपरी चिंचवड (पुणे) येथून अटक केली. शाहरुख ऊर्फ गाठण उस्मान शाह (रा.सुभेदारवस्ती, श्रीरामपूर) हा बुधवारी सायंकाळी संगमनेर रस्त्यावर ओळखीच्या तीन ते चार लोकांसोबत बसलेला होता. त्या ठिकाणी शाहरुख व अशोक या दोघांमध्ये किरकोळ वाद झाले.


त्यानंतर अशोक याने बाजूला पडलेल्या फरशीने शाहरुखच्या डोक्यात घाव घालून खून केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तपास हाती घेताच काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याच्या सूचना पथकाला दिल्या. त्यानंतर मयत शाहरुखच्या कुटुंबीयांकडून पोलिसांना माहिती मिळाली की, काही दिवसांपूर्वी शाहरुख याचे अशोक साळवेबरोबर वाद झाले होते. त्यामुळे अशोक साळवेवर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अशोकचे लोकेशन ट्रेस केले व त्याला पिंपरी चिंचवडमधून चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे देत पोलिसांची दिशाभूल केली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.


हेही वाचा :



* मराठा-धनगर समाज समदुःखी : मनोज जरांगे 

* Nagar : Good News ! प्रवाशांच्या सेवेसाठी नवीन 10 ‘हिरकणी’






The post Crime news : जुन्या वादाचा राग अन् मित्रानेच मित्राला संपविले ! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/Sx8D7J

Day 11/75- Reel 2 #75historyhardchallenge #ganpati

Day 11/75- Reel 2 #75historyhardchallenge #ganpati


via YouTube https://www.youtube.com/watch?v=46stQUSNQCo

‘डायल 112’ची कामगिरी लय भारी! दीड वर्षात 60 हजार तक्रारी

नगर : कौटुंबिक कारणातून झालेल्या वादाच्या घटना असो किंवा खून, खुनी हल्ला, चोरी, रस्ता लूट, दंगल अशी कोणतीही घटना असो माहिती तत्काळ मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी धाव घेतात. गुन्हा कोणताही असो तो रोखण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेली पोलिसांची 112 हेल्पलाइन 24 तास अलर्ट असते. या क्रमांकावर गेल्या दीड वर्षात तब्बल 60 हजार 588 तक्रारी (फोन कॉल) प्राप्त झाल्या असून, काही सेकंदात संबंधित पोलिस ठाण्याला अलर्ट पोहोचला आहे. एकंदरीतच ‘डायल 112’ नागरिकांसाठी देवदूतच ठरत आहे. नागरिकांची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. ‘खाकी’ आपले कर्तव्य दक्षतेने पार पाडत असतानाही अनेक गुन्हे घडतातच. एखाद्या ठिकाणी कोणती अनुचित घटना घडत असल्यास पोलिसांना तत्काळ माहिती मिळाली तर पुढील अनर्थ टळतो. पोलिसांची मदत लवकर पोहोचल्यास अनेक गंभीर गुन्हे टळले असून, आरोपीही पोलिसांच्या हाती लागले आहेत. यामध्ये पोलिसांची 112ची यंत्रणा मोलाची भूमिका बजावत आहे.


संबंधित बातम्या :



* Nagar News : 49 गावांतील शाळांच्या मैदानात शिक्षण-क्रीडा विभागाचा खो-खो

* Nagar News : पुलासाठी विद्यार्थ्यांचा मुख्याधिकार्‍यास घेराव

* Nagar News : ‘बीटीआर’मधून सुटलेली गोळी तरुणाच्या डोक्यात






केंद्र सरकारकडून 112 ही यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर नगर पोलिस दलात 20 सप्टेंबर 2021 पासून हा मदत क्रमांक सुरू करण्यात आला. पोलिस अधीक्षक कार्यालयात त्यासाठी स्वतंत्र व सुसज्ज अशी वॉररूम तयार करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांतून असंख्य कॉल 112ला प्राप्त होत असतात. दिवसाला 100 ते 120 कॉल डायल 112वर येतात. हे कामकाज तीन शिफ्टमध्ये चालते. दहा संगणकांच्या माध्यमातून पोलिस कर्मचारी 24 तास जिल्ह्यातून येणार्‍या प्रत्येक कॉलला तत्काळ प्रतिसाद देत असतात.


काम कसे चालते?

डायल 112 चे महाराष्ट्रात मुख्य केंद्र मुंबई (प्रायमरी कॉल सेंटर) व नागपूर (सेकंडरी कॉल सेंटर) येथे आहे. डायल 112 चे सॉफ्टवेअर महिंद्रा डिफेन्स कंपनीने तयार केले आहे. 112 वर कोणी कॉल केल्यानंतर तो कॉल एकाच वेळी मंबई व नागपूर केंद्रावर जातो. कॉल करणार्‍या व्यक्तीचे नाव, लोकेशन माहिती सॉफ्टवेअर लगेच देते. त्यानंतर जिल्हा पोलिस विभागाच्या युनिटला ही माहिती संगणकाद्वारे जाते. त्यानंतर ही माहिती घटनास्थळाच्या जवळ असलेल्या पोलिस ठाण्याला दिली जाते. मॅन्युअल डाटा ट्रान्सफर (एमडीटी) या मशिनच्या आधारे पोलिस घटनास्थळी पोहोचतात व घडणारे गुन्हे रोखतात.


डायल 112 का?

मदत क्रमांकासाठी 112 या आकड्याचीच निवड का केली, याचेही कुतूहल काहींना असते. संकटात असलेल्या व्यक्तीजवळ मोबाईल असो किंवा टेलिफोन त्यावर असलेल्या आकड्यांच्या रचनेनुसार जवळील आकडे लवकर दाबता यावेत, यासाठी 112 ची निवड झाल्याचे पोलिस उपनिरीक्षक अंबादास हुलगे यांनी ‘पुढारी’ला सांगितले.


अशी आहे डायल 112ची टीम

नगर पोलिस मुख्यालयात असलेल्या डायल 112 च्या वॉररूमचे इन्चार्ज म्हणून पोलिस उपनिरीक्षक अंबादास हुलगे काम पाहतात. त्यांच्या मदतीला उपनिरीक्षक संजय सोनवणे, हवालदार कन्हैया मगर, तुप्ती विघ्ने, मनीषा भारती, आशा वाघ, सुजाता वाघ, कविता साठे, दीपाली मते, कविता पैठणकर, नंदिनी झिंजे, पूनम यादव हे पथक 24 तास काम करीत असते. तसेच तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी अभियंता विजय घोलप व संतोष रसाळ हे मदत करतात.


The post ‘डायल 112’ची कामगिरी लय भारी! दीड वर्षात 60 हजार तक्रारी appeared first on पुढारी.


http://dlvr.it/Sx6TDQ

नगर : दुर्दैवी घटना; तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन भावंडांचा मृत्यू

जामखेड; पुढारी वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथून भुमकडे जाणाऱ्या हैदराबाद राष्ट्रीय महामार्गा लगत व अंतरवाली शिवारात असलेल्या एका पाझर तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुले व एका मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, एका वाटसरूच्या धाडसामुळे यातील मुलांच्या आईचा जीव वाचवण्यात यश आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे खर्डा व परिसरावर शोककळा पसरली आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज (दि. ५)दुपारी १: ०० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत दहावीत शिक्षण घेत असलेला कृष्ण परमेश्वर सुरवसे (वय १६ वर्षे) व दिपक ज्ञानेश्वर सुरवसे (वय १६ वर्षे) तर आठवीत शिक्षण घेत असलेली सानिया ज्ञानेश्वर सुरवसे (वय १४ वर्षे) हे दोन सख्खे भाऊ-बहिण असे तिघे जण यामधे मयत झाले.


या घटनेत सुरूवातीला पाय घसरून पडल्याने मुलगी पाण्यात बुडू लागली. तीला वाचवण्यासाठी दोन्ही मुलं पाण्यात उतरली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तीही बुडू लागली. त्या तिघांना वाचवण्यासाठी यातील मुलांची आईही पाण्यात उतरली मात्र तीही बुडत असताना तीने आरडाओरडा केल्याने रस्त्यावरून जाणारे असून भुम तालुक्यातील गिरगाव येथील सरपंचांनी केलेल्या धाडसामुळे या मुलांना वाचवण्यासाठी पाण्यात जाऊन बुडू लागलेल्या महिलेचा जीव मात्र वाचला आहे. सदर दुर्घटना ग्रस्त कुटुंबातील मयत व्यक्तीचे सुतक काढण्यासाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या या परिवारासच सुतक पडले आहे.


तीनही मयत मुलांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज खराडे यांनी केले असून अंत्य संस्कारासाठी मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आले तर खर्डा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आ. रोहित पवार यांनी दुर्घटना ग्रस्त कुटुंबाला आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.


या घटनेत खर्डा गावचे माजी उपसरपंच भागवत सुरवसे, श्रीकांत लोखंडे , ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलकरे, महालिंग कोरे , वैभव जमकावळे ,वडार समाज संघटनेचे अध्यक्ष बबलु सुरवसे, बबलू गोलेकर , गणेश ढगे , योगेश सुरवसे ,सुहास मदने, तेजस चावणे, योगेश वाळुंजकर ,सागर पवार, मंगेश देशमाने, जुनेद शिलेकर, लखन नन्नवरे, बिभीषण चौघुले, मयुर डोके, बाबासाहेब डोके, विशाल मुरकुटे यांची मोठी मदत झाली. खबर देणारे खर्डा येथील रहिवासी व दुर्घटना ग्रस्त मुलांचे नातेवाईक बिभीषण नामदेव चौघुले यांनी दिलेल्या खबरीवरून जामखेड पोलीस स्टेशनला सी. आर. पी. सी. १७४ प्रमाणे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


या आकस्मात मृत्यूच्या आकस्मात नोंदी जामखेड पोलीसात दाखल करण्यात येऊन हा तपास झिरो नंबरने आंबी पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती जामखेड पोलीसांकडून मिळाली आहे.


The post नगर : दुर्दैवी घटना; तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन भावंडांचा मृत्यू appeared first on पुढारी.


http://dlvr.it/Sx45rZ

नगर सराफ बाजार चोरी प्रकरण ; त्या वेळी पोलिस साखरझोपेत होते!

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील सराफ बाजारातील वर्मा ज्वेलर्स हे दुकान फोडून चोरट्यांनी रविवारी पहाटे साडेचोवीस लाखांचा ऐवज लुटला, त्या वेळी घटनेनंतर कोतवाली पोलिस अवघ्या चार मिनिटांत घटनास्थळी पोहचले. कंट्रोल रूमला माहिती दिली. कंट्रोल रूमनेही लागलीच सर्व पोलिस ठाण्यांना अलर्ट दिला. मात्र, चोरटे नगर-मनमाड रस्त्याने एका कारमधून येवल्याला (जि. नाशिक) पोहोचले. मग अल्ट मिळूनही या मार्गावर नगर जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या सात पोलिस ठाण्यांनी नाकाबंदी का केली नाही? आणि नाकाबंदी केली असेल तर चोरटे का अडकले नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत ‘पहाटेची वेळ असल्याने, त्या वेळी पोलिस साखरझोपेत होते’ अशी मिश्किल टिप्पणी नागरिक करत आहेत.


संबंधित बातम्या : 



* Sushama Andhare : शासनाकडे गुवाहाटीला जायला पैसे पण, हॉस्पिटलसाठी नाही ; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

* Jitendra Awhad : आम्हाला वाईट वाटण्याचे कारण नाही, अजित पवार आमचेच: जितेंद्र आव्हाड

* Pune News : खेडमधील 25 गावांत वाजणार दिवाळीपूर्वी फटाके






सराफ व्यावसायिक संतोषवर्मा यांचे ‘वर्मा ज्वेलर्स’ या सराफ बाजारातील दुकानात रविवारी पहाटे साडेचार वाजता चोरी झाली. चोरटे कारमधून पसार झाले. त्याच वेळी कोतवाली पोलिस नियमित गस्तीवर असताना चोरट्यांच्या संशयित हालचालींबाबत त्यांना एका खासगी सुरक्षारक्षकाने माहिती दिली. पोलिस तातडीने ‘वर्मा ज्वेलर्स’ येथे पोहोचले. चोरटे तेथून जाऊन अवघे चार-पाच मिनिटे झाले होते. चोरी आणि चोरट्यांबाबत पोलिसांनी तातडीने कंट्रोल रूमला माहिती दिली आणि वर्मा यांनाही कळविले. पुढे कंट्रोल रूमने सर्व पोलिस ठाण्यांना या चोरीबाबत आणि चोरटे पळून गेल्याच्या दिशेबाबत अलर्ट दिला. मात्र चोरटे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन नाशिक जिल्ह्यातील येवल्याला पोहोचले, तरी कोणत्याही ठाण्यातील पोलिसांच्या कथित नाकाबंदीत ते अडकले नाहीत.


येवल्याजवळ सापडलेल्या त्यांच्या कारमुळेे, ते नगर-मनमाड महामार्गानेच गेले असणार हे स्पष्ट असून, या मार्गावर असलेल्या जिल्ह्यातील सात पोलिस ठाण्यांंना अलर्ट मिळाला नव्हता का, असेल, तर त्यांना नाकाबंदी केली नाही का, असे प्रश्न उपस्थित होत आहे.

सराफ बाजारातील ही चोरी परिसरातील अन्य दुकानांबाहेरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमध्ये कैद झाली. पहाटे 4.21 वाजता चोरांनी दुकान फोडण्यास सुरुवात केली आणि अवघ्या आठ मिनिटांत म्हणजे 4.29 वाजता चोरटे घटनास्थळावरून पसारही झाले, हे या सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट होते. विशेष म्हणजे चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण साठविणारा ‘डीव्हीआर’ही काढून नेला. यावरून त्यांनी पोलिसांच्या तांत्रिक तपासाचा अभ्यास करून ही चोरी केल्याची शक्यता व्यक्त होत आहे.


दुकान फोडण्याआधी या चोरट्यांनी रात्री दोन वाजता कारमधून सराफा बाजारात एक फेरफटका मारल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आधी रेकी करून ही चोरी झाल्याचे दिसते. दरम्यान, चोरांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दिनेश आहेर यांची दोन आणि कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची तीन पथके रवाना झालेली आहेत.


‘या’ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून चोरटे पसार

नगर-मनमाड रस्त्यावर कोपरगावपर्यंत जिल्ह्यातील सात पोलिस ठाण्यांची हद्द येते. यात तोफखाना, एमआयडीसी, राहुरी, लोणी, राहाता, शिर्डी, कोपरगाव ही पोलिस ठाणी आहेत. कंट्रोल रूमने वायरलेसवर सराफा बाजारातील चोरीचा मेसेज दिला होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी कार्यतत्परता दाखवून नाकाबंदी केली असती तर चोरांना तत्काळ पकडता आले असते, असे म्हटले जात आहे.


सराफा असोसिएशनने घेतली एसपींची भेट

दरम्यान, मंगळवारी अहमदनगर जिल्हा सराफ सुवर्णकार संघटनेच्या शिष्टमंडळाने एसपी राकेश ओला यांची भेट घेऊन गुन्ह्याचा तपास जलदगतीने करून चोरांना अटक करण्याची मागणी केली. सराफा बाजारात दिवसा व रात्री पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी केली. यावेळी संतोष वर्मा, गणेश शेवंते, ओमप्रकाश सहदे, राजकुमार सहदेव, गोविंद वर्मा, गोपाल वर्मा, दिपक भवन, प्रकाश लोळगे आदींचे शिष्टमंडळ एसपींना भेटले.


The post नगर सराफ बाजार चोरी प्रकरण ; त्या वेळी पोलिस साखरझोपेत होते! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/Sx1Yqs

शिष्यवृत्ती परीक्षा : 20 हजार विद्यार्थ्यांचा ऑनलाईन डेमो

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीमध्ये झेडपी शाळांतील जास्तीत जास्त विद्यार्थी यावेत, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी ऑनलाईन चाचणी परीक्षेची संकल्पना राबविली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील इयत्ता पाचवी मराठी माध्यमाच्या 12630, उर्दू माध्यम 900 व इयत्ता 8 वी च्या 6540 अशा सुमारे 20 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन चाचणी परीक्षा दिली. महिन्यात शिकविलेले घटक विद्यार्थ्यांना कितपत समजले यासाठी फक्त शिकविलेल्या घटकांवर आधारित ऑनलाईन चाचणी घेवून त्यांचे मूल्यमापन करण्याची संकल्पना शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी मांडली व त्यानुसार विद्यार्थ्यांचे पालक घरी असताना पालकांच्या मोबाईलवरून विद्यार्थ्यांना टेस्ट सोडविता यावी यासाठी टेस्टचा कालावधी 30 सप्टेंबर रोजी रात्री 7:30 ते 9 व 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते 9:30 असा सोयीचा ठेवण्यात आला होता. या परीक्षेचा निकालही ऑनलाईन संकेतस्थळावर घोषित केला आहे.


अशा प्रकारे ऑनलाईन परीक्षा घेवून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासास चालना देणारी नगरची जिल्हा परिषद राज्यात पहिली ठरली आहे. जिल्हा परिषद संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या सरावासाठी अगोदरच इयत्ता 5 वी व 8 वी च्या प्रत्येकी 30 ऑनलाईन टेस्ट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.परीक्षा यशस्वीतेसाठी शिष्यवृत्ती विभाग प्रमुख विस्तार अधिकारी श्रीमती मनीषा कुलट, विस्तार अधिकारी श्रीम.जयश्री कार्ले, तंत्रस्नेही शिक्षक बाबासाहेब पवार, मिलिंद जमादार, तसेच जिल्हा आयटी समन्वयक रवि भापकर यांनी विशेष परिश्रम घेतले.तसेच प्रश्नसंच निर्मिती कामी सचिन शिंदे, सतीश भालेकर, विजय गुंजाळ, अफसाना तांबोळी,मीना निकम,,अंजुम तांबोळी, शेख जमीर अहमद याकूब, डी.डी चव्हाण निलेश थोरात, भागिनाथ बडे, नामदेव धायतडक, रामकिसन वाघ या शिक्षकांचे सहकार्य लाभले.


महिन्यानिहाय ऑनलाईन डेमोनंतर डिसेंबर महिन्यापासून सर्व अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट घेण्यात येणार आहे. यातून निश्चित जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या सरावाचा फायदा होणार आहे. यासाठी शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सरावाचा फायदा करून द्यावा.

                                          -भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी


The post शिष्यवृत्ती परीक्षा : 20 हजार विद्यार्थ्यांचा ऑनलाईन डेमो appeared first on पुढारी.


http://dlvr.it/Swyy71

Nagar News : इथं मरणानंतर ही मरण यातना संपेनात !

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील बाबुळगावला स्मशानभूमी नाही. यामुळे ‘इथं मरणानंतर ही मरण यातना संपेनात’ अशीच घटना या गावात घडली आहे. आज भर पावसामध्येच रस्त्यावर अंत्यविधी करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. ‘कोणी स्मशानभूमी देता का?’ असे म्हणन्याची वेळ नागरिकांवर आली आहे. ग्रामपंचायतीची गायरान जमीन ज्या परिसरामध्ये आहे, तिचे वाटप अन्य नागरिकांना झाल्यामुळे तेही त्या परिसरामध्ये नागरिकांसाठी स्मशानभूमी होऊ देत नाहीत. यामुळे गावामध्ये प्रत्येकवेळी अंत्यविधी कोठे करायचा असा गंभीर प्रश्न निर्माण होतो. ज्या नागरिकांना स्वतःची शेतजमीन आहे, ते त्या परिसरामध्ये स्व:मालकीच्या जमिनीत अंत्यविधी करत आहेत.


मात्र, गावातील अन्य गोरगरीब नागरिकांना मात्र स्मशानभूमी अभावी चांगलेच हाल होत आहेत. मरणानंतर देखीलही या गावातील नागरिकांच्या मरण यातना संपत नसल्याचे दुर्दैवी चित्र पाहावयास मिळत आहे. एका व्यक्तीचे निधन झाल्याने आज अशाच पद्धतीने त्यावर अंत्यविधी करण्याची वेळ आली. गावामध्ये स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यविधी कोठे करावयाचा असा प्रश्न निर्माण झाला. अखेर भर पावसामध्ये रस्त्यावर उघड्यावर मिळेल त्या जागेमध्ये अंत्यविधी करण्याचा दुर्दैवी प्रसंग नागरिकांवर ओढवला.


स्मशानभूमी नसलेले गाव

कर्जत तालुक्यातील बाबुळगाव खालसा येथे स्मशानभूमी नाही. गावांमध्ये स्मशानभूमी बांधण्यासाठी जागा शिल्लक नाही. आणि नागरिक खासगी जागा देण्यास तयार नाहीत. यामुळे हे गाव स्मशानभूमी नसलेले गाव आहे.


हेही वाचा :



* Nagar news : अखेर टंचाई आराखड्याची मुदत संपल्याने टँकर बंद!

* Nagar Crime news : सराफ दुकान फोडून 24 लाखांची चोरी






The post Nagar News : इथं मरणानंतर ही मरण यातना संपेनात ! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SwwNYP

30M view on Instagram 😍 | Only 3d drawing | repost video #art #drawing #shorts

30M view on Instagram 😍 | Only 3d drawing | repost video #art #drawing #shorts

Only 3d note drawing 😄 #3d #realistic #drawing
via YouTube https://www.youtube.com/watch?v=26aW37Q40CI

जामखेड : वीजबील अपडेट करण्याच्या बहाण्याने शेतकऱ्याची ५ लाखांची ऑनलाईन फसवणूक

जामखेड; पुढारी वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील बोर्ले येथील एका शेतकऱ्याला एका अनोळखी व्यक्तीने फोन करून महावितरण कार्यालयातून बोलत आहे, असे सांगत तुमचे वीजबिल सिस्टीममध्ये अपडेट झालेले नाही. ते करण्यासाठी मोबाईलमध्ये ‘क्विक सपोर्ट’ नावाचे ॲप डाऊनलोड करायला सांगत त्यांच्या मोबाईलचा अक्सेस घेत त्यांच्या बँक खात्यातून ५ लाख ३४ हजारांची रक्कम काढून घेत ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.


याबाबत भारत नारायण काकडे (वय ५९, रा. बोर्ले, ता. जामखेड) यांनी शुक्रवारी (दि. २९) नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फसवणुकीची ही घटना तीन महिन्यापुर्वी म्हणजे २ जून ते १२ जून या कालावधीत घडली आहे. फिर्यादी काकडे यांना अज्ञात व्यक्तीने त्याच्या ९८८३९७४६७९ या मोबाईल वरुन फोन करत आपण ‘महावितरण’ मधून बोलत आहोत आपले लाईट बील सिस्टींममध्ये अपडेट झालेले नाही, ते अपडेट करुन घेवू, असे सांगत भारत काकडे यांना क्विक सपोर्ट नावाचे ऑप मोबाईलमध्ये डाऊनलोड करायला सांगितले. फिर्यादीने ते ॲप डाऊनलोड केल्यानंतर सदरील व्यक्तीने त्यांच्या मोबाईलचा अ‍ॅक्सेस घेत त्यांच्या


आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून ५ लाख ३४ हजार रुपये एवढी रक्कम ऑनलाईन काढून घेतली. यानंतर देखील काकडे यांच्या निदर्शनास ही बाब लवकर आली नाही. जेव्हा त्यांना आपली फसवणूक झाली आहे, असे समजले तेव्हा त्यांनी जामखेड पोलिसांशी संपर्क साधत माहिती दिली. मात्र फसवणूक झालेली रक्कम ५ लाखांपेक्षा जास्त असल्याने जामखेड पोलिसांनी त्यांना नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी (दि. २९) दुपारी नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भा.दं.वि.क. ४१९, ४२० सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय सोनवणे हे करीत आहेत.


अलीकडच्या काळात आपण अनेक गोष्टींसाठी ऑनलाईन पेमेंट करण्याला प्राधान्य देतो. ऑनलाईन पेमेंट करणे सुलभ असले तरी सायबर गुन्हेगारांची कायमच अशा प्रकारच्या व्यवहारांवर नजर असते आणि ते विविध मार्गांनी लोकांची फसवणूक करतात. आता वीज बिलाच्या नावाखाली सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करत असल्याच्या घटना घडत आहेत. सायबर भामट्यांनी आता महावितरणची ऑनलाइन बिले भरण्याच्या नावाखाली ग्राहकांची लूट सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आपली फसवणूक टाळावी असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.


The post जामखेड : वीजबील अपडेट करण्याच्या बहाण्याने शेतकऱ्याची ५ लाखांची ऑनलाईन फसवणूक appeared first on पुढारी.


http://dlvr.it/Swsry6

लोणी : ‘समन्यायी’च्या पापाची जबाबदारी तुमचीच; मंत्री विखेंची टीका

लोणी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : समन्यायी पाणी वाटप कायद्याचे विधेयक सभागृहात मांडून जिल्ह्याचे हक्काचे पाणी सोडण्यास समर्थन देणारेच आज पाणी सोडण्यास विरोध केल्याची भाषा करु लागले असले तरी, जिल्ह्याच्या मानगुटीवर बसविलेल्या या कायद्याच्या पापाची जबाबदारी तुम्हाला टाळता येणार नाही अशी परखड टीका महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील केली.


पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची 74 वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन कैलास तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, प्रवरा बॅकेचे चेअरमन डॉ.भास्करराव खर्डे, ट्रस्क सोसायटीचे चेअरमन नंदु राठी, व्हा.चेअरमन सतिष ससाणे, मच्छिंद्र थेटे उपस्थित होते. या सभेत कारखान्याच्या वतीने विकसीत करण्यात आलेल्या प्रवरा किसान अ‍ॅपचे विमोचन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सर्व विषयांना सभेने एकमताने मंजुरी दिली.


मंत्री विखे पाटील म्हणाले की, यंदा धरणं भरली असली तरी पावसाची चिंता संपलेली नाही. मराठवाड्याला पाणी देण्याबाबतची टांगती तलवार आपल्यावर कायम आहे. ज्यांनी समन्यायी पाणी वाटप कायद्याचे भूत जिल्ह्याच्या मानगुटीवर बसविले तेच आता मी पहिल्यांदा विरोध केल्याची भाषा बोलू लागले आहेत याचे आश्चर्य वाटते. परंतू पाणी सोडण्याला तुम्ही समर्थन दिले हा इतिहास का विसरता? असा सवाल करुन, जाणत्या राज्याच्या उपस्थितीत पाणी सोडण्यास दिलेल्या मान्यतेचे दाखले त्यांनी सभेत सभासदांना दाखविले.


तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यासाठी 50 हजार कोटी रुपयांच्या नदीजोड प्रकल्पाला तत्वत: मान्यता दिली होती. पश्चिम वाहीनी नद्यांचे पाणी गोदावरी तुटीच्या खोर्‍यात येण्याचा मार्ग सुकर झाला होता. परंतू आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात हेच मंत्री होते परंतू त्यांनी याबाबत चकार शब्दही काढला नाही, याबाबत कधी एक विधानही केले नाही. तेच आता समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या बाबतीत विरोधाची भाषा बोलू लागले आहेत.


केंद्र सरकारच्या माध्यमातून सहकारी साखर कारखानदारीला स्थैर्य देण्याचे मोठे काम होत आहे. शेतकर्‍यांच्या जीवनात सरकारच्या धोणामुळे अमुलाग्र बदल होत आहेत, केंद्र सरकारने कारखान्यांवरील इनकमटॅक्सचा बोजा माफ करण्याचा निर्णय केल्यामुळेच ऊस उत्पादक शेतकर्‍यांना आज जादा भाव देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 15 वर्षे जाणते राजे केंद्रात मंत्री होते, परंतू फक्त शिष्टमंडळाच्या चकरा सुरु होत्या. देशात प्रथमच सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर हे प्रश्न निकाली निघत आहेत.


डॉ. विखे पाटील कारखान्यानेही आता यंदाच्या वर्षापासून ज्यूस पासून इथेनॉल तयार करण्याचा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. राज्यात असा प्रकल्प करणारा आपला कारखाना पहिला असून, सहकारात ही नवी क्रांती ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी उपरोधीक भाषण करुन, विरोधकांना शालजोडे मारले. ज्यांचे एक रुपयांचे योगदान नाही ते आपल्या विरोधात गप्पा मारतात, त्यांच्या विरोधात आपल्याला काही बोलायचे नाही. उलट आता मी चिंतामुक्त झालो असल्याने चांगले काम करीत राहणार आहे. खासदार स्व. बाळासाहेब विखे पाटलांनी मला राजकारणात कोणालाच मोकळे सोडायचे नसते ही शिवकण दिली, त्याचा योग्य उपयोग मी आता करणार आहे.


समन्यायीबाबत फेरविचार




मराठवाड्याला पाणी देण्यास विरोध नाही. परंतु या कायद्याबाबत फेरविचार करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे पाऊल टाकले आहे. या माध्यमातूनच दोन जिल्ह्यातील वाद कायमस्वरुपी मिटविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याबरोबरच पश्चिम वाहीनी नद्यांचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोर्‍यात वळविण्याबाबत राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.


हेही वाचा


नगर महापालिकेचे कामकाज होणार ठप्प


अहमदनगर : पत्नी, भाऊ अन् पुतण्याने केली हत्या


व्यक्‍तिचित्र : पापडक्रांती घडविणार्‍या आज्जी


The post लोणी : ‘समन्यायी’च्या पापाची जबाबदारी तुमचीच; मंत्री विखेंची टीका appeared first on पुढारी.


http://dlvr.it/Swr1ML