Nagar News : शिवसैनिकांनी रस्त्याचे काम पाडले बंद

October 11, 2023 0 Comments

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : शिवसैनिकांनी रात्रीचा रस्त्याचा खेळ बंद पाडला आहे. रात्री रस्त्याचे काम सुरू असल्याची खबर मिळताच शिवसेना शिंदे गटाच्या शिवसैनिक रस्त्यावर जमा होत त्यांनी सुरू असलेले काम बंद पाडले. तर, रात्री काम करण्याचा कोणता हेतू आहे, याचा जाब दुसर्‍या दिवशी सोमवारी (दि.9) अधिकार्‍यांना विचारला. गेल्या आठ महिन्यांपासून शेवगाव-तिसगाव राज्यमार्गातील शहर बसस्थानक ते भगूर असे काम सुरू होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला होता. या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले होते. तसेच, रस्त्यावर धुळीचे साम्रज्य होते. यामुळे वाहनचालकांना अनेक व्याधी बळावल्या असून, याबाबत शिवसेना शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. तर, मागील आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अधिकार्‍यांना घेरावा घातलात संताप व्यक्त केला होता. हे सर्व लक्षात घेता रविवारी (दि.8) रात्रीच आंबेडकर चौक येथून कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, याची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक रात्री त्यांनी हे काम बंद पाडले.


दुसर्‍या दिवशी सोमवारी (दि.9) सकाळी संतप्त शिवसैनिक व व्यापार्‍यांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या देऊन अधिकार्‍यांना धारेवर धरले. थातुर-मातुर काम करण्यासाठी रात्री काम करण्याची वेळ निवडल्याचा आरोप करत उपविभागीय अभियंता प्रल्हाद पाठक यांच्या समवेत कामाची पाहणी करून तहसील कार्यालय ते बसस्थानक हा रस्ता करावा, काही ठिकाणी फक्त खड्डे बुजविण्याचा देखावा करू नये, अशी मागणी केली. यावेळी जिल्हा युवा सेना प्रमुख साईनाथ आघाट, तालुका प्रमुख आशुतोष डहाळे, शहरप्रमुख विशाल परदेशी, अनिकेत पोटफोडे, जयकिसन बलदवा, संजय म्हस्के, मोसिन शेख, सुचेत भालसिंग, मनिष बाहेती, मुकुंद पलोड, अक्षय बाहेती, बाळू भंडारी, प्रकाश तिवारी, वैभव लांडे, दत्तात्रय फुंदे आदी उपस्थित होते.


‘तपासणीसाठी घेतले डांबराचे नमुने’

गत आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी क्वॉलिटी कंट्रोल मार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी शेवगाव- पैठण रस्त्याची शेवगाव बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता शैलेश साबळे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पाहणी केली. डांबर नमुने तपासणीसाठी जमा केले. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, तालुकाध्यक्ष अशोक भोसले, अमोल देवढे, हरिभाऊ कबाडी, विकास साबळे, नारायण पायघन, रामेश्वर शेळके, लक्ष्मण पालवे, वसंत गायके, पंडित थोरात आदी उपस्थित होते.


The post Nagar News : शिवसैनिकांनी रस्त्याचे काम पाडले बंद appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SxG5rd

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: