नगर तालुका : मंडळाधिकारीसाठी ग्रामस्थ आक्रमक!

October 22, 2023 0 Comments

नगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील मोठे गाव असलेल्या जेऊरमध्ये कायमस्वरुपी तलाठी, तसेच मंडळाधिकारी नसल्याने नागरिकांच्या कामांचा खोळंबा होत आहे. मागणी करूनही कायमस्वरुपी मंडळाधिकार्‍याची नियुक्ती होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या अडमुठ्या भूमिकेविरोधात जेऊर ग्रामस्थ आक्रमण झाले असून, आठ दिवसांत कायमस्वरुपी मंडळ अधिकार्‍याची नियुक्ती झाली नाही, तर आंदोलनाचा इशारा दिला आहे.


जेऊर सारख्या मोठ्या गावात कायमस्वरुपी तलाठी, तसेच मंडळाधिकारी आवश्यक आहे. परंतु, सद्यस्थितीत जेऊरच्या तलाठ्याकडे मजले चिंचोली, आव्हाडवाडी व उदरमल या गावांचा अतिरिक्त पदभार आहे. तसेच, मंडळाधिकार्‍याकडेही जेऊरचा अतिरिक्त पदभार आहे. जेऊर मंडळासाठी कायमस्वरुपी मंडळाधिकारी नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून अतिरिक्त पदभारावर जेऊर महसूलचे कामकाज सुरू आहे.


जेऊर मंडळांतर्गत जेऊर, धनगरवाडी, ससेवाडी, बहिरवाडी, इमामपूर, पांगरमल, उदरमल, खोसपुरी, आव्हाडवाडी, मजले चिंचोली, मांजरसुंबा गड, डोंगरगण, अशी 12 गावे येतात. या गावातील महसूल विभागाची सर्व कामे तलाठी व मंडळाधिकार्‍यांच्यामार्फत चालतात.

मंडळातील शेतकरी, विद्यार्थी, तसेच शासनाच्या विविध योजनांसाठी लागणारे दाखले, विविध नोंदींसाठी कायमस्वरुपी तलाठी, मंडळाधिकारी असणे गरजेचे आहे.


अधिकार्‍यांअभावी नागरीकांची कामे रखडत असून, प्रत्येक कामाला विलंब होत असून, नागरिकांना हेलपाटे मारावे लागतेय. जेऊरला कायमस्वरुपी तलाठी व मंडळाधिकार्‍याची आठ दिवसांमध्ये नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी सदस्य विजय पाटोळे, भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष संगम पाटोळे, सनी गायकवाड, विकास म्हस्के, भानुदास मगर यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.


जेऊर मोठे गाव आहे. शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. येथे कायमस्वरुपी तलाठी व मंडळाधिकारी उपलब्ध असणे गरजेचे आहे. परंतु, याबाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांसह आंदोलन करण्यात येईल.


-विजय पाटोळे,

ग्रामपंचायत माजी सदस्य, जेऊर


गेल्या अनेक महिन्यांपासून जेऊर मंडळाधिकार्‍यांचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. तलाठीकडेही जेऊरसह इतर तीन गावांचा अतिरिक्त पदभार आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या कामांचा खोळंबा होत आहे.


-संगम पाटोळे,

अध्यक्ष, भीमशक्ती संघटना



हेही वाचा


अणुचाचणी टाळण्‍यासाठी बिल क्लिंटन यांना दिली होती पाच अब्‍ज डॉलरची ऑफर : नवाज शरीफ


कोल्हापुरात वृद्ध महिलेचा दगडाने ठेचून खून


न्यूझीलंडविरुद्ध शमी-सूर्याला संधी की, शार्दुल खेळणार? प्लेइंग 11 जाणून घ्या


The post नगर तालुका : मंडळाधिकारीसाठी ग्रामस्थ आक्रमक! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/Sxn6tk

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: