Good News ! सर्व ओबीसींना मिळणार घरे ; तीन वर्षांचे उद्दिष्ट मंजूर

October 14, 2023 0 Comments

नगर : पुढारी वृत्तसेवा :  मोदी आवास योजनेंतर्गत यादीमध्ये नावे असलेल्या 15 हजार ओबीसी, तसेच विशेष मागास प्रवर्गातील कुटुंबांना घरकुले मंजूर झाली आहेत. त्यामुळे पुढील तीन वर्षांत ‘सर्वांना घरे’ मिळणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यात 2023-24 मध्ये 4306 ओबीसींना आणि विशेष मागास प्रवर्गातील 50 कुटुंबांना घरकुले मिळणार असून, उर्वरित कुटुंबांनाही दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यात घरकुले दिली जाणार आहेत. त्यामुळे या योजनेचे स्वागत केले जात आहे. ‘सर्वांसाठी घरे-2024’ या शब्दपूर्तीसाठी ग्रामीण भागातील इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) कुटुंबांकरिता ‘मोदी आवास’ घरकुल योजना हाती घेण्यात आली आहे. 2011च्या सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय सर्वेक्षणात प्राधान्यक्रम यादीत ज्यांची नावे नव्हती, त्यांच्यासाठी ‘आवास प्लस’ सर्वेक्षण करण्यात आले होते. या यादीत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची नावे ‘ड’ यादीत घेतलेली होती. त्यानुसार ‘ड’ यादीतील लाभार्थ्यांना आता लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मात्र ओबीसी व विशेष मागास प्रवर्गासाठी शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.


ओबीसींसाठी पहिल्यांदाच स्वतंत्र योजना

घरकुल योजनेतून रमाई आवास योजना, शबरी आवास योजनांच्या माध्यमातून समाजातील मागासवर्गीय कुटुंबांना घरकुलाच्या स्वतंत्र योजना कार्यान्वित आहेत. मात्र ओबीसींसाठी स्वतंत्र योजना नव्हती. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात केंद्र व राज्य सरकारने ओबीसींसाठी ‘मोदी आवास घरकुल योजना’ सुरू केली. त्यानुसार घरकुलांच्या यादीतून ओबीसींची स्वतंत्र यादी तयार करण्यात आलेली आहे. त्या यादीत प्राधान्यक्रमानुसार लाभ दिला जाणार आहे.


अखेर हक्काची घरे

मोदी आवास योजना सुरू झाल्यानंतर पहिल्याच वर्षी जिल्ह्याला 4306 घरकुले मिळाली आहेत. आता 14 तालुक्यांत हे उद्दिष्ट वाटप केले जाणार आहे.


ओबीसी 14 हजार; सर्वसाधारण 165 कुटुंबे

जिल्ह्यातील ओबीसी सर्वेक्षणानुसार तयार केलेल्या यादीत 14354 कुटुंबे आहेत. यापैकी आता तीन वर्षांत या सर्व कुटुंबांना घरकुले मिळणार आहेत. तसेच सर्वसाधारणमध्ये 165 नावे आहेत. त्यांनाही तीन वर्षांत घरकुले मंजूर झाली आहेत. जिल्ह्यातील ओबीसींसाठी पहिल्या वर्षात 4360, तर विशेष मागास प्रवर्गासाठी 50 घरकुले उद्दिष्टे आली आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर सीईओंच्या मार्गदर्शनात योजनेची अंमलबजावणी केली जाईल.


हेही वाचा : 



* हमास-इस्रायल संघर्ष; राज्यभरातील ज्यू धर्मीयांची प्रार्थनास्थळे,वस्त्यांमधील सुरक्षेत वाढ

* Chandrasekhar Bawankule : बारामतीची जागा अजित पवारांना गेली तरी विजयासाठी काम करू; चंद्रशेखर बावनकुळे






The post Good News ! सर्व ओबीसींना मिळणार घरे ; तीन वर्षांचे उद्दिष्ट मंजूर appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SxQ0Gb

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: