अहमदनगर - आष्टी रेल्वेला भीषण आग ; सुदैवाने जीवित हानी नाही 

October 17, 2023 0 Comments

पुढारी ऑनलाईन : नगर-बीड-परळी रेल्वेमार्गावर वाळुंज शिवारात असलेल्या नगर-सोलापूर महामार्ग क्रॉसिंगच्या ठिकाणी सोमवारी (दि. १६) दुपारी रेल्वेगाडीला भीषण आग लागून गाडीचे ६ डबे भस्मसात झाल्याची घटना घडली आहे. रेल्वेगाडीत अवघे ३-४ प्रवासी होते, त्यांनी पटापट खाली उड्या टाकल्याने सुदैवाने कुठलीही जिवित हानी झाली नाही. मात्र या दुर्घटनेत रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे.

नगर-बीड-परळी रेल्वेमार्गावर रेल्वेची वाहतूक सुरू झालेली आहे. सोमवारी दुपारी आष्टीकडून नगरकडे येत असलेली रेल्वेगाडी नगर तालुक्यातील वाळुंज शिवारात असलेल्या नगर-सोलापूर महामार्ग क्रॉसिंगच्या ठिकाणी आली.



Maharashtra | Five coaches of an 8-coach DEMU train caught fire at 3 pm between Ahmednagar and Narayanpur stations. No injuries or death reported as all passengers debaorded the train when it caught fire. No person is trapped inside the burning coaches. Firefighters are called by…


— ANI (@ANI) October 16, 2023





तेथे गाडी थांबल्यावर अचानक इंजिनच्या पाठीमागील डब्याला भीषण आग लागली. ही आग नंतर पसरत जावून सहा डबे पेटले. गाडी उभी असताना आग लागल्याचे लक्षात आल्यावर गाडीत असलेले ३-४ प्रवासी तसेच इंजिन मध्ये असलेले चालक व इतर रेल्वे कर्मचारी यांनी पटापट गाडीच्या खाली उड्या घेतल्या. तेथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काही नागरिकांनी याबाबतची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांना कळविली. त्यांनी तातडीने रेल्वे पोलिस तसेच नगर तालुका पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती सांगितली. तसेच नगर-सोलापूर महामार्गाचे काम करणार्‍या ठेकेदार संस्थेच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून टँकरची व्यवस्था करण्याची विनंती केली. काही वेळात अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी पोहचले, मात्र तो पर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. या आगीत रेल्वेगाडीचे सहा डबे भस्मसात झाले असल्याचे सांगण्यात आले. आगीचे कारण उशिरापर्यंत समजू शकले नव्हते.


The post अहमदनगर - आष्टी रेल्वेला भीषण आग ; सुदैवाने जीवित हानी नाही  appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SxX5y6

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: