भाजपाच्या फसवेगिरीपासून सावध राहावे ; आमदार थोरातांचा तरुणांना सल्ला

October 13, 2023 0 Comments

संगमनेर विशेष : पुढारी वृत्तसेवा:  देशात व राज्यात भाजपाचे सरकार असून सोशल मीडियाच्या माध्यमातून भूलथापा देऊन ते युवकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. भाजपाच्या या फसवेगिरी पासून तरुणांनी सावध राहून राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहन आ. बाळासाहेब थोरात यांनी केले. कोळवाडे येथील नळ योजनेचे उद्घाटन व रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात आ.थोरात बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, मिलिंद कानवडे, कैलास पानसरे, विष्णू रहाटळ, काशिनाथ गोंदे, दशरथ वर्पे, संजय वामन, बाळासाहेब राहणे, भाऊसाहेब नवले, तुषार गुंजाळ, मंगेश वर्पे, दादासाहेब देशमुख, राजेंद्र देशमुख, अमोल वाकचौरे, सरपंच पुष्पा गुंजाळ, उपसरपंच बाबुराव गोंदे, सोपान वर्पे आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी आ. थोरात म्हणाले, की कोळवाडे गावातील आश्रम शाळे मधील विद्यार्थी मोठ मोठ्या शासकीय पदापर्यंत मजल मारतात म्हणून कोळवाडे गावाचे नाव राज्याच्या कानाकोपर्‍यात पोहोचले आहे. ही गोष्ट भूषणावह आहे. या गावांमध्ये अनेक विकास कामे झाली असून गावातील आदिवासी व सर्व घटकातील लोकांचे जीवनमान उंचावण्याचे काम झाले आहे.या गावाने कायम आपल्याला भक्कम पाठिंबा दिला आहे. तालुक्यातील कोळवाडे परिसरात सातत्याने रस्ते व विविध विकास कामांसाठी मोठा निधी मिळवून अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. नव्याने होणार्‍या नळ पाणीपुरवठा योजनेमुळे पुढील अनेक वर्षांची पिण्याच्या पाण्याची चांगली सुविधा होणार असल्याचे आ. थोरात यांनी सांगितले.


माजी आमदार डॉ.तांबे म्हणाले की, कोळवाडे गावाचे विकास कामांसाठी आमदार थोरात यांच्या माध्यमातून खूप काम झाले आहे. आदिवासी बहुजन समाजातील आपण लोक आहोत. आजच्या काळातील राजकारण म्हणजे सामान्य माणसाकडे लक्ष न देणे असे आहे. मुठभर उद्योगपतींसाठी हे सरकार काम करत आहे.आपल्याच पैशावर देशाचे उदरभरण चालते. आज आपल्या पैशावर उद्योगपतींची कामे चालतात. महागाई, बेरोजगारी, भाव वाढ यावर चर्चा न होण्यासाठी धार्मिक राजकारणाकडे लक्ष वेधण्याचे काम होत आहे. व्हाट्सअप, सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण पिढीला वाईट मार्गाला घेऊन जाण्याचे काम होत आहे. लोकशाहीची दिवसाढवळ्या हत्या करण्याचे काम हे सरकार करत आहे.


दशरथ वपेॅ म्हणाले की, कोळवाडे गाव नेहमीच आमदार थोरात यांच्या पाठीमागे भक्कम उभे राहिले आहे. आमदार थोरात यांनी या गावासाठी अनेक विकास कामे केली आहेत. येथील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केले आहे.पाण्याचा मोठा प्रश्न आ. थोरात यांच्या माध्यमातून मिटला आहे. रस्त्याचे कामही होत आहे. या गावासाठी अनेक शासकीय योजनांचा लाभ गोरगरीब लोकांना मिळाला आहे.


यावेळी वनिता साबळे, मंगल कुदळ, पोपट कडू ,श्रीपत कुदळ, मधुकर गोंदे, बबन घोडे, दत्तात्रय तारडे, मंगेश वपेॅ,योगेश गुंजाळ, गोरख कुदळ, विलास गुंजाळ आदीं उपस्थित होतेे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दशरथ वर्पे यांनी केलेे, सूत्रसंचालन दिलीप बाबळे व आभार कैलास गुंजाळ यांनी मानले. कार्यक्रमाकरिता गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


निळवंडेच्या कालव्यांमुळे परिसराला फायदा

निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून डावा कालवा पूर्ण झाला असून उजव्या कालव्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. उजव्या कालव्यामुळे कोळवाडे व परिसरात मोठी समृद्धी येणार असल्याचे मिलिंद कानवडे यांनी म्हटले आहे.


The post भाजपाच्या फसवेगिरीपासून सावध राहावे ; आमदार थोरातांचा तरुणांना सल्ला appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SxMTTx

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: