शेवगाव तालुका : चढावर थांबविली ब्रेकफेल बस! विद्यार्थी, प्रवाशी बालंबाल वाचले

October 29, 2023 0 Comments

शेवगाव तालुका; पुढारी वृत्तसेवा : एस.टी. बस चालकाच्या प्रसंगावधानाने विद्यार्थी अन् प्रवाशी बालंबाल वाचले आहेत. बसस्थानकात कर्मचार्‍यांनी प्रवाशांना बाजुला सावरताना चांगलीच धावपळ झाली; मात्र धैर्याने बसवर ताबा मिळविल्याने आगाराच्या चढावर बस थांबली अन् चालकाने निश्वास सोडला. ब्रेक फेल झाल्याने चालक महादेव बुधवंत यांनी सुखरुप उतरविल्याने प्रवाशांनी त्यांचे आभार मानले. नगर मुक्काम करून सकाळी पैठण फेरीसाठी गेलेली शेवगाव आगाराची पैठण-शेवगाव (एम.एच. 07 सी. 9247) बस सकाळी साडे दहा वाजता पैठणहून शेवगावात आली.


बसस्थानक अवघ्या काही अंतरावर असताना बस जुने प्राथमिक आरोग्य केंद्रा जवळ असताना बसचा ब्रेक फेल झाला. ही गोष्ट चालक महादेव बुधवंत यांच्या लक्षात आली. बसमध्ये विद्यार्थी, काही प्रवाशी तर रस्त्यावरील वर्दळ अशा परिस्थिती चालक घामाघुम झाले होते. मात्र, बसमधील प्रवाशी घाबरू नये म्हणून सावधगिरी बाळगून चालकाने फक्त बसमधील रमेश काकडे या वाहकास याची कल्पना दिली.

कुठलीही आरडाओरड न करता प्रसंगावधान ओळखून हळूवार बस स्थानकात आणली.


वाहकाने अगोदरच मोबाईलवरून स्थानकातील काही कर्मचार्‍यांना याची कल्पना दिल्याने बस स्थानकाच्या दिशेने येताच या कर्मचार्‍यांनी प्रवाशांना बाजुला हटण्यास सांगितले. मात्र, यामुळे धावपळ उडाली. चालकाने मोठ्या सावधानतेने बस आगाराच्या आवारात चढाच्या बाजुने घातली. चढाला वेग कमी झाल्याने बस जागेवरच थांबली. बस थांबताच चालकाने एकदाचा सुटकेचा निश्वास सोडला. अर्थात प्रवाशी सुखरुप उतरले त्यात रस्त्याने किरकोळ अपवाद वगळता कुठलाच अनुचित प्रकार घडू दिला नाही. चालत्या एस.टी.चा बिघाड झाल्यास कोणती सावधानता बाळगावी याचा प्रत्य निदर्शनास आणून दिल्याने चालक महादेव बुधवंत व वाहक रमेश काकडे यांची प्रसंशा करण्यात आली.


‘बसस्थानकातील अतिक्रमण डोके दुखी’




एस.टी. बसस्थानकात प्रवेश करताना किंवा बाहेर जाताना रस्त्यावर दुतर्फा असणारी खासगी वाहणे, रिक्षा, फळ विक्रते, हातगाडीवाले आदींचे अतिक्रमन धोक्याचे बनले आहे. यामुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत परिवहन विभागाने वेळोवेळी पोलिसांत लेखी तक्रारी दिल्या; मात्र त्याची दखल घेतली जात नाही, असे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.


हेही वाचा


मंत्री विखेंच्या हस्ते आज 41 कोटींच्या कामास प्रारंभ


शब्द दिल्याप्रमाणे आरक्षण त्वरित द्या : आ.कानडे


The post शेवगाव तालुका : चढावर थांबविली ब्रेकफेल बस! विद्यार्थी, प्रवाशी बालंबाल वाचले appeared first on पुढारी.


http://dlvr.it/Sy5hsH

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: