नगर जिल्हा विभाजन दृष्टिपथात! आ. राम शिंदे

October 21, 2023 0 Comments

नगर : अनेक वर्षांपासून जिल्हा विभाजनाचा प्रश्न प्रलंबित आहे. जिल्हा विभाजन व्हावे असे माझेही मत आहे. अप्पर पोलिस अधीक्षक, अप्पर जिल्हाधिकारी पाठोपाठ आता महसुल भवनाची स्वतंत्र इमारत शिर्डीत होत असल्याने विभाजनाच्यादृष्टीने पडलेले ते आश्वासक पाऊल आहे. विभाजनाचा मुर्हूत फक्त बाकी असल्याचा दावा भाजप आ. राम शिंदे यांनी केला. शिर्डीत होत असलेल्या नव्या कार्यालयामुळे जिल्हा मुख्यालयाचा प्रश्नही निकाली निघाल्याचे सांगत त्यांनी शिर्डी मुख्यालयाचे संकेतही दिले.


नगर येथे आ. शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, अरुण मुंडे, सुवेंद्र गांधी यावेळी उपस्थित होते. अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालय उत्तरेत होते. काही दिवसांपूर्वी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीत झाले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीत 61 कोटी रुपयांची महसूल भवन इमारतीचे भूमिपूजन होत आहे. पोलिस, महसूलची कार्यालय शिर्डीत झाल्याने जिल्हा मुख्यालयाचा प्रश्न निकाली निघाल्याचे सांगत त्यांने शिर्डी जिल्हा मुख्यालयाचे संकेत दिले.


राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना खा. विखेंनी भाजप प्रवेशाची ऑफर दिल्याकडे लक्ष वेधत भूमिका काय असा प्रश्न शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांना विचारताच त्यांनीही पलटवार केला. विखे पाटील हे विकासात्मक कामे चांगली करत आहेत. त्यांनी त्यादृष्टीने आणखी प्रयत्न करावे, मात्र संघटनात्मक पातळीवरचा निर्णय शहर जिल्हा शाखेवर (आमच्यावर) सोडावा, अशी भूमिका मांडली.


शेळी-मेंढी पालन महामंडळाचे ढवळपुरी (ता. पारनेर) येथील कार्यालय स्थलांतराची प्रक्रिया सुरू झाल्याचे आ. राम शिंदे यांनी सांगितले. हे कार्यालय राज्याचे असून ते पारनेरच्या खेड्या गावात होत असल्याने दळणवळणाच्या दृष्टीने ते योग्य नाही. त्यामुळे ते स्थलांतर होत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.


हेही वाचा


चंद्रपूर: देह सोडलेल्या आईच्या कुशीत रात्रभर ढसाढसा रडला चिमुकला; पुलावरून पडून गर्भवती महिलेचा मृत्यू


नगरला अपर तहसील कार्यालय मंजूर; अध्यादेश जारी


Jammu Accident : जम्मू-श्रीनगर महामार्गावर अपघात; चार जणांचा मृत्यू


The post नगर जिल्हा विभाजन दृष्टिपथात! आ. राम शिंदे appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SxlKPG

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: