चक्क शाळा सुरू असतानाच शाळेच्या आवारात वर्षश्राद्धाचा कार्यक्रम..!

October 20, 2023 0 Comments

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शाळा सुरू असतानाच शाळेच्या आवारात वर्षश्राद्धाचा कार्यक्रम घेण्यात आल्याची घटना संगमनेर तालुक्यातील निमोण शाळेत घडली. शाळा व्यवस्थापन समितीचा विरोध असतानाही वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाला परवानगी देणार्‍या मुख्याध्यापक व शिक्षकांना निलंबित करावे, अशी मागणी समितीचे उपाध्यक्ष अशोक वालझाडे यांनी गटविकास अधिकार्‍यांकडे केली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेतून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून, गटशिक्षणाधिकार्‍यांना चौकशीचे आदेश दिल्याचे सूत्रांकडून समजले.


संबंधित बातम्या :



* गव्हाची गोदामे रिकामी झाल्यामुळेच एमएसपी वाढ : काँग्रेसचा आरोप

* Pune News : शिकावू विमान टेकऑफ घेतल्यानंतर काही वेळातच कोसळले

* पंतप्रधान मोदी 26 ऑक्टोबरला शिर्डीत ! लाखभर लाभार्थींचे टार्गेट






गेल्या आठवड्यात निमोण शाळेत वर्षश्राद्धाचा कार्यक्रम झाला. मात्र शाळेच्या वेळेत कार्यक्रम घेतला, तर मुलांचे नुकसान होणार असल्याने शाळा व्यवस्थापन समितीचा विरोध होता. मात्र येथील दोघा शिक्षकांनी परस्पर या कार्यक्रमास परवानगी दिली. परिणामी, मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने संबंधित शिक्षकांना निलंबित करावे, अन्यथा 28 ऑक्टोबरपासून शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी संगमनेर पंचायत समितीसमोर उपोषणास बसणार असल्याचा लेखी इशारा वालझाडे यांनी गटविकास अधिकार्‍यांना दिला आहे.


सरपंचांची पालकमंत्र्यांकडे तक्रार

निमोणचे लोकनियुक्त सरपंच संदीप देशमुख यांनी याप्रकरणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिले असून, शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी शाळा सोडून मुलांना आमदारांच्या स्वागतासाठी उभे केल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरल्याचे त्यांनी म्हटले आहे.


चौकशी अहवाल जिल्हा परिषदेत देणार!

निमोण शाळेत सेवानिवृत्त शिक्षकाचे वर्षश्राद्ध झाले. त्याच कार्यक्रमात त्यांच्या नावाने शाळेला कुटुंबाने दिलेल्या कमानीचे व लोकवर्गणीतून बांधलेल्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन झाले. या संदर्भात सरपंचांनीही तक्रार केली आहे. जिल्हा परिषदेतूनही चौकशीच्या सूचना मिळाल्या आहेत. त्यानुसार विस्तार अधिकारी उद्या चौकशी करतील आणि अहवाल जिल्हा परिषदेकडे दिला जाईल, अशी माहिती संगरनेरचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड यांनी दिली.


The post चक्क शाळा सुरू असतानाच शाळेच्या आवारात वर्षश्राद्धाचा कार्यक्रम..! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SxgvKK

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: