सातबारा कोरा करण्याची हिंमत कोणातच नाही : आ. बच्चू कडू

श्रीरामपूर: पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याची कोणत्याही पक्षाची हिम्मत नाही. त्या फक्त निवडणुकात बोलायच्या गोष्टी आहेत. जसं काँग्रेस शेतकर्‍यांबरोबर वागली तसंच भाजपही वागत आहे. शेतमालाला निर्यात बंदी करून आयात खुली करायची आणि शेतमालाचे भाव पाडायचे, हीच यांची पद्धत असल्याचा घरचा आहेर महायुती सरकारला देतानाच या विरोधात शेतकर्‍यांचे एकमत होत नसल्याची खंत आ. बच्चू कडू यांनी व्यक्त केली. श्रीरामपूर येथे न्यायालयीन प्रकियेसाठी आलेले आ.कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे, आप्पासाहेब ढुस, रुपेंद्र काळे, नवाज शेख, लक्ष्मण खडके, अ‍ॅड. पंढरीनाथ औताडे, दीपक पटारे उपस्थित होते.


आ. बच्चू कडू म्हणाले, जनतेचे प्रश्न सत्तेत असले म्हणजे मांडायचे नाहीत ही चुकीची प्रथा पाडली जात आहे. भाजपा बरोबर मी सत्तेत सहभागी होण्यासाठी गेलो नव्हतो. त्यांचेच मला फोन आले होते. त्यामुळे मी प्रश्न मांडतच राहणार. त्यांना पटत असेल तर मला सत्तेत ठेवावे अन्यथा दूर करावे. मला त्याचे काहीही वाटणार नाही. जाती धर्माच्या प्रश्नावर सर्व पक्षांचे वागणे वेगवेगळ्या प्रकारचे आहे. धर्म माणसाला जगायला शिकवतो परंतू पोटात अन्न असल्याशिवाय जगता येत नाही, हे कुठल्याच पक्षाला समजायला तयार नाही. धर्माचे झेंडे लोकांच्या हाती देऊन निवडणुका जिंकता येतील परंतु माणसांना जगवता येणार नाही. त्यासाठी शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवावेच लागतील. शेतकर्‍यांनी केंद्र सरकारकडे शेतमालाला रास्त भाव मागितला तर सरकारने लोकांना फुकट धान्य योजना सुरू केली.


सगळा नुसताच उलटा धंदा सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केंद्र सरकारवर केली. आमदार,जिल्हाधिकारी व प्राध्यापक यांचे पगार थोडे कमी करून अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांचे मानधन सरकारने वाढवले पाहिजे, असेही आ.कडू एका प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले. भाजप बरोबर सत्तेत सहभागी असलो म्हणजे शेतकर्‍यांचे, मजुरांचे व कष्टकर्‍यांचे प्रश्न मांडायचे नाहीत का?, त्यांनी मला सत्तेतून बाहेर काढले तरी त्याची पर्वा मी करत नाही.जे प्रश्न आणि दुःख आहे ते मी स्पष्टपणे मंडणारच अशी रोखठोक भूमिका आ.बच्चू कडू यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली. मराठा आरक्षण प्रश्नावर आ. कडू म्हणाले, या प्रश्नावर 19 फेब्रुवारी (शिवजयंती) नंतर सविस्तरपणे भूमिका मांडू. आता त्यावर काहीच बोलणार नाही.


The post सातबारा कोरा करण्याची हिंमत कोणातच नाही : आ. बच्चू कडू appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T25GJ5

खासदार संजय राऊत म्हणतात ; शिर्डी आमचीच, नगरसाठीही इच्छुक!

नगर : पुढारी वृत्तसेवा :  महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट महाराष्ट्रातील लोकसभेच्या 23 जागा लढवणार आहे. पूर्वी आम्ही तेवढ्याच जागा लढत होतो, आताही तेवढ्यात जागा लढवणार आहोत. नगर जिल्ह्यातील शिर्डी ही आमचीच आहे, संधी मिळाल्यास नगरची जागा लढवण्यास आम्ही इच्छुक आहोत, असेही खासदार संजय राऊत यांनी सांगितले.  खासदार राऊत नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, उपनेते साजन पाचपुते, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे व राजेंद्र दळवी, शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, दत्ता जाधव उपस्थित होते.


खा. राऊत म्हणाले, मराठा समाजातील अनेकजण आरक्षणाच्या अध्यादेशावरुन तोंडाला पाने पुसली, फसवणूक झाल्याची भाषा बोलत आहेत, परंतु हे मनोज जरांगे पाटील यांनी बोलणे आवश्यक आहे. त्यांचे समाधान झाले असेल तर आमचे काही म्हणणे नाही. ते तर समाधान झाले म्हणून मुख्यमंत्र्यांना मिठ्या मारत आहेत, अशी कोपरखिळी मारली. इंडिया आघाडीतून तृणमल काँग्रेस व आप बाहेर पडले, याकडे लक्ष वेधले असता खासदार राऊत म्हणाले, इंडिया आघाडी भक्कम आहे. कोणीही आघाडीतून बाहेर जात नाही. दिल्लीत आप आणि काँग्रेस एकत्रच आहेत. पंजाबमध्ये थोडी वेगळी परिस्थिती आहे, तशीच परिस्थिती पश्चिम बंगाल व केरळमध्ये आहे. महाराष्ट्रातही महाविकास आघाडी मजबूत आहे, कोणतेही मतभेद नाहीत. प्रकाश आंबेडकरही चर्चेत सहभागी होत आहेत.

त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर जी काही जिरवाजीरवी करायची आहे ती निवडणुकीनंतर पुढील काळात करावी, सध्या भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.


भुजबळ स्वाभीमानी; राजीनामा देवून बाहेर पडा!

मुख्यमंत्र्यांच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेवरून छगन भुजबळ खरोखरच अस्वस्थ झाले असतील तर त्यांनी राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडावे. ते पूर्वाश्रमीची शिवसैनिक आहेत. त्यांनी स्वाभिमान दाखवावा, अशी अपेक्षा व्यक्त करताना मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेविरुद्ध दहा मंत्री दहातोंडाने बोलत आहेत, सरकारमध्ये एकवाक्यता दिसत नसल्याची टीका खा. संजय राऊत यांनी केली.


The post खासदार संजय राऊत म्हणतात ; शिर्डी आमचीच, नगरसाठीही इच्छुक! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T22jF2

Increasing attachment among people towards the Indian Culture | सरकार से बदले संस्कार!

Increasing attachment among people towards the Indian Culture | सरकार से बदले संस्कार!

एक वक्त था जब हमारी हर पीढ़ी पश्चिमी देशों के संस्कार की तरफ भाग रही थी लेकिन मोदी सरकार के आने के बाद से देश की सांस्कृतिक विरासत के विकास के लिए इतने काम हुए कि अब चाहें बच्चे हों या फिर युवा हर कोई अपनी संस्कृति को लेकर दीवाना है। ' #modigovt #bjp #hindu #culture #indiaculture
via YouTube https://www.youtube.com/watch?v=R6ULqR8Cy5c

विक्रमी आवक झाल्याने लाल कांदा गडगडला

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात गुरुवारी (दि. 25) लाल कांद्याचे भाव क्विंटलमागे 700 रुपयांनी घसरल्याने शेतकरी हतबल झाले. लिलावासाठी तब्बल पावणेदोन लाख गोण्या कांद्याची आवक झाली. विक्रमी आवक झाल्याने भाव गडगडल्याचे सांगण्यात आले. नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात गुरुवारी कांद्याची 1 लाख72 हजार 711 गोण्या म्हणजे 94 हजार क्विंटल इतकी विक्रमी आवक झाली. अयोध्येतील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामुळे सोमवारी (दि. 22) कांद्याचे लिलाव बंद होते. त्याआधी शनिवारी (दि. 20) कांद्याची दोन लाख 44 हजार गोण्यांची आवक झाली होती.


त्या दिवशी एक नंबरच्या कांद्याला 199 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. गुरुवारी मात्र लिलावासाठी पावणेदोन लाख गोण्या कांदा आवक झाली. निर्यातबंदीमुळे सध्या कांद्याचे भाव घसरले आहेत. शिवाय लाल कांदा लवकर खराब होत असल्याने व्यापार्‍यांकडून मागणी कमी झाली आहे. त्यामुळे कांदा भाव घसरल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. गुरुवारी एक नंबरच्या कांद्याला 900 ते 1200 रुपये भाव मिळाला. नंबर दोनच्या कांद्याची 500 ते 800 रुपये, तर नंबर तीनच्या कांद्याला 250 ते 400 रुपये भावम मिळाला. लहान कांद्याची 100 ते 200 रुपये क्विंटलप्रमाणे विक्री झाली. आडत, हमाली व वाहतूक खर्च वजा जाता पदरात काहीच पडले नाही. उत्पादनाचा खर्च खिशातून टाकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली. त्यामुळे कांद्याचे भाव गडगडताच शेतकर्‍यांमध्ये संतप्त भावना निर्माण.


The post विक्रमी आवक झाल्याने लाल कांदा गडगडला appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T20Ltx

नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणी माजी संचालक साठे, कोठारी ताब्यात

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर अर्बन बँक घोटाळ्याच्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने गुरुवारी माजी संचालक मनीष साठे, अनिल कोठारी यांना तपासासाठी ताब्यात घेतले आहे. त्यांना वैद्यकीय तपसाणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. रात्री आणखी काही माजी संचालकांना ताब्यात घेतल्याचेही समजते. मात्र या माहितीला दुजोरा मिळाला नाही.

अर्बन बँक घोटाळा प्रकरणी माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यात 150 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. तत्कालीन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार कागदपत्रांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आले. त्यात 291 कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आले.


याप्रकरणी दोन शाखाधिकार्‍यांना अटक करण्यात आली होती. आणखी चार जणांना चौकशीसाठी नोटिसा दिल्या होत्या. परंतु, वारंवार नोटिसा देऊनही चौकशीला हजर राहत नसल्याने विशेष पोलिस तपास पथकाने बँकेचे माजी संचालक मनीष साठे, अनिल कोठारी यांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशी करून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविल्याचे तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक हरीश खेडकर यांनी सांगितले. दरम्यान, ‘एसआयटी’ने नोटीस देऊन चौकशीला हजर राहत नसलेल्या सर्वांना शोधून आणा, असा आदेश पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिला आहे. विशेष तपास पथक नेमल्याने गुन्ह्याच्या तपासाला वेग आला आहे.


ही अटकेची कारवाई ?

साठे व कोठारी यांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठविल्याने ही अटकेची कारवाई असल्याचे मानले जात आहे.


The post नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणी माजी संचालक साठे, कोठारी ताब्यात appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T1yZ7b

नगर : राहुरी येथील वकील दाम्पत्याचा निर्घृण खून

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : राहुरी न्यायालयात वकिली क्षेत्रात कार्यरत असलेल्या आढाव दाम्पत्याचा आज शुक्रवारी (दि.२६) निर्घृण खून झाल्याचे उघड झाले आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पती – पत्नीचा मृतदेह उंबरे (ता.राहुरी) येथील स्मशानभुमीतील विहिरीत आढळून आला.  अ‍ॅड. राजाराम जयवंत आढाव (५२) व अ‍ॅड. मनिषा आढाव असे या दाम्पत्याचे नाव आहे. सायंकाळी त्यांचा मृतदेह विहिरीतून काढण्यात आला. दोघांनाही दगड बांधून विहीरीत टाकून दिल्याचे निदर्शनास आले आहे. पैशाच्या वादातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.


राहुरी न्यायालयात वकिली क्षेत्रात कार्यरत असलेले अ‍ॅड. राजाराम आढाव व अ‍ॅड. मनिषा आढाव हे दाम्पत्य गुरूवारी (दि.२५) दुपारपासून बेपत्ता होते. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. राहुरी न्यायालय परिसरात आज शुक्रवारी (दि.२६) अ‍ॅड. आढाव यांचे चारचाकी वाहन (क्र. एम एच १७ एइ २३९०) बेवारस अवस्थेत आढळून आले. या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता या वाहनात हातमोजे व एक बूट आढळून आला. तसेच अ‍ॅड. आढाव यांचे एटीएम आयसीआय बँकेसमोर बेवारस आढळून आले. त्यामुळे या घटनेबाबत शंका – कुशंका व्यक्त केल्या जात होत्या. या वाहनाची तपासणी करीत असताना या वाहनाजवळ असणाऱ्या एका चारचाकी वाहनातील चालकाने पोलिसांना पाहून पळ काढला. त्यांनंतर पोलिसांना तपासाची चक्रे फिरवत तपासाला गती दिली. मोबाईल फोन व सीसीटिव्ही कॅमेर्‍याच्या सहाय्याने एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीतून  दाम्पत्याचा खून करून विहिरीत टाकल्याची माहिती समोर आली. या खून प्रकरणामध्ये चार आरोपींचा समावेश असल्याचेही माहिती समोर आली आहे. उंबरे (ता.राहुरी) येथील स्मशानभुमीतील विहिरीत दुपारी तीन वाजल्यापासून दोघांचा शोध सुरू होता. रात्री उशिरा दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली. मृतदेहांना दगड बांधून विहिरीत टाकण्यात आले होते. दरम्यान, या खून प्रकरणामुळे राहुरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


 


हेही वाचा :




* रायगड : महाडमधील गादी कारखान्याला भीषण आग; शेजारचे एक दुकान भस्मस्थानी


* पुणे : आळंदीत अल्पवयीन तीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

* कोल्हापूर: वाठारजवळ दुचाकी अपघातात ऊसतोड मजूर ठार






The post नगर : राहुरी येथील वकील दाम्पत्याचा निर्घृण खून appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T1wbw0

Crime News : दहा लाख घेऊन पळाला, सोलापुरात सापडला

नगर : पुढारी वृत्तसेवा : व्यापार्‍याच्या दुकानातील दहा लाखांची रोकड बँकेत भरण्यासाठी घेऊन गेलेला कर्मचार्‍याने पैसे घेऊन पोबारा केला होता. ही घटना मंगळवारी घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासांच्या आत मोहोळ (जि. सोलापूर) येथील बसस्थानकावरून त्याला जेरबंद केले. त्यांच्याकडून 9 लाख 41 हजारांची रोकड हस्तगत केली. सुशील प्रकाश बिरादार (वय 29, रा. वाणीनगर, पाईपलाईन रोड, मूळ रा. बिदर, कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. प्रताप प्रेमचंद इर्दवानी (रा. सुरभी हॉस्पिटल समोर, गुलमोहोर रोड) यांचे महाराष्ट्र ट्रेडर्स नावाचे दुकाने आहे. त्याच्या दुकानामध्ये काम करणारा सुशील बिरादार यांच्याकडे बँक खात्यामध्ये भरण्यासाठी 10 लाख रुपये दिले होते. सुशीलने रोकड बँकेत न भरता रक्कम घेऊन पळून गेला.


याबाबत इर्दवानी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी एलसीबीला तत्काळ तपासाच्या सूचना केल्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलिस हेडकॉन्स्टेबल संदीप पवार, रवींद्र कर्डिले, भीमराज खर्से, फुरकान शेख, संतोष खैरे, अमृत आढाव, प्रशांत राठोड यांचे पथक तपासासाठी रवाना केले. पथक आरोपीच्या शोधासाठी बिदर (कर्नाटक) येथे निघाले. त्या वेळी आरोपी मोहोळ (जि. सोलापूर) येथे बसस्थानकावर थांबल्याचे समजले. पथकाने मोहोळ पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांची मदत घेऊन त्याला पकडले. त्याच्याकडून 9 लाख 41 हजार रुपये व मोबाईल जप्त करण्यात आले.


The post Crime News : दहा लाख घेऊन पळाला, सोलापुरात सापडला appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T1t71c

नगरमध्ये भीषण अपघातात सहा ठार

टाकळी ढोकेश्वर, जि. नगर; पुढारी वृत्तसेवा : कल्याण-विशाखापट्टणम् राष्ट्रीय महामार्गावर ढवळपुरी फाट्याजवळ एसटी बस, कार आणि ट्रॅक्टर यांच्यात बुधवारी (दि. 24) पहाटे झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन पारनेर तालुक्यातील, तिघे संगमनेर व एकजण पाथर्डी तालुक्यातील आहे. जखमींना मदत करताना बसचा पत्रा लागून एक तरुण जखमी झाला.


नीलेश रावसाहेब भोर (25, देसवडे), प्रकाश रावसाहेब थोरात (24, वारणवाडी, दोघे ता. पारनेर), अशोक चिमा केदार (35), जयवंत रामभाऊ पारधी (45), संतोष लक्ष्मण पारधी (35, तिघे जांबूत खुर्द, ता. संगमनेर), सचिन कांतिलाल मंडलेचा (40, टाकळी मानूर, ता. पाथर्डी) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. सुयोग अंबादास अडसूळ (वय 25, रा. भनगडवाडी), देवेंद्र गणपत वाडेकर (27, रा. देसवडे, दोघे ता. पारनेर) व बद्रिनाथ विठ्ठल जगताप (45, रा. लोणी, ता. शिरूर कासार, जि. बीड) अशी जखमींची नावे आहेत. आळेफाटा ते नगरदरम्यान हिवरे कोरडा शिवारात ढवळपुरी फाट्यावर पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला.


घटनेची माहिती मिळतात सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.


अपघात नेमका कसा झाला…




रस्त्यावर उसाची ट्रॉली उलटून सर्व ऊस रस्त्यावर पडला होता. त्याच्यापुढे दुसरा ट्रॅक्टर पुढे लावून त्यातील मजूर मदत करत होते. रस्त्यावर एक कार उभी करून तिच्या हेडलॅम्पच्या उजेडात हे मदतकार्य सुरू होते. तसेच रस्त्यावरील अन्य वाहनांना दिशा दाखविण्यासाठी या कारच्या पार्किंग लाईटही सुरू होत्या. पहाटे तीनच्या सुमारास ठाण्याहून नगरकडे जाणारी एसटी बस तेथे आली. मात्र बसचालकाला रस्त्यावरील ट्रॅक्टर आणि कारचा अंदाज न आल्याने बसची ट्रॅक्टर व कारला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, तिन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला.


हेही वाचा :



* Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारचा अपघात

* सांगली : उसाच्या ट्रॉलीला धडकून अपघातात रामापूरचे सरपंच ठार

* बीड : शिरूरच्या व्यापाऱ्याचा अपघातात मृत्यू









The post नगरमध्ये भीषण अपघातात सहा ठार appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T1qbc9

Crime news : पळवून नेलेली मुलगी सापडली गुजरातमध्ये

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यातील एका गावातून पळवून नेलेल्या सतरा वर्षाच्या मुलीसह तिला पळवून नेणार्‍या आरोपीला नगर तालुका पोलिसांनी गुजरातमधील बावला (जि. अहमदाबाद) येथून ताब्यात घेतले. सागर रमेश मुदळकर (वय 25, रा. बाबुर्डी घुमट, ता.नगर) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपी मुदळकर याने 5 जानेवारी रोजी या मुलीला घरातून पळवून नेले होते. तिचा दिवसभर शोध घेवूनही ती न आल्याने तिच्या वडिलांनी रात्री उशिरा नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी प्रारंभी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.


तांत्रिक तपासात या मुलीसह आरोपी गुजरातमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक नितीन रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक युवराज चव्हाण, राजू खेडकर, संभाजी बोराडे, विक्रांत भालसिंग यांच्या पथकाने गुजरातमध्ये जाऊन या दोघांना शोधून काढत ताब्यात घेऊन नगरला आणले. त्यानंतर पीडित मुलीने दिलेल्या जबाबावरून आरोपी सागर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


The post Crime news : पळवून नेलेली मुलगी सापडली गुजरातमध्ये appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T1n42p

शिर्डी: श्रीराम मंदिराच्या पार्श्वभूमीवर भिमनगर मध्ये बुद्ध वंदना करून दीपोत्सव साजरा केला गेला




http://dlvr.it/T1mzS1

‘गणेश’मध्ये विरोधकांचा अडथळा : विवेक कोल्हे

पुणतांबा : पुढारी वृत्तसेवा : गणेश साखर कारखाना चालविताना विरोधक विविध मार्गांनी अडथळे आणतात, पण ज्येष्ठ नेते, आ. बाळासाहेब थोरात व मी संचालकांच्या मदतीने गणेश कारखाना चांगल्या प्रकारे चालविण्याचा प्रयत्न करीत आहोत. ‘गणेश’ लवकरच 1 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण करील. येत्या महिन्यात ‘गणेश’ शेतकर्‍यांना उसाचे पेमेंट देणार आहे, असे सांगत, युवकांना रोजगाराची गरज आहे. बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानद्वारे शासनदरबारी सतत पाठपुरावा सुरु आहे. सोनेवाडी व सावळीविहिरला शेती महामंडळाच्या जागेत एमआयडीसी मंजूर करुन आणली.


या औद्योगिक वसाहतीमुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटून विकासाला अधिक गती मिळणार असल्याचे मत सहकार महर्षी कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले. राहाता तालुक्यातील वाकडी येथे ग्रामपंचायतीच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण कोल्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. स्नेहलता कोल्हे होत्या. कोल्हे म्हणाले, वाकडी गाव पाणीपुरवठा योजनेचे काम मार्गी लावून पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवू. गणेश परिसरात शेतकर्‍यांसह जन विकासाचे प्रश्न सोडवून या परिसराला गतवैभव प्राप्त करून देण्यास प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.


यावेळी गंगाधर चौधरी, ‘गणेश’चे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, सरपंच रोहिणी बाळासाहेब आहेर, शिवाजी लहारे, संचालक भगवान टिळेकर, गंगाधर डांगे, संपत चौधरी, नानासाहेब नळे, संपत हिंगे, बाळासाहेब चोळके, अनिल गाढवे, महेंद्र गोर्डे, आलेश कापसे, अरुंधती अरविंद फोफसे, विष्णुपंत शेळके, भीमराज लहारे, गोरक्षनाथ यलम, विठ्ठलराव शेळके, अनिल शेळके, बाळासाहेब आहेर, संजय शेळके, तात्यासाहेब गोरे, वसंतराव हसे, संपतराव लहारे, भागवत शेळके, नवनाथ शेळके, उपेंद्र काले, ग्रा. पं. सदस्य अनिल गोरे, अमोल शेळके, कैलास लहारे, कल्पना सुनील लहारे, सविता राजेंद्र शेळके, ग्रामसेवक सोनवणे व ग्रामस्थ उपस्थित होते. माजी मंत्री स्व. कोल्हे यांनी गणेश परिसरात केलेल्या विकासाची माहिती देत विवेक कोल्हे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी विठ्ठलराव शेळके, उपेंद्र काले आदींची भाषणे झाली.


पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे आणू!




स्व. शंकरराव कोल्हे, आ. बाळासाहेब थोरात व माजी आ. स्नेहलता कोल्हे यांच्या प्रयत्नांमुळे ‘निळवंडे’चे पाणी कोपरगावसह राहाता तालुक्यात जिरायती भागात आले. यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला, असे सांगत पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे ऊर्ध्व गोदावरी खोर्‍यात वळविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सांगितले.


हेही वाचा



* Nashik I मनमाड येथील निंबस पॅकिंग कंपनीला भीषण आग

* Crime News : बंद घरातून पावणेसात लाखांची चोरी..

* नाशिक : कविता राऊत यांचा पुतळा क्रीडापटूंसाठी प्रेरणा: दादा भुसे






The post ‘गणेश’मध्ये विरोधकांचा अडथळा : विवेक कोल्हे appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T1j0Fw

शिर्डी मध्ये जल्लोष | हिंदू धर्मियांची मिरवणूक | राम कथेचे आयोजन




http://dlvr.it/T1hjmx

मीटरचे जुगाड करून कोट्यवधींची वीजचोरी : खडी क्रशरचालकाचा प्रताप

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : वीज मीटरशेजारी थेट मीटर बंद करणारे स्वतंत्र उपकरण लावून तालुक्यातील मोहरी रस्त्यावरील एका खडीक्रशरचालकाने आतापर्यंत कोट्यवधींची वीजचोरी केल्याची बाब उघडकीस आली आहे. संबंधित खडीक्रशरवर वसई, मुंबई, नाशिक अशा वेगवेगळ्या तीन ठिकाणांवरून आलेल्या महावितरणच्या भरारी पथकांनी संयुक्त छापा टाकून ही वीजचोरी पकडली.

गुरुवारी दिवसभर चाललेल्या या कारवाईत पथकांकडून संबंधित क्रशरचालकाला नेमका किती दंड करण्यात आला, त्याच्यावर कुठल्या कलमांन्वये कारवाई करण्यात आली याची माहिती मिळू शकली नाही.


संबंधित खडीक्रशरचालक अनेक वर्षांपासून मीटर बंद ठेवून चोरीच्या मार्गाने क्रशरसाठी थेट वीज वापरत असल्याची माहिती भरारी पथकांना मिळाली होती. नियोजनबद्ध सापळा रचून तिन्ही ठिकाणांहून आलेल्या पथकाने संयुक्त कारवाई केली. स्थानिक वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना या कारवाईबाबत कुठलीही कल्पना देण्यात आली नव्हती. तालुक्यात सर्वांत मोठी वीजचोरी पकडल्याची ही घटना आहे. या कारवाईमुळे वीजचोरी करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.


तालुक्यातील मोहरी व हंडाळवाडी शिवारात मोठ्या प्रमाणात खडीक्रशर व्यवसाय सुरू आहे. या ठिकाणी असलेल्या एका खडीक्रशरवर वापरले जाणारे चार अधिकृत महावितरणचे व्यावसायिक विजेचे मीटर असून, त्यामधील एका मीटरला डिवाइस बसून ते बंद करण्यात आले होते. अन्य तीन मीटरमध्येही हेराफेरी केल्याचा संशय महावितरणच्या अधिकार्‍याला असल्याने ते तीन मीटर या भरारी पथकाने ताब्यात घेऊन त्याची पुढील तपासणीसाठी वीज प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. परिसरातील अन्य खडीक्रशर चालकांच्या मीटर्सचीही तपासणी या पथकांनी केली.


स्थानिक अधिकारी अनभिज्ञ!




हे भरारी पथक अचानकपणे पाथर्डीत दाखल झाले. स्थानिक वीज वितरणच्या अधिकार्‍यांना या छाप्याची कोणतीही पूर्वकल्पनाही दिली गेली नव्हती. अतिशय गुप्तता या भरारी पथकाने बाळगून ही कारवाई केली.


भरारी पथकाचे लक्ष! वीजचोर व एजंटांवर लक्ष!




वीज गळती होणारा तालुका म्हणून पाथर्डीचे नाव अग्रस्थानी आहे. वरिष्ठ पातळीवरून तालुक्यातील वीजगळती बंद करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागासह शहरात मोठ्या प्रमाणात वीजचोरी केली जाते. ग्राहकांना वीजचोरीचा मार्ग दाखवणार्‍या अनेकांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. भरारी पथकाचे अशा वीजचोरी करणार्‍यांवर व मार्ग दाखवणार्‍या एजंटावर बारीक लक्ष आहे.


हेही वाचा



* दूध अनुदानासाठी ‘भीक नको, पण कुत्रे आवर’

* Jalgaon : सावदा शहरात पताका लावल्यावरुन दगडफेक, 2 पोलीस जखमी

* पुरंदर तालुक्यातील गव्हाचा पेरा घटला : शेतकरी अडचणीत






The post मीटरचे जुगाड करून कोट्यवधींची वीजचोरी : खडी क्रशरचालकाचा प्रताप appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T1g8Gf

नगर : संगमनेरात ५ मटका अड्ड्यांवर छापा : ९ जणांवर गुन्हे दाखल

संगमनेर: पुढारी वृत्तसेवा : संगमनेरसह परिसरातील मटका अड्ड्यांवर नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पोलिसांनी छापे टाकले. या कारवाईत मटक्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यासह ११ हजारांची रोकड हस्तगत केली. याप्रकरणी मटका चालकासह ९ जणांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, मुख्य मटका किंग शरद द्वारका शर्मा पोलिसांना पाहून फरार झाला आहे.


जिल्हा गुन्हे शाखेच्या पोलीस पथकातील हवालदार दत्तात्रय गव्हाणे, सचिन आडबल, पोलीस नाईक किशोर शिरसाट, शिवाजी आढाव, संगमनेरचे हवालदार अजित कु-हे, बाळासाहेब गुंजाळ यांच्या पथकाने शहरातील प्रवरा नदी काठावर सुरू असलेल्या जुगार अड्डासह घुलेवाडी फाटा, संजय गांधीनगर, जयजवान चौक, माळीवाडा, कासट व्यापारी संकुल, अकोले नाका, नवघर गल्ली, चिखलीचा येडू आई मंदिर परिसर अशा विविध ठिकाणी टपऱ्यांमध्ये सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर छापा टाकले.


या प्रकरणी सिद्धांत रमेश जाधव, शरद द्वारका शर्मा, शुभम बाळू कालेकर, धनंजय धनराज कतारी, राजेंद्र बाबुलाल ओझा, राम गोरक्ष बर्डे, संतोष रूपचंद पवार, संजय चंद्रभान केरे, संतोष विठ्ठल उदावंत आदी ९ जणांवर मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेतील मुख्य मटका किंग शर्मा हा फरार झाला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.


हेही वाचा 



* श्री रामलल्लाचे अयोध्या नगरभ्रमण उत्साहात; महिलांची कलशयात्रा ठरली लक्षवेधी

* Nashik News : श्रमिकनगरला स्वीट्सच्या दुकानात गॅस सिलेंटरने घेतला पेट

* अहमदनगर : निळवंडे उजव्या कालव्यातून सुटणार २२ जानेवारीला पाणी; विखे पाटील यांची घोषणा






The post नगर : संगमनेरात ५ मटका अड्ड्यांवर छापा : ९ जणांवर गुन्हे दाखल appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T1dNxz

संगमनेर : साकुरच्या चिंचेवाडीत रक्ताच्या थारोळ्यात आढळला वृद्धाचा मृतदेह

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर जवळील चिंचेवाडी शिवारात मली बाबा मंदिरासमोर ६५ वर्षीय व्यक्तीच्या डोक्यामध्ये दगड घालून खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी मध्यरात्री च्या सुमारास घडली.त्यामुळे तालुक्याच्या पठारभागामध्ये एकच खळबळ उडाली आहे.


देवराम मुक्ता खेमनर वय ६५ रा. चिंचे वाडी साकुर ता संगमनेर जि.अनगर असे खून झालेल्या मयताचे नाव आहे. साकूर ते संगमनेर महामार्गालगतच्या चिंचेवाडी शिवारात मलीबाबा मंदिर आहे.या मंदिरा बाहेर छोटसे शेड उभारलेले आहे. याच शेडमध्ये देवराम खेमनर यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.


या घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, घारगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांच्यासह पो कॉ काॅन्स्टेबल प्रमोद गाडेकर, सुभाष बोडके, गणेश लोंढे, नामदेव बिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटना स्थळाचा पंचनामा करण्यात आला. यावेळी पोलिसांनी संपूर्ण घटनास्थळाची पाहणी देखील केली. त्या मृतदेहाजवळच दगड, चप्पल,आधारकार्डासह इतर कागद पत्रे आढळून आले. यावेळी बाजूलाच रक्ताने माखलेला दगड पडलेला होता.या वेळी श्वान पथकासह ठसे तज्ञांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.


दरम्यान मृतदेहाजवळच दगड, चप्पल, आधारकार्डासह इतर कागदपत्रे आढळून आले. मृतदेहाच्या बाजूला पडलेला दगड पुर्णपणे रक्ताने माखलेला होता. यावेळी श्वानाला परिसरात फिरवण्यात आले. त्या नंतर देवराम खेमनर यांचा मृतदेह त्वरित शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रूग्णालयात पाठविण्यात आला. परंतु देवराम खेमनर यांचा खून कुणी व कशा साठी केला असावा याबाबत परिसरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. या वृद्धाचा खून कोणी केला त्याचा तपास लावणे घारगाव पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे.


The post संगमनेर : साकुरच्या चिंचेवाडीत रक्ताच्या थारोळ्यात आढळला वृद्धाचा मृतदेह appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T1b2xY

दु्र्दैवी : शॉर्टसर्किटने चार एकर ऊस जळून खाक; लाखो रुपयांचे नुकसान

काष्टी : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील रायगव्हाण येथील शेतकरी सुरेश भाऊसाहेब वराळे यांचा मंगळवारी (दि. 16) गट नंबर 36 मधील चार एकर ऊस शेताजवळील असणार्‍या रोहित्रातील शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला. यामध्ये वराळे यांचे सुमारे आठ ते नऊ लाखांचे नुकसान झाले आहे. उसाला आग लागल्यावर शेताजवळील असणारे बाळासाहेब पठारे, किरण वराळे, अनिल पठारे, सुदाम दिवटे, अनिकेत कदम, राहुल कदम, देविदास वराळे, पप्पू वराळे, सागर वराळे, नीलम वराळे, जालिंदर कदम या शेतकर्‍यांनी पेटलेला ऊस विझविण्याचा प्रयत्न केला.


वराळे यांच्या शेतामध्ये वारंवार शॉर्टसर्किट होत होते. त्याबाबत त्यांनी वारंवार पिंपरी कोलंदर चौफुला व बेलवंडी उपकेंद्रात तक्रार केली होती. परंतु, त्यांच्या तक्रारीकडे वीजपुरवठा कर्मचार्‍यांनी दुर्लक्ष केले. तक्रारीची दखल घेतली असती, तर ऊस वाचला असता. जळीत उसाचा कामगार तलाठी मोरे भाऊसाहेब, कृषी अधिकारी प्रतीक कांबळे, उपकार्यकारी अभियंता किशोर कायस्थे, वीज कर्मचारी रमेश सातपुते, कुकुडी सहकारी साखर कारखाना क्षेत्रीय अधिकारी सोमनाथ देविकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.


हेही वाचा



* Nashik Drugs : नाशिकमध्ये ‘एमडी’सह टिप्परचे दोघे गजाआड

* Kirit Somaiya : खिचडीच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा; सोमय्यांचा आरोप

* पीएमआरडीए विकास आराखडा; 24 ला निर्णय






The post दु्र्दैवी : शॉर्टसर्किटने चार एकर ऊस जळून खाक; लाखो रुपयांचे नुकसान appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T1XYcT

नुसत्या यात्रा काढून पक्ष वाढत नाही: महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा: चांगले काम करणार्‍यांना काँग्रेस पक्षात भवितव्य नाही. नुसत्या यात्रा काढून पक्ष वाढत नाही, अशी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या पदयात्रेबाबत केली. मुंबई येथील काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला.


याबाबत मंत्री विखे यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, माजी खासदार देवरा हे मुंबईचे अध्यक्ष असताना काँग्रेस पक्ष वाढीसाठी चांगले काम केले, परंतु चांगले काम करणार्‍यांना काँग्रेस पक्षात भवितव्य नाही. नुसत्या यात्रा काढून पक्ष वाढत नाही. यामुळे माजी खा. मिलिंद देवरा यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो, असे मंत्री विखे पा. म्हणाले.


हेही वाचा 



* संगमनेर, कोपरगावात चिनी मांजा विकताना पाच जणांविरूद्ध गुन्हा

* चंद्रपूर : पतंग पकडण्याच्या मोह जीवावर बेतला; स्लॅबवरून पडून एकाचा मृत्यू

* खोडद येथे उपडाकघर सुरू..






The post नुसत्या यात्रा काढून पक्ष वाढत नाही: महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T1TpMk

Gf ke ghar aise kon jata hai?🤣🤣🤣 people with smart watch

Gf ke ghar aise kon jata hai?🤣🤣🤣 people with smart watch

Tap here to buy the product https://bit.ly/3QhyDyF
via YouTube https://www.youtube.com/watch?v=xrxedMLQK1k

Radio Then vs Now 📻🎙️

Radio Then vs Now 📻🎙️


via YouTube https://www.youtube.com/watch?v=8TTPJ1uhbfA

पाणीप्रश्न सोडविण्यास कोल्हेंची साथ; कोपरगावकरांना मिळणार दिलासा

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारून कोल्हे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून नि:स्वार्थी भावनेने समाजसेवा करीत आहे. शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी कोल्हे कुटुंबियांनी मला मोलाची साथ दिली. युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजासमोर आदर्श निर्माण केला, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते राजेश मंटाला यांनी केले.


मंटाला म्हणाले, अनेक वर्षांपासून कोपरगावला पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. शहरवासियांना कधी 8 तर कधी 15 दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. गंभीर पाणीप्रश्न सोडविण्यास मी सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन डिजिटल स्वरुपात पाणी आंदोलन केले.

एकाच वेळी शहरातील हजारो नागरिकांनी पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, पाणी पुरवठा विभाग, जिल्हाधिकारी आदींना ई-मेल पाठवले. या आंदोलनात माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांची साथ मिळाली. पंतप्रधान कार्यालयाने या डिजिटल पाणी आंदोलनाची दखल घेऊन शहराचा पाणीप्रश्न तत्काळ सोडविण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारला दिले.


या आंदोलनामुळे कोपरगाव शहराच्या पाणीप्रश्नाला गती मिळून पालिकेला निधी प्राप्त झाला. पाच-सहा वर्षांपासून पाणीप्रश्न सुटण्यासाठी लढा देत आहे. श्रेय कुणीही घेतले तरी आपल्याला प्रश्न सुटण्यासाठी काम करायला आवडते, असे मंटाला यांनी सांगितले.

माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शहरात नागरिकांना नियमित शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी येसगाव शिवारात गोदावरी डावा कालव्याशेजारी नगर परिषदेच्या सर्व साठवण तलावासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी मिळवून दिल्या. या शेतकर्‍यांच्या मुलांना संजीवनी कारखान्यात नोकर्‍या दिल्या.


स्व. कोल्हे यांनी शहर पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी मिळवून दिला. पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी सतत प्रयत्न केले. शहराची वाढती लोकसंख्या व पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन त्यांनी राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा करून नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना व त्यासाठी लागणारा कोट्यवधींचा निधी मंजूर करवून आणला, ही वस्तुस्थिती असल्याचे राजेश मंटाला म्हणाले. दरम्यान, मंटाला यांनी पाणीप्रश्न संदर्भात केलेल्या या पाठपुराव्याचे कौतुक होत आहे.


हेही वाचा



* हिंदुत्व सोडल्यानेच ठाकरेंवर ही वेळ : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

* गोव्यात मंत्री, आमदारांकडून मंदिरांची स्‍वच्छता; पंतप्रधानांनी केले होते आवाहन

* मुंबईत पालिकेच्या बंद शाळेत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट






The post पाणीप्रश्न सोडविण्यास कोल्हेंची साथ; कोपरगावकरांना मिळणार दिलासा appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T1RJMn

अहमदनगर : निळवंडे उजव्या कालव्यातून सुटणार २२ जानेवारीला पाणी; विखे पाटील यांची घोषणा

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याबाबत .सर्व तांत्रिक काम पूर्ण झाली असल्याचे अभियंत्यांनी सांगितले . त्यानुसार असे कीर्तन आयोध्येतील प्रभू श्रीराम मंदीराच्या उद्घाटन सोहळ्याच्या मुहूर्तावर निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महसूल तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.प्रवरा डावा कालव्यातून तसेच मुळा उजव्या कालव्या मधून सोमवारपासून आवर्तन सोडण्याच्या त्यांनी जलसंपदा विभागाला दिल्या.


महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली संगमनेर येथील उपविभागीय कार्यालयात जलसंपदा विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सपंन्न झाली.बैठकीस नासिक जलसंपदा विभागा च्या कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे अधिक्षक अभियंता महेंद्र आमले प्रांताधिकारी शैलेश हिंगे पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे मुळा लाभक्षेत्राच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील प्रवरा लाभक्षेत्राचे स्वप्निल काळे निळवंडे उद्धव प्रवरा प्रकल्पाचे अभियंता कैलास ठाकरे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे आदी अधिकारी उपस्थित होते.


मंत्री विखे म्हणाले की राहुरी तालुक्या तील शेवटच्या गावापर्यत पाणी पोहचेल यासाठी दिड टिएमसी पाण्याचा वापर करण्यात येईल.प्रवरा धरण समूहातील उपलब्ध पाण्याचा साठा लक्षात घेवून रब्बी हंगामातील पिकांसाठी सोमवार पासून आवर्तन सोडण्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.लाभक्षेत्रा तील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेवून मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातूनही पाणी सोडण्याची कार्यवाही सोमवार पासून करण्याबाबतही विखे पाटील यांनी अधिकार्याना दिल्या.पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मंत्री विखे यांनी दिले.गोदावरीलाभक्षेत्राचे आवर्तन आताच चांगल्या पध्दतीने झाले. सुयोग्य नियोजन झाल्याबद्दल त्यांनी अधिकार्यांचे अभिनंदन केले.

फोटो ओळी


The post अहमदनगर : निळवंडे उजव्या कालव्यातून सुटणार २२ जानेवारीला पाणी; विखे पाटील यांची घोषणा appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T1NvZj

मराठवाडा : ९ वे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन अहमदपुरात

अहमदपूर, पुढारी वृत्त सेवा : मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त कॉम्रेड श्रीनिवास काळे स्मृती प्रतिष्ठान व मराठवाडा साहित्य परिषद अहमदपूरच्या संयुक्त विद्यमाने शहरातील संस्कृती मंगल कार्यालयात २० व २१ जानेवारी रोजी नववे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन पार पडणार असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी बीड येथील लेखिका  उषा दराडे यांची निवड करण्यात आली आहे. (Marathwada)


Marathwada : ‘विद्यमान तंत्रज्ञान आणि माध्यमातील स्त्री प्रतिमा’




या साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, परिसंवाद, कथाकथन व निमंत्रितांचे कविसंमेलन अशी रेलचेल राहणार आहे. २० जानेवारी रोजी शनिवारी सकाळी ग्रंथदिंडी व ग्रंथ प्रदर्शनाचे उ‌द्घाटन सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आहे. संमेलनाध्यक्षा ड.उषा दराडे, ललिता गादगे आदी उपस्थित रा- हणार आहेत. मराठी कादंबरी आणि मराठवाड्यातील रखी कादंबरी लेखन या विषयावर परिसंवादाच्या अध्यस्थानी सावित्री चिताडे (परभणी) राहणार आहे. या परिसंवादामध्ये प्रा. डॉ. जयदेवी पवार, संजीवन नेरकर, द्रौपदी पंदीलबाड, दीपा बियाणी, आसिया चिस्ती इनामदार व शारदा देशमुख यांचा सहभाग असेल. सरोजा देशपांडे (परभणी) यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन पार पडणार असून यात अनिता यलमटे, रत्नमाला मोहिते, पुष्पा दाभाडे नलावडे, सुनिता गुंजाळ, अनुपमा बन, डॉ. सत्यशीला तौर सहभागी होणार आहेत. डॉ. उर्मिला चाकूरकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन संपन्न होणार आहे.


रविवार २१ जानेवारी रोजी ‘विद्यमान तंत्रज्ञान आणि माध्यमातील स्त्री प्रतिमा’ या विषयावर परिसंवाद दोन चे आयोजन करण्यात आले असून छत्रपती संभाजीनगर येथील प्रा. समिता जाधव हे ह्या अध्यक्षस्थानी असतील. विद्या बयास ठाकूर, अनुजा डोईफोडे, शर्मिष्ठा भोसले शैलजा बरुरे, रेखा हाके आणि वैशाली कोटंबे आदी सहभागी होणार आहेत. संमेलनाचा समारोप संमेलनाच्या अध्यक्षा ड. उषा दराडे व ड. वर्षा देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.


संमेलनाला उपस्थित राहावे, असे आवाहन संमेलनाच्या स्वागताध्यक्ष तथा श्रीनिवास काळे स्मृती प्रतिष्ठानच्या प्रमुख ड. ज्योती काळे, सरोजा भोसले, रेखा हाके, आशा रोडगे-तत्तापुरे, संगीता खंडागळे, विमल काळे यांच्या सह संयोजन समितीच्या सदस्यांनी केले आहे.


हेही वाचा 



* ”नोकरकपातीमुळ अनेकजण उद्ध्वस्त!, पण मी नाही…”, १९ वर्षाची नोकरी गमावल्यानंतर Google अभियंत्याची पोस्ट चर्चेत

* West Bengal : धक्कादायक! उत्तर प्रदेशच्या ३ साधूंना प. बंगालमध्ये जमावाकडून मारहाण, १२ जणांना अटक






The post मराठवाडा : ९ वे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन अहमदपुरात appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T1M8lm

Shirdi: राम मंदिर उदघाटन समारंभाच्या निमंत्रण पत्रिका घेऊन स्वयंसेवक पोहोचले घरोघरी




http://dlvr.it/T1Kncy

मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज माफ करा : अ‍ॅड. अभय आगरकर

नगर : पुढारी वृत्तसेवा :मागासवर्गीय विकास महामंडळ व बँकांकडून घेतलेले कर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष नरेश चव्हाण, संदीप पवार उपस्थित होते.


गेल्या 15 वर्षांपासून दुष्काळ, अतिवृष्टी, आर्थिक मंदी, कोविड महामारी या कारणाने मागासवर्गीय समाजाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे मागासवर्गीय महामंडळ, बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे शक्य होत नसल्याचे निवेदनात म्हटले.

दरम्यान, भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीवर आता काय निर्णय होणार, याकडे लक्ष आहे.


हेही वाचा



* आशा स्वयंसेविकांच्या प्रश्नांवर आवाज उठवू : राम शिंदे

* Kunbi Maratha Records : मराठा म्हणजे कुणबीच नोंद सापडली?

* Red Sea | येमेनमधील हुथी बंडखोरांवर अमेरिकेचे पुन्हा हल्ले, ६० ठिकाणांना केले लक्ष्य






The post मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज माफ करा : अ‍ॅड. अभय आगरकर appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T1KSWj

शिर्डीतून पुन्हा आठवलेंच्या उमेदवारीसाठी रिपाइंचा आग्रह

आश्वी : पुढारी वृत्तसेवा : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले शिर्डी लोकसभा मतदार संघात पुन्हा 2024 ची लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. दलित व बहुजन समाजाच्या प्रश्नांवर आवाज उठविणारे प्रभावी व्यक्तिमत्व असल्याने शिर्डीतचं नव्हे तर राज्यासह देशात ते आहेत. मंत्री आठवले यांना शिर्डीतून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळावी, यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्यासह भाजपच्या केंद्रीय व राज्य नेतृत्वांना रिपाईंचे शिष्टमंडळ भेटणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष विजय वाक्चौरे यांनी दिली.


वाकचौरे म्हणतात, सध्या देशासह राज्यात भाजपाबरोबर एकमेव दलित नेता म्हणून मंत्री आठवले कार्यरत आहेत. लोकांमध्ये रमणारे ते नेते आहेत. गेल्या 10 वर्षांत भाजपाशी प्रामाणिक राहून बहुजन समाजासाठी ते आवाज उठवित आहेत. न्याय मिळवून देत कार्यरत आहेत. देशाच्या काना – कोपर्‍यात फिरणारे ते एकमेव नेते आहेत्त.


शिर्डी मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा असल्याचे मंत्री आठवले वेळोवेळी सांगत आहेत. सातत्याने ते शिर्डीसह परिसरात येतात. मंत्री आठवले यांना वातावरण चांगले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. व खा. डॉ. सुजय विखे पा. यांच्याशी उमेदवारीबाबत चर्चा झाली आहे. 2009 मध्ये आठवले यांना काही कारणास्तव पराभवाला सामोरे जावे लागले, परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप मित्र पक्षांची घौडदोड सुरू आहे. शिर्डीकरांच्या सेवेसाठी मी पुन्हा येईल. आता मात्र विजय निश्चित राहिल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जी. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मंत्री रामदास आठवले यांनी वेळोवेळी म्हटले आहे.


भाजपाने मित्र पक्ष म्हणून शिर्डी लोकसभा मतदार संघातून आठवले यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी रिपाईंचे प्रदेश उपाध्यक्ष विजय वाक्चौरे, जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे व शिष्टमंडळ करणार आहे.


The post शिर्डीतून पुन्हा आठवलेंच्या उमेदवारीसाठी रिपाइंचा आग्रह appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T1H6Bg

A Simple Formula for Dressing Well

A Simple Formula for Dressing Well

If you've been struggling to put together a great outfit, follow these four simple rules of style and you'll be well on your way. Shop essential menswear: https://hespokestyle.com/shop/ Join the community as an insider: https://hespokestyle.substack.com/ Browse the essential men’s style library: https://kit.co/hespokestyle/essential-library-of-men-s-style-books --- NEW VIEWER? START HERE https://www.youtube.com/playlist?list=PL3v2lRj6jZMeVLnSveZFagb48MaeGfAmo --- WHO AM I? GET TO KNOW ME BETTER: 5 Things I Regret Buying The Most https://www.youtube.com/watch?v=fEE5fURfTUk&list=PL3v2lRj6jZMdj2TKL6JezNG_DqudHnRLB&index=5 Reacting To Your Assumptions About Me https://www.youtube.com/watch?v=cE0Qsgr1TbE 5 Things I Wish I Knew In My 20s https://www.youtube.com/watch?v=04N8PCUMMaQ&list=PL3v2lRj6jZMdj2TKL6JezNG_DqudHnRLB&index=4 --- CONNECT WITH ME Website: https://hespokestyle.com/ Instagram: https://www.instagram.com/hespokestyle TikTok: https://www.tiktok.com/@hespokestyle Pinterest: https://www.pinterest.com/hespokestyle/ Facebook: https://www.facebook.com/hespokestyle For business inquiries and to work with Brian Sacawa or He Spoke Style, please email Ms. Stephanie Barron at stephanie@estatefive.vip. Contains affiliate links // Stay tailored! #mensstyle #mensoutfits #menswear
via YouTube https://www.youtube.com/watch?v=R9BP1loyA7Y

अहमदनगर : संगमनेरमध्ये ठाकरे गटाकडून राहूल नार्वेकर यांचा निषेध

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा :  खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना आहे आणि सर्व १६ आमदार हे पात्र असल्याचा निकाल आज (दि.१०) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. याबाबत निषेध व्यक्त करीत आज (दि.१०)  संगमनेरमध्ये ठाकरे गटाकडून नार्वेकर यांचा निषेध करण्यात आला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संतप्त शिवसैनिक आज बस स्थानकासमोर एकत्र आले. आणि राहुल नार्वेकर यांचे बॅनर जाळत त्यांनी जोडे मारो आंदोलन केले.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे १६ आमदार अपात्र की पात्र याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज निकाल देणार होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे त्यांच्या निकालाकडे लक्ष लागले होते. एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार असून एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. या निकालाबाबत संताप व्यक्त करत आज ठाकरे गटाच्या वतीने नार्वेकरांचा निषेध करत आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे संगमनेर विधानसभा संघटक कैलास वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर बस स्थानकाजवळ सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक एकत्र आले. शिवसैनिकांनी राहुल नार्वेकर यांचे बॅनर जाळत जोडे मारो आंदोलन केले. आणि नार्वेकर यांचा निषेध व्यक्त करत विरोधात घोषणा दिल्या.


यावेळी उपजिल्हाप्रमुख अशोक सातपुते, युवासेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवासेना संघटक पप्पू कानकाटे, उपशहर प्रमुख सुदर्शन इटप , शहरसंघटक समीर ओझा, उपतालुकाप्रमुख दत्तू नाईक, आजीज मोमीन, अमोल कवडे, योगेश बिचकर ,संकेत गुंजाळ राजेंद्र सातपुते, भैया तांबोळी उपस्थित होते.


हेही वाचा :



* मोठी बातमी! उद्धव ठाकरेंकडून पुढची भूमिका जाहीर! म्हणाले, ‘आम्ही आता..’

* Sanjay Raut : राहुल नार्वेकर यांनी ‘दिल्ली’वरून आलेला निकाल वाचून दाखविला : संजय राऊत

* उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टात जावं लागणार : शरद पवार






The post अहमदनगर : संगमनेरमध्ये ठाकरे गटाकडून राहूल नार्वेकर यांचा निषेध appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T1CfB8

Kisi Se Mat Daro | By Sandeep Maheshwari #StopScamBusiness

Kisi Se Mat Daro | By Sandeep Maheshwari #StopScamBusiness

Sandeep Maheshwari is a name among millions who struggled, failed and surged ahead in search of success, happiness and contentment. Just like any middle class guy, he too had a bunch of unclear dreams and a blurred vision of his goals in life. All he had was an undying learning attitude to hold on to. Rowing through ups and downs, it was time that taught him the true meaning of his life. To know more, log on to www.sandeepmaheshwari.com Facebook: https://www.facebook.com/sandeepmaheshwaripage Instagram: https://www.instagram.com/sandeep__maheshwari Twitter: https://twitter.com/sandeepseminars #StopScamBusiness
via YouTube https://www.youtube.com/watch?v=H2-RhsggQe8

वार्षिक योजनेचा 630 कोटींचा आराखडा : पालकमंत्री राधाकृष्ण विखे

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हा वार्षिक योजनेंर्गत 2024-25 या आर्थिक वर्षासाठी शासनाने 630 कोटी रुपयांची आर्थिक मर्यादा निश्चित केलेली आहे. त्यानुसार तयार केलेल्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 2023-24 या आर्थिक वर्षांचा 70 टक्के म्हणजे 434.30 कोटींचा निधी उपलब्ध झालेला आहे. त्यापैकी 371.20 कोटी रुपये खर्चाच्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2024-25 प्रारूप आराखडा बैठक झाली. खासदार सदाशिव लोखंडे व डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे व किरण लहामटे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, बाळासाहेब कोळेकर, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर उपस्थित होते. दूरदृश्यप्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) आमदार बबनराव पाचपुते व लहू कानडे सहभागी झाले होते.


जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2023-24 साठी 620 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यापैकी 434 कोटी 30 लाख निधी प्राप्त झाला असून, त्यापैकी आतापर्यंत 371 कोटी 20 लाख रकमेच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 237 कोटी 81 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी होणार्‍या राज्यस्तरीय नियोजन बैठकीत जिल्हा विकासासाठी 220 कोटी रुपयांची वाढीव मागणी करण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणांना दिले. जिल्ह्यातील शेतकर्‍यांची यशोगाथा सांगणारी कृषी विकासाची यशोगाथा पुस्तिका तयार करावी, शेतकर्‍यांना प्रेरणादायी ठरेल, असा उपक्रम जिल्ह्यात राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.


मोठमोठे उद्योग येतील

नगर तसेच शिर्डी येथे औद्योगिक विकासासाठी जवळपास एक हजार एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. आगामी काळात मोठमोठे उद्योग उभारले जातील. कौशल्य, उद्योग व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण या विभागांनी समन्वयाने काम करत उद्योगांची मागणी असलेले कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम जिल्ह्यात प्राधान्याने राबविण्याच्या सूचनाही पालकमंत्री विखे पाटील यांनी दिल्या.


थोरात, शिंदे, गडाख यांची बैठकीकडे पाठ

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला जिल्हाभरातील सर्व खासदार आणि आमदारांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, या बैठकीकडे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार सर्वश्री नीलेश लंके, रोहित पवार, आशुतोष काळे, आमदार संग्राम जगताप, सत्यजित तांबे यांनी नियोजन समितीच्या बैठकीकडे पाठ फिरवली.


The post वार्षिक योजनेचा 630 कोटींचा आराखडा : पालकमंत्री राधाकृष्ण विखे appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T198ht

अखेर उजनी चारी उपसा जलसिंचन योजना सुरु ; 11 गावांना वरदान

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा : बंद पाडलेली उजनी चारी उपसा जलसिंचन योजना त्यांनीच सुरु करण्याचा अयशस्वी प्रयत्न करुन, नागरिकांची सहानुभूती मिळविण्याचा खटाटोप केला, मात्र ही योजना फक्त काळे परिवारचं चालवू शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. उजनी उपसा जलसिंचन योजनेला काळे परिवाराशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे उजनी चारी उपसा जलसिंचन योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात म्हणाले. कोपरगाव मतदार संघाच्या दक्षिण भागातील 11 गावांना वरदान ठरणा-या उजनी चारी उपसा जलसिंचन योजनेला 2004 पूर्वी शासनाकडून नॉट फेजीबल (उपयुक्त नाही) असा शेरा मारण्यात आला होता.


परंतु रांजणगाव देशमुख, काकडी, मनेगाव, वेस-सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबाद या 11 गावांतील नागरिकांसाठी ही योजना किती महत्वाची आहे, याची जाण असणारे माजी आमदार अशोकराव काळे यांनी 2005 साली विधान सभा अधिवेशनात उजनी चारी उपसा जलसिंचन योजने संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. विद्यमान राज्यपालांकडे जावून या उजनी उपसा जलसिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी, अशी मागणी केली. राज्यपालांनी दखल घेत मागणी योग्य ठरविली. राज्यपालांनी पाटबंधारे मंत्र्यांना योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याच्या सूचना केल्या. तेव्हापासून 2014 सालापर्यंत माजी आमदार काळे यांनी स्वतःच्या कार्यकाळात योजना पदरमोड करून अखंडपणे कार्यान्वित ठेवली, मात्र 2014 नंतर पुन्हा बंद पडल्याने कायम दुष्काळाच्या झळा सोसणार्‍या 11 गावांतील शेतकर्‍यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या. ‘विधानसभा निवडणुकीपूर्वी उजनी चारी उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरु करणार,’ दिलेला हा शब्द आ. काळे यांनी निवडून येताच पूर्ण केला. 11 गावांतील शेतकर्‍यांचे चेहरे पुन्हा खुलले.


यावर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ओव्हर फ्लोच्या पाण्यावर भवितव्य अवलंबून असलेली ही योजना बंद राहणार होती, मात्र आ. काळे यांनी पाटबंधारेकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे पाणी उपलब्ध झाले, मात्र योजनेच्या पंपाच्या दुरुस्ती बीलासह इतर दुरुस्ती खर्च केल्याशिवाय योजना सुरु होणार नव्हती. यामुळे आ. काळे यांनी माजी आमदार अशोकराव काळे यांच्या पावलावर पाऊल ठेवून पदरमोड करून पंप दुरुस्ती खर्चाचा भार सोसल्याने उजनी चारी उपसा जलसिंचन योजना पुन्हा कार्यान्वित झाली. यावेळी उजनी उपसा जलसिंचन योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात, लक्ष्मण थोरात, चंद्रकांत पोकळे, गणेश थोरात, नवनाथ पोकळे, अनिल वाणी, गोरक्षनाथ वाकचौरे, शिवाजी थोरात, विलास थोरात आदी उपस्थित होते.


‘आ. आशुतोष काळे यांनी 11 गावांसाठी ‘निळवंडे’च्या पाण्यासह अतिरिक्त दीड टीएमसी पाणी देखील मंजूर करून घेतले. यामुळे साठवण तलाव तुडुंब भरले. निळवंडे असो वा उजनी चारी उपसा जलसिंचन योजना, काळे परिवाराशिवाय दुसरा पर्यायच नसल्याचे अधोरेखित होत आहे.

                         – बाबुराव थोरात, अध्यक्ष-उजनी चारी उपसा जलसिंचन योजना


The post अखेर उजनी चारी उपसा जलसिंचन योजना सुरु ; 11 गावांना वरदान appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T16h81

कपड्यावरील डाग पुसता येतो पण सरकारवरील डाग कसा पुसणार : भास्कर जाधव

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : कपड्यावरील डाग साबणाने, किंवा वॉशिंग पावडरने धुता येतो मात्र सरकार वर पडलेला डाग कोणत्या साबणानेकसा पुसणार असा प्रतिसावाल करत उद्धव ठाकरे शिवसेनेचे उपनेते आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले


सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात जयंती महोत्सव निमित्ताने उद्धव ठाकरे शिवसेनेचे उपनेते व माजी मंत्री आमदार भास्कर जाधव संगमनेररात आले होते त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधीनी मुंबईत सुरू केलेली डिप क्लिनिंग ड्राइव्ह अर्थात संपूर्ण स्वच्छता मोहीम संपूर्ण राज्यात राबवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली त्या घोषणे बाबत आ.भास्कर जाधव यांना छेडले असता ते म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या चारित्र्यावर व निष्ठेवरच डाग पडलेला असून महाराष्ट्राची वैचारिक परंपरा बरबाद केल्याचा डाग कसा पुसणार अशा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला


भावना गवळी यांची बँक खाती गोठव ल्याबद्दल आ.भास्कर जाधव यांना माध्य मांच्या प्रतिनिधींनी विचारले असता ते म्हणाले की आपल्या एका खूप मोठ्या भावाला राखी बांधली होती, कदाचित त्या मोठ्या भावानेच खासदार भावना गवळी यांना भाऊबीज भेट दिली असेल अशी टीका शिवसेनेचे उपनेते भास्कर जाधव यांनी पंतप्रधान मोदी यांचे नाव न घेता केली.


उपमुख्यमंत्री अजित पवार वारंवार तोच मुद्दा उपस्थित करत आहे.त्यामुळे त्यांच्या कडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. त्यांच्या वाढत्या वयात काम करण्याच्या वृत्तीचा आदर्श इतरांनी घ्यावा . अजून तरी त्यांचा स्टॅमिना आणि फिरण्याची धमक उत्साह हा एखाद्या वीस वर्षाच्या तरुणाला लाजविणारा आहे. त्यामुळे उगाचंच त्यांच्या वयाच्या विषयावरून वारंवार उच्चार करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले कार्यकर्तुत्व त्या आड लपवू नकाअसा टोला शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला


The post कपड्यावरील डाग पुसता येतो पण सरकारवरील डाग कसा पुसणार : भास्कर जाधव appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T14SRv

Nebula Capsule 3 Laser Unboxing

Nebula Capsule 3 Laser Unboxing


via YouTube https://www.youtube.com/watch?v=GhrgFFgzvz8

Shirdi: राकेश कोते यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या 'प्रदेश सचिव' पदी नियुक्ती




http://dlvr.it/T12qhX

नगरच्या चौकाचौकात झळकणार थकबाकीदारांची नावे

नगर : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या थकबाकीदारांना शास्तीमध्ये 75 टक्के सूट देऊनही अवघे 10 कोटी वसूल झाले. अद्याप सुमारे दोनशे कोटींची थकबाकी आहे. त्यातील सर्वाधिक थकबाकी बड्या थकबाकीदारांकडे आहे. आता त्या बड्या थकबाकीदारांची नावे मोठ्या फलकावर शहरातील चौकाचौकात झळकणार आहेत. तसे आदेश आयुक्तांनी वसुली विभागाला दिले आहेत. महापालिकेच्या तिजोरीत वर्षानुवर्षे खडखडाट आहे. महापालिकेची घरपट्टी, पाणीपट्टी अशा कराच्या स्वरूपात मालमत्ताधारकांकडे सुमारे 210 कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी पथके नेमूनही मालमत्ताधारकांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी मालमत्ताधारकांना सुरुवातीला 30 नोव्हेंबर ते 9 डिसेंबरपर्यंत 75 टक्के शास्तीमाफी जाहीर केली होती. दहा दिवसांत या योजनेचा 4 हजार 413 जणांनी लाभ घेत थकबाकीपोटी मनपाकडे 6 कोटी 70 लाख रुपयांचा भरणा केला. त्यानंतर शास्तीमाफीच्या योजनेत 31 डिसेंबरपर्यंत वाढ केली. उर्वरित 21 दिवसांत 3 कोटी 17 लाख 24 हजार अशी एकूण 9 कोटी 87 लाख 64 हजार रुपयांची वसुली झाली.


दरम्यान, शास्तीत 75 टक्के सूट देऊनही वसुलीचे प्रमाण अल्प राहिले. आजमितीला 2 हजार 734 मालमत्ताधारकांकडे एक लाखांपेक्षा जास्त थकबाकीदार आहेत. त्याच्याकडे 108 कोटी 91 लाख 78 हजार 794 रुपयांची थकबाकी आहे. त्यात मोठे उद्योजक, व्यावसायिक, हॉटेल चालक यांचा समावेश आहे. त्यातील काही मालमत्ताधारकांनी थकबाकी पोटी 2239 धनादेश मनपाला दिले. मात्र, ते सर्व धनादेश बाउंस झाले. आता बड्या थकबाकीदारांना चपराक देण्यासाठी महापालिकेने बेवसाईट व चौका-चौकात नामफलक जाऊन नावे जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.


कर संकलनासाठी प्रभाग समितीला उपायुक्त

शास्तीत सूट देऊनही थकबाकीदार महापालिकेकडे भरणा करीत नाहीत. कर संकलनाची जबाबदारी एका उपायुक्तावर होती. आता महापालिकेत प्रशासक राज असून, आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी प्रशासकाचा पदभार घेतला आहे. कर संकलनाच्या कामात सुसूत्रता यावी यासाठी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी प्रत्येक समितीला एका उपायुक्ताची नियुक्ती केली आहे. आता त्यांच्यावर करसंकलनाची जबाबदारी देण्यात येणार आहे.


The post नगरच्या चौकाचौकात झळकणार थकबाकीदारांची नावे appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T12qRs

सत्ता आल्यास पहिली सही अंगणवाडी भगिनींसाठी : खासदार सुप्रिया सुळे

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा :  मराठा, मुस्लिम, धनगर आणि लिंगायत आरक्षण देण्याचा विषय जो पक्ष सोडवेल त्याच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने उभा राहील, तसेच राष्ट्रवादीची सत्ता आल्यावर पहिल्यांदा शेतकर्‍यांना कर्जमुक्त करू आणि महिलांसाठी पहिली सही अंगणवाडी भगिनींसाठी असेल, अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी (दि. 4) येथे दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात त्या बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसवर पुढचे वर्षभर निवडणुकांची जवाबदारी असेल, असे सांगून सुळे म्हणाल्या, की महाराष्ट्रासमोर सध्या सर्वांत मोठे आव्हान पाण्याचे असणार आहे. बीड व उस्मानाबाद येथे प्रचंड पाण्याची अडचण आहे. मात्र सरकार याबाबतीत अतिशय असंवेदनशील आहे. ट्रिपल इंजिनचे हे खोके सरकार फक्त पक्ष फोडा व कुटुंब तोडण्यात व्यस्त आहे.


संबंधित बातम्या :



* Sunil Kedar : सुनील केदार यांच्यासह सहकाऱ्यांच्या जामीनावर एकाच दिवशी निर्णय

* Girish Mahajan Vs Eknath Khadse : एकनाथ खडसेंनी लोकसभा, विधानसभेत निवडून येऊन दाखवावे : गिरीश महाजन

* सोबत्यानेच केला गोळीबार ! गुंड शरद मोहोळचा उपचारादरम्यान मृत्यू






माझी लढाई महाराष्ट्रात कोणाशीच नाही, तर दिल्लीच्या अदृश्य शक्तीविरोधात आहे, असे स्पष्ट करून सुळे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल झाला तरच विकास होईल, असे सांगून त्या म्हणाल्या, की भारतीय जनता पक्ष आधी म्हणत होता ना खाऊंगा ना खाने दुंगा. आता मै भी खाऊंगा और आपको भी पेट भर के खाने दुंगा. पन्नास खोक्यांवर जर आमदार विकला जात असेल तर त्यांना लाज वाटली पाहिजे, पन्नास खोके इज नॉट ओके. भ्रष्टाचाराच्या विरोधात जसा त्यांनी आपल्यावर हल्ला केला होता, तसा आता मी त्यांच्यावर करणार आहे. ही लढाई माझ्या वडिलांसाठी नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आहे.

महाराष्ट्रातील सर्व विकास हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे, यांनी दहा वर्षांत काय केले? असा सवालही त्यांनी केला. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पहिली सही करेल ती शेतकर्‍यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.


अजितदादांना पुन्हा संधी नाही

मेट्रोपेक्षा जास्त प्रिय मला एसटी आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर एक वर्षात राज्यातील सर्व पब्लिक ट्रान्सपोर्ट चकाचक करू. अजितदादांना परत फाटकी एसटी दाखवण्याची संधी आम्ही देणार नाही, असा चिमटाही सुप्रिया सुळे यांनी काढला. शरद पवार मुख्यमंत्री असताना राज्याला सोन्याचे दिवस होते. ते दिवस पुन्हा आणायचे आहेत, असेही त्या म्हणाल्या.


The post सत्ता आल्यास पहिली सही अंगणवाडी भगिनींसाठी : खासदार सुप्रिया सुळे appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T111Nc

Shirdi: आ. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात योगेश गोंदकर यांची शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद




http://dlvr.it/T10LkC

अहमदनगर : धांदरफळ गावात डीजे वाहनाच्या चाकाखाली सापडून दोघे ठार

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा :  नवरदेवच्या मिरवणुकीवेळी बदली झालेल्या डीजे वाहनचालकाने ब्रेकवर पाय न देता अचानक क्लसवर पाय दिला. त्यामुळे डीजे वाहनाचा वेग वाढला. आणि हे वाहन नवरदेवाच्या मिरवणुकीत घुसले. या अपघातात डीजे वाहनाच्या चाकाखाली चिरडून नवरदेवाच्या भावकीतील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये आणखी काही जण किरकोळ जखमी झाले होते. त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द गावामध्ये गुरुवारी (दि.४) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. बाळासाहेब हरिभाऊ खताळ (वय ४८) आणि भास्कर राधु खताळ (वय ७४) दोघेही रा. धांदरफळ खुर्द अशी मृतांची नावे आहेत.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील किसन रंगनाथ खताळ यांच्या मुलाचे शुक्रवारी (दि.५) संगमनेर तालुक्यातील रणखांब येथे लग्न आहे. त्यानिमित्ताने गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास नवरदेवाची डीजेच्या दणदनाटात वाजत गाजत संपूर्ण गावातून मिरवणूक निघाली होती. यावेळी अचानक मिरवणुकीतील डीजे वाहन (क्र .एम.एच 16/ए.ई. 2097) चालकांमध्ये अदलाबदली झाली. आणि नव्याने चालक म्हणून बसलेल्या युवकाने अचानक डीजे वाहनाच्या ब्रेकवरती पाय देण्याऐवजी क्लसवर पाय दिल्याने अचानक वाहनाचा वेग वाढला. डीजे वाहन मागे येत असताना डीजेच्या चाकाखाली बाळासाहेब खताळ आणि भास्कर खताळ हे दोघे सापडले. त्यात बाळासाहेब खताळ यांचा डीजेच्या चाकाखाली चिरडून जागेवर मृत्यू झाला. तर भास्कर खताळ यांना तरुणांनी चाकाच्या घालून ओढून बाहेर काढले. आणि त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचाराच्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये पाच ते सहाजण किरकोळ जखमी झाले होते. मात्र त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मात्र गंभीर जखमी असलेले अभिजीत संतोष ठोंबरे (वय २२) रामनाथ दशरथ काळे यांच्यावर (वय ५५) संगमनेर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.


धांदरफळ खुर्दला डीजे वाहनाचा अपघात झाला असल्याची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, संगमनेर तालुक्याचे पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे, पो. कॉ. अमित महाजन घटनास्थळी दाखल झाले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यानंतर पोलिसांनी डीजे जप्त केला.


धांदरफळ खुर्द आणि रणखांबा गावात पसरली शोककळा




संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द आणि रणखांब या दोन गावांत लग्नाच्या निमित्त धामधुम चालू होती. मात्र या अपघातामध्ये नवरदेवाच्या भावकीतील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने  आनंदाच्या क्षणावर विरजन पडले.


हेही वाचा : 



* Amravati Accident : अमरावती महामार्गावर तिहेरी अपघात; पती-पत्नी ठार, मुलगी जखमी

* रत्नागिरी : सुसेरी नं.२ गावात गादीचा कारखाना जळून खाक

* दिल्‍ली पोलिसांना मोठे यश..! ‘हिजबुल’चा वॉन्टेड दहशतवादी जेरबंद






The post अहमदनगर : धांदरफळ गावात डीजे वाहनाच्या चाकाखाली सापडून दोघे ठार appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T0ym82

जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकर्‍यांचे उपोषण : आश्वासनानंतर आंदोलन मागे

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा, या मागणीसाठी मंगळवारी भालगाव येथील ग्रामस्थांनी विभागीय प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. मात्र, उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.


भालगाव परिसरातील महामार्ग क्रमांक 361 एफ व 752 या रस्त्यांच्या कामात भालगाव व पंचक्रोशीतील शेतकर्‍यांच्या गेलेल्या जमिनींचा मोबदला अनेक दिवसांपासून रखडला आहे. प्रशासकीय अधिकारी व राजकीय नेत्यांच्या आश्वासनानंतर अनेक वर्षे उलटूनही पैसे मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी हे आंदोलन केले. निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, दोन्ही रस्त्यांच्या बांधकामात गेलेल्या जमिनींचा मोबदला मिळण्यासाठी यापूर्वी निवेदन सादर केले होते. काही महिन्यांपूर्वी उपविभागीय अधिकारी व खासदार डॉ. सुजय विखे यांनी आम्हाला एक महिन्यात दोन्ही रस्त्यांच्या बांधकामात गेलेल्या जमिनींचा मोबदला दिला जाईल, असे आश्वासन दिले होते.


त्यानंतर, कार्यालयाकडून तीन महिन्यांपूर्वी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. त्यानुसार सर्व शेतकर्‍यांनी कागदपत्रांची पूर्तता केली आहे. परंतु, आजतागायत एकाही शेतकर्‍याला मोबदला मिळालेला नाही. उद्धव खेडकर, अंकुश कासुळे, बाबासाहेब खेडकर, संजय बेद्रे, सावता बनसोडे, बाजीराव सुपेकर, भागवत कुटे, उत्तम बनसोडे, बापुराव सुपेकर, सुखदेव सुपेकर, ज्ञानोबा खेडकर, विठ्ठल बनसोडे, भीमराव खेडकर, अश्रू सुपेकर, कचरू सुपेकर, राजेंद्र सुपेकर, जगन्नाथ बनसोडे, विश्वनाथ खेडकर, नवनाथ बनसोडे आदीसह शेतकर्‍यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत.


गेल्या पाच वर्षांपासून आम्ही शासकीय पातळीवर प्रयत्न करत आहोत. थातूरमातूर उत्तरे देऊन आमची बोळवण केली जाते. हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी न लागल्यास पंचक्रोशीतील शेतकर्‍यांना सोबत घेऊन अन्य मार्गांनी आंदोलने केली जातील. शेतकर्‍यांचे रखडलेले पैसे हे व्याजासकट शेतकर्‍यांना द्यावे, असे दिलीप खेडकर म्हणाले. रस्त्याच्या कामात जमिनी गेलेल्या ज्या शेतकर्‍यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे, त्यांना येत्या आठ दिवसांत मोबदला मिळवून देऊ. उर्वरित शेतकर्‍यांची कागदपत्रे आल्यावर त्यांनाही लवकरात लवकर मोबदला मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.


हेही वाचा 



* IND vs SA 2nd Test : भारताची द. आफ्रिकेविरुद्ध आघाडी, रोहित-यशस्वी तंबूत परतले

* रस्ताकाम बंदच्या निषेधार्थ भीक मागो : ढाकणे यांचे आमदार राजळेंना आव्हान

* igloo : बर्फापासून बनवलेले ‘इग्लू’ का असते ऊबदार?






The post जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकर्‍यांचे उपोषण : आश्वासनानंतर आंदोलन मागे appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T0wQYv

Shirdi: "राम मांसाहारी होता, आम्ही रामाचा आदर्श पाळतो, म्हणून आम्ही आज मटण खातोय" - जितेंद्र आव्हाड




http://dlvr.it/T0wBq0

पोलिस पाटील भरती : खासगी कंपन्यांनाच पायघड्या

नगर : पुढारी वृत्तसेवा :  राज्य शासनाच्या विविध विभागांतील तृतीय श्रेणी कर्मचारी भरती प्रक्रिया खासगी कंपन्यांमार्फत राबवली जात आहे. मध्यंतरी तलाठी भरतीबाबत अनेकांनी ओरड केली आहे. अशा परिस्थितीत पोलिस पाटील या मानधनावरील पदांच्या भरतीची प्रक्रियादेखील खासगी कंपनीमार्फत राबवली जात असल्यामुळे विश्वासार्हतेचा प्रश्न पुढे आला आहे. आतापर्यंत प्रांताधिकारी कार्यालयामार्फत ही भरती होत होती. आता खासगी कंपन्या नियुक्त करून वरिष्ठ सरकारी अधिकारी आपली जबाबदारी टाळत आहेत, की राजकीय दबावापोटी त्यांनी हा निर्णय घेतला. याबाबत जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे.


शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील तृतीय श्रेणी कर्मचार्‍यांची भरती प्रक्रिया जिल्हा मंडळ किंवा राज्य लोकसेवा आयोग यांच्या वतीने राबवली जात होती. आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले आणि सर्वत्र खासगी कंपन्यांचे पेव फुटले. खासगी उद्योगधंद्यात या खासगी कंपन्यांना कामे दिली जाऊ लागली. शासकीय कार्यालयेदेखील काही कामे आऊटसोर्सिगद्वारे करू लागली. काही कार्यालयांत मानधनावर कर्मचारीदेखील खासगी कंपन्यांकडून भरले जात आहेत.


महसूल व पोलिस विभागाचे दुवा म्हणून गावपातळीवर पोलिस पाटील काम करतात. जिल्ह्यातील 915 गावचा कारभार सध्या पोलिस पाटलांविना सुरू आहे. गेल्या एक दशकापासून पोलिस पाटील या अशासकीय पदांची भरती रखडलेली आहे. 2012-13 मध्ये संगमनेर आणि श्रीरामपूर प्रांत कार्यालयाच्या वतीने पोलिस पाटील भरती प्रक्रिया राबवून पोलिस पाटील नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर भरती प्रक्रियाच रखडली आहे.गेल्या महिन्यापासून पोलिस पाटील भरती प्रक्रिया सुरू झाली. मात्र, ही प्रक्रिया महसूल यंत्रणा राबविणार नाही. त्यासाठी खासगी कंपनीला ठेका दिला जाणार आहे. त्यासाठी खासगी कंपन्यांकडून निविदादेखील मागवली गेली आहे. शासकीय यंत्रणेवर थोडातरी विश्वास आहे. मात्र, खासगी कंपन्यांकडे ही भरती प्रक्रिया सोपवून शासकीय यंत्रणा जबाबदारी टाळत असल्याची टीका होत आहे.


The post पोलिस पाटील भरती : खासगी कंपन्यांनाच पायघड्या appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T0t9nR

‘जलयुक्त’चे कागदी घोडे ! प्रशासकीय मंजुरीविना साडेचार कोटी कपाटबंद

गोरक्ष शेजूळ







नगर : जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने यंदा पाणी टंचाईच्या तीव्र झळा जाणवण्यास सुरूवात झाली आहे. हिवाळ्यातच टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. शासनाने हाती घेतलेल्या ‘जलयुक्त शिवार 2.0’ योजनेसाठी जिल्ह्याला 22 कोटीचा निधी मंजूर झाला अन् त्यातील साडेचार कोटी वर्गही केले. पण वर्षभरात एकाही कामाला प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. केवळ ‘जलयुक्त 2.0’चे कागदीघोडे नाचविले जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. पावसाच्या पाण्याचे संवर्धन करून त्याची साठवणूक व्हावी, याव्दारे त्या-त्या भागातील पाणी पातळीत वाढ होऊन शेतकर्‍यांची पाणी समस्या सोडवावी, या हेतुने मुख्यमंत्र्यांनी ही योजना हाती घेतली आहे. जानेवारीत सुरू झालेल्या या योजनेत आता डिसेंबर उलटत आला तरी दुर्दैवाने नगरमध्ये एकाही कामाची प्रशासकीय मान्यता झालेली नसल्याचे उदासिन चित्र पुढे आले आहे.


पावसाची अनियमितता व खंडामुळे सतत टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. या टंचाई स्थितीवर मात करण्यासाठी 2015-16 पासून ते 2018-19 पर्यंत जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली होती. जलसमृद्धी वाढवून गावचा व तेथील शेतकर्‍यांचा सर्वांगिण विकास व्हावा, हाच योजनेचा उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात जलसंधारणाची कामे न झालेल्या ठिकाणी दुसर्‍या टप्प्यात कामे घेवून पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी संरक्षित करणे, पाण्याच्या ताळेबंदीच्या माध्यमातून जलसाक्षरता वाढविणे, विकेंद्रीत जलसाठे निनिर्माण करणे, जलस्त्रोतांची साठवण क्षमता वाढविणे, इत्यादी कामांसाठी जलयुक्त शिवार अभियान 2.0 अभियान हाती घेतले गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 3 जानेवारी 2023 ला योजना राबविण्याबाबत शासन आदेश काढला होता.


9 मार्च 2023 रोजी उपमुख्यमंत्री तथा तत्कालिन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या या ड्रीम प्रोजेक्टची घोषणा करत निधीची तरतूदही केली. सप्टेंबरमध्ये 257 निवडलेल्या गावांसाठी (यात नंतर वाढ होऊन गावे 368 झाली) 22 कोटी 65 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यापैकी प्रत्यक्षात 4 कोटी 53 लाख रुपये निधीही दिला होता. दुर्दैवाने टप्पा दोनमधील एकाही कामाची प्रशासकीय मान्यता देण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना वेळ नसल्याने हा निधी देखील अखर्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नाशिक, बीड, पुणे सह अन्य जिल्ह्यातील कामे पूर्णत्वाकडेही जात असताना नगर जिल्हा प्रशासना संबंधित कामांचे प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांच्या टेबलवर आहेत, ते लवकरच प्रशासकीय मान्यता देतील, असे सांगत आहेत.


जानेवारीत आदेश आला, त्यानंतर वेळोवेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आयुक्तांनी याबाबत आढावा घेतला. मात्र आज डिसेंबर उलटत आला आहे. तरीही नगरमध्ये एकही काम मंजूर नसल्याचे दिसते आहे. जलसंधारण विभागातून योजनेच्या अंमलबजावणीसाठी वर्षभरापासूनच हालचाली सुरू आहेत, मात्र सध्यातरी त्या हालचाली फक्त कागदावरच आहेत. कार्यकारी अभियंता पांडुरंग गायसमुद्रे यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारेचा पदभार असताना त्यांच्याकडे राज्याच्या जलसंधारण विभागाचीही जबाबदारी ढकलली आहे. त्यामुळे आता फक्त तीन महिने बाकी असताना कधी प्रशासकीय मान्यता, निविदा आणि प्रत्यक्षात कामे कधी होणार, याविषयी कुतूहल आहे.


उपलब्ध निधीतून 2500 कामे सुरू

जिल्ह्यात जलसंधारण, कृषी, सामाजिक वनीकरण, वनविभाग, जलसंपदा, वरिष्ठ भूवैज्ञानिक विभाग, मनरेगा इत्यादी विभागातील कामांचा टप्पा दोनमध्ये समावेश आहे. मात्र यातील कामांना प्रशासकीय मान्यताच नसल्याने या विभागाने आपल्याकडील जिल्हा नियोजन किंवा अन्य योजनांतील उपलब्ध निधीतून कामे सुरू केलेली आहेत. जिल्ह्यात 2500 पेक्षा अधिक कामे सुरू असून राज्यात टक्केवारीत नगर पुढे असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तर जलयुक्त टप्पा दोन मात्र अजुन सुरू होऊ शकला नसल्याची खंत देखील याच विभागाकडून व्यक्त केली जात आहे.


जलयुक्तच्या टप्पा दोनच्या कामांना अजुन प्रशासकीय मान्यता झालेल्या नाहीत, एक-दोन दिवसांत त्या होतील. या योजनेचा 22 कोटींचा निधी मंजूर असला तरी प्रत्यक्षात चार साडेचार कोटी प्राप्त आहेत. मार्च 2024 पर्यंत निधी खर्च करायचा आहे. मात्र जलयुक्तची कामे सुरू आहेत. टप्पा दोनची कामे देखील लवकरच सुरू होतील.

                                   – पांडुरंग गायसमुद्रे, प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी


The post ‘जलयुक्त’चे कागदी घोडे ! प्रशासकीय मंजुरीविना साडेचार कोटी कपाटबंद appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T0r9N3

पाठलाग करून दरोडेखोर जेरबंद; मिरजगाव पोलिसांची कारवाई

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : लग्नसमारंभामध्ये वर्‍हाडी म्हणून मिरवून हात साफ करणारी, तसेच दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा दरोडेखोरांना मिरजगाव पोलिसांनी जेरबंद केले. त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे. कर्जत तालुक्यातील मांदळी येथील आत्मगिरी लॉन्स, थेरगावचे शिवपार्वती मंगल कार्यालयातील लग्नसमारंभात चोर्‍या होण्याचे प्रकार वाढले आहेत. याप्रकरणी मिरजगाव पोलिसांनी गुन्हेही दाखल केले आहेत.


सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांना मिळालेल्या माहितीनुसार दरोडा टाकण्याच्या तयारीत असेलेली सहाजणांची टोळी पांढर्‍या रंगाच्या स्कॉर्पिओमधून मिरजगाव येथील क्रांती चौकातून आष्टीकडे जाणार आहे. ही माहिती मिळताच दिवटे यांनी पोलिस पथक घेऊन क्रांती चौकात नाकाबंदी केली. दरम्यान, काही वेळाने कोकणगावच्या दिशेने एक संशयित स्कॉर्पिओ येताना दिसताच, तिला थांबविण्यासाठी पोलिस पथकाने हात केला. स्कॉर्पिओ नाकाबंदी तोडून कड्याच्या दिशेने गेली. यानंतर पोलिस पथकाने पाठलाग केला. गतिरोधक येताच स्कॉर्पिओ पकडली.


स्कॉर्पिओची झडती घेतली असता, पोलिस पथकाला लोखंडी सुरा, दोन लोखंडी गज, एक बांबूचे दांडके व मिरचीची पूड आढळून आली. यानंतर पोलिसांनी संतोष प्रभाकर खरात (रा भटेवाडी (ता. जामखेड), आकाश रमेश गायकवाड (गोरोबा टॉकीज, जामखेड), विशाल हरीश गायकवाड, किरण आजिनाथ गायकवाड, रवी शिवाजी खवळे, संतोष शिवाजी गायकवाड (सर्व रा. मिलिंदनगर, जामखेड) यांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता, दरोडेखोरांनी मिरजगाव परिसरातील मंगल कार्यालयांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली.


या दरोडेखोरांकडून 24 हजारांची रोकड, नऊ ग्रॅम वजनाचे सोने, काही मोबाईल व स्कॉर्पिओ (क्र.एमएच 12 एनई 8906) असा एकूण सात लाख 80 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, फौजदार सुनील माळशिकारे, गणेश ठोंबरे, विकास चंदन, सुनील खैरे, गोकुळदास पळसे, गंगाधर आंग्रे, राजेंद्र गाडे, राहुल सपट यांच्या पथकाने केली.


टोळीकडून अन्य गुन्ह्यांचाही तपास




मिरजगाव पोलिसांनी पकडलेल्या या सहा दरोडेखोरांची वरात थेट जेलमध्ये गेली आहे. या टोळीने अनेक ठिकाणी चोर्‍या केल्या असून, इतरही गुन्ह्याच्या तपास लागेल, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी दिली.


हेही वाचा



* एकवीरा देवस्थान ट्रस्टचा कारभार नवनिर्वाचित विश्वस्तांकडे सुपूर्त

* गडचिरोली : शेतातील वीज तारांना स्पर्श झाल्‍याने हत्तीचा मृत्यू

* नववर्ष स्वागताला शहरवासीय निघाले पर्यटनाला






The post पाठलाग करून दरोडेखोर जेरबंद; मिरजगाव पोलिसांची कारवाई appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T0pdf5