दु्र्दैवी : शॉर्टसर्किटने चार एकर ऊस जळून खाक; लाखो रुपयांचे नुकसान

January 18, 2024 0 Comments

काष्टी : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील रायगव्हाण येथील शेतकरी सुरेश भाऊसाहेब वराळे यांचा मंगळवारी (दि. 16) गट नंबर 36 मधील चार एकर ऊस शेताजवळील असणार्‍या रोहित्रातील शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला. यामध्ये वराळे यांचे सुमारे आठ ते नऊ लाखांचे नुकसान झाले आहे. उसाला आग लागल्यावर शेताजवळील असणारे बाळासाहेब पठारे, किरण वराळे, अनिल पठारे, सुदाम दिवटे, अनिकेत कदम, राहुल कदम, देविदास वराळे, पप्पू वराळे, सागर वराळे, नीलम वराळे, जालिंदर कदम या शेतकर्‍यांनी पेटलेला ऊस विझविण्याचा प्रयत्न केला.


वराळे यांच्या शेतामध्ये वारंवार शॉर्टसर्किट होत होते. त्याबाबत त्यांनी वारंवार पिंपरी कोलंदर चौफुला व बेलवंडी उपकेंद्रात तक्रार केली होती. परंतु, त्यांच्या तक्रारीकडे वीजपुरवठा कर्मचार्‍यांनी दुर्लक्ष केले. तक्रारीची दखल घेतली असती, तर ऊस वाचला असता. जळीत उसाचा कामगार तलाठी मोरे भाऊसाहेब, कृषी अधिकारी प्रतीक कांबळे, उपकार्यकारी अभियंता किशोर कायस्थे, वीज कर्मचारी रमेश सातपुते, कुकुडी सहकारी साखर कारखाना क्षेत्रीय अधिकारी सोमनाथ देविकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.


हेही वाचा



* Nashik Drugs : नाशिकमध्ये ‘एमडी’सह टिप्परचे दोघे गजाआड

* Kirit Somaiya : खिचडीच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा; सोमय्यांचा आरोप

* पीएमआरडीए विकास आराखडा; 24 ला निर्णय






The post दु्र्दैवी : शॉर्टसर्किटने चार एकर ऊस जळून खाक; लाखो रुपयांचे नुकसान appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T1XYcT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: