‘गणेश’मध्ये विरोधकांचा अडथळा : विवेक कोल्हे

January 22, 2024 0 Comments

पुणतांबा : पुढारी वृत्तसेवा : गणेश साखर कारखाना चालविताना विरोधक विविध मार्गांनी अडथळे आणतात, पण ज्येष्ठ नेते, आ. बाळासाहेब थोरात व मी संचालकांच्या मदतीने गणेश कारखाना चांगल्या प्रकारे चालविण्याचा प्रयत्न करीत आहोत. ‘गणेश’ लवकरच 1 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण करील. येत्या महिन्यात ‘गणेश’ शेतकर्‍यांना उसाचे पेमेंट देणार आहे, असे सांगत, युवकांना रोजगाराची गरज आहे. बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानद्वारे शासनदरबारी सतत पाठपुरावा सुरु आहे. सोनेवाडी व सावळीविहिरला शेती महामंडळाच्या जागेत एमआयडीसी मंजूर करुन आणली.


या औद्योगिक वसाहतीमुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटून विकासाला अधिक गती मिळणार असल्याचे मत सहकार महर्षी कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले. राहाता तालुक्यातील वाकडी येथे ग्रामपंचायतीच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण कोल्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. स्नेहलता कोल्हे होत्या. कोल्हे म्हणाले, वाकडी गाव पाणीपुरवठा योजनेचे काम मार्गी लावून पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवू. गणेश परिसरात शेतकर्‍यांसह जन विकासाचे प्रश्न सोडवून या परिसराला गतवैभव प्राप्त करून देण्यास प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.


यावेळी गंगाधर चौधरी, ‘गणेश’चे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, सरपंच रोहिणी बाळासाहेब आहेर, शिवाजी लहारे, संचालक भगवान टिळेकर, गंगाधर डांगे, संपत चौधरी, नानासाहेब नळे, संपत हिंगे, बाळासाहेब चोळके, अनिल गाढवे, महेंद्र गोर्डे, आलेश कापसे, अरुंधती अरविंद फोफसे, विष्णुपंत शेळके, भीमराज लहारे, गोरक्षनाथ यलम, विठ्ठलराव शेळके, अनिल शेळके, बाळासाहेब आहेर, संजय शेळके, तात्यासाहेब गोरे, वसंतराव हसे, संपतराव लहारे, भागवत शेळके, नवनाथ शेळके, उपेंद्र काले, ग्रा. पं. सदस्य अनिल गोरे, अमोल शेळके, कैलास लहारे, कल्पना सुनील लहारे, सविता राजेंद्र शेळके, ग्रामसेवक सोनवणे व ग्रामस्थ उपस्थित होते. माजी मंत्री स्व. कोल्हे यांनी गणेश परिसरात केलेल्या विकासाची माहिती देत विवेक कोल्हे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी विठ्ठलराव शेळके, उपेंद्र काले आदींची भाषणे झाली.


पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे आणू!




स्व. शंकरराव कोल्हे, आ. बाळासाहेब थोरात व माजी आ. स्नेहलता कोल्हे यांच्या प्रयत्नांमुळे ‘निळवंडे’चे पाणी कोपरगावसह राहाता तालुक्यात जिरायती भागात आले. यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला, असे सांगत पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे ऊर्ध्व गोदावरी खोर्‍यात वळविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सांगितले.


हेही वाचा



* Nashik I मनमाड येथील निंबस पॅकिंग कंपनीला भीषण आग

* Crime News : बंद घरातून पावणेसात लाखांची चोरी..

* नाशिक : कविता राऊत यांचा पुतळा क्रीडापटूंसाठी प्रेरणा: दादा भुसे






The post ‘गणेश’मध्ये विरोधकांचा अडथळा : विवेक कोल्हे appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T1j0Fw

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: