नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणी माजी संचालक साठे, कोठारी ताब्यात

January 28, 2024 0 Comments

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर अर्बन बँक घोटाळ्याच्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने गुरुवारी माजी संचालक मनीष साठे, अनिल कोठारी यांना तपासासाठी ताब्यात घेतले आहे. त्यांना वैद्यकीय तपसाणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. रात्री आणखी काही माजी संचालकांना ताब्यात घेतल्याचेही समजते. मात्र या माहितीला दुजोरा मिळाला नाही.

अर्बन बँक घोटाळा प्रकरणी माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यात 150 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. तत्कालीन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार कागदपत्रांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आले. त्यात 291 कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आले.


याप्रकरणी दोन शाखाधिकार्‍यांना अटक करण्यात आली होती. आणखी चार जणांना चौकशीसाठी नोटिसा दिल्या होत्या. परंतु, वारंवार नोटिसा देऊनही चौकशीला हजर राहत नसल्याने विशेष पोलिस तपास पथकाने बँकेचे माजी संचालक मनीष साठे, अनिल कोठारी यांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशी करून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविल्याचे तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक हरीश खेडकर यांनी सांगितले. दरम्यान, ‘एसआयटी’ने नोटीस देऊन चौकशीला हजर राहत नसलेल्या सर्वांना शोधून आणा, असा आदेश पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिला आहे. विशेष तपास पथक नेमल्याने गुन्ह्याच्या तपासाला वेग आला आहे.


ही अटकेची कारवाई ?

साठे व कोठारी यांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठविल्याने ही अटकेची कारवाई असल्याचे मानले जात आहे.


The post नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणी माजी संचालक साठे, कोठारी ताब्यात appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T1yZ7b

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: