वार्षिक योजनेचा 630 कोटींचा आराखडा : पालकमंत्री राधाकृष्ण विखे

January 10, 2024 0 Comments

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हा वार्षिक योजनेंर्गत 2024-25 या आर्थिक वर्षासाठी शासनाने 630 कोटी रुपयांची आर्थिक मर्यादा निश्चित केलेली आहे. त्यानुसार तयार केलेल्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 2023-24 या आर्थिक वर्षांचा 70 टक्के म्हणजे 434.30 कोटींचा निधी उपलब्ध झालेला आहे. त्यापैकी 371.20 कोटी रुपये खर्चाच्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2024-25 प्रारूप आराखडा बैठक झाली. खासदार सदाशिव लोखंडे व डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे व किरण लहामटे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, बाळासाहेब कोळेकर, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर उपस्थित होते. दूरदृश्यप्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) आमदार बबनराव पाचपुते व लहू कानडे सहभागी झाले होते.


जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2023-24 साठी 620 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यापैकी 434 कोटी 30 लाख निधी प्राप्त झाला असून, त्यापैकी आतापर्यंत 371 कोटी 20 लाख रकमेच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 237 कोटी 81 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी होणार्‍या राज्यस्तरीय नियोजन बैठकीत जिल्हा विकासासाठी 220 कोटी रुपयांची वाढीव मागणी करण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणांना दिले. जिल्ह्यातील शेतकर्‍यांची यशोगाथा सांगणारी कृषी विकासाची यशोगाथा पुस्तिका तयार करावी, शेतकर्‍यांना प्रेरणादायी ठरेल, असा उपक्रम जिल्ह्यात राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.


मोठमोठे उद्योग येतील

नगर तसेच शिर्डी येथे औद्योगिक विकासासाठी जवळपास एक हजार एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. आगामी काळात मोठमोठे उद्योग उभारले जातील. कौशल्य, उद्योग व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण या विभागांनी समन्वयाने काम करत उद्योगांची मागणी असलेले कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम जिल्ह्यात प्राधान्याने राबविण्याच्या सूचनाही पालकमंत्री विखे पाटील यांनी दिल्या.


थोरात, शिंदे, गडाख यांची बैठकीकडे पाठ

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला जिल्हाभरातील सर्व खासदार आणि आमदारांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, या बैठकीकडे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार सर्वश्री नीलेश लंके, रोहित पवार, आशुतोष काळे, आमदार संग्राम जगताप, सत्यजित तांबे यांनी नियोजन समितीच्या बैठकीकडे पाठ फिरवली.


The post वार्षिक योजनेचा 630 कोटींचा आराखडा : पालकमंत्री राधाकृष्ण विखे appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T198ht

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: