शिर्डीतून पुन्हा आठवलेंच्या उमेदवारीसाठी रिपाइंचा आग्रह

January 12, 2024 0 Comments

आश्वी : पुढारी वृत्तसेवा : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले शिर्डी लोकसभा मतदार संघात पुन्हा 2024 ची लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. दलित व बहुजन समाजाच्या प्रश्नांवर आवाज उठविणारे प्रभावी व्यक्तिमत्व असल्याने शिर्डीतचं नव्हे तर राज्यासह देशात ते आहेत. मंत्री आठवले यांना शिर्डीतून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळावी, यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्यासह भाजपच्या केंद्रीय व राज्य नेतृत्वांना रिपाईंचे शिष्टमंडळ भेटणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष विजय वाक्चौरे यांनी दिली.


वाकचौरे म्हणतात, सध्या देशासह राज्यात भाजपाबरोबर एकमेव दलित नेता म्हणून मंत्री आठवले कार्यरत आहेत. लोकांमध्ये रमणारे ते नेते आहेत. गेल्या 10 वर्षांत भाजपाशी प्रामाणिक राहून बहुजन समाजासाठी ते आवाज उठवित आहेत. न्याय मिळवून देत कार्यरत आहेत. देशाच्या काना – कोपर्‍यात फिरणारे ते एकमेव नेते आहेत्त.


शिर्डी मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा असल्याचे मंत्री आठवले वेळोवेळी सांगत आहेत. सातत्याने ते शिर्डीसह परिसरात येतात. मंत्री आठवले यांना वातावरण चांगले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. व खा. डॉ. सुजय विखे पा. यांच्याशी उमेदवारीबाबत चर्चा झाली आहे. 2009 मध्ये आठवले यांना काही कारणास्तव पराभवाला सामोरे जावे लागले, परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप मित्र पक्षांची घौडदोड सुरू आहे. शिर्डीकरांच्या सेवेसाठी मी पुन्हा येईल. आता मात्र विजय निश्चित राहिल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जी. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मंत्री रामदास आठवले यांनी वेळोवेळी म्हटले आहे.


भाजपाने मित्र पक्ष म्हणून शिर्डी लोकसभा मतदार संघातून आठवले यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी रिपाईंचे प्रदेश उपाध्यक्ष विजय वाक्चौरे, जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे व शिष्टमंडळ करणार आहे.


The post शिर्डीतून पुन्हा आठवलेंच्या उमेदवारीसाठी रिपाइंचा आग्रह appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T1H6Bg

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: