पूजा चव्हाण मृत्यू ते संजय राठोड यांचा राजीनामा; काय घडलं आतापर्यंत?

मुंबई: प्रकरणानं राज्यातील राजकीय वर्तुळ ढवळून निघालं. या प्रकरणात वनमंत्री यांचे नाव आल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर टीका केली. राठोड यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सातत्याने लावून धरली. मात्र, आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण संजय राठोड यांनी दिले होते. अखेर या प्रकरणात राठोड यांनी आज, रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. मात्र, त्याचबरोबर आपण आमदारकीचा राजीनामा दिला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी आपली भूमिका असून, चौकशीनंतर सत्य समोर येईल, असे ते राजीनामा दिल्यानंतर म्हणाले. मृत्यू ते संजय राठोड यांचा राजीनामापर्यंत आतापर्यंत काय-काय घडले, हे जाणून घेऊयात. >> ७ फेब्रुवारी २०२१ रोजी पुण्यातील वानवडी परिसरातील इमारतीच्या बाल्कनीतून उडी घेऊन तरुणीने आत्महत्या केल्याची बातमी >> आत्महत्या करणारी तरुणी टिकटॉक स्टार पूजा चव्हाण असल्याची माहिती आली समोर >> पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक तपासातून संशय >> या प्रकरणाच्या चौकशीची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली मागणी >> पूजा चव्हाणच्या मृत्यूशी संबंधित काही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या >> या प्रकरणाशी राज्यातील एका मंत्र्याचे नाव समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ >> या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर प्रकरणाची चौकशी करण्याची विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली मागणी >> पूजा चव्हाणने आत्महत्या केली की तिची हत्या झाली असा संशय व्यक्त करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी या मागणीने धरला जोर >> पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची महिला आयोगाकडून गंभीर दखल, सरकार आणि पोलिसांना बजावली नोटीस >> नातेवाइक आणि मित्रांचे जबाब नोंदवून घेण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक पूजाच्या मूळ गावी गेले, कुणीही तक्रार न दिल्याने या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद >> पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली प्रतिक्रिया, चौकशीचे आश्वासन दिले. >> पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना घेतले होते ताब्यात >> घटनेनंतर बरेच दिवस 'नॉट रिचेबल' असलेले संजय राठोड २३ फेब्रुवारी रोजी कुटुंबासह पोहरादेवी येथे गेले. >> या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. सत्य समोर येईलच. माझ्याबद्दल आणि समाजाबद्दल घाणेरडे राजकारण केल्याचा आरोप राठोड यांनी केला. >> दुसऱ्या दिवशी संजय राठोड वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला >> राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधीच देणार असल्याची जोरदार चर्चा >> २८ फेब्रुवारी २०२१ रोजी संजय राठोड यांचा अखेर राजीनामा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला >> राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद, पूजा चव्हाण प्रकरणाचा निष्पक्ष तपास, चौकशी व्हावी अशी भूमिका असल्याचे केले स्पष्ट

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबई: पूजा चव्हाण कथित आत्महत्येप्रकरणी (Pooja Chavan Death Case) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे आपला मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केल्यानंतर (Sanjay Rathod) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी माझा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आताच दिलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या बजारा समाजाची तरूणी पूजा चव्हाण हिच्या दुदैवी मुत्यूवरून विरोधी पक्षानी घाणेरडे राजकारण केले गेले. माझ्या समाजाची बदनामी केली गेली. म्हणूनच यातील खरे सत्य बाहेर यावे, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशीच माझी भूमिका आहे. म्हणूनच मी मंत्रिपदापासून बाजूला झालेलो आहे. आता या प्रकरणी योग्य चौकशी होऊन खरे सत्य बाहेर पडावे अशीच आपली भूमिका असल्याचे संजय राठोड म्हणाले. ( gives first reaction after resigning from the ministry in ) पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचे नाव जोडले गेल्यानंतर आज दुसऱ्यादा ते प्रसारमाध्यमांमोर आले. मुंबईतील वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते आपले म्हणणे मांडत होते. गेल्या अनेक दिवसांपासून माझी बदनामी करण्यात येत आहे. मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला गेला. मी गेले ३० वर्षे सार्वजनिक जीवनात आले. या माझ्या कारकिर्दीतूनच मला उठवण्याचा प्रयत्न झाला, असे म्हणत संजय राठोड यांनी विरोधी पक्षांवर टीकेचे प्रहार केले. क्लिक करा आणि वाचा- पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, याच कारणामुळे मी मंत्रिपदापासून बाजूला होत आहे, असे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचे संजय राठोड म्हणाले. मी मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिपदाचा राजीनामा देत असताना माझ्या सोबत अनिल बर आणि अनिल देसाई उपस्थित होते, असेही राठोड म्हणाले. चौकशी होईपर्यंत मी मंत्रिपदापासून दूर राहायला हवे ही माझी भूमिका असल्याचे ते म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- विरोधकांवर केली टीका आपण राजीनामा दिल्याची माहिती देत असताना संजय राठोड यांनी विरोधी पक्षांवर टीकेचे प्रहार केले. या प्रकरणी विरोधी पक्षाने अतिशय घाणेरड्या पद्धतीने राजकारण केले. उद्याचे अधिवेशन आपण चालवू देणार नाही असे विरोधक म्हणत आहे, मात्र त्यांची ही भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेविरुद्ध आहे. माझ्या समाजावर या आरोपांचा जो परिणाम झाला तो पाहून मी मंत्रिपदापासून बाजूला झालो. या प्रकरणी तपास योग्य पद्धतीने व्हावा आणि खरे सत्य बाहेर यावे ही आपली भूमिका असल्याचे राठोड म्हणाले. क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

पुणे: ज्येष्ठ दाम्पत्य रात्री ८ वाजता रस्त्यावरून पायी जात होते, इतक्यात...

म. टा. प्रतिनिधी, : एका ज्येष्ठ दाम्पत्याने धाडस दाखवून सोनसाखळी चोरट्याला नागरिकांच्या मदतीने पकडले. परिसरातील मुरकुटे गार्डन रस्त्यावर शनिवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे पोलीस चोरट्यांना पाहून पळून जात असल्याची घटना अलीकडेच घडली असताना, या ज्येष्ठ दाम्पत्याने दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. दयानंत आश्रुबा गायकवाड (वय २६, रा. शिंदे वस्ती, मारूंजी) असे पकडलेल्या सोनसाखळी चोरट्याचे नाव आहे. तर, त्याचा साथीदार नागरिकांना पाहून पळून गेला आहे. त्याचा चतुःश्रुंगी पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या प्रकरणी ६८ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या पतीसोबत मुरकुटे गार्डन रस्त्यावरून शुक्रवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास पायी फिरत होत्या. त्यावेळी दुचाकीवरून दोघेजण त्यांच्याजवळ आले. पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील ५६ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. मात्र, तक्रारदार यांनी तत्काळ प्रसंगावधान दाखवून सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्याची कॉलर पकडली. पण, ते हिसका देऊन पळून जाऊ लागले. त्यावेळी आजीबाई व त्यांच्या पतीने दुचाकीला धक्का देत त्यांना ढकलून दिले. त्यानंतर दुचाकी पकडून ठेवली. त्यावेळी मंगळसूत्र हिसकावणारा चोरटा त्यांना धक्का देऊन पळून गेला. तक्रारदार व त्यांच्या पतीने आरडाओरडा केला. त्यावेळी नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी दुचाकी चालविणाऱ्या गायकवाड या सोनसाखळी चोरट्याला पकडले. यावेळी चतुःश्रुंगी पोलिसांचे मार्शल त्या ठिकाणाहून जात होते. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन, आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून साथीदाराची माहिती घेतली जात आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

पूजा चव्हाण मृ्त्यूप्रकरणी अखेर वनमंत्री संजय राठोड याचा राजीनामा

मुंबई: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव जोडले गेलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी दबाव वाढल्यानंतर अखेर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. () यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन वनमंत्री राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांनी दिली आहे. वनमंत्री संजय राठोड हे पत्नी शीतल राठोड आणि त्यांचे मेहुणे सचिन नाईक यांच्यासह चर्चगेटमधील छेडा सदन निवासस्थानाहून दुपारी अडीचच्या सुमारास वर्षा बंगल्यावर पोहोचले. त्यानंतर राठोड राजीनामा देणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा दिला असला तरी देखील तो मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला आहे की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. हा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी याच्याकडे गेल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. आज राज्याच्या मंत्रिमंडळ बैठक होत असून या बैठकीत मुख्यमंत्री राजीनाम्या बाबात माहिती देतील असे बोलले जात आहे. त्यानंतर मुख्यमंत्री राजीनाम्याबाबत माहिती देण्याची शक्यता आहे. संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनातील विरोधकांचा मोठा मुद्दा शिवसेनेने निष्प्रभ केल्याचे बोलले जात आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

राठोडांचा राजीनामा घेतला नाही तर...; देवेंद्र फडणवीसांनी दिला 'हा' इशारा

मुंबईः महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सरकारनं शक्ती कायदा आणण्याची तयारी सुरु केली आहे. दिशा कायद्यासाठी सरकारने समिती स्थापन केली आहे. पण मंत्र्यावर इतके गंभीर आरोप होत असताना मुख्यमंत्री राजीनामा घेत नाहीत. राठोड यांचा राजीनामा घेतला नाही, तर दिशा कायद्यासाठी गठित समितीतून राजीनामे देऊ, असा इशाराच भाजप नेते यांनी दिला आहे. राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं असतानाच यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. वाचाः 'पूजा चव्हाण प्रकरणात ऑडिओ क्लिप आहेत. संभाषण आहेत. फोटो आहेत तरीही राठोड यांच्यावर कारवाई होत नाही. त्यावर राठोड यांना दोष देणार नाही. त्यांच्यावर त्यांच्या वरिष्ठांचा आशीर्वाद असल्यानेच पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत,' असा आरोपही त्यांनी केला आहे. 'नव्या कायद्यामुळं मंत्र्यांना, सत्ताधाऱ्यांना लैंगिक स्वैराचार करण्याची मोकळीक आपण दिली आहे काय. याचे उत्तर आम्हाला हवंय, अशा शब्दांत फडणवीस यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे. मंत्री संजय राठोड प्रकरणात सारे पुरावे असताना काहीही कारवाई होत नाही. महाराष्ट्र पोलिसांची इतकी लाचार अवस्था कधी पाहिली नाही. पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास जे अधिकारी करत आहेत त्यांना निलंबित करा, पुरावे असतानाही कारवाई न करणाऱ्या या अधिकाऱ्याला नोकरीवर राहण्याचा काहीच अधिकार नाही,' असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. वाचाः

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

पुण्यात नाइट कर्फ्यू वाढवला; 'हे' आहेत नवे नियम

पुणेः करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यानं पुण्यात निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. तसंच, रुग्णवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लागू करण्यात आली होती. त्यानंतर आज पुण्यातील रात्रीची संचारबंदी १४ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. शहरातील शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लास बंद राहणार आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर महोळ यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पुणे महानगरपालिका हद्दीत करोना संसर्ग वाढत असल्यानं खबदारी म्हणून महाविद्यालये आणि कोचिंग क्लास १४ मार्च २०२१ पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला असून या काळात ऑनलाइन शिक्षणास परवानगी असेल. रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचार निर्बंध कायम असणार आहेत. रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत पुणे महानगरपालिका हद्दीत संचार निर्बंध कायम ठेवण्यात आले असून अत्यावश्यक सेवा, शिफ्टमध्ये कामकाज करणाऱ्यांना यात मुभा देण्यात येत आहे. तर, अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई सुरु राहणार आहे, असंही महापौरांनी सांगितलं.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

पूजा चव्हाण प्रकरणः पोहरादेवीच्या महंताची मुख्यमंत्र्यांना 'ही' विनंती

नागपूरः पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात संशयाच्या फेऱ्यात अडकलेले शिवसेनेचे नेते व वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस राष्ट्रवादी हे दोघेही राठोड यांच्या बचावासाठी अनुकुल नसल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळं अधिवेशनाच्या काळात देणार का?, असा प्रश्न सध्या चर्चिला जात असतानाच पोहरादेवीच्या महंतानी मुख्यमंत्र्यांकडे एक विनंती केली आहे. पूजा चव्हाण प्रकरणात काही ऑडिओ क्लिप समोर आल्या असून त्यात राठोड यांचा आवाज असल्याचा दावा केल्यानं हे प्रकरण गंभीर बनले आहे. तर, राठोड यांनी बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथे त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच, पोहरादेवी येथील शक्तीप्रदर्शनावरुन राठोडांनी मुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नाराजी ओढवून घेतल्याचं बोललं जात असतानाच. आता पोहरादेवी येथील महंत जितेंद्र महाराज यांनी मुख्यमंत्र्यांना एक विनंती केली आहे. वाचाः 'पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची संपूर्ण चौकशी होऊन अहवाल येत नाही तोपर्यंत संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारु नये, असं महंत जितेंद्र महाराज यांनी म्हटलं आहे. तसंच, या प्रकरणात संजय राठोड दोषी आढळले तर आमदार पदाचा राजीनामा द्या, अशी विनंती आम्ही करु,' अशी विनंती पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. वाचाः

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मोदींच्या फोटोखाली मांडणार चूल; नेमका प्रकार काय?

म. टा. प्रतिनिधी, नगर: स्वयंपाकाचा गॅस आणि इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी राज्यभरात पेट्रोलपंपांसमोर चूल मांडण्याचा आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने पुकारले आहे. ज्या पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोसह जाहिरात आहे, तेथे हे आंदोलन करण्यात येणार आहे. कालच भाजपच्या महिला आघाडीतर्फे वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन झाले. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला दुसऱ्या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरत आहेत. एकीकडे करोनाचे आकडे वाढत असता दुसरीकडे अशी आंदोलनेही सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या आदेशावरून हे आंदोलन होत आहे. इंधनाच्या वाढत्या किमतीकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन असल्याचे सांगण्यात आले. हे आंदोलन पेट्रोलपंपावर आणि मोदींच्या जाहिराती खालीच का, याबद्दलही चाकणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, दिवसेंदिवस गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचे दर गगनाला भिडत आहेत. असे असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रत्येक पेट्रोलपंपावरील जाहिरात ही सामान्यांना अच्छे दिनचा खोटा आशावाद देत आहे. यामुळेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मोदींची जाहिरात असलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक पेट्रोलपंपावर रविवारी ‘चूल मांडा’ आंदोलन करण्यात येणार आहे. ज्या पेट्रोलपंपावर मोदींचा बॅनर किंवा जाहिरात आहे, त्या बॅनर किंवा फलकाखाली दगडाची किंवा विटांची चूल ठेवली जाईल. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतीच्या निषेधार्थ स्वयंपाकासाठी आता ही दगडाची आणि विटाची चूल पेटवण्याशिवाय पर्याय राहिला नाही, याचा प्रतिकात्मक निषेध यातून करण्यात येईल. वाचाः कालच भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीचे राज्यभर आंदोलन झाले होते. वनमंत्री राठोड यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी हे आंदोलन झाले होते. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला रस्त्यावर उतरत आहेत. ही आंदोलन करोनाच्या नियमांचे पालन करून केली जात असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र, अनेक ठिकाणी या नियमांचा भंग केला जातो. जनतेच्या हितासाठी आंदोलने होत असल्याचे सांगण्यात येत असले तरी करोनाचा फैलाव वाढत असताना अशी आंदोलने धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. वाचाः

from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

संजय राऊतांच्या 'त्या' ट्वीटमुळं राठोडांच्या राजीनाम्याची चर्चा; राऊतांनी दिलं स्पष्टीकरण

मुंबईः पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वादात सापडलेले शिवसेनेचे नेते यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे केलेल्या शक्तीप्रदर्शनावरुन आघाडीतील मित्रपक्ष असेलल्या काँग्रेस राष्ट्रवादीनं नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर राठोडांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढत असल्याच्या चर्चा असतानाच शिवसेना नेते यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे. या ट्वीटवरुन राठोड आज राजीनामा देणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. काय आहे ते ट्वीट संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा छायाचित्र असलेला फोटो ट्वीट केला आहे. त्यावर सिंहासनाधिष्ठीत छत्रपती शिवरायांच्या हातातील हा राजदंड काय सांगतो?, महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन, असा मजकूर असलेलं ट्वीट केलं आहे. संजय राऊतांच्या या ट्वीटनंतर मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, संजय राऊत यांनी या ट्वीटवर स्पष्टीकरण दिलं आहे. वाचाः संजय राऊत काय म्हणाले? मुख्यमंत्री कोणाच्याही दबावाला बळी पडत नाहीत. माझी आणि मुख्यमंत्र्यांची दररोज चर्चा होते. मला त्यांना कशाचीही आठवण करुन देण्यासाठी ट्वीटची गरज पडत नाही. ते माझे मित्र आहेत, माझे ते मार्गदर्शक आहेत. माझी त्यांची दररोज चर्चा होते. त्यामुळं त्यांना मला काही सांगायचं असल्यास ट्वीटची गरज नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. 'हे ट्वीट आहे ते सर्वव्यापक व सर्वसमावेशक आहे,' असंही त्यांनी म्हटलं आहे. वाचाः वेट अँड वॉच संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर प्रश्न विचारल्यावर संजय राऊत म्हणाले की, त्यांच्यावर निर्णय घ्यायला मुख्यमंत्री आहेत, तपास यंत्रणा आहे, पोलिस आहे, न्यायालय आहे. तुम्ही कशाला न्यायालयाच्या भूमिकेत शिरताय. तसंच, आत्ताही महाराष्ट्रात शिवधर्माचंच राजकारण सुरु आहे. मी फक्त इतकेच म्हणेन वेट अँड वॉच, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मुकेश अंबानी के घर के बाहर जैश-उल-हिंद के आतंकियों ने SUV में रखा था विस्फोटक, जिम्मेदारी लेते हुए कही ये बात 

डिजिटल डेस्क, मुंबई। देश के सबसे अमीर उद्योगपति मुकेश अंबानी (Mukesh Ambani) के घर एंटीलिया के बाहर बीते दिनों एक स्कॉर्पियो में जिलेटिन की 20 छड़ें मिली थीं। इस मामले में जैश-उल हिंद नाम के एक संगठन ने जिम्मेदारी ली है। संगठन ने एक मैसेज के जरिए जांच एजेंसी को चुनौती दी है। 

संगठन ने मैसेज में लिखा गया है, 'रोक सकते हो तो रोक लो, तुम कुछ नहीं कर पाए थे जब हमने तुम्हारी नाक के नीचे दिल्ली में तुम्हें हिट किया था, तुमने मोसाद के साथ हाथ मिलाया लेकिन कुछ नहीं हुआ।' इसके आखिर में लिखा है कि तुम्हें (अंबानी के लिए) मालूम है तुम्हें क्या करना है। बस पैसे ट्रांसफर कर दो जो तुम्हें पहले कहा गया है।

दो साल बाद पाकिस्तान ने विंग कमांडर अभिनंदन का नया वीडियो जारी किया

क्या है पूरा मामला
बीते दिनों उद्योगपति मुकेश अंबानी के घर एंटीलिया के बाहर एक स्कॉर्पियो में जिलेटिन की 20 छड़ें मिली थीं। बुधवार रात को एक बजे के आसपास स्कॉर्पियो को खड़ा किया गया था। सूत्रों के मुताबिक, इस संदिग्ध गाड़ी में से एक पत्र भी मिला था। जिसमें लिखा था, ‘ये तो सिर्फ एक ट्रेलर है। नीता भाभी, मुकेश भैया, ये तो सिर्फ एक झलक है। अगली बार सामान पूरा होकर तुम्हारे पास आएगा और पूरा इंतजाम हो गया है।’

मुंबई पुलिस की टीम ने संदिग्ध कार को कब्जे में लेने के बाद मामले की जांच शुरु कर दी थी। साथ ही अंबानी के घर के आसपास सुरक्षा कड़ी कर दी गई। बता दें कि इस मामले की जिम्मेदारी लेने वाले संगठन जैश-उल-हिंद ने ही दिल्ली में इजरायल एम्बेसी के बाहर ब्लास्ट की जिम्मेदारी ली थी।

.Download Dainik Bhaskar Hindi App for Latest Hindi News.
.
...
Jaish-ul Hind took responsibility in explosive case outside Mukesh Ambani's house
.
.
.

from दैनिक भास्कर हिंदी

नगर: माजी सरपंच-ग्रामसेवकानं स्वतःच्याच नावांनी १०६ वेळा चेक काढले!

म. टा. प्रतिनिधी, : तालुक्यातील येथील तत्कालीन सरपंचाने ग्रामसेवकाला हाताशी धरून आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात दोघांनी मिळून तब्बल १०६ वेळा स्वतःच्याच नावाने धनादेश काढले. त्यातून विविध सरकारी योजनांतील सुमारे २६ लाख रुपयांचा केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर माजी सरपंच व सध्याचे उपसरपंच प्रशांत गवराम फटांगरे व ग्रामसेवक सुनील शंकर शेळके यांच्याविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वत:च्या नावाने चेकने पैसे काढून अपहार करण्याचा वेगळाच नमुना या गावात पाहायला मिळाला. हा प्रकार २०१२ ते २०१३ ते २०१७ ते २०१८ या काळात घडला. याची कुणकुण लागल्याने एका दक्ष ग्रामस्थाने जानेवारी २०२० मध्ये तक्रार केली. त्यानुसार या प्रकाराची चौकशी सुरू झाली. गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी नोटीसा पाठविल्या. सरपंचाने नोटीसांकडेही दुर्लक्ष केले. ग्रामसेवकाने मात्र उत्तर दिले. चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात आली. गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचा अहवाल सादर करण्यात आला. त्यातून या दोघांनी केलेला अपहार उघड झाला. ग्रामपंचायतीचा निधी खर्च करण्यासाठी पद्धत ठरलेली आहे. त्या सर्वांना फाटा देत या दोघांनी वेळोवळी स्वत:च्या नावाने धनादेश देऊन निधी उचलला असल्याचे आढळून आले. फटांगरे यांनी तब्बल ८२ वेळा, तर ग्रामसेवक शेळके यांनी २४ वेळा आपल्या नावाने चेकद्वारे ग्रामपंचायतीच्या खात्यातून पैसे काढल्याचे आढळून आले. सरपंच फटांगरे यांनी सुमारे साडेसोळा लाख तर ग्रामसेवक शेळके यांनी सुमारे ९ लाख रुपये अशा पद्धतीने काढल्याचे आढळून आले. या प्रकरणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनील गुलाबराव माळी यांनी घारगाव पोलीस ठाण्यात सारोळे पठारचे तत्कालीन सरपंच तथा विद्यमान उपसरपंच प्रशांत फटांगरे व ग्रामसेवक सुनील शेळके या दोघांविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी त्या दोघांविरूद्ध फसवणूक व अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. आता शेळके यांच्या पदासंबंधी पंचायत समितीकडून काय कारवाई केली जाते, याकडेही लक्ष लागले आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मुकेश अंबानींना पुन्हा धमकी; कारमधील स्फोटकांबाबत खळबळजनक माहिती उघड

मुंबईः रिलायन्स उद्योग समूहाचे मालक यांच्या दक्षिण मुंबईतील अँटेलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याची जबाबदारी जैश उल हिंद या दहशतवादी संघटनेने स्वीकारल्याची माहिती समोर येत आहे. जैश उल हिंद संघटनेनं एक पत्रक जारी केलं आहे. या पत्रकात संघटनेनं एसयूव्ही कारमध्ये स्फोटकं ठेवणारे दहशतवादी सुखरुप घरी पोहोचले आहेत, असा दावा केला आहे. तसंच, हा तर फक्त ट्रेलर आहे अजून पिक्चर बाकी आहे, असं म्हणत मुकेश अंबानी यांच्याकडून पैशांची मागणी केली आहे. जर अंबानींनी मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर पुढच्या वेळी मुलाच्या कारवर हल्ला करु, अशी धमकीही दिली आहे. 'तुम्हाला माहितीये की पुढं काय करायचं आहे. जे पैसे तुम्हाला द्यायला सांगितलेत ते ट्रान्सफर करा आणि तुमच्या 'फॅट किड्स'सोबत आनंदात राहा,' असंही या पत्रकात लिहलं आहे. वाचाः दरम्यान, गुरुवारी अँटेलियापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर विजय स्टोअरच्या समोरच्या पदपथावर एक हिरव्या रंगाची कार बेवारस स्थितीत आढळली. या कारबाबत सर्वप्रथम अँटिलियाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना संशय आला. याबाबतची माहिती मिळताच मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर एटीएस, बॉम्बशोधक नाशक पथक घटनास्थळी पोहोचले. तिथे कारमध्ये जिलेटिनच्या सुमारे २५ ते ३० कांड्या सापडल्या. कारमध्ये एक पत्र सापडले असून यामध्ये 'यह तो खाली ट्रेलर है' अशा शब्दांत धमकी दिली आहे. वाचाः

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

महाराष्ट्रात होणार नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती..”जाणून घ्या” कोणते नवीन जिल्हे होणार आहेत..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हे किती आहेत असा प्रश्न जर आपल्याला कोणी विचारला तर आपण त्याचे उत्तर देऊ 36 जिल्हे. मात्र आता या उत्तरामध्ये काही दिवसांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

कारण राज्यांमध्ये 22 नवीन जिल्हे वय 49 नवीन तालुके निर्मितीचा प्रस्ताव विचारात आहे तर मित्रांनो आपण या लेखात जाणून घेणार आहोत कोणत्या नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून होणार आहे याबाबत सविस्तर माहिती.

मित्रांनो राज्यात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालूके निर्मितीचा प्रस्ताव देण्यात आला आहे मोठमोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवे जिल्हे निर्मितीचा प्रस्ताव आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करून नव्या जिल्ह्याच्या निर्मितीच्या मागण्यांचा अभ्यास केला होता.

वित्त महसूल नियोजन विभागाचे सचिव विविध पक्षांचे नेते आणि विभागीय आयुक्त या समितीत होते या समितीने महाराष्ट्रात नवे 22 जिल्हे आणि 49 नवे तालुके असा प्रस्ताव समितीसमोर ठेवण्यात आला.

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी संगमनेर आणि श्रीरामपूर असे तीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे नाशिक जिल्ह्यातून मालेगाव कळवण जिल्ह्याचा निर्मितीचा प्रस्ताव आहे तर मुंबईच्या ठाणे जिल्ह्यातून मीरा-भाईंदर आणि कल्याण असे दोन नवे जिल्हे अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.

लातूर जिल्ह्यातील उदगीर ला जिल्हा म्हणून मान्यता देण्याच्या हालचालींना वेग आला आहे कर्नाटक सीमावर्ती भागाला लागून असलेला उदगीर तालुका हा शिक्षण व्यापार आणि अन्नधान्याची बाजारपेठ यासाठी प्रसिद्ध आहे उदगीर जिल्हा निर्मिती ची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे.

यासाठी सातत्याने आंदोलन करण्यात आली आहेत आता सरकारने विभागीय आयुक्तांना उदगीर जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्याने उदगीर आता जिल्हा होण्याची चिन्हे आहेत.

उदगीर जिल्हा झाला तर लातूर जिल्ह्यातील देवणी आणि जळकोट तालुक्यात यात समाविष्ट होतील तर नळेगाव हा नव्याने तालुका होईल आणि नांदेड जिल्ह्यातील मुकरमाबाद हा नव्याने तालुका होऊन उदगीर मध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो.

तर नांदेड जिल्ह्यातील देगलूर आणि मुखेड देखील उदगीर ला जोडता येऊ शकते उदगीर जिल्हा करताना साधारणता साठ किलोमीटर अंतरावरील मोठ्या लोकसंख्येच्या गावांना तालुका म्हणून मान्यता दिली जाऊ शकते.

चला तर जाणून घेऊ कोणत्या जिल्ह्यांमधून कोणते नवीन जिल्ह्यांचा समावेश होण्याचा प्रस्ताव आहे:-

नाशिक जिल्ह्यातून मालेगाव आणि कळवण, ठाणे जिल्ह्यातून मीरा-भाईंदर आणि कल्याण, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, अमरावती जिल्ह्यातून अचलपूर, भंडारा जिल्ह्यातून चिमूर.

गडचिरोली जिल्ह्यातून अहेरी, जळगाव जिल्ह्यातून भुसावळ, लातूर जिल्ह्यातून उदगीर, बीड जिल्ह्यातून आंबेजोगाई, नांदेड जिल्ह्यातून कीनवट, सातारा जिल्ह्यातून मानदेश, पुणे जिल्ह्यातून शिवनेरी, पालघर जिल्ह्यातून जव्हार.

रत्नागिरी जिल्ह्यातून मानगड, रायगड जिल्ह्यातील महाड, अहमदनगर जिल्ह्यातून शिर्डी संगमनेर आणि श्रीरामपूर अशा या जिल्ह्यांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मित्रांनो लवकरच हे जिल्हे अस्तित्वात येतील अशी आपण आशा करूयात.

नगर: माजी सरपंच-ग्रामसेवकानं स्वतःच्याच नावांनी १०६ वेळा चेक काढले!

म. टा. प्रतिनिधी, : तालुक्यातील येथील तत्कालीन सरपंचाने ग्रामसेवकाला हाताशी धरून आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात दोघांनी मिळून तब्बल १०६ वेळा स्वतःच्याच नावाने धनादेश काढले. त्यातून विविध सरकारी योजनांतील सुमारे २६ लाख रुपयांचा केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर माजी सरपंच व सध्याचे उपसरपंच प्रशांत गवराम फटांगरे व ग्रामसेवक सुनील शंकर शेळके यांच्याविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वत:च्या नावाने चेकने पैसे काढून अपहार करण्याचा वेगळाच नमुना या गावात पाहायला मिळाला. हा प्रकार २०१२ ते २०१३ ते २०१७ ते २०१८ या काळात घडला. याची कुणकुण लागल्याने एका दक्ष ग्रामस्थाने जानेवारी २०२० मध्ये तक्रार केली. त्यानुसार या प्रकाराची चौकशी सुरू झाली. गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी नोटीसा पाठविल्या. सरपंचाने नोटीसांकडेही दुर्लक्ष केले. ग्रामसेवकाने मात्र उत्तर दिले. चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात आली. गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचा अहवाल सादर करण्यात आला. त्यातून या दोघांनी केलेला अपहार उघड झाला. ग्रामपंचायतीचा निधी खर्च करण्यासाठी पद्धत ठरलेली आहे. त्या सर्वांना फाटा देत या दोघांनी वेळोवळी स्वत:च्या नावाने धनादेश देऊन निधी उचलला असल्याचे आढळून आले. फटांगरे यांनी तब्बल ८२ वेळा, तर ग्रामसेवक शेळके यांनी २४ वेळा आपल्या नावाने चेकद्वारे ग्रामपंचायतीच्या खात्यातून पैसे काढल्याचे आढळून आले. सरपंच फटांगरे यांनी सुमारे साडेसोळा लाख तर ग्रामसेवक शेळके यांनी सुमारे ९ लाख रुपये अशा पद्धतीने काढल्याचे आढळून आले. या प्रकरणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनील गुलाबराव माळी यांनी घारगाव पोलीस ठाण्यात सारोळे पठारचे तत्कालीन सरपंच तथा विद्यमान उपसरपंच प्रशांत फटांगरे व ग्रामसेवक सुनील शेळके या दोघांविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी त्या दोघांविरूद्ध फसवणूक व अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. आता शेळके यांच्या पदासंबंधी पंचायत समितीकडून काय कारवाई केली जाते, याकडेही लक्ष लागले आहे.

from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

Pune : पत्नीचा खून करून पतीची गळफास घेऊन आत्महत्या

म. टा. प्रतिनिधी, : परिसरातील मांगडेवाडी येथे पत्नीचा कुऱ्हाडीने करून पतीने स्वतः गळफास घेऊन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता तुकाराम कोरे (वय ३२, रा. मांगडेवाडी, कात्रज) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. अनिता यांचा खून करून तुकाराम गंगाराम कोरे (वय ४०) यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत जगदेवी तुकामार कोरे (वय ३८) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम व जगदेवी हे पती-पत्नी आहेत. नऊ महिन्यांपूर्वी तुकाराम याने जगदेवी यांच्या बहिणीसोबत घरातच गळ्यात हार घालून विवाह केला होता. तेव्हापासून दोघे जण एकत्र राहत होते. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून आरोपी अनिता यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून त्यांच्यात सतत वाद सुरू होते. शुक्रवारी रात्री याच कारणावरून त्यांच्यात वाद झाले. त्यावेळी तुकाराम याने कुऱ्हाडीने वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी त्यांनी दरवाजा न उघडल्यामुळे शेजाऱ्यांनी चौकशी केली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घर उघडून पाहिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस अधिक तपास करत आहेत. कोथरूडमध्ये खुनाची घटना कोथरूड मधील मतिमंदासाठी असलेल्या संस्थेच्या दुसऱ्या मजल्यावरून एका मतिमंद महिलेला अल्पवयीन मुलीने ढकलून दिले. यात महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डावी भुसारी कॉलनी येथील एका नामांकित संस्थेच्या इमारतीमध्ये शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

करोनाची चाचणी न केल्यास गुन्हे; पोलिस आयुंक्तांनी दिले निर्देश

म.टा. प्रतिनिधी, करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी न केल्यास थेट गुन्हे दाखल करा, असे निर्देश पोलिस आयुक्तांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना दिले. बाधितांच्या संपर्कात आल्यानंतरही संपर्कातील नागरिक चाचणी करीत नाहीत. त्यामुळे प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी चाचणी केली का, त्याचा अहवाल काय आला, अहवाल निगेटिव्ह नसतानाही तो शहरात फिरत आहे का, याची माहिती घेण्यासह चाचणी न करणाऱ्यांविरुद्ध साथरोग कायदा व आदेशाचे उल्लंघन आदी कलमान्वये गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले. 'मिनी लॉकडाउन'दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये व नागरिकांनी नियमांचे पालन करावे, यासाठी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासह तब्बल अडीच हजार पोलिसांचा ताफा शनिवारी उपराजधानीतील रस्त्यांवर होता. शनिवारी पोलिसांनी रात्री साडेनऊपर्यंत विविध ठिकाणी ६६ नागरिकांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून ११ हजार ६०० रुपयांचा वसूल केला. मास्क न घालणाऱ्या २३ नागरिकांकडून सहा हजार रुपये तर सुरक्षित वावरचे पालन न करणाऱ्या ४३ नागरिकांकडून ५,६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहतूक पोलिसांनीही मास्क न घालणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली. मात्र, या कारवाईची संख्या वृत्त लिहिपर्यंत कळू शकली नाही. वाचाः शनिवार आणि रविवारी असलेल्या बंदच्या बंदोबस्ताची आखणी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुरुवारीच केली. शनिवारी सकाळपासूनच शहरातील मुख्य चौकांसह विविध ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. बंदोबस्तात गुन्हेशाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी, नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह आठ पोलिस उपायुक्त, ७२ पोलिस निरीक्षक, २३७ सहाय्यक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक, २,४६५ पोलिस कर्मचारी, ३४१ महिला पोलिस कर्मचारी शहरातील विविध भागांत तैनात होते. प्रत्येक पोलिस स्टेशनच्या हद्दीत नाकाबंदी, फिक्स पॉइंट लावण्यात आले. पोलिसांची गस्तही वाढविण्यात आली. याशिवाय, सहा दंगल नियंत्रण पथके व दोन शीघ्रकृती पथके पोलिस मुख्यालय व नियंत्रण कक्षात सज्ज होते. वाचाः तर कठोर निर्णय : पालकमंत्री करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रशासन व पोलिसांकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी सुरक्षित वावरचे पालन करण्यासह मास्क घालावा. नागरिकांनी नियमांचे काटेकार पालन न केल्यास कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा ऊर्जामंत्री व पालकमंत्री डॉ. यांनी दिला. व्हरायटी चौकातील पोलिस बंदोबस्ताचा आढावा घेतल्यानंतर राऊत पत्रकारांशी बोलत होते. पालकमंत्री या नात्याने नागरिकांचे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे. नागरिकांनीही प्रशासनांच्या सूचनेचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी पोलिस आयुक्तांसह पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वाचाः

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

अमरावतीत करोना रॅकेट सक्रिय?; जिल्हाधिकारी म्हणतात...

: करोना उपचाराच्या निमित्ताने विमा काढून लाखोंची हेराफेरी करणारे रॅकेट अमरावती जिल्ह्यात सक्रिय असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी आमसभेत केला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या चौकशीदरम्यान त्यांना याबाबत तथ्यात्मक पुरावे प्राप्त झाले नाही. तसा अहवाल सीईओ अमोल येडगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. पण, प्रकाश साबळे मात्र आरोपांवर कायम आहेत. जिल्हा परिषदेच्या आमसभेत आरोग्य समिती सदस्य प्रकाश साबळे यांनी अमरावती जिल्ह्यात सक्रिय असल्याचा आरोप केला होता. करोना अहवाल पॉझिटीव्ह हवा अथवा निगेटिव्ह अशी विचारणा केली जात असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी सभागृहात केला होता. यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी चौकशी सुरू केली होती. साबळे यांनी याबाबत पुरावे देण्याचे म्हटले होते. परंतु चौकशीदरम्यान पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे शुक्रवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना सादर केलेल्या अहवालात करोना रॅकेटच्या आरोप योग्य नसल्याचे स्पष्ट केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी चौकशी करताना दीडशेहून अधिक करोनाबाधितांशी संवाद साधून चौकशी केली. अ‍ॅन्टीबॉडी टेस्ट महत्वाची ठरणार साबळे यांनी विम्याचा लाभ घेतलेल्यांची करण्याचे म्हटले आहे. तसे झाल्यास लाभ घेतलेल्यांना खरेच करोना होऊन गेला की नाही हे स्पष्ट होणार आहे. यामुळे ही चाचणी महत्त्वाची ठरणार आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

करोनाबाधितांचा ट्रेंड बदलता; लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास 'हा' धोका

म. टा. खास प्रतिनिधी, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील करोनाबाधितांचा 'ट्रेंड' बदलला असून, लक्षणे नसणाऱ्यांपेक्षा लक्षणे असणाऱ्यांतच बाधित आढळणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. लक्षणांकडे केलेले दुर्लक्ष बाधितांना अत्यवस्थ स्थितीत घेऊन जात असल्याची धक्कदायक माहिती पुढे आली आहे. सर्दी, खोकल्यासारख्या लक्षणांमुळे यापूर्वी केलेल्या करोना निदान चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आपण निश्चिंत झाला असाल. त्यानंतर पुन्हा तशीच लक्षणे असल्याने हा वातावरण बदलाचा परिणाम आहे असे वाटणेही स्वाभाविक आहे. परंतु, मनाची समजूत घालून लक्षणांकडे होणारे दुर्लक्ष जीवघेणे ठरू शकते, ही बाब यामुळे अधोरेखित झाली आहे. जिल्ह्यात पहिला बाधित रुग्ण २८ मार्च २०२० रोजी आढळून आला होता. शुक्रवार (दि. २६)पर्यंत एकूण करोनाबाधितांची संख्या एक लाख २१ हजार ८०२ पर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी ९६.१८ टक्के लोक म्हणजेच एक लाख १७ हजार १४५ लोक करोनामुक्त झाले आहेत. करोना संसर्गाची लक्षणे ही सुरुवातीपासूनच अत्यंत सामान्य राहिली आहेत. सर्दी, खोकला, ताप आणि त्यानंतरच्या स्थितीत श्वास घेण्यास त्रास होणे ही त्यातल्या त्यात अत्यंत प्रमुख लक्षणे आहेत. जिल्ह्यात पहिला बाधित रुग्ण आढळला तेव्हापासून आजतागायत वेगवेगळी लक्षणे आढळत गेली. त्यामध्ये जुलाब, मळमळणे, उलट्या, डोकेदुखी, पोटदुखी, इतकेच नाही तर पेशी कमी होणे यांसारखी लक्षणेदेखील काही रुग्णांमध्ये आढळली होती. लक्षणे असणारे ५० टक्के बाधित जिल्ह्यात करोना संसर्गाची सुरुवात झाली तेव्हापासून साधारणत: डिसेंबरपर्यंत लक्षणे असणाऱ्यांपेक्षा लक्षणे नसणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती. केवळ ३० टक्के रुग्णांमध्येच लक्षणे आढळून येत होती, तर ७० टक्के रुग्णांना कोणतीच लक्षणे नसतानाही त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह राहिल्याचे निष्कर्ष आरोग्य यंत्रणांनी काढले. परंतु, बाधितांचा 'ट्रेंड' आता बदलू लागला आहे. लक्षणे असणारे बाधित आढळण्याचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत गेले आहे. त्यामुळे नागरिकांनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तपासणी करवून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. संसर्गाची सुरुवात झाली तेव्हापासून लक्षणे असणाऱ्यांचे प्रमाण कमी राहिले. परंतु, आता हे प्रमाण २० टक्क्यांनी वाढले आहे. घरीच उपचार घेऊन बरे होता येते हा विश्वासही दुणावल्याचेही पाहावयास मिळत आहे. आजार बळावू नये याकरिता लक्षणे जाणवताच कोव्हिड निदान चाचणी करवून घेणे आवश्यक आहे. -सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

डेलकरांची आत्महत्या हे साधे प्रकरण वाटत नाही; राऊतांनी व्यक्त केली शंका

मुंबईः सिल्वासा, दादरा- नगर हवेलीचे खासदार यांनी मुंबईत आत्महत्या केली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात ज्यांनी देशभरात खळबळ माजवली त्या प्रत्येकासाठी डेलकरांची आत्महत्या हे आव्हान आहे. मोहन डेलकरांची आत्महत्या हे साधे प्रकरण वाटत नाही, अशी शंका शिवसेनेचे नेते यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून राऊतांनी मोहन डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणावर भाष्य केलं आहे. ( on ) दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. काँग्रेसनं तर भाजपच्या त्रासाला कंटाळून डेलकर यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर शिवसेनेनंही डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणात शंका व्यक्त केली आहे. वाचाः 'सुशांत राजपूतने त्याच्या एका सिनेमात 'आत्महत्या करू नये. निराश होऊ नये,' असे संवाद फेकले. त्यामुळे सुशांतसारखा खंबीर मनाचा तरुण आत्महत्या कसा करील? सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याची 'पटकथा' तयार झाली. त्या कथाकारांना डेलकरांच्या आत्महत्येमागे कोणतेच काळेबेरे दिसू नये? डेलकर यांनी त्यांची जीवनयात्रा संपवली, स्वतःचा अत्यंत दारुण शेवट त्यांनी करून घेतला याबद्दल किती जण हळहळले?,' असा सवालही त्यांनी केला आहे. 'मोहन डेलकर हे हिंमतबाज होते, ते पळपुटे नव्हते. ते आत्महत्या का करतील? त्यांना जय-पराजयाची चिंता कधीच वाटली नाही. अशा डेलकरांचा मृतदेह मुंबईतील हॉटेलात फासावर लटकलेला आढळतो व सगळे चूप आहेत. एका नटाची आत्महत्या खळबळ माजवते, एका नटीचे बेकायदेशीर बांधकाम तोडल्यावर हलकल्लोळ होतो, पण सातवेळा निवडून आलेले एक खासदार मुंबईत संशयास्पदरीत्या मृत पावतात त्यावर कोणी काहीच आपटायला तयार नाही,' असंही राऊत म्हणाले आहेत. वाचाः 'मोहन डेलकर यांनी एक 'सुसाईड नोट' गुजरातीत लिहून ठेवली. ही नोट खरी असेल तर त्यात डेलकरांनी नक्की काय लिहिले? दादरा-नगर हवेलीचे प्रशासक डेलकरांचा छळ करीत होते, भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी त्यांच्यावर दबाव होता असे त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. आपल्याला विरोध करणारा राजकारणी, कलाकार, सामाजिक कार्यकर्ता, चळवळ यांची मानसिक कोंडी करून त्यांना आत्महत्येच्या कड्यावर न्यायचेच अशी काही योजना ठरली आहे काय? मोहनने आत्महत्या केली, तो खून नाही हे मान्य केले तर मग ती का केली?,' असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. वाचाः बाळासाहेबांनी डेलकरांच्या विरोधात प्रचासभा घेतली होती १९९० च्या दशकात शिवसेनेने सिल्वासात लोकसभा निवडणूक लढवली. प्रचारासाठी स्वतः बाळासाहेब ठाकरे सिल्वासाला गेले. मोहन डेलकर काँग्रेसचे उमेदवार होते. प्रचार सभा डेलकरांच्याच विरोधात होती. डेलकरांच्या झुंडशाही आणि दडपशाहीविरोधात शिवसेनेने प्रचार सुरू केला. त्यात बाळासाहेब ठाकरे तेथे पोहोचणार म्हटल्यावर वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. आदल्या दिवशी संध्याकाळी फोन वाजला. फोनवर स्वतः मोहन डेलकर. 'क्या मोहनभाई, क्या चल रहा हैं' मोहन डेलकर शांतपणे म्हणाले, 'उद्या सिल्वासात आदरणीय बाळासाहेब येत आहेत. सिल्वासात चांगली हॉटेल्स नाहीत. साहेबांची गैरसोय होऊ नये. त्यांना विनंती करा, माझ्याच बंगल्यात उतरा. नंतर प्रचार सभेला जा. सध्या कडक उन्हाळा आहे.' यावर मी विचारले, ”अरे बाबा, तुझा पक्ष तुझ्यावर कारवाई करील 'बाळासाहेबांमुळे कारवाई होणार असेल तर चालू द्या, पण मीच जिंकणार आहे, असं डेलकर म्हणाले व शेवटी डेलकरच मोठ्या फरकाने जिंकले, अशी आठवणही संजय राऊत यांनी सांगितली आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; राज्य सरकारची कोंडी करण्याची भाजपची रणनीती

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन त्यांची चौकशी करा. सोमवारपर्यंत राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील सरकारला विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तोंड उघडू देणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिला. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री राठोड यांच्याविरोधात पुरावे आहेत, ऑडिओ क्लिप आहे. सर्व पुरावे समोर आलेले असताना सरकारच्या दबावामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. या प्रकरणात प्रदेश भाजपच्या उपाध्यक्षा यांनी आवाज उठवल्यामुळे त्यांच्या पतीविरोधातील एका प्रकरणाची चौकशी पोलिसांनी आता सुरू केली आहे. वाघ या सातत्याने पूजा चव्हाण प्रकरणात सरकारला प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे पूर्वीच्या प्रकरणाची आता चौकशी सुरू करून दबाव वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. कार्यकत्यांना त्रास दिला म्हणून आम्ही मागे हटणार नाहीत. पक्ष चित्रा वाघ यांच्या पाठीशी आहे, असे पाटील यांनी सांगितले. वाघ यांच्या पतीच्या प्रकरणात काय आर्थिक हेराफेरी झाली असेल तर चौकशी करा, पण दबाव आणण्यासाठी प्रयत्न केला तर खपवून घेणार नाही. राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर सोमवारपासून प्रदेश भाजपच्या युवा मोर्चा आणि ओबीसी मोर्चाकडूनही आंदोलन केले जाईल, असेही ते म्हणाले. पूजा चव्हाण प्रकरणात राठोड यांची चौकशी करा. चौकशीत काय निष्पन्न झाले ते नागरिकांपुढे येऊ द्या. ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचा आहे, गर्भपात केलेले डॉक्टर कुठे आहेत, अरुण राठोड कुठे आहे, याची माहिती पुढे येऊ दे, असे पाटील यांनी सांगितले. 'सत्यवादी भूमिका दिसली नाही' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सत्यवादी आहेत, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले, 'उद्धव ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून पूजा चव्हाणला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. पण मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत खुर्ची टिकवण्यासाठी त्यांनी आतापर्यंत अनेक मंत्री आणि सत्तारूढ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या गैरवर्तनाबद्दल सत्यवादी भूमिका घेतल्याचे दिसले नाही.' मुंडे यांच्याही राजीनाम्याची मागणी समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे हे करुणा शर्मा या विषयावर बोलले. १५ वर्षे संबंध आहेत. पण ही माहिती प्रतिज्ञापत्रात लपवली. त्यामुळे राठोड यांच्याबरोबर मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही विधिमंडळात भाजप करेल, असे पाटील म्हणाले. मंत्र्यांच्या राजीनाम्याबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न, वीजबिले, करोनातील भ्रष्टाचार आदी विषयांवर अधिवेशनात सरकारला जाब विचारू, असे त्यांनी केले.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

'चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नसता तर...'

म. टा. प्रतिनिधी, मुंबई वनमंत्री यांच्यावर आरोपांचा धुरळा उडत असतानाच, या प्रश्नावरून भाजप नेत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. यांच्यात कलगीतुरा सुरू झाला आहे. किशोर वाघ यांच्यावर १२ फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला असून, भाजपच्या काळात २०१६मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खुली चौकशी सुरू केली होती. आपण साहेबांच्या तालमीत तयार झाल्या आहात. त्यामुळे दिशाभूल करू नये, असा टोला मिटकरी यांनी चित्रा वाघ यांना लगावला आहे. किशोर वाघ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सरकारला जाब विचारल्यामुळेच ही कारवाई केली जात असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. त्यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे मिटकरी यांनी ट्वीट करून त्यांना प्रत्युत्तर दिले. त्यांनी ट्वीटमध्ये वाघ यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. किशोर वाघ यांच्यावर १२ फेब्रुवारीला गुन्हा दाखल झालेला आहे. त्याहीपेक्षा २०१६ रोजी भाजपनेच याबाबत खुली चौकशी लावलेली आहे, असा खुलासा मिटकरी यांनी केला. चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नसता तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याप्रकरणी गुन्हा दाखल केला असता, असा दावाही त्यांनी केला. मिटकरी यांनी एसीबीने दाखल केलेल्या एफआरआयची प्रतसुद्धा ट्विटरवर पोस्ट केली आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी चित्रा वाघ पत्रकार परिषदा घेऊन राज्य सरकारवर टीका करीत आहेत. वनमंत्री राठोड यांच्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तालमीत तयार झाल्याचे बोलून दाखवले होते. याच मुद्द्यावरून मिटकरी यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. कथित लाच प्रकरणातील मुख्य आरोपी गांधी रुग्णालयाचे तत्कालीन महानिरीक्षक गजानन भगत यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यांची अजून चौकशीच सुरू आहे. २०११पासून एसीबीची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. मग माझ्या नवऱ्यावरच गुन्हा दाखल कसा करण्यात आला, असा सवाल चित्रा वाघ यांनी सरकारला विचारला आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

कंगनाची पुन्हा चौकशी होणार; 'या' प्रकरणी नव्याने तपास सुरु

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई अभिनेता आणि यांच्यातील इमेल वाद प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने (सीआययू) शनिवारी पुन्हा एकदा हृतिकचा जबाब नोंदवला. २०१६ नंतर थांबलेला तपास पुन्हा सुरू करून हृतिकचा जबाब घेण्यात आल्याने याप्रकरणात कंगनालाही चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. तपास, पुरावे तसेच इतर कायदेशीर बाबींचा अभ्यास करून लवकरच कंगनाला यासाठी बोलाविले जाईल, असे गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. कंगना रणोट हिने हृतिकने आपल्याला काही खासगी आणि रोमॅन्टिक ई-मेल पाठवल्याचा आरोप केल्याने दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. कंगनाने मला हजारो मेल पाठविल्याचा आरोप करीत हृतिकने पोलिसांत तक्रार केली होती. त्याच्या तक्रारीवरून २०१६ मध्ये वांद्रे-कुर्ला संकुल येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर याप्रकरणात कंगनाची चौकशीही करण्यात आली होती. मात्र, तपास फार पुढे चालला नाही. तपासाकरिता हृतिकने मोबाइल, लॅपटॉप तसेच इतर साहित्य पोलिसांना दिले होते. चार वर्षांनंतरही या गुन्ह्याचा तपास जैसे थेच आहे. हृतिकच्या वकिलांच्या मागणीनंतर पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी डिसेंबर २०२० मध्ये तपास पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या सीआययू पथकाकडे सोपवला होता. सीआययूने बुधवारी जबाब नोंदविण्यासाठी हृतिकला समन्स पाठिवले होते. सायबरतज्ज्ञांच्या मदतीने २०१४ मध्ये कंगनाच्या दोन मेल आयडीवरून पाठविण्यात आलेले सुमारे साडेनऊशे इमेल तपासण्यात आले. यापैकी सुमारे ३५० ईमेलमध्ये आक्षेपार्ह भाषा, अश्लील छायाचित्रे, तसेच इतर अनेक बाबींचा समावेश आहे. याबाबत अधिक माहिती आणि सविस्तर जबाब देण्यासाठी शनिवारी सकाळी ११च्या सुमारास हृतिक क्रॉफर्ड मार्केट येथील आयुक्त कार्यालयात दाखल झाला. सुमारे दोन तास हृतिकचा जबाब घेण्यात आला. गुन्हा दाखल करताना दिलेली माहिती यावेळी पुन्हा हृतिकने दिली असून, काही संदर्भही दिल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

राठोडांच्या शक्तीप्रदर्शनामुळं काँग्रेस- राष्ट्रवादीत नाराजी; शिवसेना एकाकी

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वाद आणि आरोपांचा सामना करणारे वनमंत्री हे सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधी पक्षाचे लक्ष्य असणार आहेत. त्यात महाराष्ट्र विकास आघाडीमधील घटक पक्ष असलेले आणि राष्ट्रवादी हे दोघेही राठोड यांच्या बचावासाठी अनुकूल नाहीत. त्यामुळे राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असलेल्या भाजपचा अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच एकहाती सामना करावा लागणार आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कडक निर्बंधांची टांगती तलवार, करोना नियमांची होणारी पायमल्ली, वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ, मराठा आरक्षणाचा गुंता सोडविण्यासाठी होणारा विलंब, शिक्षकांचे सुरू असलेले आंदोलन, शिक्षण खात्यातील गोंधळ, सरकार आणि राज्यपाल यांच्यातील वाढता विसंवाद, सेलिब्रेटींच्या ट्वीटची चौकशी आदी असंख्य मुद्द्यांवरून सोमवारपासून सुरू होणारे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तापणार आहे. करोनाचे संकट कायम असल्याने अलीकडच्या काळात प्रथमच अर्थसंकल्पीय अधिवेशन जेमतेम आठ दिवस चालणार आहे. पुण्यातील पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात संजय राठोड यांचे नाव घेतले जात असल्याने भाजप त्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून हा मुद्दा लावून धरण्याचे भाजपने ठरवले आहे. या प्रकरणात समोर येत असलेली माहिती आणि करोनाचे निर्बंध झुगारून पोहरादेवी येथे केलेले शक्तिप्रदर्शन यामुळे राठोड यांच्याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येही नाराजी आहे. एकूणच राठोड प्रकरणात एकट्या शिवसेनेला भाजपशी दोन हात करावे लागणार असल्याचे दिसते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आघाडी सरकारच्या विरोधात भाजपने आक्रमक सूर लावला असून पक्षनेते वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरकारवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतूनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभात्याग केला होता. त्यामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षाकडून बहिष्कार टाकण्याचे जवळपास निश्चित असल्याचे समजते.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

कोरोना वैक्सीनेशन: निजी अस्पतालों में 250 रुपए देकर लगवा सकेंगे कोविड-19 की वैक्सीन?

डिजिटल डेस्क, दिल्ली। देश में 16 जनवरी से शुरु हुए कोरोना वैक्सीनेशन अभियान के तहत पहले चरण में स्वास्थ्यकर्मियों और फ्रंटलाइन वर्कर्स को टीका लगाने का काम किया जा रहा है। एक मार्च से दूसरा चरण शुरू होगा। इस बीच खबर है कि निजी अस्पतालों में 250 रुपए प्रति डोज के हिसाब से कोरोना वैक्सीन लगाई जाएगी। इसमें 100 रुपए सर्विस चार्ज शामिल है।

ज्ञात हो कि कोरोना से बचाव के लिए अब तक 1,42,42,547 लोगों को वैक्सीन भी लगाई जा चुकी है। इनमें 66,68,974 हेल्थकेयर वर्कर्स और 51,19,695 फ्रंटलाइन वर्कर्स शामिल हैं। सूत्रों के मुताबिक, कोरोना वैक्सीन की कीमत 250 रुपये प्रति डोज होगी और इस बारे में केंद्र सरकार जल्द ही घोषणा कर सकती है। वैक्सीन का एक निश्चित मूल्य होगा, कोई कैपिंग नहीं होगी। बताया जा रहा है कि आज या कल तक निजी अस्पतालों में वैक्सीन की कीमत की घोषणा सरकार कर सकती है। 

एक मार्च से देश में कोरोना वैक्सीनेशन का दूसरा चरण
बता दें कि एक मार्च से देश में कोरोना वैक्सीनेशन का दूसरा चरण शुरू होगा। वैक्सीनेशन के दौरान 60 साल से ऊपर की उम्र वालों को वैक्सीन लगाई जाएगी। हालांकि 45 साल से 60 साल के बीच के लोगों को भी वैक्सीन की डोज दी जाएगी, लेकिन इस एज ग्रुप के उन्हीं लोगों को वैक्सीन मिलेगी जो पहले से किसी गंभीर बीमारी से पीड़ित हैं।  

24 घंटे में 16 हजार से ज्यादा नए मरीज मिले
शनिवार को देश में 16 हजार 19 लोग कोरोना संक्रमित पाए गए। 12 हजार 361 लोग रिकवर हुए और 109 की मौत हो गई। अब तक 1 करोड़ 10 लाख 79 हजार से ज्यादा लोग संक्रमण की चपेट में आ चुके हैं। इनमें 1 करोड़ 7 लाख 61 हजार से ज्यादा लोग ठीक हो चुके हैं। 1 लाख 56 हजार 970 मरीज ऐसे हैं जिनकी मौत हो गई। 1 लाख 56 हजार 413 मरीजों का अभी इलाज चल रहा है।

18 राज्यों में कोरोना का नया स्ट्रेन फैला
देश के 18 राज्यों में कोरोना का नया स्ट्रेन फैल गया है। ये स्ट्रेन यूके, साउथ अफ्रीका और ब्राजील से आए हैं। इसके अब तक 194 मामले सामने आ चुके हैं। केद्र सरकार ने देश में बढ़ते मामलों को देखते हुए इन सभी 18 राज्यों की निगरानी शुरू कर दी है। नेशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल (NCDC) ने इन राज्यों से नए स्ट्रेन से जुड़े मरीजों की जानकारी और उनके संपर्क में आने वाले लोगों के बारे में पूछा है।

.Download Dainik Bhaskar Hindi App for Latest Hindi News.
.
...
Covid-19 vaccine will be available in private hospitals by paying Rs 250
.
.
.

from दैनिक भास्कर हिंदी

सत्ता, पदासाठी ही लाचारी; राणे यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे खासदार (Narayan Rane) यांनी पुन्हा (CM Uddhav Thackeray) याच्यावर टीकास्त्र सोडले आहे. शुक्रवारी स्वातंत्र्यवीर सावकर () यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या व्यक्तिगत सोशल मीडिया अकाउंट्सवरून सावरकर यांना अभिवादन करण्यात आलेले नाही, असे लक्षात आणून देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी?, असा सवाल केला आहे. ही सत्तेसाठी आणि पदासाठी लाचारी असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (bjp mp criticise ) नारायण राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'काल स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त @CMOMaharashtra आणि मुख्यमंत्र्यांच्या वैयक्तिक सोशल मीडियावरून अभिवादन व्यक्त करण्यात आले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर म्हणजे हिंदुत्वाचा विसर. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी.' क्लिक करा आणि वाचा- भाजप खासदार नारायण राणे हे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. अलिकडे राणे यांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर टीका करताना त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या कृपेमुळेच मुख्यमंत्रिपदी बसले आहेत, असे सांगत हे सरकारच शरद पवार यांच्या कृपेमुळे आहे असा हल्लाबोल राणे यांनी केला होता. इतकेच नाही, तर शरद पवार यांची कृपा नसती तर असा मुख्यमंत्री कोणी केला असता?, असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. क्लिक करा आणि वाचा- या राज्यातील कोणताही सरपंच या मुख्यमंत्र्यापेक्षा कितीतरी हुशार आहे. सरपंचालाही मुख्यमंत्र्यांपेक्षा कायदे कानून माहीत आहेत, अशा शब्दांत राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती घणाघाती हल्ला चढवला. क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मंत्र्यांमध्ये 'ही' चढाओढ लागली आहे; भाजप महिला आघाडीचा गंभीर आरोप

म.टा. प्रतिनिधी, अहमदनगर ‘राज्यातील आघाडी सरकारच्या (maha vikas aghadi govt) मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी महिलांवर अत्याचार केल्याचे सिद्ध झाले आहे. नागरिकांची कामे करणे, त्यांना सोयीसुविधा पुरविणे ही कामे करण्यापेक्षा सरकारमधील मंत्र्यांमध्ये महिलांवर अत्याचार करण्याची चढाओढ लागली आहे,’ असा आरोप नगर शहर भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा यांनी केला. (what kind of competition has taken place among the ministers asks leader ) भाजपा शहर महिला आघाडीच्या वतीने दिल्लीगेटसमोर वन मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. राठोड यांचा निषेध करून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. काही काळ रास्तारोको आंदोलनही झाले. यावेळी वल्लाकटी म्हणाल्या, ‘अलीकडेच उघडकीस आलेले वन मंत्री राठोड यांचे प्रकरण भयानक आहे. युवतीवर अत्याचार करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे भक्कम पुरावे राठोड यांच्या विरोधात आहेत. तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राठोड यांचा अद्याप राजीनामा न घेता या प्रकरणाकडे डोळेझाक करीत आहेत. आघाडी सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात महिला असुरक्षित आहेत,’ असा आरोपही त्यांनी केला. क्लिक करा आणि वाचा- प्रदेश सरचिटणीस सुरेखा विद्ये म्हणाल्या, ‘तिघाडीमुळे मुख्यमंत्री ठाकरे यांचे हात दबलेले असल्याने ते सक्षम निर्णय घेताना दिसत नाहीत. अत्याचार करणार्‍या मंत्र्यांना ते पाठीशी घालत आहेत. त्यांनी ताबडतोब मंत्री राठोड यांचा राजीनामा घेतला नाही, तर भाजपा महिला आघाडी शांत न बसता अधिक तीव्र आंदोलन करील,’ असा इशाराही त्यांनी दिला. क्लिक करा आणि वाचा- यावेळी महिला आघाडीच्या सदस्या शुभांगी साठे, नम्रता सगम, सविता सामल, अर्चना चौधरी, संध्या पावसे, ललिता कोटा, अश्‍विनी करांडे उपस्थित होत्या. क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

भाजप नेत्यानं मुख्यमंत्री ठाकरेंना दिली 'ही' उपमा

मुंबई: 'मुख्यमंत्री हे मिस्टर सत्यवादी आहेत. ते कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत...' या यांच्या वक्तव्याचा भाजपचे आमदार यांनी जोरदार समाचार घेतला आहे. 'हरिश्चंद्राने उद्धव ठाकरेंच्या रूपात पुनर्जन्म घेतला आहे. हे मिस्टर सत्यवादी फक्त सत्ता आणि टक्केवारीसाठी घसरतात,' असा सणसणीत टोला भातखळकर यांनी हाणला आहे. ( Criticised CM ) वाचा: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. भाजपचे नेते रोजच्या रोज महाविकास आघाडी सरकारवर टीकेच्या तोफा डागत आहेत. त्यामुळं राठोड यांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आला होता. त्यावर, 'राज्याचे मुख्यमंत्री शांत बसलेले नाहीत. ते कुठल्याही गोष्टीपासून अनभिज्ञ नाहीत. जे जे घडतंय, ते सर्व त्यांना माहीत आहे. त्यांचं प्रत्येक घडामोडींकडं लक्ष आहे. मुख्यमंत्री अत्यंत जागरूक, संवेदनशील आणि न्यायप्रिय आहेत. ते कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत,' असं राऊत म्हणाले होते. राऊत यांच्या या वक्तव्याचा भातखळकर यांनी तिरकस शब्दांत समाचार घेतला आहे. 'राजा हरिश्चंद्राने उद्धव ठाकरेंच्या रूपात पुनर्जन्म घेतला आहे. हे मिस्टर सत्यवादी फक्त सत्ता आणि टक्केवारीसाठी घसरतात. गब्रूच्या बाबतीत प्रश्न सत्तेचा आहे एवढीच अडचण आहे,' असं भातखळकर यांनी म्हटलं आहे. 'चित्रा वाघ 'गब्रू प्रकरणी' रोज सरकारची लाज काढताहेत, त्यामुळं कागदी वाघानं त्यांच्या मागे चौकशीचं शुक्लकाष्ट लावलं. कमाल आहे ठाकरे सरकारची, बलात्काऱ्यावर कारवाई करण्याची धमक नाही. आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई करताहेत. काय लायकीची माणसं आहेत ही?,' असं भातखळकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

बाळ बोठे पोलिसांना सापडेना; रेखा जरेंच्या मुलाला 'हा' संशय

अहमदनगर: रेखा जरे यांच्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार याच्यासाठी कोण लपवाछपवी करत आहे? पोलिसांची गुप्तचर यंत्रणाही का काम करू शकत नाही? सरकार त्याला पाठीशी घालतेय काय? असे प्रश्न उपस्थित करीत जरे यांचा मुलगा रुणाल यांनी पाच मार्चपासून पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी मोठे कारस्थान सुरू असल्याचा संशयही जरे यांनी व्यक्त केला असून एकप्रकारे हे यंत्रणेला दिलेले आव्हान असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. वाचा: या प्रकरणात पोलिसांनी नुकतेच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. मात्र, सूत्रधार अद्याप फरार आहे. यासंबंधी जरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आपल्या आईच्या म्हणजे रेखा जरे यांच्या हत्येला ८७ दिवस उलटून गेले आहेत. तरीही यातील मुख्य सूत्रधार पोलिसांना सापडलेला नाही. एवढे सक्षम अधिकारी असतानाही आरोपी सापडत नाही. त्यामुळे सरकार त्याला पाठीशी घालत आहे, असे वाटते. त्यामुळे पोलिसांची गुप्तचर यंत्रणा काय करते? हे प्रकरण दडपण्याचा तर प्रयत्न सुरू नाही ना? यात कोणी तरी लपवाछपवी तर करीत नाही ना, असे प्रश्न पडले आहेत. मी व माझे वडील पोलिसांना मदत करायला सतत तयार आहोत. यासाठी आम्ही अधिकारी आणि मंत्र्यांनाही भेटलो. मात्र, माझ्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडूनही मिळू शकली नाहीत. त्यामुळेच मोठे कट कारस्थान करून या गुन्ह्याची चौकशी दडपण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. हिमत असेल तर चौकशी करून दाखवा, अशा प्रकाराचा संदेशच जणून यातून दिला जात आहे. वाचा: पोलिसांवर मोठा राजकीय दबाव असल्यासारखे वाटत आहे. शिवाय मंत्रीही स्वत: यावर बोलत नाहीत. देशात नावाजलेल्या महाराष्ट्र पोलिसांना हा आरोपी सापडत नाही, यामागे नेमके कारण काय? यामागे कोण आहे? आम्ही एवढा पाठपुरावा करूनही आम्हाला नेमकी उत्तरे मिळालेली नाहीत. माझी आई राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी असली तरी शेवटी ती एक स्त्री होती. त्या दृष्टीने या प्रकरणाकडे पाहिले पाहिजे. पोलिसांवर आमचा विश्वास होता. मात्र, दोषारोपपत्र दाखल झाले तरीही मुख्य आरोपी सापडत नाही. त्यामुळे आरोपीला अटक होऊन शिक्षा होऊपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. आपण उपोषणाची परवानगी मागितली, मात्र ती देण्यात आलेली नाही. तरीही आपण पाच मार्चपासून उपोषण करणार आहोत. याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही जरे यांनी म्हटले आहे. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

पूजा चव्हाण: भाजपचे राज्यात ठिकठिकाणी आंदोलन, जळगावात मात्र 'हे' घडले

म. टा. प्रतिनिधी, मुंबई भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीकडून राज्यात ठिकठिकाणी पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणी पूजाच्या कुटुबीयांना न्याय मिळाला या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. बीड येथिल पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी राज्यभरात भाजपाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आज शनिवारी (दि.२७) जळगाव शहरात आकाशवाणी चौकात भाजपा महिला आघाडीकडून होणारे हे आंदोलन पोलिसांनी बळाचा वापर करीत उधळून लावले. आंदोलनासाठी महामार्गावर येण्यापूर्वीच भाजप महिला आघाडीच्या पदाधकिऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. (bjp agitation in various parts of the state demanding justice for pooja chavan family) गेल्या काही दिवसांपासून राज्यात बीडच्या पूचा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येचे प्रकरण गाजत आहे. या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली आहे. या कथित प्रकरणात शिवसेनेचे वनमंत्री यांचे नाव विरोधकांकडून घेतले जात आहे. राज्य शासनाने या प्रकरणाच्या चौकशीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचे पावले उचलली नाही, मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतलेला नाही. त्यामुळे विरोधीपक्ष असलेल्या भाजपाने आक्रमक पावित्रा घेतला आहे. मंत्री राठोड यांचा राजीनामा घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, पूजाला व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, या मागण्यांसाठी जळगावात देखील भाजपच्या वतीने आज चक्काजाम आंदोलन केले जाणार होते. महिला पोलिस व आंदोलकांमध्ये झटापट जळगाव जिल्हा व महानगर भाजपकडून सकाळी ११ वाजता चक्काजाम आंदोलन शहरातील आकाशवाणी चौकात महामार्गावर होणार होते. आंदोलनासाठी भाजपच्या महिला पदाधिकारी या ठीकाणी पोहचल्या होतात. त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात करताच पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलन दडपून टाकले. सर्व महिला आंदोलकांना ताब्यात घेऊन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी भाजपच्या महिला पदाधिकारी व महिला पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. पोलीस आंदोलक महिलांना ताब्यात घेत असताना राज्य शासन तसेच मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजप महिला आघाडीकडून राज्या शासनाचा निषेध देखील करण्यात आला. क्लिक करा आणि वाचा- कोल्हापुरातही दोरदार निदर्शने पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांना तात्काळ अटक करावी, त्याचबरोबर मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महिला मोर्चातर्फे बिनखांबी गणेश मंदिर येथे रास्ता रोको आंदोलन झाले. भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा गायत्री राऊत यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. मंत्री राठोड यांच्यावरील कारवाईप्रश्नी सरकार किंवा पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिला आघाडीने दिला. क्लिक करा आणि वाचा- औरंगाबादमध्ये आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात पुजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव येत असून याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दुध डेअरी सिग्नल चौकात केले आंदोलन, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात. अहमदनगरमध्ये राठोड्यांच्या प्रतिमेला मारले जोडे वन मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात भाजपा महिला आघाडी नगरमध्ये आंदोलन, राठोड यांच्या प्रतिमेला मारले जोडे क्लिक करा आणि वाचा- मुंबईतही झाले आंदोलन

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मंत्र्यांमध्ये 'ही' चढाओढ लागली आहे; भाजप महिला आघाडीचा गंभीर आरोप

म.टा. प्रतिनिधी, अहमदनगर ‘राज्यातील आघाडी सरकारच्या (maha vikas aghadi govt) मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी महिलांवर अत्याचार केल्याचे सिद्ध झाले आहे. नागरिकांची कामे करणे, त्यांना सोयीसुविधा पुरविणे ही कामे करण्यापेक्षा सरकारमधील मंत्र्यांमध्ये महिलांवर अत्याचार करण्याची चढाओढ लागली आहे,’ असा आरोप नगर शहर भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा यांनी केला. (what kind of competition has taken place among the ministers asks leader ) भाजपा शहर महिला आघाडीच्या वतीने दिल्लीगेटसमोर वन मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. राठोड यांचा निषेध करून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. काही काळ रास्तारोको आंदोलनही झाले. यावेळी वल्लाकटी म्हणाल्या, ‘अलीकडेच उघडकीस आलेले वन मंत्री राठोड यांचे प्रकरण भयानक आहे. युवतीवर अत्याचार करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे भक्कम पुरावे राठोड यांच्या विरोधात आहेत. तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राठोड यांचा अद्याप राजीनामा न घेता या प्रकरणाकडे डोळेझाक करीत आहेत. आघाडी सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात महिला असुरक्षित आहेत,’ असा आरोपही त्यांनी केला. क्लिक करा आणि वाचा- प्रदेश सरचिटणीस सुरेखा विद्ये म्हणाल्या, ‘तिघाडीमुळे मुख्यमंत्री ठाकरे यांचे हात दबलेले असल्याने ते सक्षम निर्णय घेताना दिसत नाहीत. अत्याचार करणार्‍या मंत्र्यांना ते पाठीशी घालत आहेत. त्यांनी ताबडतोब मंत्री राठोड यांचा राजीनामा घेतला नाही, तर भाजपा महिला आघाडी शांत न बसता अधिक तीव्र आंदोलन करील,’ असा इशाराही त्यांनी दिला. क्लिक करा आणि वाचा- यावेळी महिला आघाडीच्या सदस्या शुभांगी साठे, नम्रता सगम, सविता सामल, अर्चना चौधरी, संध्या पावसे, ललिता कोटा, अश्‍विनी करांडे उपस्थित होत्या. क्लिक करा आणि वाचा-

from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

८७ दिवस झाले तरी बाळ बोठे पोलिसांना सापडेना; रेखा जरेंच्या मुलानं घेतला 'हा' निर्णय

अहमदनगर: रेखा जरे यांच्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार याच्यासाठी कोण लपवाछपवी करत आहे? पोलिसांची गुप्तचर यंत्रणाही का काम करू शकत नाही? सरकार त्याला पाठीशी घालतेय काय? असे प्रश्न उपस्थित करीत जरे यांचा मुलगा रुणाल यांनी पाच मार्चपासून पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी मोठे कारस्थान सुरू असल्याचा संशयही जरे यांनी व्यक्त केला असून एकप्रकारे हे यंत्रणेला दिलेले आव्हान असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. वाचा: या प्रकरणात पोलिसांनी नुकतेच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. मात्र, सूत्रधार अद्याप फरार आहे. यासंबंधी जरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आपल्या आईच्या म्हणजे रेखा जरे यांच्या हत्येला ८७ दिवस उलटून गेले आहेत. तरीही यातील मुख्य सूत्रधार पोलिसांना सापडलेला नाही. एवढे सक्षम अधिकारी असतानाही आरोपी सापडत नाही. त्यामुळे सरकार त्याला पाठीशी घालत आहे, असे वाटते. त्यामुळे पोलिसांची गुप्तचर यंत्रणा काय करते? हे प्रकरण दडपण्याचा तर प्रयत्न सुरू नाही ना? यात कोणी तरी लपवाछपवी तर करीत नाही ना, असे प्रश्न पडले आहेत. मी व माझे वडील पोलिसांना मदत करायला सतत तयार आहोत. यासाठी आम्ही अधिकारी आणि मंत्र्यांनाही भेटलो. मात्र, माझ्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडूनही मिळू शकली नाहीत. त्यामुळेच मोठे कट कारस्थान करून या गुन्ह्याची चौकशी दडपण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. हिमत असेल तर चौकशी करून दाखवा, अशा प्रकाराचा संदेशच जणून यातून दिला जात आहे. वाचा: पोलिसांवर मोठा राजकीय दबाव असल्यासारखे वाटत आहे. शिवाय मंत्रीही स्वत: यावर बोलत नाहीत. देशात नावाजलेल्या महाराष्ट्र पोलिसांना हा आरोपी सापडत नाही, यामागे नेमके कारण काय? यामागे कोण आहे? आम्ही एवढा पाठपुरावा करूनही आम्हाला नेमकी उत्तरे मिळालेली नाहीत. माझी आई राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी असली तरी शेवटी ती एक स्त्री होती. त्या दृष्टीने या प्रकरणाकडे पाहिले पाहिजे. पोलिसांवर आमचा विश्वास होता. मात्र, दोषारोपपत्र दाखल झाले तरीही मुख्य आरोपी सापडत नाही. त्यामुळे आरोपीला अटक होऊन शिक्षा होऊपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. आपण उपोषणाची परवानगी मागितली, मात्र ती देण्यात आलेली नाही. तरीही आपण पाच मार्चपासून उपोषण करणार आहोत. याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही जरे यांनी म्हटले आहे. वाचा:

from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

'उद्धव ठाकरे मिस्टर सत्यवादी; कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत'

मुंबई: 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मिस्टर सत्यवादी आहेत. अत्यंत जागरूक व न्यायप्रिय आहेत. ते कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत,' असा दावा शिवसेनेचे खासदार यांनी प्रकरणाबाबत बोलताना केला आहे. ( MP Sanjay Raut Praises ) पूजा चव्हाण प्रकरणात () वनमंत्री () यांचं नाव आल्यापासून भाजपनं सरकारविरोधात रान उठवलं आहे. राठोड यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. भाजपच्या महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यात आघाडीवर आहेत. आजही भाजपनं ठिकठिकाणी राठोड यांच्याविरोधात निदर्शनं केली. या संपूर्ण घडामोडींविषयी संजय राऊत यांना विचारलं असता, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. वाचा: 'राज्याचे मुख्यमंत्री शांत नाहीत. ते कुठल्याही गोष्टीपासून अनभिज्ञ नाहीत. जे जे घडतंय, ते सर्व त्यांना माहीत आहे. त्यांचं प्रत्येक घडामोडींकडं लक्ष आहे. अत्यंत जागरूक मुख्यमंत्री आहेत. संवेदनशील आहेत. तपास पूर्ण होऊ द्या, मग बोलू एवढीच आमची भूमिका आहे,' असं राऊत म्हणाले. वाचा: 'चित्रा वाघ यांची काही वक्तव्ये मी ऐकली आहेत. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. विरोधी पक्षाचे लोक काहीही बोलू शकतात. महाराष्ट्रात विरोधकांना बोलण्याचं लायसन्स आहे. चित्रा वाघ यांच्याकडं सरकार आणि पोलिसांपेक्षा अधिक माहिती असू शकते. तशी ती असेल तर त्यांनी जाहीर आरोप करण्याऐवजी तपास यंत्रणेला भेटून दिली पाहिजे. गृहमंत्र्यांची भेट घेतली पाहिजे. तपासात त्याचा उपयोग होऊ शकतो. केवळ प्रसिद्धीसाठी किंवा राजकारणासाठी याचा उपयोग करू नये. न्याय न मिळाल्यास इतर माध्यमांचा वापर त्यांनी जरूर करावा,' असं संजय राऊत म्हणाले. वाचा: 'महाराष्ट्रातील विरोधी पक्षानं पूजा चव्हाण प्रकरणात अधिवेशनात नक्की बोलावं, पण अधिवेशन होऊ देणार नाही, अशी धमकी देणं म्हणजे त्यांचा अजेंडा ठरलेला आहे. अनेक प्रश्न आहेत. विरोधी पक्षानं ते मांडायला हवेत. पेट्रोल, डिझेलच्या महागाईचा प्रश्नही त्यांनी मांडायला हवा. पेट्रोल, डिझेलविरोधात विरोधकांनी आंदोलन केलं तर आम्ही स्वत: त्यात सहभागी होऊ,' असंही राऊत म्हणाले.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

पवारसाहेब, आज मला तुमची खूप आठवण येते सकाळपासून: चित्रा वाघ

नाशिक: 'पवार साहेब मला आज सकाळपासून तुमची खूप आठवण येते', असे म्हणत आपले पती किशोर वाघ हे निर्दोष असल्याचे भाजप नेत्या यांनी म्हटले आहे. ५ जुलै २०१७ ला माझ्या पतीवर गुन्हा दाखल झाला आणि ईदीच्या दिवशी ७ जुलैला यांनी बोलावलं. माझ्याकडे पंचनाम्याची, एफआयआरची कॉपी मागितली. ती पाहिली आणि त्यांनी सांगितले की, चित्रा, तुझा नवरा यात कुठेच नाही, असे सांगत खुद्द शरद पवार यांनी माझा पती निर्दोष असल्याचे सांगितल्याचे अप्रत्यक्षपणे नमूद केले. चित्रा वाघ नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. या वेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे प्रहार केले. 'ते प्रकरण अजूनही कोर्टात सुरू आहे. मला महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगायचे आहे की, माझ्या नवऱ्याने एक रुपयाही घेतलेला नाही. तो त्या ठिकाणी नव्हताच. कृपया माझ्या नवऱ्याला कळू द्या की माझ्या नवऱ्याने पैसे घेतले की नाहीत', असे चित्रा वाघ पुढे म्हणाल्या. आता हे सरकार आले. २०११ पासूनच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कितीतरी प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत हे मी जबाबदारीने सांगते, अजूनही कोणावर केस दाखल झालेली नाही असे चित्रा वाघ म्हणाल्या. या प्रकरणात असलेला मुख्य आरोपी गांधी हॉस्पिटलचा सुपरिटेंडेंट डॉ. गजानन भगत याची अजून चौकशीच सुरू आहे आणि माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल करत आहेत, वा रे वा... वा गृहमंत्री, तुम्हाला तर तिनदा सॅल्युट... असे म्हणत त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही टोला हाणला. क्लिक करा आणि वाचा- महाविकास आघाडी सरकारवर प्रहार भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचे पती यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदवला आहे. किशोर वाघ यांनी बेहिशेबी संपत्ती जमवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यानंतर नाशिकमध्ये पत्रकार परिषद आयोजित करत चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. लाचलुचपच प्रतिबंधक विभाग माझ्या नवऱ्याचा छळ करत असल्याचा आरोप करतानाच मीच तुम्हाला पुरून उरेन असे आव्हानही चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला केले आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

कोबीचे भाव पडल्याने शेतकऱ्याची सटकली; रागाच्या भरात त्यानं...

अहमदनगर: कोबीचे भाव पडल्याने तालुक्यातील कोपर्डी येथील शेतकरी नाना रामचंद्र सुद्रिक यांनी कोबीच्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला. सध्या कोबीचे उत्पादन वाढले असून त्याचे भाव मात्र पडले आहेत. आठवडे बाजारात कोबी मोफत वाटण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. नफा आणि उत्पादन खर्च मिळणे दूरच कोबी काढून बाजारात नेण्यासाठी खर्च होत असल्याने पीक मोडून काढण्याचा निर्णय घेतल्याचे सुद्रिक यांनी सांगितले. तरीही शहरांत मात्र ग्राहकांना कोबी एवढा स्वस्त मिळत नाही. वाचा: सध्या कोबीचे उत्पादन वाढले आहे. करोनाच्या काळात भाजीपाल्याचे मागणी वाढल्याचे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. मात्र, प्रत्यक्षात उत्पादनात वाढ होऊन तुलनेत मागणी कमी झाल्याने भाव पडले आहेत. बाहेरच्या शहरांत कोबी पाठविणे परवडत नाही. त्यामुळे स्थानिक बाजारात विक्रीसाठी घेऊन आले तर त्याला भाव मिळत नाही. आठवडी बाजारात एक ते दोन रुपयाला कोणी कोबीची गड्डा घेत नाही. त्यामुळे बाजारा आणण्याच खर्चही निघत नाही. अशा परिस्थिती पीकच मोडून काढण्याचा निर्णय शेतकरी घेत आहेत. सुद्रिक यांनी अशाच पद्धतीने आपला दोन एक क्षेत्रात ट्रॅक्टर फिरविला. यापूर्वी टोमॅटोचे भाव पडल्याने शेतकऱ्यांवर अशी वेळ आल्याची उदाहरणे आहेत, अर्थात सध्याही टोमॅटोला समाधानकारक भाव नाहीत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरीही अडचणी आहेत. कर्जत तालुक्यात भाजीपाला मोठ्या प्रमाणात पुण्यात जातो. सध्या पुण्यात पुन्हा निर्बंध कडक करण्यात येत आहेत. त्यामुळे वाहतूकदारांसह शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. सध्या जो माल जात आहे, त्यालाही समाधानकारक भाव मिळत नसल्याचे शेतकरी सांगतात. शेती मालाच्या हमी भावासाठी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ट्रॅक्टर मोर्चे काढले जात आहेत. इकडे मात्र भाव मिळत नसल्याने पिकात ट्रॅक्टर चालविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे सर्वच पक्षांनी राजकारण केले असून प्रत्यक्षा प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे भावातील अनिशिततेमुळे शेतकऱ्यांवर अशी वेळ नेहमीच येते. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मास्क न घालताच राज ठाकरे सार्वजनिक कार्यक्रमात, म्हणाले...

मुंबई: राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. गर्दी टाळणं आणि मास्कचा वापर करणं हाच करोनापासून दूर राहण्याचा उत्तम उपाय असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, मनसे अध्यक्ष मास्क न घालताच आज मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याबद्दल विचारलं असता त्यांनी अजब उत्तर दिलं. त्यांच्या या वक्तव्यामुळं उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे. महापालिका प्रशासन राज ठाकरे यांच्यावर काय कारवाई करणार, असा प्रश्न विचारला जात आहे. ( Said, I Don't Use FaceMask) मराठी भाषा दिनानिमित्त मनसेनं शाखा-शाखांवर 'मराठीतून स्वाक्षरी' कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. यापैकी एका कार्यक्रमात राज ठाकरे स्वत: सहभागी झाले होते. मात्र, त्यांनी लावले नव्हते. याबद्दल पत्रकारांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावर, मी मास्क घालतच नाही. तुम्हालाही सांगतो,' असं ते म्हणाले. राज यांच्या या वक्तव्यामुळं चर्चा रंगली आहे. वाचा: 'मनसेच्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. 'बाकीच्या सगळ्या कार्यक्रमांना गर्दी होते. सरकारमधले मंत्री गर्दी करून धुडगूस घालतात, ते चालते. पण, शिवजयंती आणि मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमांना नकार दिला जातो. एवढी काळजी वाटत असेल तर सर्व निवडणुका एक वर्ष पुढं ढकला. एका वर्षाने घ्या. काही फरक पडत नाही,' असं त्यांनी सुनावलं. 'अभिजात भाषेचं संभाजीनगरसारखं व्हायला नको' मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबद्दल सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याबद्दल विचारलं असता ते म्हणाले, 'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं सरकारच्या मनात आहे की नाही? हेच कळत नाही. की यांना फक्त संभाजीनगरसारखं करायचं आहे. हा दिवस आल्यानंतरच सरकारला जाग का येते? त्यांना असं का बोलावसं वाटतं? सरकारला तुम्ही या गोष्टी विचारायला हव्यात,' असं राज ठाकरे म्हणाले. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

 मोदी के गढ़ में प्रियंका गांधी, काशी पहुंची, पैदल चलकर रविदास मंदिर में मत्था टेका 

डिजिटल डेस्क (वाराणसी)।  कांग्रेस महासचिव प्रियंका गांधी संत शिरोमणि श्री गुरु रविदास महाराज की 644 वीं जयंती समारोह के दिन आशीर्वाद लेने सीरगोवर्धन पहुंचीं। यहां उन्होंने संत रविदास के दर पर मत्था टेका। इसके बाद संत निरंजन दास का आशीर्वाद लिया। साथ ही उनका हालचाल जाना। प्रियंका गांधी पिछले साल भी यहां आई थीं। संत रविदास जयंती समारोह में शामिल होने के लिए शनिवार को प्रियंका गांधी लाल बहादुर शास्त्री अंतर्राष्ट्रीय एयरपोर्ट वाराणसी पहुंचीं। जहां मंदिर के कुछ देर पहले उन्होंने गाड़ी छोड़कर पैदल ही रास्ता तय किया। इस दौरान सैकड़ों गाड़ियों का काफिला भी उनके पीछे जुटा तो नारेबाजी से शहर भी गूंज उठा। शहर में जगह जगह उनका भारी भरकम काफिला गुजरा तो लोगों की भीड़ भी उनकी एक झलक देखने के लिए उमड़ पड़ी।

इसके बाद संत रविदास जयंती के मौके पर जन्मस्थान मंदिर पहुंची कांग्रेस महासचिव प्रियंका वाड्रा का स्वागत मुख्य द्वार पर ट्रस्ट की तरफ से किया गया। प्रियंका ने संत रविदास की प्रतिमा के सामने मत्था टेकते हुए आशीर्वाद मांगा। इसके बाद मंदिर में संत निरंजन दास से आशीर्वाद लिया। संत निरंजन दास ने कुशल क्षेम पूछते हुए प्रियंका से लंगर छकने के लिए पूछा तो प्रियंका ने कहा कि अभी पानी पी लूंगी।

प्रियंका ने संत निरंजन दास से पूछा आपने प्रसाद ले लिया है तो उन्होंने कहा कि अभी सत्संग पंडाल जाना है। साथ में आये नेताओं से भी प्रियंका ने संत निरंजन दास से परिचय कराया। इसके बाद आयोजन के दौरान वह मंच पर भी पहुंचीं और संत निरंजन दास के बगल बैठकर रैदासियों का अभिवादन भी किया। प्रियंका के साथ प्रदेश अध्यक्ष अजय सिंह लल्लू पूर्व विधायक अजय राय महानगर अध्यक्ष राघवेंद्र चौबे मणिंद्र मिश्रा, गौरव कपूर सहित, नवीन मिश्रा और अन्य कांग्रेस नेता भी साथ रहे।

.Download Dainik Bhaskar Hindi App for Latest Hindi News.
.
...
priyanka gandhi visit pm modi constituency varanasi
.
.
.

from दैनिक भास्कर हिंदी

Covid-19: दुनियाभर में कोरोना फिर दिखा रहा है खौफ, अब तक 25.1 लाख से अधिक की मौत

डिजिटल डेस्क, नई दिल्ली। कोरोना वायरस से इस वक्त पूरी दुनिया लड़ रही है। हालांकि, दुनिया में टीकाकरण अभियान भी चल रहा है। लेकिन हालिया आंकड़ों के मुताबिक कोरोना ने एक बार फिर से अपना खौफ दिखाना शुरू कर दिया है। कई देशों में इससे महामारी से संक्रमित मरीजों की दैनिक संख्या में इजाफा हो रहा है। वहीं इससे होने वाली मृत्युदर में भी प्रतिदिन का ग्राफ बढ़ा है।

लगातार बढ़ रही संक्रमितों की संख्या के चलते यह आंकड़ा 11.3 करोड़ के पार पहुंच गया है। वहीं दुनिया में अब तक 25.1 लाख से अधिक लोग अपनी जान इस वायरस के चलते गंवा चुके हैं। 

देश में फिर बढ़ने लगे कोविड- 19 के मरीज, 24 घंटे में सामने आए 16 हजार 488 मामले

जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी के सेंटर फॉर सिस्टम्स साइंस एंड इंजीनियरिंग (सीएसएसई) द्वारा शनिवार सुबह जारी किए गए आंकड़ों के मुताबिक वर्तमान दुनियाभर में अब तक 11 करोड़ 33 लाख 89 हजार 166 लोग कोविड 19 से ग्रसित हैं। वहीं 25 लाख 17 हजार 062 लोगों की मौत इस वायरस से हो चुकी है।

बात करें सर्वाधिक प्रभावित देश की तो कोरोनावायरस से संयुक्त राष्ट्र अमेरिका में सबसे ज्यादा संक्रमित सामने आए हैं। सीएसएसई के अनुसार, यहां कुल 2 करोड़ 84 लाख 86 हजार 118 मामले सामने आ चुके हैं। वहीं मौतों की संख्या 5 लाख 10 हजार 458 
के आंकड़े को पार कर गई है। 

वहीं, दूसरे नंबर पर अभी भी भारत देश का नाम है। यहां कुल संक्रमितों की संख्या 1 करोड़ 10 लाख 63 हजार 491 के पार जा पहुंची है। वहीं 1 लाख 56 हजार 938 लोगों की मौत हो चुकी है।

एसएसई के आंकड़ों के अनुसार, दस लाख से अधिक मामलों वाले अन्य देश:

देश का नाम  

कुल संक्रमितों का आंकड़ा

ब्राजील

10,455,630

रूस

4,175,757

ब्रिटेन

4,175,315

फ्रांस

3,746,707

स्पेन

3,188,553

इटली

2,888,923

तुर्की

2,683,971

जर्मनी

2,436,506

कोलंबिया

2,244,792

अर्जेटीना

2,098,728

मेक्सिको

2,076,882

पोलैंड

1,684,788

ईरान

1,615,184

दक्षिण अफ्रीका

1,510,778

यूक्रेन

1,381,273

इंडोनेशिया

1,322,866

पेरू

1,308,722

चेक रिपब्लिक

1,212,780

नीदरलैंड्स

1,093,899

कोविड मौतों के मामले में वर्तमान में 20,000 से अधिक मृत्यु वाले देश:

देश का नाम

कुल मौतों का आंकड़ा

ब्राजील

252,835 

मेक्सिको

184,474

भारत

156,825

ब्रिटेन

122,648

इटली

97,227

फ्रांस

85,738

रूस

83,481

जर्मनी

69,939

स्पेन

69,142

ईरान

59,899

कोलंबिया

59,518

अर्जेंटीना

51,887

दक्षिण अफ्रीका

49,784

पेरू

45,903

पोलैंड

43,353

इंडोनेशिया

35,786

तुर्की

28,432

यूक्रेन

27,146

बेल्जियम

22,034

कनाडा

21,915

.Download Dainik Bhaskar Hindi App for Latest Hindi News.
.
...
Covid-19 World: Over 25.1 lakh deaths so far, more than 11.3 crore infected
.
.
.

from दैनिक भास्कर हिंदी

Chitra Wagh: चित्रा वाघ सरकारवर भडकल्या; म्हणाल्या, 'मी तुम्हाला पुरून उरेन'

नाशिक: पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणी () राज्य सरकारला लक्ष्य करणाऱ्या भाजप नेत्या यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदवल्यानंतर चित्रा वाघ या अधिक आक्रमक झाल्या आहेत. माझ्या नवऱ्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छळ करत असून, मीच तुम्हाला पुरून उरेन असे आव्हान चित्रा वाघ यांनी दिले आहे. (bjp leader slams maha vikas aghadi govt) चित्रा वाघ या नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या. राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग माझ्या नवऱ्याचा छळ करत आहे. मी मुंबई बँकेतून कधीही कर्ज घेतलेले नाही आणि असे असतानाही की बँकेला ३० लाख रुपयांच्या कर्जाची माहिती द्या, असे सांगत मी या विरुद्ध न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. देशातील न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास असून ती सरकारसारखी मुर्दाड नाही असा टोलाही चित्रा वाघ यांनी लगावला आहे. किशोर वाघ हे केवळ चित्रा वाघ हिचे पती असल्यामुळेच सरकार हे करत आहे. सरकार त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करतेय. आमच्यावर हल्ले करतेय. मात्र मी गप्प बसणार नाही. पूजा चव्हाण सारख्या पीडितांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मी आवाज उठवतच राहणार, असे चित्रा वाघ म्हणाल्या. 9146870100 हा नंबर कोणाचा ? 9146870100 हा नंबर कोणाचा आहे, हे सांगणार की नाही?, असा सवालही त्यांनी विचारला. या मोबाइल नंबरचा CDR काढा, असे आव्हानही त्यांनी दिले. आपल्याला पोलिसांचा अभिमान असून मूठभर पोलीस बदनाम करत आहेत. राज्यातील प्रत्येक पीडितेचे प्रश्न गंभीर आहेत आणि राजकारण करण्यासाठी याचं गांभीर्य नाही. धनंजय मुंडे प्रकरणात तक्रारदार महिला मागे फिरली. या प्रकरणी दोषींवर कारवाई करा ही आमची मागणी कायम आहे, असे चित्रा वाघ पुढे म्हणाल्या. क्लिक करा आणि वाचा- केवळ इतर पक्षांचाच नाही तर, भाजपचा देखील कोणी चुकला तर त्यालाही सोडणार नाही. महिला हा विषय भाजपसाठी राजकारणाचा विषय नाही, असेही त्या म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांवर दबाव? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव असल्याच्या बातम्या मी वाचल्या. हे जर खरे असेल तर ते क्लेषदायक असल्याचे वाघ म्हणाल्या. पूजा चव्हाणला न्याय मिळावा हेच आम्हाला वाटतं, असे सांगत संजय राठोड यांच्या मुसक्या बांधाव्या असं पूजा चव्हाणच्या आईवडींलांना वाटत नाही का?, असा सवालही त्यांनी केला. पूजा चव्हाण यांच्या आईवडिलांनी पोलिसांना याचा जाब विचारला. पूजा ही महाराष्ट्राची लेक आहे. तिची बदनामी करण्याचा प्रश्नच येत नाही, असेही त्या म्हणाल्या. 100 या पोलीस नंबरवर अरुण राठोडने जबाब दिला त्याचं काय झालं ? हे तुम्ही का विचारत का नाही ? हा प्रश्न तिच्या वडिलांना मला विचारायचाय, असे ही त्या म्हणाल्या.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

कोबीचे भाव पडल्याने शेतकऱ्याची सटकली; उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

अहमदनगर: कोबीचे भाव पडल्याने तालुक्यातील कोपर्डी येथील शेतकरी नाना रामचंद्र सुद्रिक यांनी कोबीच्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला. सध्या कोबीचे उत्पादन वाढले असून त्याचे भाव मात्र पडले आहेत. आठवडे बाजारात कोबी मोफत वाटण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. नफा आणि उत्पादन खर्च मिळणे दूरच कोबी काढून बाजारात नेण्यासाठी खर्च होत असल्याने पीक मोडून काढण्याचा निर्णय घेतल्याचे सुद्रिक यांनी सांगितले. तरीही शहरांत मात्र ग्राहकांना कोबी एवढा स्वस्त मिळत नाही. वाचा: सध्या कोबीचे उत्पादन वाढले आहे. करोनाच्या काळात भाजीपाल्याचे मागणी वाढल्याचे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. मात्र, प्रत्यक्षात उत्पादनात वाढ होऊन तुलनेत मागणी कमी झाल्याने भाव पडले आहेत. बाहेरच्या शहरांत कोबी पाठविणे परवडत नाही. त्यामुळे स्थानिक बाजारात विक्रीसाठी घेऊन आले तर त्याला भाव मिळत नाही. आठवडी बाजारात एक ते दोन रुपयाला कोणी कोबीची गड्डा घेत नाही. त्यामुळे बाजारा आणण्याच खर्चही निघत नाही. अशा परिस्थिती पीकच मोडून काढण्याचा निर्णय शेतकरी घेत आहेत. सुद्रिक यांनी अशाच पद्धतीने आपला दोन एक क्षेत्रात ट्रॅक्टर फिरविला. यापूर्वी टोमॅटोचे भाव पडल्याने शेतकऱ्यांवर अशी वेळ आल्याची उदाहरणे आहेत, अर्थात सध्याही टोमॅटोला समाधानकारक भाव नाहीत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरीही अडचणी आहेत. कर्जत तालुक्यात भाजीपाला मोठ्या प्रमाणात पुण्यात जातो. सध्या पुण्यात पुन्हा निर्बंध कडक करण्यात येत आहेत. त्यामुळे वाहतूकदारांसह शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. सध्या जो माल जात आहे, त्यालाही समाधानकारक भाव मिळत नसल्याचे शेतकरी सांगतात. शेती मालाच्या हमी भावासाठी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ट्रॅक्टर मोर्चे काढले जात आहेत. इकडे मात्र भाव मिळत नसल्याने पिकात ट्रॅक्टर चालविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे सर्वच पक्षांनी राजकारण केले असून प्रत्यक्षा प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे भावातील अनिशिततेमुळे शेतकऱ्यांवर अशी वेळ नेहमीच येते. वाचा:

from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

शिवरायांच्या भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणारच: उद्धव ठाकरे

मुंबई: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुख्यमंत्री यांनी तमाम मराठी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. 'मी मराठी, माझी मराठी' हा बाणा जपू या!, असं आवाहन त्यांनी केलं. 'एका ध्येयाने एक होऊन पुढं जाऊ या, मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळत नाही ते पाहूच! पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणारच,' असा जबरदस्त विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. (Uddhav Thackeray Wishesh On ) वाचा: कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करत मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा दिनाचा शुभेच्छा संदेश दिला आहे. 'अमृतातेही पैजा जिंकणारी मराठी भाषा हा अभिमान मिरविण्यासाठी 'मी मराठी, माझी मराठी!' असा बाणा जपायला हवा. त्यासाठी मराठीत विचार करण्याची, मराठीत बोलण्याची आणि व्यक्त होण्याची गरज आहे. दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढवायला हवा. मराठीतील लेखन-वाचनाच्या नवनव्या प्रयोगांचा स्वीकार करायला हवा. मुलांमध्ये, तरुणांमध्ये मराठीची ओढ वाढावी, तिची गोडी लागावी यासाठी कलाविष्कार, मनोरंजन क्षेत्राच्या माध्यमातून होणाऱ्या प्रयत्नांचे स्वागत करायला हवे. नव तंत्रज्ञान, नव माध्यमात, समाज माध्यमातही मराठीचा आवर्जून वापर व्हायला हवा,' अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. 'मराठी ही आपल्या रोमारोमात भिनलेलली भाषा आहे. माझी माती, माझी माता, माझी मातृभूमी, माझी मातृभाषा हा आपल्यासाठी अभिमानाचा गौरवाचा विषय असून हा गौरव जपणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या एका ध्येयाने एक होऊन पुढे जाऊ या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला, महाराष्ट्राच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळत नाही हे पाहूच,' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Coronavirus: देश में फिर बढ़ने लगे कोविड- 19 के मरीज, 24 घंटे में सामने आए 16 हजार 488 मामले

डिजिटल डेस्क, नई दिल्ली। कोरोनावायरस (Coronavirus) दुनियाभर में अपना कहर बरपा रहा है। कई देशों में एक बार फिर से लॉकडाउन जैसी स्थिति बन रही है। भारत में भी कोरोना वायरस संक्रमण का ग्राफ चढ़ने लगा है। बीते दो दिन से 16 हजार से ज्यादा नए मामले दर्ज हो रहे हैं और रोजाना होने वाली मौतों की संख्या भी सौ के पार है। यहां कई राज्यों के दैनिक मामलों में निरंतर वृद्धि दर्ज की जा रही है। 

केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालय के अनुसार, पिछले 24 घंटों में भारत में 16,488 नए COVID19 मामले सामने आए हैं। वहीं 113 लोगों की मौत कोरोनावायरस से हुई है। 

5 राज्यों का चुनावी कैलेंडर: 27 मई से वोटिंग की शुरुआत

बीते दिनों कोविड 19 मरीजों की संख्या में निरंतर बढ़ोतरी होने के बाद देश में कुल संक्रमितों का आंकड़ा बढ़कर 1.10 करोड़ के भी पार चला गया है। जानकारी के अनुसार भारत में कुल मामलों की संख्या 1 करोड़ 10 लाख 79 हजार 979 हो गई है। जबकि अब तक कुल 1 लाख 56 हजार 938 लोगों की जान इस वायरस ने ले ली है। 

नए स्ट्रेन के मामलों में भी वृद्धि
रिपोर्ट के अनुसार भारत में कोरोना वायरस के नए स्ट्रेन के मामलों में तेजी से इजाफा हो रहा है। महाराष्ट्र, केरल और तेलंगाना सहित 18 राज्यों में कोरोना वायरस के नए स्ट्रेन के मामलों को लेकर निगरानी की जा रही है। केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालय द्वारा जारी नए आंकड़े के मुताबिक, फिलहाल देश में कोरोना वायरस के नए स्ट्रेन से 194 लोग संक्रमित हैं।

.Download Dainik Bhaskar Hindi App for Latest Hindi News.
.
...
Coronavirus: 16,488 newly infected patients in India, 113 died
.
.
.

from दैनिक भास्कर हिंदी

करोनाच्या पार्श्वभूमीवर 'दगडूशेठ' गपणती ट्रस्टचा मोठा निर्णय

पुणे: करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून अंगारकी चतुर्थीला (मंगळवार, २ मार्च) मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने घेतला आहे. केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी होतील, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली. अंगारकी चतुर्थीला शहर व उपनगरांतून दरवर्षी येणाऱ्या सुमारे ३ ते ४ लाख भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. त्यामुळे गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून मंगळवारी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. चतुर्थीच्या दिवशी भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. वाचा: अंगारकीच्या दिवसासह इतरही दिवशी भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था व इतर पूजा आॅनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे. भक्तांनी आॅनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने गुरुजींद्वारे धार्मिक विधी होऊ शकतील. त्याकरीता https://seva.dagdushethganpati.com/fasttrack यावर नोंदणी करावी. वाचा: घरबसल्या दर्शनाची सोय देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. हार, नारळ स्वीकारले जाणार नाहीत! पुण्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये भाविकांकडून प्रसाद, फुले, हार स्विकारणे बंद केले आहे. तसेच येणा-या भाविकांची तापमान तपासणी, सॅनिटाझेशन, मास्क ही नियमावली पाळून मंदिरात प्रवेश दिला जात आहे. मंदिरात कोणालाही बसण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. राज्य सरकारने जी नियमावली आखून दिली आहे. त्याचे काटेकोरपणे पालन मंदिरात केले जात आहे. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times