पूजा चव्हाण मृत्यू ते संजय राठोड यांचा राजीनामा; काय घडलं आतापर्यंत?

February 28, 2021 0 Comments

मुंबई: प्रकरणानं राज्यातील राजकीय वर्तुळ ढवळून निघालं. या प्रकरणात वनमंत्री यांचे नाव आल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर टीका केली. राठोड यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सातत्याने लावून धरली. मात्र, आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण संजय राठोड यांनी दिले होते. अखेर या प्रकरणात राठोड यांनी आज, रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. मात्र, त्याचबरोबर आपण आमदारकीचा राजीनामा दिला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी आपली भूमिका असून, चौकशीनंतर सत्य समोर येईल, असे ते राजीनामा दिल्यानंतर म्हणाले. मृत्यू ते संजय राठोड यांचा राजीनामापर्यंत आतापर्यंत काय-काय घडले, हे जाणून घेऊयात. >> ७ फेब्रुवारी २०२१ रोजी पुण्यातील वानवडी परिसरातील इमारतीच्या बाल्कनीतून उडी घेऊन तरुणीने आत्महत्या केल्याची बातमी >> आत्महत्या करणारी तरुणी टिकटॉक स्टार पूजा चव्हाण असल्याची माहिती आली समोर >> पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक तपासातून संशय >> या प्रकरणाच्या चौकशीची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली मागणी >> पूजा चव्हाणच्या मृत्यूशी संबंधित काही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या >> या प्रकरणाशी राज्यातील एका मंत्र्याचे नाव समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ >> या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर प्रकरणाची चौकशी करण्याची विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली मागणी >> पूजा चव्हाणने आत्महत्या केली की तिची हत्या झाली असा संशय व्यक्त करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी या मागणीने धरला जोर >> पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची महिला आयोगाकडून गंभीर दखल, सरकार आणि पोलिसांना बजावली नोटीस >> नातेवाइक आणि मित्रांचे जबाब नोंदवून घेण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक पूजाच्या मूळ गावी गेले, कुणीही तक्रार न दिल्याने या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद >> पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली प्रतिक्रिया, चौकशीचे आश्वासन दिले. >> पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना घेतले होते ताब्यात >> घटनेनंतर बरेच दिवस 'नॉट रिचेबल' असलेले संजय राठोड २३ फेब्रुवारी रोजी कुटुंबासह पोहरादेवी येथे गेले. >> या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. सत्य समोर येईलच. माझ्याबद्दल आणि समाजाबद्दल घाणेरडे राजकारण केल्याचा आरोप राठोड यांनी केला. >> दुसऱ्या दिवशी संजय राठोड वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला >> राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधीच देणार असल्याची जोरदार चर्चा >> २८ फेब्रुवारी २०२१ रोजी संजय राठोड यांचा अखेर राजीनामा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला >> राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद, पूजा चव्हाण प्रकरणाचा निष्पक्ष तपास, चौकशी व्हावी अशी भूमिका असल्याचे केले स्पष्ट


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: