मुकेश अंबानींना पुन्हा धमकी; कारमधील स्फोटकांबाबत खळबळजनक माहिती उघड

February 28, 2021 0 Comments

मुंबईः रिलायन्स उद्योग समूहाचे मालक यांच्या दक्षिण मुंबईतील अँटेलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याची जबाबदारी जैश उल हिंद या दहशतवादी संघटनेने स्वीकारल्याची माहिती समोर येत आहे. जैश उल हिंद संघटनेनं एक पत्रक जारी केलं आहे. या पत्रकात संघटनेनं एसयूव्ही कारमध्ये स्फोटकं ठेवणारे दहशतवादी सुखरुप घरी पोहोचले आहेत, असा दावा केला आहे. तसंच, हा तर फक्त ट्रेलर आहे अजून पिक्चर बाकी आहे, असं म्हणत मुकेश अंबानी यांच्याकडून पैशांची मागणी केली आहे. जर अंबानींनी मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर पुढच्या वेळी मुलाच्या कारवर हल्ला करु, अशी धमकीही दिली आहे. 'तुम्हाला माहितीये की पुढं काय करायचं आहे. जे पैसे तुम्हाला द्यायला सांगितलेत ते ट्रान्सफर करा आणि तुमच्या 'फॅट किड्स'सोबत आनंदात राहा,' असंही या पत्रकात लिहलं आहे. वाचाः दरम्यान, गुरुवारी अँटेलियापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर विजय स्टोअरच्या समोरच्या पदपथावर एक हिरव्या रंगाची कार बेवारस स्थितीत आढळली. या कारबाबत सर्वप्रथम अँटिलियाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना संशय आला. याबाबतची माहिती मिळताच मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर एटीएस, बॉम्बशोधक नाशक पथक घटनास्थळी पोहोचले. तिथे कारमध्ये जिलेटिनच्या सुमारे २५ ते ३० कांड्या सापडल्या. कारमध्ये एक पत्र सापडले असून यामध्ये 'यह तो खाली ट्रेलर है' अशा शब्दांत धमकी दिली आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: