संजय राऊतांच्या 'त्या' ट्वीटमुळं राठोडांच्या राजीनाम्याची चर्चा; राऊतांनी दिलं स्पष्टीकरण

February 28, 2021 0 Comments

मुंबईः पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वादात सापडलेले शिवसेनेचे नेते यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे केलेल्या शक्तीप्रदर्शनावरुन आघाडीतील मित्रपक्ष असेलल्या काँग्रेस राष्ट्रवादीनं नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर राठोडांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढत असल्याच्या चर्चा असतानाच शिवसेना नेते यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे. या ट्वीटवरुन राठोड आज राजीनामा देणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. काय आहे ते ट्वीट संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा छायाचित्र असलेला फोटो ट्वीट केला आहे. त्यावर सिंहासनाधिष्ठीत छत्रपती शिवरायांच्या हातातील हा राजदंड काय सांगतो?, महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन, असा मजकूर असलेलं ट्वीट केलं आहे. संजय राऊतांच्या या ट्वीटनंतर मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, संजय राऊत यांनी या ट्वीटवर स्पष्टीकरण दिलं आहे. वाचाः संजय राऊत काय म्हणाले? मुख्यमंत्री कोणाच्याही दबावाला बळी पडत नाहीत. माझी आणि मुख्यमंत्र्यांची दररोज चर्चा होते. मला त्यांना कशाचीही आठवण करुन देण्यासाठी ट्वीटची गरज पडत नाही. ते माझे मित्र आहेत, माझे ते मार्गदर्शक आहेत. माझी त्यांची दररोज चर्चा होते. त्यामुळं त्यांना मला काही सांगायचं असल्यास ट्वीटची गरज नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. 'हे ट्वीट आहे ते सर्वव्यापक व सर्वसमावेशक आहे,' असंही त्यांनी म्हटलं आहे. वाचाः वेट अँड वॉच संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर प्रश्न विचारल्यावर संजय राऊत म्हणाले की, त्यांच्यावर निर्णय घ्यायला मुख्यमंत्री आहेत, तपास यंत्रणा आहे, पोलिस आहे, न्यायालय आहे. तुम्ही कशाला न्यायालयाच्या भूमिकेत शिरताय. तसंच, आत्ताही महाराष्ट्रात शिवधर्माचंच राजकारण सुरु आहे. मी फक्त इतकेच म्हणेन वेट अँड वॉच, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: