पूजा चव्हाण: भाजपचे राज्यात ठिकठिकाणी आंदोलन, जळगावात मात्र 'हे' घडले

February 27, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, मुंबई भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीकडून राज्यात ठिकठिकाणी पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणी पूजाच्या कुटुबीयांना न्याय मिळाला या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. बीड येथिल पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी राज्यभरात भाजपाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आज शनिवारी (दि.२७) जळगाव शहरात आकाशवाणी चौकात भाजपा महिला आघाडीकडून होणारे हे आंदोलन पोलिसांनी बळाचा वापर करीत उधळून लावले. आंदोलनासाठी महामार्गावर येण्यापूर्वीच भाजप महिला आघाडीच्या पदाधकिऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. (bjp agitation in various parts of the state demanding justice for pooja chavan family) गेल्या काही दिवसांपासून राज्यात बीडच्या पूचा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येचे प्रकरण गाजत आहे. या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली आहे. या कथित प्रकरणात शिवसेनेचे वनमंत्री यांचे नाव विरोधकांकडून घेतले जात आहे. राज्य शासनाने या प्रकरणाच्या चौकशीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचे पावले उचलली नाही, मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतलेला नाही. त्यामुळे विरोधीपक्ष असलेल्या भाजपाने आक्रमक पावित्रा घेतला आहे. मंत्री राठोड यांचा राजीनामा घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, पूजाला व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, या मागण्यांसाठी जळगावात देखील भाजपच्या वतीने आज चक्काजाम आंदोलन केले जाणार होते. महिला पोलिस व आंदोलकांमध्ये झटापट जळगाव जिल्हा व महानगर भाजपकडून सकाळी ११ वाजता चक्काजाम आंदोलन शहरातील आकाशवाणी चौकात महामार्गावर होणार होते. आंदोलनासाठी भाजपच्या महिला पदाधिकारी या ठीकाणी पोहचल्या होतात. त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात करताच पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलन दडपून टाकले. सर्व महिला आंदोलकांना ताब्यात घेऊन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी भाजपच्या महिला पदाधिकारी व महिला पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. पोलीस आंदोलक महिलांना ताब्यात घेत असताना राज्य शासन तसेच मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजप महिला आघाडीकडून राज्या शासनाचा निषेध देखील करण्यात आला. क्लिक करा आणि वाचा- कोल्हापुरातही दोरदार निदर्शने पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांना तात्काळ अटक करावी, त्याचबरोबर मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महिला मोर्चातर्फे बिनखांबी गणेश मंदिर येथे रास्ता रोको आंदोलन झाले. भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा गायत्री राऊत यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. मंत्री राठोड यांच्यावरील कारवाईप्रश्नी सरकार किंवा पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिला आघाडीने दिला. क्लिक करा आणि वाचा- औरंगाबादमध्ये आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात पुजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव येत असून याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दुध डेअरी सिग्नल चौकात केले आंदोलन, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात. अहमदनगरमध्ये राठोड्यांच्या प्रतिमेला मारले जोडे वन मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात भाजपा महिला आघाडी नगरमध्ये आंदोलन, राठोड यांच्या प्रतिमेला मारले जोडे क्लिक करा आणि वाचा- मुंबईतही झाले आंदोलन


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: