कर्जत/जामखेड(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कर्जत-जामखेड मतदारसंघातील 11 रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 मधून 19.13 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. या निधीतून 20.400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. याबाबत आमदार प्रा.राम शिंदे व खासदार सुजय विखे या दोघांनीही प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधत या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. यावर, श्रेय कोणीही घ्या, पण विकास कामे करा, अशी प्रतिक्रिया मतदारसंघातील जनतेतून व्यक्त होत आहे.
शिंदे-फडणवीस-पवार सरकारने कर्जत-जामखेड मतदारसंघातील जनतेला पुन्हा मोठे गिफ्ट दिले. मतदारसंघात दळणवळणाच्या सुविधा अधिक गतिमान व्हाव्यात, यासाठी खासदार सुजय विखे व आमदार प्रा. शिंदे यांनी नेहमी प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे. आ. राम शिंदे यांनी फडणवीस सरकारमध्ये मंत्री असताना मतदारसंघात गाव तिथे रस्ता, वाडी तिथे रस्ता ही मोहीम राबविली. यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मतदारसंघात खेचून आणल्याचे म्हटले आहे. तर, खा. विखे यांनी नगर-दक्षिण लोकसभा मतदारसंघात येणार्या कर्जत-जामखेडसाठी हा निधी मंजूर करुन आणल्याचे म्हटले आहे.
मंजूर रस्त्यांची कामे अशी ः जातेगाव ते केदारेश्वर मंदिर रस्ता 1 कोटी 44 लाख 84 हजार रुपये. सारोळा ते काटेवाडी रस्ता 1 कोटी 17 लाख 61 हजार, धामणगाव ते जिल्हा हद्द 2 कोटी 7 लाख 52 हजार, पिंपळगाव उंडा ते जगताप वस्ती रस्ता 1 कोटी 38 लाख 39 हजार, आपटी ते गव्हाणवस्ती रस्ता 92 लाख 10 हजार, अरणगाव ते निगुडेवस्ती 1 कोटी 30 लाख 10 हजार रुपये. रावळगाव ते चिंतामणी मंदिर 1.200 किलोमीटर रस्ता 1 कोटी 16 लाख 63 हजार. खांडवी ते माळवाडी रस्ता 1 कोटी 62 हजार, राशीन ते जिराफवस्ती रस्ता 2 कोटी 40 लाख 18 हजार , निंबे ते डोमाळवाडी रस्ता 4 कोटी 12 लाख 91 हजार, सिद्धेश्वर मंदिर बोरमळा ते जुना वाळूंज रस्ता 2 कोटी 12 लाख 69 हजार रुपये.
निधीबद्दल दोघांकडून सरकारचे आभार
कर्जत-जामखेड मतदारसंघात रस्त्यांसाठी भरघोस निधी दिल्याबद्दल खासदार सुजय विखे व आमदार राम शिंदे या दोघांनीही राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे आभार मानले आहेत.
हेही वाचा
जागतिक स्पर्धेत नंदुरबारचे नाव झळकवणाऱ्या नारायणीची पालकमंत्र्यांकडून दखल
चंद्रपूर : ओबीसी आंदोलनाची २२ दिवसांनतर आज सांगता
पिंपरी : विसर्जनासाठी गेलेला तरुण बुडाला
The post खा. सुजय विखे-आ. राम शिंदे यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Swp9qL
जामखेड; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत जामखेड तालुक्यातील जवळा येथील कन्या डाॅ. दिपाली सुरेश पठाडे यांची पशुधन विकास अधिकारी (वर्ग-१) पदी निवड झाली आहे. पठाडे या ओबीसी प्रवर्गातून मुलींमध्ये राज्यात नवव्या आल्या आहेत. डाॅ.दिपाली सुरेश पठाडे यांचे प्राथमिक शिक्षण इंदौर येथील शारदा रामकृष्ण विद्यामंदिर येथे झाले.माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या जवळा येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात,उच्च माध्यमिक शिक्षण कर्जत येथील दादा पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात झाले.
नागपुर येथील पशुवैद्यकिय महाविद्यालयात पदवी मिळवल्यानंतर,परभणीच्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयात पॅथालाजी डिपार्टमेंट या याविषयात पदवीत्तर शिक्षण पुर्ण केले. यादरम्यान डाॅ.दिपाली पठाडे यांनी स्पर्धा परिक्षेचाही अभ्यास सूरू केला होता.डाॅ.दिपाली पठाडे या जवळा सेवा संस्थेचे माजी चेअरमन सुरेश पठाडे यांच्या जेष्ठ कन्या आहेत.
या यशाबद्दल डाॅ.दिपाली पठाडे यांचे आमदार प्रा राम शिंदे, आमदार रोहित पवार , चेअरमन आजीनाथ हजारे, माजी उपसभापती दिपक पाटील, सरपंच प्रशांत शिंदे ,जवळा सेवा संस्थेचे चेअरमन शहाजी पाटील, माजी सभापती सुभाष आव्हाड, माजी सरपंच प्रदिप दळवी, डाॅ.महादेव पवार , संतराम सूळ , डाॅ.दिपक वाळुंजकर, प्रशांत पाटील, राजेंद्र महाजण, विक्रांत मंडलेचा , कल्याण रोडे, रफीक शेख, अरूण लेकुरवाळे,भास्कर रोडे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
लॅबोरटरी ॲनिमल्स मध्ये संशोधन
डाॅ.दिपाली पठाडे यांनी परभणी येथे पदवीत्तर शिक्षण घेताना पॅथालाजी डिपार्टमेंटमध्ये ‘ लॅबोरटरी ॲनिमल्स ‘ मध्ये संधोशन केले आहे.त्यांचा संशोधन पेपर प्रकाशित झाला आहे.
हेही वाचा
खलिस्तानी, गँगस्टरविरोधात एनआयएची सहा राज्यांत छापेमारी
गृहिणी कुटुंबाची काळजी घेते; तिचे उत्पन्न मासिक वेतनात मोजता येत नाही : कोलकाता उच्च न्यायालय
The post जामखेड तालुक्यातील दिपाली पठाडे यांची पशुधन विकास अधिकारी पदी निवड appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SwlmHJ
गोरक्ष शेजूळ
नगर : राज्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा व गुणवत्तेच्या नावाखाली 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून ‘समूह शाळा’ उभारण्याच्या शासनाच्या हालचाली सुरू आहेत. मात्र या धोरणामुळे नगर जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील एकूण 747 शाळांना टाळे लागणार असून, तेथील 1318 शिक्षक अतिरिक्त ठरतील तर, 10 हजारापेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील अनेक मुले-मुली शाळा दूर असल्याने शिक्षणापासून वंचित होते. याचा अभ्यास करूनच वाड्या-वस्त्यांवरही शाळा सुरू करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे घराजवळच शाळा असल्याने अनेक मुले-मुली शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकली. आजमितीला या शाळांमध्ये 20 पेक्षा कमी पटसंख्या असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
‘त्या’ शाळांचा एकत्रीकरणाचा प्रस्ताव
पानशेत आणि तोरणमाळच्या धर्तीवर राज्यासह नगरमध्येही 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या 747 शाळांचे एकत्रीकरण करण्याचा शासनाचा विचार आहे. त्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांना दिल्या आहेत.
मुलींच्या शिक्षणाला लागणार ब्रेक
जिल्ह्यात 747 शाळांची पटसंख्या ही 20 पेक्षा कमी आहे. या ठिकाणी 1388 शिक्षक 10 हजार 668 विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत आहेत. मात्र, उद्या ह्या शाळा बंद झाल्या, तर संबंधित शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेतच; शिवाय एकत्रीकरणात, दूरवरील शाळेवर जावे लागले, तर या मुलांच्या शिक्षणाचे काय, मुलींना पालक शाळेत पाठवतील का, असे अनेक प्रश्नही उपस्थित होऊ लागले आहेत.
अकोल्यात सर्वाधिक 145 शाळांवर गदा
आदिवासी व दुर्गम भाग असलेल्या अकोले तालुक्यात सर्वाधिक 145 शाळा 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या आहेत. पारनेर 98, पाथर्डीत 94 आणि श्रीगोंद्यात 90 शाळा बंद होणार आहेत.
जिल्ह्यातील 747 शाळा
20 पेक्षा कमी पटसंख्येच्या आहेत. यात काही शाळा दुर्गम व आदिवासी भागातील, तर अनेक शाळा वाड्यावस्त्यांवरील आहेत. शिक्षण आयुक्तांच्या निर्देशानुसार समूह शाळांचा तसा प्रस्ताव तयार केला जात आहे.
-भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी
समाजातील सर्व घटकांमध्ये शैक्षणिक संधीचे
समानीकरण व्हावे, यासाठीच सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत शासनाने ‘वस्ती तेथे शाळा’ निर्माण केली. मात्र या खासगीकरण व समुह शाळा अध्यादेशाने मूळ कायद्याला डावलले जात आहे. यातून गळतीचे प्रमाण वाढण्याची मोठी भिती पुढे उभी राहणार आहे. त्यामुळे शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करणे हितवाह राहील.
– बापूसाहेब तांबे, शिक्षक नेते, नगर
सरकारी शाळा सांभाळणे सरकारच्या
जिवावर आलेले दिसते. समूह शाळेमुळे शिक्षक तर अतिरिक्त होतीलच, त्यापेक्षाही ग्रामीण भागातील मुले-मुली शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर फेकले जातील हे वाईट आहे. व्यवस्थेने निर्णय घेताना शिक्षक हा घटक डोळ्यासमोर न ठेवता विद्यार्थाहित लक्षात ठेवून निर्णय घ्यावेत.
– डॉ. संजय कळमकर, शिक्षक नेते
The post नगर जिल्ह्यातील 10 हजार विद्यार्थ्यांच्या नशिबी पुन्हा पायपीट ! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Swhwls
शिर्डी; पुढारी वृत्तसेवा : शिर्डीच्या साईबाबांचे व्हीआयपी दर्शन आरती घेणाऱ्या साईभक्तांना आता साई संस्थानने मोबाईल क्रमांक व आधार किंवा मतदान कार्ड आयडी क्रमांकांची सक्ती केली आहे. भाविकांच्या मोबाईलवर संस्थानने पाठविलेला संदेशाची खात्री केल्याशिवाय दर्शन आरती मिळणार नसल्याने मोबाईल व आधार किंवा मतदान कार्ड क्रमांकाची सक्ती केली असून ही अंमल बजावणी येत्या शुक्रवारपासून करण्यात येणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, काही एजंट दर्शन आरती पासचा काळा बाजार करीत असल्याच्या तक्रारी साई संस्थानकडे आल्या आहेत. काही प्रकरणाची चौकशी करून त्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहेत. हा प्रकार थांबविण्यासाठी अशा रितीची योजना साई संस्थान राबवित आहे.
साईबाबा संस्थानला जे साईभक्त दान देतात, त्या दानाच्या टप्पे करून त्यांना साई संस्थानच्या वतीने दर्शन आणि आरती देण्यात येत असते. यासाठी संस्थान अशा दानशूर साई भक्तांना एक युनिक आयडी कार्ड देण्याचे प्रस्तावित केले आहे. असे असले तरी दानशूर भक्तांनी ऑनलाईन दर्शन व आरती आरक्षित करणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे समाधी व मूर्तीवर वस्त्र चढविण्यासाठी लकी ड्रॉ पद्धतीने वस्त्र काढली जातात. यामध्ये देणगीदार यांना देखील वस्त्र चढविण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.
साई संस्थानच्या माध्यमातून एक नवीन योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. भारतातील कोणत्याही ठिकाणी एखाद्या भाविकांने साई मंदिरासाठी पाच एकर जागा दानाच्या स्वरूपात दिली. त्या ठिकाणी साई संस्थान स्वखर्चाने शिर्डीच्या धर्तीवर साई मंदिर बनवून शिर्डीत साई भक्तांना देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा दिल्या जातात त्या देण्यासाठी प्रस्तावित आहे. अथवा राज्यातील किंवा राज्याबाहेरील एखादी शासन मान्य सामाजिक किंवा धार्मिक संस्था आहे. अशा संस्थेस साई मंदिर बांधकामासाठी ५० टक्के रक्कम अथवा ५० लाखापेक्षा जी रक्कम कमी आहे. ती संस्थान देईल मात्र त्यावर नियंत्रण हे साई संस्थानचे असेल. असे प्रस्तावित आहे. यावर साईभक्तांनी आपल्या सूचना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जगभरातील साई मंदिरांचे एक असोसिएशन स्थापन करण्यासाठी साई संस्थान विचाराधीन यावरही संस्थानने भाविकाकडून सूचना मागितल्या आहेत. यामाध्यमातून साई बाबांच्या शिकवणुकीचा प्रचार व प्रसार होणार आहे.
साई बाबा संस्थानच्या रक्तदानच्या विभागामार्फत रक्तदान शिबीरे घेतले जातात. त्यामाध्यमातून जे रक्तदान गोळा केले जाते. साईबाबा आणि साईनाथ रुग्णालयात जे रुग्ण असतील आणि त्यांना रक्ताची आवश्यकता असेल त्यांना साईनाथ रक्तपेढीमधून मोफत रक्त देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी रक्तदान करून रक्त मिळणार असे निर्णय घेण्यात आली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी दिली.
साई संस्थानने प्रस्तावित केलेल्या प्रस्तावावर साई भक्तांकडून सूचना मागण्यासाठी मेल आयडी ceo.ssst@sai.org.in या संकेतस्थळावर पाठविण्याचे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
The post शिर्डी : साईबाबांच्या व्हीआयपी दर्शनासाठी नवीन नियम; मोबाईल नंबरसह ओळखपत्राची सक्ती appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SwdYvM
उंबरे : पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध न केल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना राहुरी तालुक्यातील उंबरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने 23 वर्षे तरुणाला जीव गमावला लागल्याची दुर्घटना घडली. कुक्कडवेढे येथून दिलीप हुळूळे हा तरुण कामानिमित्त मोटारसायकलवरून उंबरेकडे येत होते. उंबरेपासून 1 किलो मीटर अंतरावर ढोकणे वस्ती येथे खड्ड्यात साठलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकी स्लीप होऊन तो खाली पडला. त्याच्या डोक्यासह शरिरावर गंभीर जखमा झाल्या.
संबंधित बातम्या :
* Nagar News : जिल्हा बँकेच्या कारभाराची ईडी चौकशी करा : आमदार तनपुरे
* Crime news : संगमनेर हत्याप्रकरणी पत्नीसह तिघे गजाआड
* Nagar News : जोरदार पावसाने दोन तलाव फुटले ; काम निकृष्ट झाल्याचा टाकळी लोणारच्या ग्रामस्थांचा आरोप
गावातील काही तरूण तेथून जात असताना त्यांनी दिलीप याला शरद ढोकणे यांच्या वाहनातून उंबरे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. डॉ. पठाण यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अ.नगरला हलवावे, असे सांगितले; परंतु उंबरे आरोग्य केंद्रामध्ये दोन रुग्णवाहिका असताना चालक उपलब्ध नव्हता. डॉ. पठाण यांनी 108 नंबरला फोन करून अॅम्बुलन्स बोलाविण्याचा प्रयत्न केला; परंतु तिही उपलब्ध न झाल्याने जखमी तरुण कोमात गेला. एक- दोन तासानंतर नातेवाईक आल्यानंतर त्याला अ. नगरला खासगी दवाखान्यात हलविण्यात आले, मात्र तोपर्यंत तरुण पुर्णतः कोमामध्ये गेला. दरम्यान, खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना जखमी दीपकची प्राणज्योत मालवली. रुग्णवाहिका उपलब्ध झाली असती तर त्याचा जीव वाचला असता. याला जबाबदार कोण,असा संताप व्यक्त होत आहे.
डॉक्टरची तत्परता..!
उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्र वादग्रस्त राहिले आहे. डॉ. पठाण काही दिवसांपूर्वीच येथे हजर झाले. जखमी दीपक या तरुणास आरोग्य केंद्रात आणले तेव्हा आरोग्य केंद्रामध्ये ऑक्सिजन शिल्लक नव्हता. अनेकांना फोन केले, परंतु कुठलीच रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. डॉक्टरांच्या तत्पर्यतेमुळे जखमी दीपकवर योग्य उपचार झाले खरे, परंतु सुविधा नसल्याने त्यांनी जखमीस तत्काळ अ.नगरला हलविण्याच्या सूचना करून स्वतःही प्रयत्न केले. त्यांच्या या तत्परतेबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
The post दुर्दैवी ! रुग्णवाहिकेअभावी तरुणाचा गेला जीव appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SwbBPw
जामखेड, पुढारी वृत्तसेवा : धनगर आरक्षणप्रश्री राज्य सरकारने दखल घ्यावी. नाहीतर गाठ धनगराशी आहे. असा इशारा उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांची कन्या प्रतिक्षा बंडगर हिने दिला आहे. धनगर आरक्षणासंदर्भात सरकारने मुंबईत बैठक घेतली, पण ठोस निर्णय घेतला नाही. रविवार उपोषणाचा एकोणीसवा दिवस होता. जर सरकार वेळकाढूपणा करत असेल तर राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेऊ, असे यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपोषणकर्ते बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले. प्रकृती खालावलेल्या उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांची कन्या प्रतिक्षा बंडगर हिने सरकारने धनगर आरक्षणाचे प्रमाणपत्र देऊन लवकरात समाजाचा प्रश्न सोडवावा असे आवाहण केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या किर्ती स्तंभाशेजारी यशवंतसेनेच्या वतीने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी गेल्या १९ दिवसापासून उपोषण सुरू आहे. मुंबई येथे सरकारने आरक्षण संदर्भात बोलविलेल्या बैठकीची चर्चा निष्फळ ठरल्याने राज्यभरातील नेते व समाजबांधव चोंडीमध्ये मोठ्या प्रमाणावर येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा व्यक्त करत तीव्र आंदोलनासाठी तयार असल्याचे सांगत आहेत.
उपोषणस्थळी प्रकृती खालावलेले यशवंतसेनेचे प्रदेशउपाध्यक्ष सुरेश बंडगर यांची कन्या प्रतिक्षा बंडगर हिने आपल्या भावनांचा बांध मोकळा केला ती म्हणाली वडील सुरेश बंडगर व दुसरे उपोषणकर्ते राष्ट्रीय उपाध्यक्ष आण्णासाहेब रूपनवर हे १९ दिवसापासून उपोषण करीत असून आता त्यांनी पाणी वर्ज्य केले आहे व उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सरकारने दखल घ्यावी नाहीतर गाठ धनगराशी अशा इशारा प्रतिक्षा बंडगर हिने दिला.
हेही वाचलंत का?
* Parineeti-Raghav marriage : परिणीती-राघवने बांधली लग्नगाठ; शाही विवाह उदयपूरमध्ये संपन्न
* Weather Forecast: कोकण, घाटमाथ्यावर २८ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता
The post अहमदनगर : धनगर आरक्षणाचा ठोस निर्णय घ्या; अन्यथा राज्यभर चक्काजाम आंदोलन appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SwY22P
नगर : पुढारी वृत्तसेवा : अमरापूर (ता. शेवगाव) येथील रेणुकामाता मंदिराचे कुलूप तोडून देवीच्या मूर्तीवरील दागिने चोरून नेल्याच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने तीन संशयितांच्या मुसक्या आवळल्या. मंदिराच्या कळसासह 7 लाख 19 हजारांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. गणपत कुंडलिक केदार (वय 46, रा. हातराळ, सैदापूर, ता. पाथर्डी), अजय छबू चव्हाण (वय 27), जॅकसन ऊर्फ किशोर पुंजाराम जाधव (वय 34, दोन्ही रा. माळीबाभुळगाव, ता. पाथर्डी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोन अल्पवयीन मुलांचाही या गुन्ह्यात समावेश आहे. या टोळीने जिल्ह्यात तब्बल 22 मंदिरांमध्ये चोर्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.
रेणुकामाता मंदिराचा दरवाजा तोडून चोरांनी देवीच्या मूर्तीवरील सोन्याच्या दागिन्यांसह 16 लाख 76 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. देवस्थानचे पुजारी तुषार विजय वैद्य (वय 36, रा. पाथर्डी) यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याच्या शोधासाठी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी विशेष पथकाची नेमणूक केली होती. गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना केदार व त्याच्या साथीदारांबाबत माहिती मिळाली. पथकाने लागलीच हातराळ सैदापूर (ता. पाथर्डी) येथे जाऊन केदारला ताब्यात घेतले. त्याने चव्हाण, जाधव व दोन मुलांना सोबत घेऊन चोरी केल्याची कबुली दिली. शेतात पुरलेले दागिनेही त्याने काढून दिले. पोलिसांनी त्याच्या अन्य साथीदारांना विविध ठिकाणांहून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आणखी 22 मंदिरांमध्ये दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 5 लाख 44 हजार रुपयांचे सोन्या–चांदीचे दागिने, मंदिराचा कळस, नाग, पत्रा, नथ, एक दुचाकी व सव्वा लाखाची रोकड असा एकूण 7 सात लाख 19 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांना शेवगाव पोलिसांच्या ताब्यात दिले असून, न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलिस कोठडी दिली आहे.
सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात, उपनिरीक्षक तुषार धाकराव, सोपान गोरे, सहायक फौजदार भाऊसाहेब काळे, बाळासाहेब मुळीक, पोलिस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रेय हिंगडे, मनोज गोसावी, दत्तात्रेय गव्हाणे, सुरेश माळी, अतुल लोटके, रवींद्र कर्डिले, संदीप दरंदले, संतोष लोढे, सचिन अडबल, विजय ठोंबरे, रणजित जाधव, भाग्यश्री भिटे, संभाजी कोतकर, उमाकांत गावडे, भरत बुधवंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
जिल्ह्यातील 22 मंदिरांमधील चोर्या उघड
तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांनी जिल्ह्यात तब्बल 22 मंदिरांमध्ये चोर्या केल्याचे उघड झाले आहे. त्यांच्याविरुद्ध शेवगाव, तोफखाना, एमआयडीसी, नेवासा, श्रीरामपूर, पाथर्डी, भिंगार कॅम्प, श्रीरामपूर शहर, राजूर, शिर्डी, घारगाव, संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात चोरीसह विविध गुन्हे दाखल आहेत.
पाथर्डीत विकले सोने
आरोपींनी जिल्ह्यात विविध ठिकाणी चोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. अमरापूर येथील चोरीचे सोने आरोपींनी पाथर्डीतील काही प्रतिष्ठित व्यापार्यांना विकल्याचा संशय असून, त्यात दोन महिलांचाही सहभाग असल्याचे पोलिस सूत्रांकडून समजले. आता ते प्रतिष्ठित व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर आहेत.
The post Nagar crime news : रेणुकामातेचे दागिने चोरणारे तिघे गजाआड appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SwWRL4
राहाता : पुढारी वृत्तसेवा : राज्यात आत्तापर्यत 78 वाळू विक्री केंद्र सुरू झाले असून, त्रृटी दूर करून वाळू धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. वाळू व्यवसायातील माफियाराज संपुष्टात येत असल्याने ग्रामीण भागातील गुन्हेगारी रोखण्यात यश येत असल्याचे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. तालुक्यातील दाढ बु. येथे सातव्या वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रवरा बॅकेचे चेअरमन डॉ.भास्करराव खर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, बाळासाहेब कोळेकर, प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसिलदार अमोल मोरे, डॉ. विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, व्हा. चेअरमन सतिष ससाणे, नंदूशेठ राठी, कांचन मांढरे, निवृत्ती सांगळे, प्रतापराव तांबे, सुनिल जाधव, शिवाजीराव कोल्हे आदी यावेळी उपस्थित होते.
संबंधित बातम्या :
* पुणे : बदली झाली तरी सोडवेना खुर्ची! सीईओंचे विभागप्रमुखावर कारवाईचे आदेश
* जपून ! नगरमध्ये रात्री नऊनंतर रस्त्यांवर असते कुत्र्यांचीच दहशत
* Nagar crime news : तीन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या
मंत्री विखे म्हणाले की, पर्यावरणाचे रक्षण आणि सामाजिक दृष्टीकोन ठेवून राज्यात वाळू धोरणाची अंमलबजावणी सुरू केली. धोरणाचा विषय सर्वांसाठी नविन असल्याने काही आव्हान होती. परंतू आता राज्यात 78 वाळू विक्री केंद्र सुरू झाली असून, सामान्य माणसाला अतिशय स्वस्त दरात वाळूची उपलब्धता होत आहे. धोरण करतानाच घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्याच्या निर्णयाचा लाभही लाभार्थ्यांना मिळत असल्याचे विखे पाटील म्हणाले.
राज्यातील बहुसंख्य आमदारांनी या धोरणाचे स्वागत करून यामध्ये काही सूचना केल्या आहेत, त्यांच्या सूचनांचा अंर्तभावही या धोरणात करण्यात आला असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. या वाळू धोरणाचा सर्वाधिक फायदा हा ग्रामीण भागातील गुन्हेंगारी रोखण्यासाठी झाला असून, ग्रामीण भागातील कमी झाली असल्याकडे लक्ष वेधून मंत्री विखे पाटील म्हणाले की, वाळू व्यवसाय पुर्णपणे माफीयामुक्त करण्यासाठी नागरीकांच्या सहकार्याचीही गरज आहे.
अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी जिल्ह्यातील वाळू धोरणाच्या अंमलबजावणीचा आढावा आपल्या प्रास्ताविक भाषणातून मांडला.
…त्यामुळे वाळू धोरणाला मान्यता
वाळू व्यवसाय संपूर्णपणे माफीयांच्या ताब्यात गेला. गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्रामीण भागातील सामाजिक वातावरण कलुषित झाले होते. रात्री सुरू असणारी बेकायदेशीर वाळू वाहतूक ही सर्वांसाठी डोकेदुखी ठरली होती. गावपातळीवर निर्माण होणारे वादंग आणि अधिकारी वर्गालाही याचा झालेला त्रास लक्षात घेवून राज्य सरकारने नव्या वाळू धोरणाला मान्यता दिली.
हेही वाचा :
* नाशिक : आमदार सरोज अहिरेंच्या मतदार संघातील कामांसाठी पुन्हा भरघोस निधी
* मंत्रिमंडळ विस्तार सोडा, लोकसभेच्या कामाला लागा; भाजप श्रेष्ठींचे आमदारांना आदेश
The post राज्यात आत्तापर्यंत 78 वाळू विक्री केंद्र सुरू : पालकमंत्री राधाकृष्ण विखे appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SwTdML
नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात काल श्री गणेशाचे आगमन झाले. डीजे, ढोलपथक, ढोलताशा व सनई चौघड्यांच्या सुरांमध्ये जल्लोषात लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यात आले. जिल्ह्यात सुमारे 2500 मंडळांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली. त्यात 325 गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आला. मांगल्य, पावित्र्य आणि उत्साहाचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला जिल्ह्यात आनंदात सुरुवात झाली. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात गावोगाव श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पारंपरिक ढोल-ताशाच्या गजरात वाजत-गाजत श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली.
यंदा पारंपरिक वाद्यांच्या जोडीला डीजे व ढोलपथकाचा दणदणाट पाहायला मिळाला. संपूर्ण गावाने मिळून एकाच श्री गणेशाची स्थापना करावी, यासाठी प्रशासनाचा प्रयत्न असतो. गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासन तरुण मंडळे, सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये जनजागृती करीत असते. परंतु, प्रशासनाच्या प्रयत्नांना तितकेसे यश येत नाही. यंदा संपूर्ण जिल्ह्यात 2550 मंडळांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. त्यातील केवळ 325 गावामध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम राबविण्यात आला आहे. अकोले तालुक्यात सर्वाधिक 47 गावामध्ये एक गाव एक गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तर, कर्जत तालुक्यात अवघ्या दोन गावांत एक गाव एक गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असली तरी गणेशोत्सवामध्ये भाविकांचा उत्साह दिसून येत आहे.
तालुकानिहाय एक गाव एक गणपती
नगर तालुका 24, पारनेर 27, श्रीगोंदे 13, जामखेड 18, कर्जत 2, पाथर्डी 9, शेवगाव 10, नेवासे 13, श्रीरामपूर 16, राहुरी 17, कोपरगाव 13, राहाता 7, अकोले 47, संगमनेर 42फ..
खासगी गणपती 125
लहान मंडळे 900
मोठे मंडळे 1200
सार्वजनिक मंडळे 2100
एक गाव एक गणपती 325
एकूण गणपती 2550
The post नगर जिल्ह्यात 325 गावांमध्ये एक गाव एक गणपती ! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SwRJZX
संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : तुम्ही पालकमंत्री आहात. पालकमंत्री म्हणून काम करा, मालक बनू नका, अशी टीका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महसूमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर केली होती. दरम्यान, बाळासाहेब थोरत यांच्या टीकेला राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी पालकत्व कसे करावे, हे कुणी शिकविण्याची गरज नाही, असे प्रत्युतर राधाकृष्ण विखे-पाटील यांना दिले आहे.
आपण महसूलमंत्री असताना टंचाई आराखडा तयार केला. तो संपूर्ण राज्याला भूषणावह असल्याचे सांगत सुटले. मात्र, गेल्या ३० ते ३५ वर्षापासून या संगमनेर तालुक्यातील जनतेला पाणी देऊ शकले नाही. मग कोणत्या अर्थाने त्यांचा टंचाई आराखडा राज्याला भूषणावह आहे हे त्यांनी सांगावे, अशा शब्दात राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता टीका केली.
राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, संपूर्ण राज्यात आपण वाळू उपशावर बंदी आणली आहे. मात्र, संगमनेर तालुक्यात वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. त्यामुळे इथून पुढील काळात कुठल्याही परिस्थितीत शंभर टक्के वाळूचा गोरख धंदा बंद झालाच पाहिजे. कोणी वाळू तस्करांना पाठीशी घालतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
हेही वाचलंत का?
* OBC Reservation : राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाकडून शासन निर्णयाची होळी
* Women’s Reservation Bill : ऐतिहासिक! ‘महिला आरक्षण विधेयक’ लोकसभेत बहुमताने मंजूर
The post "मी पालकत्व कसे करावे, हे कोणी शिकविण्याची गरज नाही"; विखे-पाटलांचे बाळासाहेब थोरातांना प्रत्युत्तर appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SwPJ94
जामखेड : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील जवळा सीना परिसरात बिबट्या ठसे असल्याचे निदर्शनात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जवळा परिसरातील शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन सरपंच प्रशांत शिंदे यांनी केले आहे. जवळा परिसरात गेल्या दोन दिवसांपूर्वी रात्री बिबट्याचा वावर असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले त्यानुसार दि 19 सप्टेंबर रोजी जामखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी जवळा परिसरात येऊन पाहणी केली. जवळा परिसरातील सीना भागात शेतकऱ्यांनी दाखवलेले पायांचे ठसे बिबट्याचेच असल्याचे जामखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी सांगितले असून बिबट्याच्या हल्ल्यापासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या तसेच नागरिकांना सतर्कत राहण्याचे आवाहन केले. जवळा परिसरात बिबट्या आल्याचे समजताच शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सबंधित बातम्या:
* फडणवीस यांनी लपाछपीचा खेळ थांबवावा : नाना पटोले
* चंद्रपूर : सोयाबीनवर मूळखूज, खोडखुज आणि पिवळा मोज्याक रोगाचा प्रादुर्भाव
* दुर्दैवी ! पावसाअभावी 4 एकर सोयाबीनवर फिरविला नांगर ; कर्जामुळे खचला तरुण शेतकरी
जवळा येथील सीना नदी परीसरात काही शेतकऱ्यांना बिबट्या आढळला. याची माहिती त्यांनी गावचे सरपंच प्रशांत यांना दिली. माहिती मिळताच सरपंच प्रशांत शिंदे व जामखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल आर. एम भोसले, वनरक्षक प्रवीण उबाळे, आजिनाथ भोसले, रवी राठोड यांनी संबंधित बिबट्या प्रवण क्षेत्राची पाहणी केली. त्यावेळी शेतकऱ्यांनी दाखवलेले पायांचे ठसे बिबट्याचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले व नागरिकांना सतर्कत राहण्याचे आवाहन केले तसेच बिबट्याच्या धोक्यापासून सावध राहण्याच्या उपाय योजना सुचवल्या. यावेळी शेतकरी ग्रामस्थांना बिबट्यापासून नुकसान होण्यापुर्वी वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा यासाठी पिंजरा बसविण्याची मागणी सरपंच प्रशांत शिंदे यांनी केली आहे.
यावेळी जवळा येथील वन विभागातील अधिकारी प्रवीण शिंदे, सामाजिक कार्यकर्ते तानाजी पवार, दादा वाळुंजकर, सचिन विटकर तसेच परिसरातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
The post Nagar News : जवळा सीना परिसरात आढळले बिबट्याचे ठसे appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SwLWMW
जामखेड, पुढारी वृत्तसेवा : धनगर समाजामुळे गेल्या ७० वर्षात बारामतीत जेष्ठ नेते शरद पवार यांनी सत्ता उपभोगली. ते पवार साहेब जालन्याला पळत जातात. मग ते चौंडीला का येत नाहीत ? आपले ते लेकुरू आणि दुस-याचे ते कार्ट का ? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्नेहा सोनकाटे यांनी उपस्थित करत ,असा दुजाभाव त्यांच्याकडुन अपेक्षित नसल्याचे त्यांनी सांगितले.
यशवंतसेनेच्या वतीने चौंडी येथे धनगर आरक्षणप्रश्री गेली १३ दिवसापासून आमरण उपोषण चालु आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सोनकाटे यांनी चौंडीला भेट देवून,आंदोलनाला पाठींबा दिला.यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या.
डॉ. सोनकाटे म्हणाल्या , चौंडी येथे गेली १३ दिवसापासून सूरू असलेल्या आंदोलनाकडे विरोधी पक्षांनीही पाठ फिरवली आहे. विधानसभेच्या १२० मतदारसंघात आणि लोकसभेच्या ४० मतदारसंघात धनगर समाज निर्णायक आहे. ज्यांनी आजपर्यंत धनगर समाजामुळे सत्ता उपभोगली त्यांना आता विसर पडला आहे का ? असा आमचा सवाल आहे.
धनगर समाजाची लोकसंख्या मोठी असताना आरक्षण मात्र केवळ साडेतीन टक्के आहे. त्यानुळे २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत धनगर समाज सत्ताधा-यांना जागा दाखवून देणार असल्याचे त्यांनी सांगीतले. धनगर आरक्षण लढा चौंडीतून सूरू झाला आहे.आता या लढ्याचा महाराष्ट्रात उद्रेक होणार आहे. असेही डाॅ.सोनकाटे यांनी सांगितले.
The post शरद पवार जालन्याला जातात, मग ते चौंडीला का येत नाहीत? : डॉ. स्नेहा सोनकाटे appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SwHgWQ
सोनई(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : भारताचे 50 वे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी शनिवारी सायंकाळी शनिशिंगणापूरला येऊन शनिमूर्तीवर तेल अभिषेक करत शनिदर्शन घेतले. मुळा कारखान्याच्या हेलिपॅडवर सायंकाळी पाच वाजता त्यांचे आगमन झाले. तेथून शनिशिंगणापूरला दर्शनासाठी आले. चौथर्यावर जाऊन तेल अभिषेक कतर उदासी महाराज मठात अभिषेक केला.
त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, नेवाशाचे जिल्हा न्यायाधीश बी. वाय. जाधव, पोलिस अधीक्षक राकेश ओला, तहसीलदार बिराजदार आदी उपस्थित होते. जनसंपर्क कार्यालयात देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी त्यांचा शाल, श्रीफळ, शनिप्रतिमा व प्रसाद देऊन सन्मान केला. यावेळी शेवगाव उपविभागाचे पोलिस उपधीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिंगणापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे व सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी बंदोबस्त ठेवला होता.
हेही वाचा
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा : मंत्री विखे पा.
अहमदनगर : महिलेवर पेट्रोल ओतून ठार मारले; दोघांना जन्पठेपेची शिक्षा
अहमदनगर : महिलेवर पेट्रोल ओतून ठार मारले; दोघांना जन्पठेपेची शिक्षा
The post सरन्यायधीश चंद्रचूड यांचे शनिदर्शन appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SwF2yJ
रमेश चौधरी
शेवगाव : शेवगाव तालुक्यातील 34 खरीप गावांची, तर रब्बी हंगामाच्या 79 गावांमध्ये दोन तृतांश पेक्षा जास्त खरीप पेरा झाल्याने अशा 113 गावांची 50 पैशापेक्षा जास्त नजर आणेवारी प्रशासनाने जाहीर केली आहे. यामध्ये शासन दरबारी सर्व दुष्काळी गावांत सुकाळ जाणवला आहे. तालुक्यात खरीप हंगामाची 34 गावे आहेत. मात्र यंदा रब्बी हंगाम क्षेत्रात खरीपांची पिके घेण्यात आल्याने सर्व 113 गावांची नजन आणेवारी जाहीर करण्यात आली. ही आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त जाहीर झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
गेल्या एक महिन्यापासून पावसाचा खंड पडला आहे.
त्यातच कुठेही जोरदार पाऊस बरसलेला नाही. यामुळे खरीप पिके वाया गेली. तसेच, शि÷ल्लक पिकांचे उत्पन्न घटणार आहे. अशा परिस्थितीत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होताना महसुल प्रशासनाने मात्र सुकाळ जाहीर केला. यामुळे मोठी खंत व्यक्त करण्यात आली.
खरीप हंगामातील 34 गावांची नजर आणेवारी
दिवटे (55 पैसे), राक्षी, लाडजळगाव, गोळेगाव, राणेगाव, शोभानगर, मुरमी (54 पैसे), माळेगावने, ठाकुर निमगाव, सालवडगाव, आंतरवाली खुर्द शे, हसनापूर, कोळगाव, वरखेड, सोनेसांगवी, नागलवाडी, सेवानगर, कोनोशी, सुकळी, बाडगव्हाण (53 पैसे), नजिक बाभुळगाव, वाडगाव, थाटे, आंतरवाली बुद्रूक, बेलगाव, मंगरूळ बुद्रूक, मंगरूळ खुर्द, बोधेगाव, चेडेचांदगाव, शेकटे बुद्रूक, अधोडी, शिंगोरी, शेकटे खुर्द, सुळे पिंपळगाव (52 पैसे).
79 गावांतील खरीप पेरणीची नजर आणेवारी
मुंगी (58 पैसे), कर्जत खुर्द, विजयपूर, कांबी, पिंगेवाडी, खडके, मडके, दहिगावने, घेवरी, देवळाणे, ढोरसडे, रांजणी, ढोरजळगाव शे, वाघोली, ढोरजळगावने (57 पैसे), एरंडगाव भागवत, ढोरहिंगनी, ताजनापूर, कर्हेटाकळी, खानापूर, हातगाव, खामपिंप्री नवीन, खामपिंप्री जुनी, बक्तरपूर, शहरटाकळी, अंत्रे, सुलतानपूर बुद्रक, मलकापूर, गरडवाडी, आपेगाव, आखतवाडे, वडूले खुर्द, निंबेनांदूर (56 पैसे), आंतरवाली बुद्रक, जुने दहिफळ, दादेगाव, बोडखे, आंतरवाली खुर्दने, गा. जळगाव, लखमापुरी, देवटाकळी, भावी निमगाव, भातकुडगाव, मजलेशहर, आव्हाणे खुर्द, आव्हाणे बुद्रूक, नांदुर विहीरे, बालमटाकळी (55 पैसे), लाखेफळ, खुंटेफळ, घोटन, सोनविहीर, भायगाव, जोहरापूर, हिंगनगावशे, मळेगावशे, लोळेगाव, बर्हाणपूर (54 पैसे), शेवगाव, अमरापूर, आखेगाव ति, आखेगाव डो, खरडगाव, भगूर, तळणी, दहिगावशे, रावतळे, सामनगाव (53 पैसे), सुलतानपूर खुर्द, शहाजापूर, वरूर बुद्रूक, वरूर खुर्द, मुर्शतपूर, चापडगाव, प्रभुवाडगाव, गदेवाडी, कुरुडगाव, ठाकुर पिंपळगाव, वडुले बुद्रूक (52 पैसे).
पाऊस नसल्याने पिकांची गंभीर परिस्थिती आहे. जनावरांना चारा नाही. आशी गंभीर परिस्थिती असताना तरीही जास्त नजर आणेवारी कोणत्या आधारावर लावण्यात लावली. यामुळे अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकर्यांना आत्महत्या कराव्या लागतील. लोकप्रतिनिधींनी आणेवारीवर दुर्लक्ष करून शेतकर्यांना वार्यावर सोडले.
– दत्तात्रय फुंदे, जिल्हा उपाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
The post शेवगाव तालुक्यातील 113 गावांची नजर आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त ! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SwC5d7
मच्छिंद्र आनरसे
मिरजगाव : कर्जत तालुक्यातील थेरगाव येथील पदवीधर शेतकरी विवेक रायकर यांचे डाळिंब थेट बांगला देशात निर्यात होत आहेत. येथील डाळिंब उत्तम असून, डाळिंब खरेदी करणारे अनेक व्यापारी याची मागणी करत आहेत. येथील डाळिंबाला आळेफाटा येथील बाजारात 194 रुपये किलोचा उच्चांकी भाव मिळाला. नगर-सोलापूर महामार्गालगत कर्जत तालुक्यात मांदळी जवळ थेरगाव गाव आहे. येथील रहिवासी आजीनाथ रायकर यांना पुरेशी शेती नव्हती.
शेतीसाठी खडकाळ माळरान असलेली वडिलोपार्जित 20 एकर जमीन निवडली. या जमीनीतून हमखास उत्पन्न काढण्याचा माणस विवेक रायकर यांनी केला. 20 एकर श्रेत्रावर डाळिंब लागवड केली. लागवड करताना भगवा डाळिंब या वाणाची निवड केली. लागवडीसाठी दोन टप्पे करण्यात आले. पाणी उपलब्ध नाही म्हणून सीना नदीवरून पाईपलाईन केली. ठिबक सिंचनाद्वारे संपूर्ण बागेला पाणी पुरवठा केला जातो. बागेसाठी गांडूळ खत तयार केले जाते. शिवाय बागेत कधीही तणनाशकाची फवारणी केली जात नाही. लहान मुलांप्रमाणे बागेची काळजी घेतली जाते. यामुळे डाळिंबावर रासायनिक औषधांची फवारणी कमी प्रमाणात करावी लागते. या बागेत गेल्या चार-पाच वर्षांपासून डाळिंबाचे उत्पादन सुरू झाले आहे.
पूर्वी हे प्रमाण कमी होते; परंतु यावर्षी 10 एकर क्षेत्रातून सुमारे 200 टन उत्पादन होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सध्या येथील डाळिंब बागेत फळांची तोडणी सुरू असून, यावर्षी आळेफाटा येथे हा माल दिला. डाळिंबाचा आकार, कलर व गोडी पाहून हा माल आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात करण्यासाठी पात्र ठरला आहे. तो सध्या बांगला देशाला पाठविला जात असून, कर्जत तालुक्याला दुष्काळी संबोधले जाते. परंतु, अलिकडीच्या काळात उपलब्ध पाणी येथील प्रगतशील शेतकर्यांनी केलेली शेतीमुळे येथील उत्पादन परदेशात जाऊ लागले आहे. ही अभिमानाची बाब आहे.
गेली चार-पाच वर्षांपासून डाळिंब विक्री करत आहे. मुंबई, पुण्यापेक्षा आळेफाटा येथे सर्वाधिक भाव मिळाला. शिवाय येथे कोणतीही आर्थिक जोखीम नाही. अनेक डाळिंब उत्पादक शेतकर्यांना फसवणुकीचे प्रकार आपण पहातो. येथे तसा काही प्रकार होत नाही. डाळिंब उत्पादक शेतकर्यांना माल विक्री करण्यासाठी आळेफाटा उत्तम ठिकाण आहे.
-विवेक रायकर, डाळिंब उत्पादक शेतकरी, थेरगाव
थेरगावचे प्रगतशील शेतकरी विवेक रायकर यांच्या नगर-
सोलापूर महामार्गालगत ही बाग आहे. डाळिंब बागेतील फळांचा दर्जा पहाता याला 194 रुपये प्रति किलो दर मिळाला. हा आता पयर्र्ंतचा उच्चांकी भाव आहे. यामुळे आजच्या पदवीधर युवकांनी शेती केली तर काय होऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे.
– दत्तात्रय ननवरे, व्यवस्थापक डाळिंब बाग, थेरगाव
The post कौतुकास्पद ! पदवीधर युवकाने खडकाळ माळरानावर फुलविली डाळिंब बाग appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sw7JWB
Is Leaving Job without Notice Period Legal? #LLAShorts 715
Subscribe to the FREE Success Circle Newsletter by LLA 👇 http://nl.lla.in ▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀ Insurance is Important, Get one Now! 👇 Term Insurance: https://term.lla.in Health Insurance: https://health.lla.in/ Car Insurance: https://4wheeler.lla.in Bike Insurance: https://2wheeler.lla.in Commercial vehicle Insurance: https://cv.lla.in Choose the right Insurance for yourself: https://link.lla.in/LLA-PL-life-insurance ▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀ 📚COURSES: http://lpti.lla.in ▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀ Free AI Newsletter: http://nl.lla.in ▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀ Employment Consultancy, Contract Review, Salary Structure Review: https://www.consult.lla.in/ ▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀ Checkout LLA Courses, Videos & Apps: https://link.lla.in/shorts ▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀ QuickPayroll: https://quickpayroll.in/ ▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀ Is Leaving Job without Notice Period Legal? ▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀ Shot & Edited by: Naveen Agarwal Presented by: RJ (Rishabh Jain) ▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀ Follow us on Social Media📲 Twitter: https://link.lla.in/LLAtwitter Instagram: https://link.lla.in/LLAinsta Telegram: https://t.me/JoinLLA Facebook: https://link.lla.in/LLAFB #Shorts #LLA #noticeperiod
via YouTube https://www.youtube.com/watch?v=hNTgCU04gJo
कर्जत : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसच्या उपनगराध्यक्ष रोहिणी सचिन घुले व युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि. 13) अधिकार्यांच्या मनमानीविरुद्ध नगरपंचायतीवर मोर्चा काढून कार्यालयाला टाळे ठोकले. या आंदोलनात युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन घुले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, ज्येष्ठ नेते तात्या ढेरे, नगरपंचायतीमधील भाजपच्या विरोधी पक्षनेत्या माया दळवी, नगरसेविका मोहिनी पिसाळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बापूसाहेब नेटके, ओंकार तोटे, माझीद सय्यद, राजू बागवान यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुख्याधिकारी साळवे, इतर कर्मचारी व काही नगरसेवकांना कार्यालयाबाहेर काढून कार्यालयास टाळे ठोकण्यात आले.
या वेळी नगरपंचायत कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांनी हलगी वाजवून आंदोलन केले. माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, सुनील शेलार, उपगटनेते सतीश पाटील, यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक त्यांच्या मागण्यांवर ठाम होते. टाळे ठोकल्यानंतर युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी नगरपंचायत कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले.
या दरम्यान मुख्याधिकारी साळवे यांनी आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोडगा निघाला नाही. यावेळी सचिन घुले यांनी सांगितले, नगरपंचायत कार्यालय बेमुदत बंद ठेवू, आमच्यावर गुन्हे नोंदवले तरी चालतील, नगरपंचायतीने माझी वसुंधरा अभियानात एक कोटी रुपयांचे बक्षीस पटकावले. त्यातील 80 लाख रुपये खर्चही झाले. याबद्दल माहिती दिली जात नाही, याचा अर्थ या खर्चात गैरव्यवहार झाला आहे. असा आरोप त्यांनी केला. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामधून वरिष्ठ अधिकार्यांनी कार्यवाही करण्याची भूमिका घेतली तरच आंदोलन मागे घेतले जाईल, असेही घुले यांनी बजावले.
उपनगराध्यक्ष रोहिणी घुले म्हणाल्या, नगरपंचायतीने माझी वसुंधरा अभियानात प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला. यासाठी मोठी रक्कम शासनाने दिली, ही रक्कम खर्च करण्यात येत आहे. मात्र, ही कशी खर्च केली, कोणती निविदा देण्यात आली. याविषयी माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख बापूसाहेब नेटके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील यांनीही विविध आरोप केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर परिषद प्रशासन विभागाचे सहआयुक्त प्रशांत खांडकेकर यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे पत्र ई-मेलद्वारे पाठविल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
हे ही वाचा :
पुणे : बोगस 2742 प्रमाणपत्रे वाटणार्या मुख्य आरोपीचा जामीन फेटाळला
पुणे पोलिसांनी जप्त केलेले ५ कोटींचे अमली पदार्थ केले नष्ट; गांजा, एमडी, कोकेन, चरसचा समावेश
The post कर्जत नगरपंचायतीला ठोकले टाळे appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sw4bCM
भेंडा : पुढारी वृत्तसेवा : 2021-22 च्या गळीत हंगामात लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने कपात केलेले 109 रुपये शेतकर्यांना न दिल्यास 2023-24 च्या गळीत हंगामासाठी परवानगी देणार नसल्याचे आश्वासन साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना दिले. मुरकुटे यांनीच ही माहिती ‘पुढारी’शी बोलताना दिली.
2021-22 मध्ये गळीत झालेल्या उसाचे एफआरपीमधून ज्ञानेश्वर कारखान्याने 109 रुपये आसवनी विस्तार वाढीसाठी कपात केली होती.
एफआरपी रकमेतुन कोणतीही कपात न करण्याचा केंद्र सरकारचा नियम असताना ज्ञानेश्वर कारखान्याने अनाधिकृतपणे 109 रुपये कपात करून शेतकर्यांवर अन्याय केल्या विरोधात मुरकुटे यांनी साखर आयुक्ताकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. ज्ञानेश्वर कारखान्यावर मोर्चा, धरणे आंदोलनेही केली. त्यानंतर कारखान्याने फक्त 83 शेतकर्यांच्या खात्यावर 109 रुपये प्रति टना प्रमाणे पैसे जमा केले. इतरांची मागणी वाढल्याने 109 रुपये परत करणे थांबवले. या विरोधात 1 सप्टेंबरला आमदार मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली शेतकर्यांनी ज्ञानेश्वर कारखान्यावर धरणे आंदोलन केले. 12 सप्टेंबरला माजी आमदार मुरकुटे व इतरांनी साखर आयुक्तांकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. 2021-22 मध्ये गळीत झालेल्या उसाचे 109 रुपये टनाप्रमाणे शेतकर्यांच्या खात्यात वर्ग करा, तसेच 2022-23 गळीत हंगामाचे रिकव्हरी नुसार प्रतिटन 3 हजार 10 रुपये उसाचे पेमेंट द्यावे, अशी मागणी केली. तसे न केल्यास येणार्या गळीत हंगामात ज्ञानेश्वर कारखान्यास परवानगी देऊ नये अशी आग्रही मागणी केली.
तत्काळ त्यासंदर्भात आदेश काढला जाणार असून कारखान्याने अंमलबजावणी न केल्यास लोकनेते ज्ञानेश्वर कारखान्यास येत्या गळीत हंगामास परवानगी दिली जाणार नाही,असे आश्वासन साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मुरकुटे यांना दिले.
लोकनेते ज्ञानेश्वर कारखाना शेतकी खात्याचे संबंधित कर्मचारी 109 रुपये मागणी करणार्या काही शेतकर्यांना आमीष दाखवून तर काहींवर दबाव टाकून आमची काही तक्रार नसल्याचे लेखी घेत आहेत. हे योग्य नसून शेतकर्यांनी आमिषाला किंवा दबावास बळी पडू नये.
– बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार.
हेही वाचा :
जगातील 2 दिग्गज अंतराळ शास्त्रज्ञ करणार पृथ्वीचा अभ्यास; अवकाशात निरीक्षण शाळा पाठवण्याची मोहीम
पुणे : डायजीन औषधांची विक्री थांबवण्याच्या सूचना
The post नगर : कपात 109 रुपये न दिल्यास ‘घुलेंना’ गाळप परवाना नाही appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sw1qpS
काष्टी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कै. बाबा नजू राहिंज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष शांताराम दादासाहेब राहिंज याच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन संचालक मंडळातील 13 पैकी आठ संचालकांनी आक्षेप घेत, त्यांचे सर्व अधिकार काढून घेतले आहेत. ही संस्था आमदार बबनराव पाचपुते यांच्या ताब्यात असून, आमदार पाचपुते गटाला पुतण्या सरपंच तथा ठाकरे सेनेचे उपनेते साजन पाचपुतेंनी मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे. या घटनेची तालुक्यात चर्चा आहे.
सन 2022 साली कै. बाबा नजू राहिंज सेवा सहकारी संस्थची निवडणूक झाली. यामध्ये आमदार बबनराव पाचपुते यांच्या गटाने पूर्ण बहुमताने सत्ता मिळविली. यानंतर एकमताने बबन उर्फ शांताराम राहिंज यांची अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर वर्षभरात संस्थेची एकही बैठक झाली नाही, कागदोपत्री बैठक दाखवली, संचालक मंडळाला अध्यक्ष विश्वसात घेत नाही, तसेच संस्था व शेतकरी सभासदांच्या हिताचा एकही निर्णय नाही, दिवसेदिवस संस्था कर्जाच्या खाईत लोटत चालली, यामुळे संस्थेच्या दोन्ही नेतृत्वाने संस्थेकडे दुर्लक्ष केले.
यामुळे संसदेच्या संचालकांचा कोणावरही विश्वास राहिला नाही. यामुळे संस्थेत दोन गट निर्माण झाले. म्हणून यातील 13पैकी आठ संचालक लालासाहेब पंडित दांगट, विश्वनाथ दत्ता गावडे, दादा आनंदा राहिंज, धोंडीबा बापुराव राहिंज, प्रेमराज शिवराम राहिंज, कोंडीबा मारुती राहिंज, ज्ञानदेव दगडू राहिंज, अनिल विलास माने आदी संचालक साजन पाचपुते गटाला जावून मिळाल्याने त्यांनी अध्यक्ष शांताराम राहिंज यांच्या विरोधात श्रीगोंदा येथील सहायक निबंधकांकडे लेखी तक्रार देवून अध्यक्षांचे अधिकार काढून घेतले. यामध्ये आमदार पाचपुतेंना शह देण्यासाठी पुतण्या साजन पाचपुतेंनी मदत केल्याने आमदार पाचपुते गटाला मोठा धक्का बसला आहे. लवकरच अध्यक्ष राहिंज यांच्यावर अविश्वास दाखल करून नवीन अध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग आला आहे.
हेही वाचा
दांडीबहाद्दरांमुळे पानशेत खोर्यातील शाळा बंद
धुमधडक्यात साजरा करू बैल पोळा! खरेदीसाठी आठवडे बाजारात शेतकर्यांची गर्दी
चंद्रपुरात मराठा समाजाच्या मागणीविरोधात रवींद्र टोंगेंचे अन्नत्याग आंदोलन
The post आ. पाचपुते गटाला पुतण्याचा दे धक्का! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Svz4l3
शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील गतिमान सरकारमुळे जिल्हा व तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लागले आहेत. सत्ता विकासासाठी असल्याचे राज्य व केंद्रातील सरकारने दाखवून दिले आहे. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात विकासकामांचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न केला. आगामी वर्षभरात रस्ते, वीज व पाणीपुरवठ्याचे प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांमधून खासदार विखे व आमदार मोनिका राजळे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या तालुक्यातील विविध 6 कोटी 50 लाख रुपये खर्चाच्या व प्रादेशिक पर्यटन योजनेतंर्गत आव्हाणे बुद्रुक येथे गणपती देवस्थान 50 लाख रुपयांच्या सभामंडपाचे भूमिपूजन खासदार विखे यांच्या हस्ते झाले.
त्यावेळी विखे बोलत होते. यावेळी आमदार मोनिका राजळे, भाजपचे प्रदेश चिटणीस अरूण मुंढे, ‘वृद्धेेश्वर’चे उपाध्यक्ष रामकिसन काकडे, तहसीलदार प्रशांत सांगडे, गटविकास अधिकारी राजेश कदम, सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता प्रल्हाद पाठक, बाळासाहेब कोळगे, बापूसाहेब पाटेकर, तुषार पुरनाळे, अमोल सागडे, विजय कापरे, देवस्थानचे अध्यक्ष मालोजी भुसारी, मीना कळकुंबे, उमेश भालसिंग, चंद्रकांत गरड, भीमराज सागडे, संदीप वाणी, राम कोळगे, अनिल खैरे आदी उपस्थित होते.
खासदार विखे म्हणाले, राज्यात गतिमान सरकार असून आमदार राजळे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रयत्नांमुळे विविध प्रश्न मार्गी लागत आहेत. शेवगाव तालुक्यासाठी नादुरुस्त झालेले 50 एमव्हीए क्षमतेचे रोहित्र अवघ्या 10 दिवसांत बसविण्याचे काम सुरू आहे. येत्या तीन दिवसांत ते कार्यान्वित होऊन वीजपुरवठा सुरळीत होईल. जिल्हा नियोजन समितीतून विजेसाठी असणारा निधी दीड कोटी रूपयांवरून 15 कोटी वाढविण्यात येणार आहे. तालुक्यातील 53 हजार हेक्टर क्षेत्राचा 40 हजार शेतकर्यांनी पीक विमा उतरविला असून, भाजपाच्या वतीने प्रत्येक गावात कार्यकर्ते ई-पीक पाहणी करण्यासाठी शेतकर्यांना मदत करणार आहेत.
शेतकरी त्यापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल. तसेच, शेवगाव ते पांढरीपूल चौपदरी रस्त्याचे काम येत्या सहा महिन्यांत सुरू होईल. आम्ही शेवगाव-पाथर्डीचा विकास तत्परतेने करू. निधीचा योग्य वापर करणारा लोकप्रतिनिधी हवा असतो. यापुढेही प्रामाणिक व तत्परतेने आपली सेवा करण्याची ग्वाही विखे यांनी दिली. बाळासाहेब कोळगे यांनी प्रास्तविक केले. कचरू चोथे यांनी सूत्रसंचालन केले. अर्जुन सरपते यांनी आभार मानले
या कामांचे झाले भूमिपूजन
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून हिंगणगाव ते देवटाकळी रस्ता डांबरीकरण 3 कोटी 61 लाख 44 हजार रूपये, वाघोली ते माका रस्ता डांबरीकरण 3 कोटी 61 लाख 44 हजार रूपये, वडुले बुद्रुक ते पानसंबळवस्ती रस्ता डांबरीकरण 30 लाख रूपये, बालमटाकळी ते मुरमी रस्ता डांबरीकरण 30 लाख, दिंडेवाडी फाटा ते ज्योतिबा चौफुली रस्ता डांबरीकरण 30 लाख, बालमटाकळी ते कांबी रस्ता डांबरीकरण 70 लाख, भारतरत्न डॉ. आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत बालमटाकळी येथे मॉडेल स्कूल बांधकाम 59 लाख रुपये, प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत आव्हाणे बुद्रुक येथील स्वयंभू निद्रिस्त गणपती देवस्थान सभामंडप 50 लाख रूपये, या कामांचे भूमिपूजन विखे व राजळे यांच्या हस्ते करण्यात आले.
हेही वाचा :
Girish Mahajan : शरद पवार झालेत अस्वस्थ : गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर
India vs Pakistan Colombo Weather Updates : कोलंबोत सूर्यदर्शन, सामना वेळेत सुरु होण्याची आशा
The post विकासाचा अनुशेष भरण्याचा प्रयत्न : खासदार डॉ. सुजय विखे appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SvwR6t