विकासाचा अनुशेष भरण्याचा प्रयत्न : खासदार डॉ. सुजय विखे

September 11, 2023 0 Comments

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील गतिमान सरकारमुळे जिल्हा व तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लागले आहेत. सत्ता विकासासाठी असल्याचे राज्य व केंद्रातील सरकारने दाखवून दिले आहे. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात विकासकामांचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न केला. आगामी वर्षभरात रस्ते, वीज व पाणीपुरवठ्याचे प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांमधून खासदार विखे व आमदार मोनिका राजळे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या तालुक्यातील विविध 6 कोटी 50 लाख रुपये खर्चाच्या व प्रादेशिक पर्यटन योजनेतंर्गत आव्हाणे बुद्रुक येथे गणपती देवस्थान 50 लाख रुपयांच्या सभामंडपाचे भूमिपूजन खासदार विखे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी विखे बोलत होते. यावेळी आमदार मोनिका राजळे, भाजपचे प्रदेश चिटणीस अरूण मुंढे, ‘वृद्धेेश्वर’चे उपाध्यक्ष रामकिसन काकडे, तहसीलदार प्रशांत सांगडे, गटविकास अधिकारी राजेश कदम, सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता प्रल्हाद पाठक, बाळासाहेब कोळगे, बापूसाहेब पाटेकर, तुषार पुरनाळे, अमोल सागडे, विजय कापरे, देवस्थानचे अध्यक्ष मालोजी भुसारी, मीना कळकुंबे, उमेश भालसिंग, चंद्रकांत गरड, भीमराज सागडे, संदीप वाणी, राम कोळगे, अनिल खैरे आदी उपस्थित होते. खासदार विखे म्हणाले, राज्यात गतिमान सरकार असून आमदार राजळे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रयत्नांमुळे विविध प्रश्न मार्गी लागत आहेत. शेवगाव तालुक्यासाठी नादुरुस्त झालेले 50 एमव्हीए क्षमतेचे रोहित्र अवघ्या 10 दिवसांत बसविण्याचे काम सुरू आहे. येत्या तीन दिवसांत ते कार्यान्वित होऊन वीजपुरवठा सुरळीत होईल. जिल्हा नियोजन समितीतून विजेसाठी असणारा निधी दीड कोटी रूपयांवरून 15 कोटी वाढविण्यात येणार आहे. तालुक्यातील 53 हजार हेक्टर क्षेत्राचा 40 हजार शेतकर्‍यांनी पीक विमा उतरविला असून, भाजपाच्या वतीने प्रत्येक गावात कार्यकर्ते ई-पीक पाहणी करण्यासाठी शेतकर्‍यांना मदत करणार आहेत. शेतकरी त्यापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल. तसेच, शेवगाव ते पांढरीपूल चौपदरी रस्त्याचे काम येत्या सहा महिन्यांत सुरू होईल. आम्ही शेवगाव-पाथर्डीचा विकास तत्परतेने करू. निधीचा योग्य वापर करणारा लोकप्रतिनिधी हवा असतो. यापुढेही प्रामाणिक व तत्परतेने आपली सेवा करण्याची ग्वाही विखे यांनी दिली. बाळासाहेब कोळगे यांनी प्रास्तविक केले. कचरू चोथे यांनी सूत्रसंचालन केले. अर्जुन सरपते यांनी आभार मानले या कामांचे झाले भूमिपूजन प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून हिंगणगाव ते देवटाकळी रस्ता डांबरीकरण 3 कोटी 61 लाख 44 हजार रूपये, वाघोली ते माका रस्ता डांबरीकरण 3 कोटी 61 लाख 44 हजार रूपये, वडुले बुद्रुक ते पानसंबळवस्ती रस्ता डांबरीकरण 30 लाख रूपये, बालमटाकळी ते मुरमी रस्ता डांबरीकरण 30 लाख, दिंडेवाडी फाटा ते ज्योतिबा चौफुली रस्ता डांबरीकरण 30 लाख, बालमटाकळी ते कांबी रस्ता डांबरीकरण 70 लाख, भारतरत्न डॉ. आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत बालमटाकळी येथे मॉडेल स्कूल बांधकाम 59 लाख रुपये, प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत आव्हाणे बुद्रुक येथील स्वयंभू निद्रिस्त गणपती देवस्थान सभामंडप 50 लाख रूपये, या कामांचे भूमिपूजन विखे व राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. हेही वाचा : Girish Mahajan : शरद पवार झालेत अस्वस्थ : गिरीश महाजनांचे प्रत्‍युत्तर India vs Pakistan Colombo Weather Updates : कोलंबोत सूर्यदर्शन, सामना वेळेत सुरु होण्‍याची आशा The post विकासाचा अनुशेष भरण्याचा प्रयत्न : खासदार डॉ. सुजय विखे appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SvwR6t

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: