शेवगाव तालुक्यातील 113 गावांची नजर आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त !

September 17, 2023 0 Comments

रमेश चौधरी शेवगाव : शेवगाव तालुक्यातील 34 खरीप गावांची, तर रब्बी हंगामाच्या 79 गावांमध्ये दोन तृतांश पेक्षा जास्त खरीप पेरा झाल्याने अशा 113 गावांची 50 पैशापेक्षा जास्त नजर आणेवारी प्रशासनाने जाहीर केली आहे. यामध्ये शासन दरबारी सर्व दुष्काळी गावांत सुकाळ जाणवला आहे. तालुक्यात खरीप हंगामाची 34 गावे आहेत. मात्र यंदा रब्बी हंगाम क्षेत्रात खरीपांची पिके घेण्यात आल्याने सर्व 113 गावांची नजन आणेवारी जाहीर करण्यात आली. ही आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त जाहीर झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गेल्या एक महिन्यापासून पावसाचा खंड पडला आहे. त्यातच कुठेही जोरदार पाऊस बरसलेला नाही. यामुळे खरीप पिके वाया गेली. तसेच, शि÷ल्लक पिकांचे उत्पन्न घटणार आहे. अशा परिस्थितीत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होताना महसुल प्रशासनाने मात्र सुकाळ जाहीर केला. यामुळे मोठी खंत व्यक्त करण्यात आली. खरीप हंगामातील 34 गावांची नजर आणेवारी दिवटे (55 पैसे), राक्षी, लाडजळगाव, गोळेगाव, राणेगाव, शोभानगर, मुरमी (54 पैसे), माळेगावने, ठाकुर निमगाव, सालवडगाव, आंतरवाली खुर्द शे, हसनापूर, कोळगाव, वरखेड, सोनेसांगवी, नागलवाडी, सेवानगर, कोनोशी, सुकळी, बाडगव्हाण (53 पैसे), नजिक बाभुळगाव, वाडगाव, थाटे, आंतरवाली बुद्रूक, बेलगाव, मंगरूळ बुद्रूक, मंगरूळ खुर्द, बोधेगाव, चेडेचांदगाव, शेकटे बुद्रूक, अधोडी, शिंगोरी, शेकटे खुर्द, सुळे पिंपळगाव (52 पैसे). 79 गावांतील खरीप पेरणीची नजर आणेवारी मुंगी (58 पैसे), कर्जत खुर्द, विजयपूर, कांबी, पिंगेवाडी, खडके, मडके, दहिगावने, घेवरी, देवळाणे, ढोरसडे, रांजणी, ढोरजळगाव शे, वाघोली, ढोरजळगावने (57 पैसे), एरंडगाव भागवत, ढोरहिंगनी, ताजनापूर, कर्हेटाकळी, खानापूर, हातगाव, खामपिंप्री नवीन, खामपिंप्री जुनी, बक्तरपूर, शहरटाकळी, अंत्रे, सुलतानपूर बुद्रक, मलकापूर, गरडवाडी, आपेगाव, आखतवाडे, वडूले खुर्द, निंबेनांदूर (56 पैसे), आंतरवाली बुद्रक, जुने दहिफळ, दादेगाव, बोडखे, आंतरवाली खुर्दने, गा. जळगाव, लखमापुरी, देवटाकळी, भावी निमगाव, भातकुडगाव, मजलेशहर, आव्हाणे खुर्द, आव्हाणे बुद्रूक, नांदुर विहीरे, बालमटाकळी (55 पैसे), लाखेफळ, खुंटेफळ, घोटन, सोनविहीर, भायगाव, जोहरापूर, हिंगनगावशे, मळेगावशे, लोळेगाव, बर्‍हाणपूर (54 पैसे), शेवगाव, अमरापूर, आखेगाव ति, आखेगाव डो, खरडगाव, भगूर, तळणी, दहिगावशे, रावतळे, सामनगाव (53 पैसे), सुलतानपूर खुर्द, शहाजापूर, वरूर बुद्रूक, वरूर खुर्द, मुर्शतपूर, चापडगाव, प्रभुवाडगाव, गदेवाडी, कुरुडगाव, ठाकुर पिंपळगाव, वडुले बुद्रूक (52 पैसे). पाऊस नसल्याने पिकांची गंभीर परिस्थिती आहे. जनावरांना चारा नाही. आशी गंभीर परिस्थिती असताना तरीही जास्त नजर आणेवारी कोणत्या आधारावर लावण्यात लावली. यामुळे अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकर्‍यांना आत्महत्या कराव्या लागतील. लोकप्रतिनिधींनी आणेवारीवर दुर्लक्ष करून शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले.                          – दत्तात्रय फुंदे, जिल्हा उपाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना The post शेवगाव तालुक्यातील 113 गावांची नजर आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त ! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SwC5d7

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: