Nagar crime news : रेणुकामातेचे दागिने चोरणारे तिघे गजाआड

September 23, 2023 0 Comments

नगर : पुढारी वृत्तसेवा : अमरापूर (ता. शेवगाव) येथील रेणुकामाता मंदिराचे कुलूप तोडून देवीच्या मूर्तीवरील दागिने चोरून नेल्याच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने तीन संशयितांच्या मुसक्या आवळल्या. मंदिराच्या कळसासह 7 लाख 19 हजारांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. गणपत कुंडलिक केदार (वय 46, रा. हातराळ, सैदापूर, ता. पाथर्डी), अजय छबू चव्हाण (वय 27), जॅकसन ऊर्फ किशोर पुंजाराम जाधव (वय 34, दोन्ही रा. माळीबाभुळगाव, ता. पाथर्डी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोन अल्पवयीन मुलांचाही या गुन्ह्यात समावेश आहे. या टोळीने जिल्ह्यात तब्बल 22 मंदिरांमध्ये चोर्‍या केल्याचे तपासात उघड झाले आहे. रेणुकामाता मंदिराचा दरवाजा तोडून चोरांनी देवीच्या मूर्तीवरील सोन्याच्या दागिन्यांसह 16 लाख 76 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. देवस्थानचे पुजारी तुषार विजय वैद्य (वय 36, रा. पाथर्डी) यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याच्या शोधासाठी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी विशेष पथकाची नेमणूक केली होती. गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना केदार व त्याच्या साथीदारांबाबत माहिती मिळाली. पथकाने लागलीच हातराळ सैदापूर (ता. पाथर्डी) येथे जाऊन केदारला ताब्यात घेतले. त्याने चव्हाण, जाधव व दोन मुलांना सोबत घेऊन चोरी केल्याची कबुली दिली. शेतात पुरलेले दागिनेही त्याने काढून दिले. पोलिसांनी त्याच्या अन्य साथीदारांना विविध ठिकाणांहून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आणखी 22 मंदिरांमध्ये दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 5 लाख 44 हजार रुपयांचे सोन्या–चांदीचे दागिने, मंदिराचा कळस, नाग, पत्रा, नथ, एक दुचाकी व सव्वा लाखाची रोकड असा एकूण 7 सात लाख 19 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांना शेवगाव पोलिसांच्या ताब्यात दिले असून, न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलिस कोठडी दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात, उपनिरीक्षक तुषार धाकराव, सोपान गोरे, सहायक फौजदार भाऊसाहेब काळे, बाळासाहेब मुळीक, पोलिस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रेय हिंगडे, मनोज गोसावी, दत्तात्रेय गव्हाणे, सुरेश माळी, अतुल लोटके, रवींद्र कर्डिले, संदीप दरंदले, संतोष लोढे, सचिन अडबल, विजय ठोंबरे, रणजित जाधव, भाग्यश्री भिटे, संभाजी कोतकर, उमाकांत गावडे, भरत बुधवंत यांच्या पथकाने ही कारवाई केली. जिल्ह्यातील 22 मंदिरांमधील चोर्‍या उघड तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांनी जिल्ह्यात तब्बल 22 मंदिरांमध्ये चोर्‍या केल्याचे उघड झाले आहे. त्यांच्याविरुद्ध शेवगाव, तोफखाना, एमआयडीसी, नेवासा, श्रीरामपूर, पाथर्डी, भिंगार कॅम्प, श्रीरामपूर शहर, राजूर, शिर्डी, घारगाव, संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात चोरीसह विविध गुन्हे दाखल आहेत. पाथर्डीत विकले सोने आरोपींनी जिल्ह्यात विविध ठिकाणी चोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. अमरापूर येथील चोरीचे सोने आरोपींनी पाथर्डीतील काही प्रतिष्ठित व्यापार्‍यांना विकल्याचा संशय असून, त्यात दोन महिलांचाही सहभाग असल्याचे पोलिस सूत्रांकडून समजले. आता ते प्रतिष्ठित व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर आहेत. The post Nagar crime news : रेणुकामातेचे दागिने चोरणारे तिघे गजाआड appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SwWRL4

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: