दुर्दैवी ! रुग्णवाहिकेअभावी तरुणाचा गेला जीव

September 25, 2023 0 Comments

उंबरे : पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध न केल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना राहुरी तालुक्यातील उंबरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने 23 वर्षे तरुणाला जीव गमावला लागल्याची दुर्घटना घडली. कुक्कडवेढे येथून दिलीप हुळूळे हा तरुण कामानिमित्त मोटारसायकलवरून उंबरेकडे येत होते. उंबरेपासून 1 किलो मीटर अंतरावर ढोकणे वस्ती येथे खड्ड्यात साठलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकी स्लीप होऊन तो खाली पडला. त्याच्या डोक्यासह शरिरावर गंभीर जखमा झाल्या. संबंधित बातम्या : * Nagar News : जिल्हा बँकेच्या कारभाराची ईडी चौकशी करा : आमदार तनपुरे * Crime news : संगमनेर हत्याप्रकरणी पत्नीसह तिघे गजाआड * Nagar News : जोरदार पावसाने दोन तलाव फुटले ; काम निकृष्ट झाल्याचा टाकळी लोणारच्या ग्रामस्थांचा आरोप गावातील काही तरूण तेथून जात असताना त्यांनी दिलीप याला शरद ढोकणे यांच्या वाहनातून उंबरे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. डॉ. पठाण यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अ.नगरला हलवावे, असे सांगितले; परंतु उंबरे आरोग्य केंद्रामध्ये दोन रुग्णवाहिका असताना चालक उपलब्ध नव्हता. डॉ. पठाण यांनी 108 नंबरला फोन करून अ‍ॅम्बुलन्स बोलाविण्याचा प्रयत्न केला; परंतु तिही उपलब्ध न झाल्याने जखमी तरुण कोमात गेला. एक- दोन तासानंतर नातेवाईक आल्यानंतर त्याला अ. नगरला खासगी दवाखान्यात हलविण्यात आले, मात्र तोपर्यंत तरुण पुर्णतः कोमामध्ये गेला. दरम्यान, खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना जखमी दीपकची प्राणज्योत मालवली. रुग्णवाहिका उपलब्ध झाली असती तर त्याचा जीव वाचला असता. याला जबाबदार कोण,असा संताप व्यक्त होत आहे. डॉक्टरची तत्परता..! उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्र वादग्रस्त राहिले आहे. डॉ. पठाण काही दिवसांपूर्वीच येथे हजर झाले. जखमी दीपक या तरुणास आरोग्य केंद्रात आणले तेव्हा आरोग्य केंद्रामध्ये ऑक्सिजन शिल्लक नव्हता. अनेकांना फोन केले, परंतु कुठलीच रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. डॉक्टरांच्या तत्पर्यतेमुळे जखमी दीपकवर योग्य उपचार झाले खरे, परंतु सुविधा नसल्याने त्यांनी जखमीस तत्काळ अ.नगरला हलविण्याच्या सूचना करून स्वतःही प्रयत्न केले. त्यांच्या या तत्परतेबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.   The post दुर्दैवी ! रुग्णवाहिकेअभावी तरुणाचा गेला जीव appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SwbBPw

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: