मास्क न वापरणाऱ्यांपुढे डोके फोडून घेऊ का?; अजितदादा भडकले

अहमदनगर: काळात सुरुवातीपासून दक्षता घेणारे उपमुख्यमंत्री अद्यापही काळजी घेताना दिसतात. एवढेच नाही तर इतरांनी काळजी घ्यावी, असा त्यांचा अग्रह असतो. आज तालुक्यातील वांबोरी येथे आयोजित कार्यक्रमात मास्क नसलेले लोक पाहून पवार चांगलेच भडकले. ‘हे बघा हे पठ्ठे, येथे बिनमास्कचे फिरत आहेत. आता त्यांच्यापुढे डोके फोडून घ्यावे का,’ असा आपल्या खास शैलीत त्यांनी संताप व्यक्त केला. वाचा: उपमुख्यमंत्री पवार आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित होते. यावेळी आयोजित सभेत बोलताना पवार यांनी करोना संकट आणि त्यामुळे राज्यावर ओढावलेले आर्थिक संकट यावर भाष्य केले. वाचा: पवार म्हणाले, ‘करोना आणि त्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्वांचेच हाल झाले. त्यातूनही मार्ग काढत राज्य सरकारने उपाययोजना केल्या. पुरेशी आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, या काळात आर्थिक विकासाचा दर खाली आला. सरकारी तिजोरीत पैसे येणे कमी झाले. अर्थसंकल्पात जे ठरविले, तेवढेही पैसे येत नव्हते. केंद्र सरकारकडे २५ हजार कोटी रुपये येणे बाकी आहेत. तरीही आपले महाविकास आघाडीचे सरकार वचन पाळणारे सरकार आहे. उपलब्ध पैशांत कामे सुरूच ठेवली. राज्य सरकारचा सर्वांत मोठा खर्च पगार आणि निवृत्ती वेतनावर होतो. दरमहा सुमारे १२ हजार कोटी रुपये यासाठी लागतात. त्यानंतर उरलेल्या पैशातून कामे करावी लागतात. असे असले तरी करोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. करोनाला हसण्यावारी घेऊ नका. आपण करोनाची काळजी घेणे आवश्यक आहे. असे असले तरी अद्यापही अनेक जण दुर्लक्ष करीत आहेत. येथेही हे बघा अनेक पठ्ठे बिनामास्कचे आले आहेत. ज्यांनी मास्क लावले आहेत, त्यातील अनेकांनी येथे वाटलेले मास्क लावल्याचे दिसून येत आहे. असे करू नका. ब्रिटनमध्ये करोनाची दुसरी लाट आली असून परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या,’ असे आवाहनही त्यांनी केले. वाचा: या सभेत पवार यांनी राजकीय टोलेबाजीही केली. अकोल्यातील ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचा नाव न घेता त्यांनी समाचार घेतला. पवार म्हणाले, ‘नगर आणि पुणे जिल्ह्याने राष्ट्रवादीला मोठी ताकद दिली. पुण्याचे दहा तर नगरने सात आमदार दिले. अकोल्यात ऐनवेळी पक्षाला सोडून गेलेल्यांना पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादीला सोडलेल्यांची अशीच अवस्था होते. नगर जिल्ह्यात निवडून आलेले बहुतांश आमदार तरुण आहेत. त्यातच राहुरीचे आमदार तनपुरे यांना राज्यमंत्रिपद मिळाले आहे. मी जेव्हा नवीन राज्यमंत्री झालो, त्यावेळी माझ्याकडे तीनच खाती होती. आता तनपुरे यांच्याकडे किती तरी जास्त खाती आहेत. त्याचा उपयोग त्यांनी पक्षाचे आमदार असलेल्या मतदारसंघात जास्तीत जास्त करावा. नगर जिल्ह्याने आम्हाला भरभरून दिले आहे. आता त्यांचे हित जोपासणे आमची जबाबदारी आहे,’ असेही पवार म्हणाले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

किसान आंदोलन का 66वां दिनः सरकार ने इंटरनेट, बिजली-पानी बंद किया, पुलिस ने NH-24,गाज़ीपुर बॉर्डर का मार्ग 

डिजिटल डेस्क ( भोपाल)। दिल्ली की हरियाणा सीमा पर स्थित सिंघु बॉर्डर पर किसानों और ग्रामीण के बीच हिंसक संघर्ष के एक दिन बाद लेबर पार्टी के ब्रिटिश सांसद तन्मनजीत सिंह ढेसी ने चेतावनी दी है कि अगर सत्ता में बैठे लोगों ने शांतिपूर्ण तरीके से प्रदर्शन कर रहे किसानों के साथ दुर्व्यवहार किया तो इससे उनका आंदोलन और मजबूत होगा। ढेसी ने ट्वीट कर कहा कि मैं यह देखकर हैरान हूं कि किस तरह भीड़ और पुलिस पानी, बिजली और इंटरनेट की सुविधा से वंचित करके किसानों को डराने और धरना-स्थल से हटाने की कोशिश कर रही है।

ब्रिटिश सांसद तन्मनजीत सिंह ढेसी ने  एक अन्य ट्वीट में कहा कि हिंसा के लिए दोषियों को नहीं बख्शा जा सकता, लेकिन अगर सत्ता में बैठे लोग शांतिपूर्ण तरीके से प्रदर्शन कर रहे किसानों के साथ दुर्व्यवहार करते हैं तो इससे उनका आंदोलन और मजबूत होगा। इससे पहले पंजाब मूल के ब्रिटिश सांसद ने किसानों के मौजूदा प्रदर्शन को लेकर 100 सांसदों द्वारा हस्ताक्षरित एक पत्र ब्रिटेन के प्रधानमंत्री बोरिस जॉनसन को भेजा था। इस पत्र के माध्यम से उन्होंने इस मुद्दे को प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी के समक्ष उठाने के लिए जॉनसन से आग्रह किया था।

गौरतलब है कि शुक्रवार को सिंघु बॉर्डर पर किसानों और ग्रमीणों के बीच हिंसक संघर्ष शुरू होने के बाद क्षेत्र की तनावपूर्ण स्थिति को नियंत्रित करने के लिए भारी संख्या में पुलिस बल तैनात किया गया है। पत्थरबाजी की घटना के बाद पुलिस ने इलाके में चारों ओर से बैरिकेडिंग कर दी और धरना-स्थल की ओर से लोगों के प्रवेश पर रोक लगा दी।

स्थानीय लोगों ने आईएएनएस से बातचीत में आरोप लगाया कि किसानों ने गणतंत्र दिवस के मौके पर ट्रैक्टर रैली के दौरान तिरंगे का अपमान किया और वे पिछले दो महीने से इलाके में डेरा डाले हुए हैं जिससे स्थानीय लोगों को बहुत परेशानी हो रही है।

किसान नेता बलबीर सिंह राजेवाल ने कहा कि हम जहां बैठे हैं वहां पर सरकार ने इंटरनेट बंद कर दिया है, हरियाणा में भी इंटरनेट बंद कर दिया है। कई बार पानी, बिजली बंद कर देते हैं। वहीं,  दिल्ली ट्रैफिक पुलिस ने NH-24,गाज़ीपुर बॉर्डर पर आने और जाने वाले मार्ग को बंद कर दिया गया है। 



.Download Dainik Bhaskar Hindi App for Latest Hindi News.
.
...
farmers protest day 66: Violence erupts at Singhu border 
.
.
.


from दैनिक भास्कर हिंदी

ईरान का ब्लास्ट से कनेक्शन ! इजरायली दूतावास धमाके की जांच में जुटी भारतीय जांच एजेंसी

डिजिटल डेस्क, नई दिल्ली। राजधानी दिल्ली में शुक्रवार को एपीजे अब्दुल कलाम रोड पर स्थित इजरायली दूतावास के बाहर धमाका हुआ। धमाके वाली जगह से एक लेटर मिला, जिसमें लिखा था, 'ये तो ट्रेलर है' अब जांच एजेंसियों को संदेह है कि जल्द ही कोई बड़ी घटना को अंजाम दिया जा सकता है। ये छोटा सा ब्लास्ट किसी बड़ी साजिश का संकेत हो सकता है। जानकारी के मुताबिक घटनास्थल से मिले लेटर में  2020 में मारे गए कासिम सुलेमानी और ईरान के वरिष्ठ न्यूक्लियर वैज्ञानिक मोहसिन फखरीजादेह का भी जिक्र है। इस लेटर में बदला लेने की बात भी कही गई है। भारतीय जांच एजेंसियां अलर्ट पर हैं और इस मामले की बारीकी से जांच कर रही हैं।

घटना की पीछे ईरान का हाथ !
दिल्ली में इजरायली दूतावास के बाहर हुए धमाके में ईरान का हाथ होने का अंदेशा है। दरअसल, दिल्ली में शुक्रवार 29 जनवरी 2021 को हुई ब्लास्ट की घटना से पहले साल 2012 में इजरायल की एक कार में धमाका हुआ था। इस धमाके में 2 ईरानी शामिल थे। ये धमाका भी भारत में हुआ था। अब जांच एजेंसी उन लोगों की भी तलाश कर रही है। इसके साथ ही 2012 से लेकर अबतक कितने लोग ईरान से भारत आए और गए इनके रिकॉर्ड भी खंगाले जा रहे हैं। जांच एजेंसियों को इस घटना के पीछे ईरान का हाथ होने का संदेह है। घटनास्थल पर जो लेटर मिला है उसमें कासिम सुलेमानी का जिक्र है। कासिम ईरान का सबसे ताकतवार कमांडर था, जिसे अमेरिकी हवाई हमले में मारा था।  

मोसाद करेगी इजरायली दूतावास धमाके की जांच
मोसाद दिल्ली में इजरायली दूतावास के बाहर हुए धमाके की जांच में भारतीय जांच एसेंजियों की मदद कर रही है। मोसाद के बारे में बताया गया है कि यह जांच एजेंसी अपने लेवल पर काम करती है। हालांकि अभी तक मोसाद के स्पॉट पर आने की कोई खबर नहीं है। लेकिन इस घटनाक्रम पर उसकी नजर बनी हुई है। जल्द ही मोसाद की टीम जांच के लिए दिल्ली आ सकती है। बता दें कि मोसाद इजराइल की सबसे बड़ी जांच एजेंसी है जिसने दुनिया के सबसे खतरनाक और बड़े ऑपरेशन को अंजाम दिया है।  

इराक स्ट्राइक: जानिए कौन था मेजर कासिम सुलेमानी, अमेरिका के लिए क्यों था खतरा?

दिल्ली में इजरायली दूतावास के बाहर आंतकी हमला हुआ- इजरायली अधिकारी 
दिल्ली में इजरायली विदेश मंत्रालय के बाहर हुई घटना को आतंकी वारदात करार दिया जा रहा है। इजरायली विदेश मंत्रालय ने यह भी कहा कि इस घटना को लेकर विदेश मंत्री गाबी अश्केनजी को अपडेट दिया जा रहा है। इजरायली अधिकारियों आतंकी हमले का अंदेश जताया है। वहीं, सीसीटीवी फुटेज भी खंगाले जा रहे हैं। हालांकि इस काम में जांच एजेंसियों को खासी दिक्कत आ रही है। दरअसल, मौके से मिली सीसीटीवी फुटेज में 1970 का टाइम आ रहा है। इसमें लाइव फुटेज चल रही है। पीछे की फुटेज को रिट्रीव करने में दिक्कत आ रही है। 

सीसीटीवी फुटेज में दिखाई दिए 2 संदिग्ध 
इजरायली दूतावास के बाहर हुए धमाके में मिले सीसीटीवी फुटेज में एक कैब दिखाई दी है। जिससे दो लोग उस जगह के पास उतरते हैं, जहां धमाका कल शुक्रवार को धमाका हुआ था। कैब दोनों को वहां छोड़कर चली जाती है। दोनों संदिग्ध पैदल ही ब्लास्ट वाली जगह बम प्लांट करके गए थे और इसके बाद दोनों संदिग्ध वहां से पैदल ही निकले थे। स्पेशल सेल ने उस कैब चालक का पता लगाकर उससे पूछताछ की है। उसके हिसाब से संदिग्धों के हुलिए का खाका तैयार किया जा रहा है। 

अमोनियम नाइट्रेट के इस्तेमाल का अंदेशा
जांच में जुटी स्पेशल सेल के मुताबिक इस ब्लास्ट में अमोनियम नाइट्रेट का इस्तेमाल किए जाने की संभावना है। ब्लास्ट में छोटे-छोटे बॉल बेयरिंग भी इस्तेमाल किए गए थे। जिन्हें घटना स्थल से जांच के दौरान बरामद किया गया था। वहीं, सॉफ्ट ड्रिंक की कैन के कुछ टुकड़े मिले हैं। शक है कि इसके जरिये ही विस्फोटक तैयार किया गया था। बताया जा रहा है कि 3 बजे के करीब जब इजरायली दूतावास से सभी लोग जा चुके थे। उस दौरान यह धमाका हुआ। 



.Download Dainik Bhaskar Hindi App for Latest Hindi News.
.
...
Indian investigative agencies are investigating Israeli Embassy blast Delhi blast investigation updates
.
.
.


from दैनिक भास्कर हिंदी

'आदरणीय राष्ट्रपती आरएसएसच्या त्या कृत्याचा निषेध का करत नाहीत?'

मुंबई: प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढणाऱ्या काही शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकावल्यावरून वादंग माजलं आहे. संसद अधिवेशनाच्या आधी अभिभाषण करताना राष्ट्रपती यांनी या प्रकाराबद्दल खंत व्यक्त करत ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं होतं. राष्ट्रपतींच्या या भूमिकेवर वंचित बहुजन आघाडीचे नेते यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. वाचा: प्रजासत्ताक दिनाच्या घडलेल्या घटनेवरून जो संशयकल्लोळ निर्माण केला जात आहे, त्यावर आंबेडकरांनी ट्वीटच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रपती कोविंद यांना इतिहासातील घटनांची आठवण देताना काही प्रश्न केले आहेत. 'तिरंग्याचा कधीही अपमान करणार नाही. तसंच, १५ ऑगस्ट व २६ जानेवारी रोजी आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकवू, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं १९४९ साली सरदार पटेल यांना लेखी दिलं होतं. आदरणीय कोविंद यांना अत्यंत दु:खी मनानं आठवण करून द्यावी लागत आहे,' असं आंबेडकरांनी म्हटलं आहे. आंबेडकरांचे राष्ट्रपतींना सवाल 'सरदार पटेल यांना लेखी दिल्यानुसार, आरएसएसनं आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकवला खरा, मात्र त्याच उंचीवर स्वत:च्या संघटनेचा ध्वज फडकावून आपली नियत दाखवून दिली. हे आपण विसरलात का? शेतकरी आंदोलकांनी तिरंगा उतरवला नाही. तिरंग्याच्या १५ फूट खाली शीख धर्माचा व शेतकऱ्यांचा ध्वज फडकवला. यातून तिरंग्याचा अपमान कसा झाला? शेतकरी आंदोलकांनी तिरंग्याचा अपमान केला असं आपल्याला वाटत असेल तर १५ ऑगस्ट १९४७ साली आरएसएसनं जो काळा दिवस पाळला, त्यांचा निषेध तुम्ही का करत नाही? वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

'कंगनाला झाशीची राणी म्हणणारे फडणवीसांचे चमचे आता कुठे गेले?'

मुंबई: कर्नाटकचे उपमुख्यमंत्री यांनी मुंबई केंद्रशासित करण्याबाबत केलेल्या वक्तव्याचे महाराष्ट्रात तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून भाजपला घेरलं आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष यांनी आता भाजपवर बोचरी टीका केली आहे. 'महाराष्ट्रद्रोही आणि त्यांचे चमचे आता कुठे गेले?,' असा सवाल जगताप यांनी केला आहे. ( Slams & BJP Leaders) वाचा: मुंबईत मोठ्या संख्येनं कानडी भाषिक आहेत. हे शहर कर्नाटकशी जोडावे अशी कर्नाटकातील कानडी भाषिकांची भावना आहे. ही मागणी पूर्ण होत नाही तोवर मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याची मागणी सावदी यांनी केली होती. सावदी यांच्या या वक्तव्याचा भाई जगताप यांनी समाचार घेतला. 'सावदी हे कर्नाटकातील भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. या पदावरच्या वक्तीनं असं निरर्थक विधान करणं निषेधार्ह आहे. एखादं वक्तव्य करताना त्यांनी किमान अक्कल वापरायला हवी. ज्या महाजन समितीच्या अहवालाचा संदर्भ देऊन सावदी मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी करतात, तो अहवाल बेळगावसह सीमाभागाशी संबंधित आहे. मुंबईशी त्याचा दुरान्वये देखील संबंध नाही. सर्वोच्च न्यायालयात सध्या असलेले प्रकरण पूर्णपणे वेगळे आहे,' असं जगताप म्हणाले. सावदी यांना फटकारतानाच जगताप यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवरही तोफ डागली. 'भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस व त्यांचे चमचे एरवी मोठमोठ्या बाता मारतात. त्यांना सावदी यांचं हे वक्तव्य खटकलं कसं नाही? त्यांच्या विरोधात ते चकार शब्दही काढत नाहीत. सारख्या दीडदमडीच्या नटीनं मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली, तेव्हा भाजपचे हेच चमचे तिची तुलना झाशीच्या राणीशी करत होते. आताही सावदी यांच्या वक्तव्यावर हे लोक मूग गिळून गप्प आहेत. हेच त्यांचं मुंबईबद्दलचं प्रेम आहे का?,' असा सवालही जगताप यांनी केला आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

पिस्तूल दाखवून शिवसैनिकांनी केली गाडी ओव्हरटेक; व्हिडिओ व्हायरल

मुंबई: वाहतूक कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी एक कारचालक व त्याचा सहकारी इतर वाहनचालकांना चक्क पिस्तुलाचा दाखवत असल्याचं समोर आलं आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर हा प्रकार घडला असून याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. पिस्तूलबाज वाहनचालकाच्या गाडीवर शिवसेनेचा लोगो असल्यानं उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे. (Shiv Sainiks Brandishing Revolver on Mumbai-Pune Express Highway) वाचा: एमआयएमचे खासदार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 'महाराष्ट्रातील पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील हे चित्र आहे. वाहनावरील लोगो सर्व काही सांगून जातो. शुक्रवारी रात्री शिवसैनिक त्यांच्या गाडीसाठी वाट काढत असताना रिव्हॉल्व्हरचं ब्रँडिंग करीत होता. राज्याचे गृहमंत्री व पोलीस महासंचालक याची दखल घेतील का,' असा सवाल जलील यांनी केला आहे. जलील यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अनेक ट्विटरकरांनी हा व्हिडिओ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, आदित्य ठाकरे यांना टॅग करून रीट्वीट केला आहे. शिवसैनिक आपल्याच पक्षाची बदनामी करत असल्याचं काहींनी म्हटलं आहे. ही सत्तेची गुर्मी असल्याचं काहींचं म्हणणं आहे वाचा: शिवसेनेकडून अद्याप यावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या गाडीवर शिवसेनेच्या वाघाचे चित्र असले तरी पिस्तूल दाखवणारे लोक शिवसैनिकच आहेत का, याविषयी अद्याप काहीही स्पष्ट होऊ शकलेले नाही. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

'अण्णा हजारे नक्की कोणाच्या बाजूने?; महाराष्ट्राला तरी कळू द्या'

मुंबई: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ज्येष्ठ समाजसेवक यांनी उपसलेली उपोषणाची तलावर अखेर म्यान केल्यामुळं उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेनं अण्णांच्या या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. लोकशाही, शेतकऱ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांचा स्वाभिमान याबाबत अण्णांना भूमिका घ्यावीच लागेल. कृषी कायद्यांबाबत त्यांची भूमिका काय आहे? या कायद्यांविरोधात प्राणार्पण करण्यास तयार असलेल्या शेतकऱ्यांना अण्णांचा पाठिंबा आहे का? अण्णा नक्की कोणाच्या बाजूने? या प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला कळायला हवीत,' असा टोला शिवसेनेनं हाणला आहे. ( Reaction after Cancels Hunger Strike) वाचा: शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या आजच्या अग्रलेखातून अण्णा हजारे यांच्या स्थगित झालेल्या आंदोलनावर तिरकस भाष्य करण्यात आलं आहे. 'अण्णांनी उपोषणाचं अस्त्र बाहेर काढायचं आणि नंतर ते म्यान करायचं असं यापूर्वीही घडलं आहे. त्यामुळं आताही ते घडलं तर त्यात अनपेक्षित असं काही नाही. भाजप नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांमुळं अण्णांचं समाधान झालं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मूळ प्रश्न कृषी कायद्याची दहशत आणि शेतकऱ्यांच्या विरोधातील दडपशाहीचा आहे. या संदर्भात अण्णा निर्णायक भूमिका घेत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. मात्र अण्णांनी उपोषण मागं घेतलं आहे. त्यामुळं कृषी कायद्यांबाबत त्यांची नेमकी भूमिका काय हे तूर्त तरी अस्पष्टच आहे,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. अण्णांच्या उपोषण स्थगितीवर म्हणते... >> लाखो शेतकरी साठ दिवसांपासून सरकारशी संघर्ष करीत आहेत. सरकार आता त्यांचं आंदोलन चिरडायला निघालं आहे. वीज, पाणी, अन्नधान्याची रसद कापली आहे. शेतकऱ्यांविरोधात ‘लुकआऊट’ नोटीस बजाविण्यात आली आहे. हे धक्कादायक आहे. अण्णा हजारे यांचे या घडामोडींवर नेमके काय मत आहे? >> मुळात उपोषणाचा इशारा देण्यामागचा अण्णांचा नेमका हेतू काय होता? कृषी कायदे रद्द करावेत असं आंदोलक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. अण्णा हजारे यांचं उपोषण शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी होतं काय हे स्पष्ट झालेलं नाही. तसं असतं तर त्यांना मोदी सरकारविरोधात उघड भूमिका घ्यावी लागली असती. राळेगणमध्ये मनधरणीसाठी येणाऱ्या भाजपच्या पुढाऱ्यांना तसं स्पष्ट शब्दांत सांगावं लागलं असतं. वाचा: >> मनमोहन सिंग पंतप्रधान असताना अण्णांनी दोन वेळा दिल्लीत जंगी आंदोलन केलं. या आंदोलनाच्या मशालींवर तेल ओतण्याचं काम तेव्हा भाजप करीत होता, पण गेल्या सात वर्षांत मोदी राज्यात नोटाबंदीपासून लॉकडाऊनपर्यंत अनेक निर्णयांमुळं जनता बेजार झाली, पण अण्णांनी कूसही बदलली नाही. म्हणजे आंदोलने फक्त काँग्रेस राजवटीतच करायची काय? बाकी आता रामराज्य अवतरले आहे काय? >> अण्णा माजी सैनिक आहेत. देशाच्या बॉर्डरवर सैनिकांची स्थिती आज नक्की कशी आहे? चिनी सैन्यानं भारताची जमीन बळकावली आहे. हा विषय अण्णांसारख्या समाजधुरिणांनी सरकारला जाब विचारावा असाच आहे, पण अण्णा आज एकाकी पडले आहेत. राजकीय पक्षांनी त्यांना वेळोवेळी वापरून घेतलं. त्यात अण्णांच्या शरीराची प्रचंड झीज झाली. उपोषण करणं व ती पुढे रेटणं ही साधी गोष्ट नाही. मागच्या उपोषणाचे परिणाम अण्णांच्या शरीराच्या अनेक अंगांना भोगावे लागत आहेत. पण अण्णांनी एखादे आंदोलन छेडणे यास आजही महत्त्व आहेच. >> अण्णा हजारेंनी उघडपणे भूमिका घेण्याची गरज आहे. ९०-९५ वर्षांचे शेतकरी गाझियाबादच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. अशा वयोवृद्ध शेतकऱ्यांना नैतिक बळ देण्यासाठी आता अण्णांनी उभं राहायला हवं. राळेगणात बसून भाजप पुढाऱ्यांबरोबर सोंगट्या खेळण्यात आता हशील नाही. प्रसंग युद्धाचाच आहे व युद्ध आता गावातून व मंदिरातून होणार नाही. मैदानात उतरावे लागेल.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मुंबईकरांनो सांभाळा! लोकल ट्रेनच्या वेळेचा नियम मोडल्यास शिक्षा होणार

म. टा. प्रतिनिधी, राज्य सरकारने आणि रेल्वेने मंजूर केलेली वेळ वगळता अन्य वेळेत सर्वसामान्यांनी प्रवास करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा, आयपीसी १८८ आणि यानुसार कारवाई होईल, असे मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी सांगितले. विनागर्दीच्या वेळेत सर्वांना १ फेब्रुवारीपासून लोकलमुभा दिल्यानंतर संभाव्य गर्दी टाळण्यासाठी रेल्वे पोलिसांना एकूण २६५० सुरक्षा रक्षकांची अतिरिक्त रसद पुरवण्यात आली आहे. यात महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आणि होमगार्ड यांचा समावेश आहे. यांच्या जोडीला रेल्वे सुरक्षा दलाकडून ही गर्दी नियोजनाचे काम करण्यात येईल. वाचा: गर्दी बाबत संवंदेनशील असलेल्या रेल्वे स्थानकांवर सुरक्षा पुरवण्यासाठी सरकारने २००० होमगार्ड आणि ६५० सुरक्षा महामंडळाचे जवान रेल्वे पोलिस दलास दिले आहेत. याचबरोबर आणि रेल्वे पोलिस असे एकत्र मिळून गर्दी रोखण्यासाठी कामगिरी बजावतील, असेही आयुक्त सेनगावकर यांनी स्पष्ट केले. हेल्पलाइन सेवा सायंकाळच्या सर्व महिला डब्यांमध्ये रेल्वे पोलिस नियुक्त करण्यात येणार असून कोणत्याही प्रवाशांना अडचण आल्यास त्यांनी १५१२ या रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा. सध्या गर्दी कमी असल्याने रेल्वे स्थानक आणि परिसरात गुन्हे करणाऱ्यांवर विशेष कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

राम मंदिर निधी: 'भाजपकडून गोळा केल्या जाणाऱ्या पैशाचा हिशेब घ्या'

मुंबई: 'अयोध्येतील राम मंदिराच्या नावानं भाजप व आरएसएस घरोघरी जाऊन रोख पैसे गोळा करत असून त्यांच्याकडून जनतेला लुबाडले जाण्याची शक्यता आहे. हा पैसा भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या घरी किंवा पक्षासाठी वापरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं जनतेनं आपला निधी थेट राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये जाईल याची खबरदारी घ्यावी. तसंच, भाजपा-आरएसएसनं गोळा केलेला निधी ट्रस्टला पोहोचला की नाही याची चौकशी राज्य सरकारने करावी, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. () वाचा: राम मंदिराच्या उभारणीसाठी देशपातळीवर राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून निधी गोळा केला जात आहे. सोबतच संघ परिवारातील संघटनांकडूनही निधी गोळा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. 'भाजप व संघ परिवाराने राम मंदिरासाठी यापूर्वीही निधी गोळा केला होता. त्याचे काय झाले याची माहिती त्यांनी दिलेली नाही. राम मंदिरासाठी गेली अनेक वर्षे लढणाऱ्या निर्मोही आखाड्याने विश्व हिंदू परिषदेवर १४०० कोटी रुपये लुबाडल्याचा आरोप केला होता. अखिल भारतीय हिंदू महासभेने २०१५ साली विहिंपने १४०० कोटी रुपये आणि अनेक क्विंटल सोने लुबाडले गेल्याचा आरोपही केला होता. तशी तक्रारही पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आली होती. मात्र, याची चौकशी करण्याची तयारी भाजपच्या सरकारने दाखवलेली नाही, असं सावंत म्हणाले. वाचा: राम मंदिरासाठी भाजपकडून निधी गोळा करण्याच्या कार्यक्रमाला अखिल भारतीय हिंदू महासभेनं विरोध केला आहे. भाजपला अयोध्येत राम मंदिर कधीच नको होते आणि भाजपसाठी हा केवळ राजकीय आणि पैसे कमावण्याचा कार्यक्रम आहे. गेल्या तीन दशकामध्ये भाजपनं जमा केलेल्या पैशाचा अजूनही हिशोब दिलेला नाही, असं हिंदू महासभेचे प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी यांनी सांगितलेलं आहे. निधीचा हिशेब सार्वजनिक न केल्यास कोर्टात जाण्याचा इशाराही जोशी यांनी दिला आहे, याकडं सावंत यांनी लक्ष वेधलं. सावंत यांनी दिली निधी संकलनातील गैरव्यवहाराची उदाहरणे >> १० सप्टेंबर २०२० रोजी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमधून ६ लाख रुपये क्लोन चेकच्या माध्यमातून काढले गेले होते. >> १२ एप्रिल २०२० रोजी दिल्लीच्या एका युवकावर अयोध्येतील राम मंदिर पोलिस ठाण्यात खोट्या ट्रस्टच्या नावाने खोटी वेबसाइट काढून पैसे लुबाडल्याची देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे. >> खोट्या पावत्या दाखवून राम मंदिरासाठी निधी गोळा करणाऱ्या ४ लोकांवर श्रीराम मंदिर निर्माण समर्पण निधी समितीच्या मुरादाबाद येथील अध्यक्षांनी गुन्हा दाखल केलेला आहे. >> उत्तर प्रदेशातील पिलीभित येथे ५ लोकांनी खोट्या संघटनेच्या माध्यमातून पैसे गोळा केल्याचं उघड झालं आहे. >> दिल्ली येथे राम मंदिर ट्रस्टच्या नावाने खोटे ट्विटर, वेबसाइट बनवल्याची तक्रार राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनी केली आहे. >> राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रच्या नावाने घोटाळा केला जात असून अपहार करणाऱ्या १३ UPI ( United payment Interface) ची यादीच आरएसएसशी संबंधित ऑप-इंडिया या न्यूज पोर्टलनं दिली आहे. >> सूरत पोलिसांनी १६ जानेवारीला कारवाई करून एका युवकाला पैसे गोळा करताना पकडले आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Pune news: 'ते' मावस बहिणीकडे गेले होते, घरी परतल्यानंतर हादरलेच!

पुणे: पुण्यातील परिसरात २७ जानेवारी रोजी रात्री उशिरा घरफोडीची घटना घडली. चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून साधारण अडीच लाख रुपयांचा ऐवज पळवला. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चिखली परिसरातील राजे शिवाजीनगर परिसरात रामदास जाधव (वय ३३) हे राहतात. ते मूळचे कोल्हापूरमधील करवीर येथील रहिवासी आहेत. घरात झाल्याची तक्रार त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते मावस बहिणीला भेटण्यासाठी तळेगाव-दाभाडे येथे गेले होते. घरातून बाहेर पडताना त्यांनी दरवाजाला कुलूप लावले होते. रात्री सव्वा दहा ते साडेअकरापर्यंत त्यांचे घर बंद होते. घरात कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून पोबारा केला. चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत अंदाजे २ लाख ४१ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. जाधव हे घरी आल्यानंतर त्यांना धक्काच बसला. घरातील दागिने चोरीला गेले होते. त्यांनी या घटनेची माहिती चिखली पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास चिखली पोलीस करत आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

लोकल प्रवासावर वेळेच बंधन; भाजपनं ठाकरे सरकारला केला 'हा' सवाल

मुंबईः सर्वसामान्य नागरिकांसाठी १ फेब्रुवारीपासून लोकल सुरु करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. मात्र, लोकलमधून प्रवास करण्यासाठी नागरिकांना काही बंधनं पाळावी लागणार आहेत. ठाकरे सरकारच्या या निर्णयावर भाजपनं जोरदार टीका केली आहे. सर्वासामान्यांना १ फेब्रुवारीपासून लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र, लोकल प्रवासासाठी विशिष्ट वेळा ठरवण्यात आल्या आहेत. सकाळची पहिली लोकल ते सकाळी ७ वाजेपर्यंत ते दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल. प्रशासनानं ठरवून दिलेल्या या वेळांवर भाजपनं जोरदार आक्षेप घेतला आहे. भाजपचे राम कदम यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. वाचाः लोकल ट्रेन पाच महिने उशिरा सुरु करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय सरकारचा निष्काळजीपणा दाखवतो. मंदिरा अगोदर बार उघडण्याची घाई करणारे महाविकास आघाडी सरकार या गोष्टीचे उत्तर कधी देणार? सकाळी ७च्या अगोदर रात्री ९. ३० नंतर या ट्रेनचा फायदा कोणाला? का पुन्हा बारवाल्यांची चिंता?, असा सवाल राम कदम यांनी केला आहे. वाचाः सरकारच्या निष्काळजीपणामुळं लाखो लोकांना नुकसान झालं, दूर राहणाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या, बदल्यांच्या पाठी मागे लागलेले हे सरकार, जनतेच्या प्रति गंभीरता कधी दाखवणार, अशा शब्दांत टीका केली आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मनसेचे जय श्रीराम! राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार

मुंबई: दोन वर्षांपूर्वी पक्षाचा झेंडा बदलून हिंदुत्वाच्या दिशेनं वाटचाल करण्याचे संकेत दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आणखी पुढचं पाऊल टाकणार आहे. मनसे अध्यक्ष हे अयोध्या दौरा करणार आहेत. राज यांचा हा दौरा झाल्यास मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हे आहेत. वाचा: आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीनं मनसेची महत्त्वाची बैठक आज वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये झाली. मनसेच्या पुढील रणनीतीवर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीतील निर्णयांची माहिती मनसेचे नेते यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज ठाकरे हे १ ते ९ मार्च या कालावधीत अयोध्येचा दौरा करतील, असं नांदगावकर यांनी सांगितलं. राज ठाकरे यांच्या करिष्म्यामुळं मनसे हा पक्ष सतत चर्चेत असला तरी संसदीय राजकारणात मनसेची ताकद खूपच कमी आहे. एक आमदार आणि जेमतेम काही नगरसेवक एवढीच मनसेची ताकद आहे. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचं कौतुक करणाऱ्या राज ठाकरे यांनी कालांतरानं मोदींविरोधात आघाडी उघडली होती. त्यानंतर अचानक त्यांनी हिंदुत्वाची कास धरली आणि मोदी विरोधही थांबवला. आता नव्या भूमिकेसह मनसे निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीची महाविकास आघाडी झाल्यानं राज्यातील राजकीय समीकरणं बरीच बदलली आहेत. सध्या प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप महाविकास आघाडीशी टक्कर घेत आहे. या साऱ्यामध्ये मनसेला स्थान निर्माण करायचे आहे. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक मनसेच्या भवितव्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीत चांगलं यश मिळवणं मनसेसाठी आवश्यक आहे. हिंदुत्वाची भूमिका घेतल्यामुळं मनसे भाजपशी युती करणार का, अशी एक चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. राज यांच्या अयोध्या दौऱ्यामुळं युतीच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळंच या दौऱ्याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

सिंघु बॉर्डर पर किसानों के साथ स्थानीय लोगों की झड़प, पुलिस ने आंसू गैस के गोले दागे

डिजिटल डेस्क ( भोपाल)। दिल्ली पुलिस ने शुक्रवार को दिल्ली-हरियाणा की सिंघु सीमा पर सैकड़ों ग्रामीणों की भीड़ को तितर-बितर करने के लिए लाठीचार्ज किया और आंसू गैस के गोले दागे। दरअसल स्थानीय लोग इलाके को प्रदर्शनकारियों से खाली करवाना चाहते थे। झड़प में दिल्ली पुलिस का एक एसएचओ घायल हो गया।

स्थानीय लोग प्रदर्शन स्थल पर पहुंचे और दो महीने से अधिक समय से स्थल पर मौजूद आंदोलनकारियों को जगह खाली करने के लिए कहने लगे। दोनों पक्षों में तीखी बहस के बाद, स्थानीय लोगों ने किसानों के तंबू पर हमला करना शुरू कर दिया। इसके बाद दोनों समूहों के बीच पथराव हुआ। दिल्ली पुलिस और सिंघु सीमा पर तैनात सुरक्षाकर्मियोंको प्रदर्शन स्थल पर भीड़ को तितर-बितर करने के लिए आंसू गैस के गोले दागने पड़े।

भीड़ को नियंत्रित करने के लिए पुलिस ने लाठीचार्ज भी किया। अलीपुर पुलिस स्टेशन हाउस ऑफिसर सहित कई पुलिसकर्मी घायल हो गए। दिल्ली पुलिस के सूत्रों के मुताबिक, कई लोगों को हिरासत में लिया गया है।

भारतीय किसान यूनियन  के नरेश टिकैत ने आज कहा कि  सरकार हठधर्मी हो रही है, अगर सरकार चाहती तो फैसला बहुत जल्दी हो जाता। अगर मुद्दे का हल नहीं होता तो गाज़ीपुर बाॅर्डर पर आंदोलन चलेगा। 

आप नेता, मंत्रियों ने दिल्ली की सीमाओं पर प्रदर्शनकारी किसानों से मुलाकात की

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल की नेतृत्व वाली दिल्ली सरकार में कैबिनेट मंत्रियों सहित आम आदमी पार्टी (आप) के नेताओं ने शुक्रवार को दिल्ली की तीनों सीमाओं पर प्रदर्शन कर रहे किसानों से मुलाकात की। आप के वरिष्ठ नेता और दिल्ली के उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया शुक्रवार सुबह 11.30 बजे गाजीपुर बॉर्डर पहुंचे। सूत्रों ने आईएएनएस को बताया कि आप के वरिष्ठ पदाधिकारियों ने गुरुवार रात एक बैठक में प्रदर्शन स्थल पर जाने का फैसला किया था।

उन्होंने यह भी बताया कि आप नेताओं ने दिल्ली सरकार द्वारा उन्हें प्रदान की जा रही पानी, शौचालय और नागरिक सुविधाओं का जायजा लेने के लिए सीमाओं पर किसान विरोध स्थलों का दौरा करने की योजना बनाई थी।

आप सरकार आंदोलन की शुरुआत से ही प्रदर्शनकारीकिसानों का समर्थन कर रही है। आप प्रमुख और दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शुक्रवार को एक बार फिर किसानों के समर्थन में सामने आए और ट्वीट किया, हम किसानों के साथ खड़े हैं। आपकी मांगें वास्तविक हैं। किसानों को बदनाम करना और उन्हें देशद्रोही बताना पूरी तरह से गलत है।

एक अन्य वरिष्ठ आप नेता सत्येंद्र जैन ने सिंघु सीमा का दौरा किया, जहां किसान पिछले दो महीनों से विरोध प्रदर्शन कर रहे हैं। जैन के साथ आप के राष्ट्रीय प्रवक्ता और दिल्ली जल बोर्ड (डीजेबी) के उपाध्यक्ष राघव चड्ढा भी थे, जिन्होंने आरोप लगाया कि दिल्ली पुलिस ने किसानों को पानी की आपूर्ति बाधित करने की कोशिश की।



.Download Dainik Bhaskar Hindi App for Latest Hindi News.
.
...
-farmers-protest: tense on Singhu border, After Group Barges In, Cop Injured
.
.
.


from दैनिक भास्कर हिंदी

मोठी बातमी! १ फेब्रुवारीपासून सर्वांना लोकल प्रवास करता येणार

मुंबई: करोनाच्या संकटामुळं सुमारे दहा महिन्यांपूर्वी बंद झालेली व त्यानंतर मर्यादित प्रवाशांसाठी सुरू असलेली मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा येत्या १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली होणार आहे. मात्र, प्रवासाच्या वेळा मर्यादित असणार आहेत. तसं पत्र राज्य सरकारनं मध्य व पश्चिम रेल्वेला लिहिलं आहे. त्यामुळं मुंबईसह आसपासच्या शहरांत राहणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. ( For All) राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या सहीने आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागानं हे पत्र लिहिलं आहे. त्याद्वारे सर्वांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याची सूचना मध्य व पश्चिम रेल्वेला करण्यात आली आहे. रेल्वेला ही सूचना करतानाच मुंबईकरांच्या सोयीसाठी व उपनगरातील विविध कार्यालये व आस्थापना यांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी, असं आवाहनही सरकारनं केलं आहे. वाचा: विशिष्ट वेळांच्या मर्यादेत मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली होती. यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते. सर्व प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरू करताना गर्दी होणार नाही व आरोग्याचे नियम पाळले जातील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार कोणत्या वेळेत सर्वसामान्यांना प्रवासाची परवानगी देता येईल, हे देखील सरकारनं रेल्वेला कळवलं आहे. या पत्रानुसार सर्वसामान्य प्रवाशांसाठी खालीलप्रमाणे ही सेवा उपलब्ध असणार आहे: कधी प्रवास करता येईल: सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल. कधी प्रवास करता येणार नाही: सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील. उपहारगृहे व दुकानांसाठी वेळा मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने व आस्थापना रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येतील तसेच उपहारगृहे रात्री १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येतील. दुकानांसाठी कमाल कर्मचाऱ्यांची ३० टक्के उपस्थितीची अट तसेच उपहारगृहे, फूड कोर्ट यासाठी वेळोवेळी निर्गमित एसओपीप्रमाणे अंमलबजावणी राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मुंबई लोकल ट्रेन: रेल्वे प्रशासनाच्या 'या' प्रतिक्रियेमुळं वाढला संभ्रम

मुंबई: येत्या १ फेब्रुवारीपासून मुंबईतील उपनगरीय लोकल सेवा मर्यादित वेळेत सर्वांसाठी सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तसं पत्र मध्य व पश्चिम रेल्वेला देण्यात आलं आहे. त्यामुळं एकीकडं सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असतानाच रेल्वे प्रशासनानं घेतलेल्या भूमिकेमुळं संभ्रम वाढलं आहे. (Railway Administration on Resuming Mumbai Local Train) वाचा: राज्य सरकारनं दिलेलं पत्र आम्हाला मिळालं आहे. सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्याच्या सरकारच्या मागणीबाबत रेल्वे बोर्डाला कळवण्यात येईल. बोर्डानं मान्यता दिल्यानंतर त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. त्यामुळं लोकल ट्रेनमधून १ फेब्रुवारीपासूनच प्रवास करता येणार की आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. वाचा: ठराविक वेळेत मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी बैठक झाली होती. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. सर्व प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरू करताना गर्दी होणार नाही व आरोग्याचे नियम पाळले जातील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले होते. त्यानुसार, कोणत्या वेळेत सर्वसामान्यांना प्रवासाची परवानगी देता येईल, याचा सविस्तर तपशील सरकारनं रेल्वेला दिला आहे. त्यानंतर रेल्वे प्रशासनानं आता बोर्डाकडं बोट दाखवलं आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

राज्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढला; 'या' तारखेपर्यंत निर्बंध कायम

मुंबई: करोनाचे संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नसल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं सध्या सुरू असलेला लॉकडाऊन २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कंटेनमेंट झोनमध्ये सध्या असलेले निर्बंध कायम राहणार आहेत. या संदर्भात राज्य सरकारनं आज नवा आदेश काढला आहे. राज्यात आत्तापर्यंत मिशन बिगिन अगेन अंतर्गंत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. आतापर्यंत ज्या सवलती देण्यात आल्या आहेत त्या या पुढेही कायम ठेवतानाच कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच, लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्यात यानं, असंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. याआधी ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबरला मिशन बिगीन अगेन अंतर्गंत काही निर्बंध शिथील करत प्रसिद्ध करण्यात आलेल्या गाइडलाइन्स २८ फेब्रुवारीपर्यंत लागू राहतील, असंही या पत्रकात स्पष्ट केलं आहे. तसंच, या आधी परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी सुरु राहणार आहेत. मुंबई लोकलला परवानगी करोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई लोकल बंद करण्यात आली होती. मिशन बिगीन अंतर्गंत त्यानंतर आत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, महिला आणि अन्य काही क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा देण्यात आली होती. त्यानंतर आज राज्य सरकारने काढलेल्या नव्या आदेशानुसार १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सेवा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, प्रवासाच्या वेळा मर्यादित असणार आहेत. तसं पत्र राज्य सरकारनं मध्य व पश्चिम रेल्वेला लिहिलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मुंबई महापालिका निवडणुकीवरुन मनसे - शिवसेनेत ट्विटरवॉर

मुंबईः मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीसाठी , भाजपसह अन्य पक्षांनीही आत्तापासून तयारी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेला पराभूत करण्यासाठी भाजपनं मोहिम आखण्यास सुरुवात केली असतानाच मनसेनंही शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूकीसाठी काही महिने उरले आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय टीका-टिप्पणीला सुरुवात झाली आहे. पालिकेतील कारभारावरुन मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला डिवचलं आहे. तर, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनीही देशपांडे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करत महापालिकेच्या कारभारावर टीका केली आहे. विरप्पन ने जितकं लोकांना लुटलं नसेल त्या पेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत गँगचा एन्काउंटर करावाच लागेल, असं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलं आहे. तर, संदीप देशपांडेंच्या या टीकेला उत्तर देताना वरुण सरदेसाई यांनी काही वृत्तपत्राची कात्रण पोस्ट 'खरे विरप्पन कोण हे जनतेला चांगलेच माहिती आहे,' असा टोला लगावला आहे. संदीप देशपांडे यांनीही वरुण सरदेसाईंना प्रत्युत्तर देताना एक ट्विट केलं आहे. मी विरप्पनबद्दल बोललो होतो पण वरुण सरदेसाईंना का झोंबल माहित नाही, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

सांगली: हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ पकडले

म. टा. प्रतिनिधी, सांगली: सांगलीजवळ कर्नाळ रस्त्याजवळील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ पकडले. एकूण सहा जणांना अटक केली. दोन तरुणींची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. सांगली शहराजवळील कर्नाळ रोड येथील हॉटेलात केला जात होता. या हायप्रोफाइल रॅकेटचा सांगली पोलिसांनी पर्दाफाश केला. एका पोलीस निरीक्षकासह सहा जणांना अटक करण्यात आली. तर दोन तरुणींची सुटका करण्यात आली. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आटपाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण देवकर, हॉटेल मालक राघवेंद्र शेट्टी, रवींद्र शेट्टी, राजेश यादर, शिवाजी वाघले, सत्यजित पंडित अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर दोन महिलांची महिला सुधारगृहात रवानगी केली आहे. दरम्यान, वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या हॉटेलमधून पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या सहायक पोलीस निरीक्षक मायादेवी काळगावे यांनी फिर्याद दिली आहे. कर्नाळ येथील हॉटेलात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपअधीक्षक अजित टिके, निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्यासह पथकाने छापा टाकून ही कारवाई केली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

राष्ट्रवादी व भाजपच्या हालचालींमुळं काँग्रेसही सावध; केली 'ही' तयारी

अहमदनगर: भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ आता काँग्रेसनेही पक्ष विस्तारासाठी उपक्रम घ्यायला सुरुवात केली आहे. प्रदेशाध्यक्ष यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १ ते ७ फेब्रुवारी या काळात काँग्रेस आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये लोकसंपर्कासह विविध उपक्रम होणार आहेत. पक्षासोबतच प्रदेशाध्यक्ष म्हणून थोरात यांच्या नेतृत्वालाही बळकटी देण्याचा प्रयत्न यामागे असल्याचे दिसून येते. वाचा: महाविकास आघाडीत सहभागी झालेल्या काँग्रेसची सरकारमध्ये उपेक्षा झाल्याचे आरोप अनेकदा झाले. खुद्द काँग्रेसच्या नेत्यांनीही यासंबंधी तक्रारी केल्या होत्या. ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यापर्यंत प्रकरण गेल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून भावना कळविताना काही सूचनाही केल्या होत्या. काँग्रेसमध्ये सध्या केंद्रीय तसेच प्रादेशिक नेतृत्वाच्या बदलाचीही चर्चा सुरू आहे. यामध्ये पक्ष अडकलेला असताना विरोधातील भाजप आणि सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसनेही पक्षविस्तारासाठी विविध उपक्रम सुरू केले. अनेकांचे पक्षप्रवेश झाले. तुलनेत काँग्रेसमधील हालचाली थंडच होत्या. आता मात्र, काँग्रेसनेही हालचाली सुरू केल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या पक्षप्रवेशानंतर काँग्रेस बळकटीकरणासाठी उपक्रमही सुरू करण्यात येत आहेत. यासाठी थोरात यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधण्यात आले आहे. वाचा: नगरला जिल्हा काँग्रेसतर्फे १ ते ७ फेब्रुवारी हा काँग्रेस बळकटीकरण सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या काळात सर्वसामान्यांसाठी उपयुक्त उपक्रम, आरोग्य शिबिरे, वैचारिक प्रबोधनपर कार्यक्रम, गावागावांत नव्या शाखा उघडणे असे कार्यक्रम होणार आहेत. आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कामाला सुरवात करण्यात आली आहे. डॉ. तांबे यांच्यासह आमदार लहू कानडे, बाजीराव खेमनर, ज्ञानदेव वाफारे, मधुकर नवले, सुरेश थोरात, दादा पाटील वाकचौरे, इंद्रभान थोरात, हिरालाल पगडाल, डॉ. एकनाथ गोंदकर यांच्यासह नाशिक विभागातील पाचही जिल्हयांतील पदाधिकारी यासाठी पुढाकार घेत आहेत. या कालावधीमध्ये प्रत्येक तालुक्यात जिल्हा परिषद गट व गण निहाय विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, भाषण स्पर्धा, नोकरी मेळावा, मॅरेथॉन स्पर्धा, क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. गाव तेथे सक्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांची शाखा, युवक काँग्रेसच्या विविध शाखांची स्थापनाही होणार आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेले विविध निर्णय जनतेपर्यंत पोहोचवणे, महसूल मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची विचारधारा अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचतांना केलेली लोकोपयोगी कामे लोकांना सांगणे असे उपक्रम होणार आहेत. वाचा: याबद्दल डॉ. तांबे म्हणाले, ‘काँग्रेस पक्षाला मोठी परंपरा असून हा पक्ष अगदी तळागाळापर्यंत पोहोचला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारचे धोरणात्मक निर्णय जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या काँग्रेस बळकटीकरण सप्ताहाचा अधिक चांगला उपयोग करावा. प्रत्येक तालुक्यात किमान २० शाखा नव्याने उघडण्याचे नियोजन आहे,’ असेही तांबे यांनी सांगितले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

अवघ्या ७१ दिवसांत साईंच्या झोळीत इतक्या कोटींचे दान

अहमदनगर: राज्‍य सरकारच्या आदेशाने शिर्डीचे श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी १६ नोव्हेंबरला खुले करण्‍यात आले. तेव्हापासून म्हणजेच गेल्या ७१ दिवसात सुमारे १२ लाख २ हजार १६२ साईभक्‍तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला. तर, याकाळात साईभक्‍तांकडून तब्बल ३२ कोटी २ हजार १९१ रुपये देणगी रोख स्वरूपात संस्‍थानला प्राप्‍त झालेली आहे. याशिवाय ७९६ ग्रॅम सोने व १२ हजार १९२ ग्रॅम चांदी संस्‍थानला देणगी स्‍वरुपात प्राप्‍त झालेली आहे. (Donation to Shirdi Sai Baba Temple) वाचा: संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ही माहिती दिली. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मागील वर्षी मार्च महिन्यात राज्यातील धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. राज्य सरकारने ही धार्मिक स्थळे उघडण्यास १६ नोव्हेंबरला परवानगी दिली. तेव्हापासून शिर्डीच्या साई मंदिरात म्हणजेच गेल्या ७१ दिवसात १२ लाख २ हजार १६२ भाविकांनी दर्शन घेतले आहे. तर १० लाख ४५ हजार भाविकांनी साई प्रसादालयात भोजनाचा लाभ घेतला आहे. या काळात साई संस्थानला रोख स्वरूपात ३२ कोटी २ हजार १९१ रुपये देणगी प्राप्‍त झालेली आहे. याशिवाय ७९६ ग्रॅम सोने व १२ हजार १९२ ग्रॅम चांदी संस्‍थानला साईचरणी भाविकांनी अर्पण केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. वाचा: साई संस्थानच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या भक्तनिवास सुविधेचा गेल्या ७१ दिवसांच्या कालावधीमध्ये जवळपास ३ लाख २० हजार ६३९ लाभ घेतला आहे. याशिवाय साई संस्थानच्या वतीने मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्यांना उदी देण्यात येते. ही उदी तब्बल १० लाख ३१ हजार साईभक्तांना मिळाली आहे, असेही त्यांनी सांगितले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times