Pune news: 'ते' मावस बहिणीकडे गेले होते, घरी परतल्यानंतर हादरलेच!

January 29, 2021 0 Comments

पुणे: पुण्यातील परिसरात २७ जानेवारी रोजी रात्री उशिरा घरफोडीची घटना घडली. चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून साधारण अडीच लाख रुपयांचा ऐवज पळवला. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चिखली परिसरातील राजे शिवाजीनगर परिसरात रामदास जाधव (वय ३३) हे राहतात. ते मूळचे कोल्हापूरमधील करवीर येथील रहिवासी आहेत. घरात झाल्याची तक्रार त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते मावस बहिणीला भेटण्यासाठी तळेगाव-दाभाडे येथे गेले होते. घरातून बाहेर पडताना त्यांनी दरवाजाला कुलूप लावले होते. रात्री सव्वा दहा ते साडेअकरापर्यंत त्यांचे घर बंद होते. घरात कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून पोबारा केला. चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत अंदाजे २ लाख ४१ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. जाधव हे घरी आल्यानंतर त्यांना धक्काच बसला. घरातील दागिने चोरीला गेले होते. त्यांनी या घटनेची माहिती चिखली पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास चिखली पोलीस करत आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: