'आदरणीय राष्ट्रपती आरएसएसच्या त्या कृत्याचा निषेध का करत नाहीत?'

January 30, 2021 0 Comments

मुंबई: प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढणाऱ्या काही शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकावल्यावरून वादंग माजलं आहे. संसद अधिवेशनाच्या आधी अभिभाषण करताना राष्ट्रपती यांनी या प्रकाराबद्दल खंत व्यक्त करत ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं होतं. राष्ट्रपतींच्या या भूमिकेवर वंचित बहुजन आघाडीचे नेते यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. वाचा: प्रजासत्ताक दिनाच्या घडलेल्या घटनेवरून जो संशयकल्लोळ निर्माण केला जात आहे, त्यावर आंबेडकरांनी ट्वीटच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रपती कोविंद यांना इतिहासातील घटनांची आठवण देताना काही प्रश्न केले आहेत. 'तिरंग्याचा कधीही अपमान करणार नाही. तसंच, १५ ऑगस्ट व २६ जानेवारी रोजी आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकवू, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं १९४९ साली सरदार पटेल यांना लेखी दिलं होतं. आदरणीय कोविंद यांना अत्यंत दु:खी मनानं आठवण करून द्यावी लागत आहे,' असं आंबेडकरांनी म्हटलं आहे. आंबेडकरांचे राष्ट्रपतींना सवाल 'सरदार पटेल यांना लेखी दिल्यानुसार, आरएसएसनं आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकवला खरा, मात्र त्याच उंचीवर स्वत:च्या संघटनेचा ध्वज फडकावून आपली नियत दाखवून दिली. हे आपण विसरलात का? शेतकरी आंदोलकांनी तिरंगा उतरवला नाही. तिरंग्याच्या १५ फूट खाली शीख धर्माचा व शेतकऱ्यांचा ध्वज फडकवला. यातून तिरंग्याचा अपमान कसा झाला? शेतकरी आंदोलकांनी तिरंग्याचा अपमान केला असं आपल्याला वाटत असेल तर १५ ऑगस्ट १९४७ साली आरएसएसनं जो काळा दिवस पाळला, त्यांचा निषेध तुम्ही का करत नाही? वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: