नगर : घरामध्ये गळफास घेऊन दोघांनी केल्या आत्महत्या
https://ift.tt/la2m6kx
नगर तालुका / वाळकी, पुढारी वृत्तसेवा : राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. यातील एक घटना नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे, तर दुसरी घटना नगर शहरातील बोरूडे मळ्यात घडली आहे. पहिल्या घटनेत अवघ्या चौदा वर्षे वय असलेल्या शाळकरी मुलाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तेजस बाळासाहेब कोकाटे (रा.चिचोंडी पाटील, ता.नगर) असे मृत मुलाचे नाव आहे. चिचोंडी पाटील गावात ही घटना घडली.
तेजस याने रविवारी (दि. 21) राहत्या घरात सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गळफास घेतला. तेजसने गळफास घेतल्याची माहिती त्याच्या कुटुंबियाला मिळताच त्यांनी त्याला उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. दरम्यान, तेजसने आत्महत्या का केली, याबाबत माहिती समजू शकली नाही.
याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तेजसच्या आत्महत्येबाबत अधिक तपास नगर तालुका पोलिस करीत आहेत.
तरुणाची आत्महत्त्या
भाड्याने राहत असलेल्या घरामध्ये गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. रामदास रभाजी मुखेकर (वय 30 मूळ रा. कोरडगाव, ता. पाथर्डी) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
येथील बालिकाश्रम रस्त्यावरील बोरूडे मळा येथे शनिवारी (दि.20) रात्री 10 वाजता ही घटना घडली. रामदास रभाजी मुखेकर हे बालिकाश्रम रस्त्यावरील बोरूडे मळा येथे आकांत लक्ष्मीकांत बोरूडे यांच्या घरामध्ये भाड्याने राहत होते. रामदास मुखेकर यांनी शनिवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.
घरमालक आकांत बोरूडे यांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. घोगरे यांनी तपासणी केली असता ते उपचारापूर्वीच मयत झालेले होते. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही घटनांमध्ये त्यांच्या आत्महत्येमागील कारण समजले नाही. पोलिस नाईक संतोष गर्जे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
The post नगर : घरामध्ये गळफास घेऊन दोघांनी केल्या आत्महत्या appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/NuAPhDO
via IFTTT
0 Comments: