संगमनेर तालुका पोलिसांचा हायप्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापा , दोन परप्रांतीय मुलींची सुटका
https://ift.tt/xREFWQ6
संगमनेर पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पोखरी बाळेश्वरच्या तळेवाडीच रस्त्यावर सुरू असणाऱ्या एका हायप्रोफाईल वेश्या व्यवसायावर श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून सदरचा कुंटणखाना चालविण्यास प्रोत्साहन देणार्या एका महिलेवर गुन्हा दाखल केला. याशिवाय दोन बंगाली तरुणींची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. त्यामुळे पठार भागात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत घारगाव पोलिसांकडून पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटाच्या माथ्यावरील पोखरी बाळेश्वरच्या तळेवाडीच्या शिवारात हॉर्टल साईकृपाच्या पाठीमागील रस्त्यावर हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय सुरु असल्याची गुप्त माहिती श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली.
घारगाव पोलिसांना माहिती होण्यापूर्वी स्वतः पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी संगमनेर तालुका पो नि अरुण आव्हाड सहाय्यक पो नि ज्ञाने श्वर थोरात, चालक पो. ना. मनोज पाटील ,पोलीस शिपाई नितीन शिरसाठ, महिला पोलीस मंगल जाधव यांच्या पथकासह मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी बुधवारी सायंकाळी बनावट ग्राहकांकडे निशाणी केलेल्या पाचशे रुपयांचा नोटा देवून सदरच्या कुंटणखाण्यात पाठवले. त्यावरुन मिळालेली माहिती सत्य असल्याचे स्पष्ट झाले. पोखरी बाळेश्वरच्या शिवारातील एका शेतात उभारलेल्या पत्र्याच्या शेडवर डोंगराच्या कडेला दबा धरुन बसलेल्या पोलीस पथकाने छापा टाकून त्या शेतमालकाच्या चाळीस वर्षीय पत्नीला ताब्यात घेत त्या ठिकाणाहून पोलिसानी तीस व सव्वीस वर्षीय बंगाली तरुणींची सुटका केली.
याप्रकरणी घारगाव पोलिसात महिला पोलीस शिपाई मंगल जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वेश्या व्यवसाय चालविण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणाऱ्यासह त्याला प्रोत्साहन देणार्या एका चाळीस वर्षीय महिलेच्या विरोधात महिला आणि मुलींचे अनैतिक देह व्यापारास प्रतिबंध करणार्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी या हायप्रोफाईल वेश्या व्यवसायातून सुटका केलेल्या त्या दोन्ही परप्रांतीय मुलींची पोलिसांनी नगरच्या महिला सुधारगृहामध्ये रवानगी केली आहे.
The post संगमनेर तालुका पोलिसांचा हायप्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापा , दोन परप्रांतीय मुलींची सुटका appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/RlrIhPp
via IFTTT
0 Comments: