नगर : निपाणी-वडगाव येथे जबरी चोरीची घटना
https://ift.tt/cOPAjN9
श्रीरामपूर, पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे दाम्प्त्यास मारहाण करून चोरी केल्याची घटना घडली. या ठिकाणी पोलिसांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
निपाणी फाटा येथे वास्तव्यास असणारे कनगरे यांच्या राहत्या घरी चोरट्यांनी रात्री सव्वादोन ते पावणेतीन दरम्यान कटवणीच्या साह्याने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी कनगरे पती-पत्नी झोपलेले असताना चोरट्यांनी दोघांना दमबाजी करीत जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच महिलेच्या गळ्यातील तसेच कानातील सोने ओरबाडून नेले. गळ्यातील सोने तुटत नसल्याने चोरट्याने दाताने तोडून घेतले.
यावेळी शेजारच्या खोलीमध्ये झोपलेले मुलगा व सूनबाई जागे झाले. याप्रसंगी घटनेचे गांभीर्य ओळखत दोघांनीही आरडा-ओरड करत पोलिस पाटलांना घटनेची माहिती दिली. पोलिस पाटील संजय गायधने यांनी मोबाईलवरून ग्राम सुरक्षायंत्रणा यांना घटनेची माहिती दिली. यावरून जवळजवळ दोन ते अडीच हजार नागरिकांना तत्काळ मेसेज गेला. या घटनेची परिस्थिती पाहता नागरिकांनी श्रीरामपूर शहर पोलिस ठाणे या ठिकाणी माहिती दिली. यावरून पोलिस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे, पोलिस हवालदार संतोष परदेशी, रघुनाथ खेडकर, पोलिस नाईक किरण पवार, अमोल जाधव यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची पाहणी करीत वरिष्ठ अधिकार्यांना माहिती दिली.
पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मच्छिंद्र खाडे, तसेच अहमदनगर येथील क्राईम ब्रँच पथकातील मेघराज कोल्हे, जालिंदर माने, शिवाजी ढाकणे, चालक संभाजी कोतकर यांनी घटनेची श्वान पथकाद्वारे पाहणी करून तपास केला. यावेळी परिसरातील संशयित वस्तूवरील हाताचे ठसे घेतले. पोलिस प्रशासनाने तत्काळ संपर्क करून ग्राम सुरक्षा यंत्रणा सज्ज असल्याचे यावेळी नागरिकांमधून समाधानाचे बोल ऐकू आले आहे.
The post नगर : निपाणी-वडगाव येथे जबरी चोरीची घटना appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/U7Q65YC
via IFTTT
0 Comments: