विहिरीत आढळली कार अन् मानवी सांगाडा!

म. टा. वृत्तसेवा, : पंचाळे-पांगरी रस्त्यावरील (ता. ) शेतातील विहिरीत कार (एमपी ०९ सीआर ६२९४) शनिवारी सकाळी आढळून आली. विशेष म्हणजे या कारमध्ये मानवी सांगाडा आढळून आल्याने खळबळ उडाली. एमआयडीसी पोलिसांनी काही तासांतच या प्रकरणाचा उलगडा केला. संबंधित कार मध्य प्रदेशातील इंदूर येथील दिनेश तिवारी यांच्या मालकीची आहे. तर मृत व्यक्ती कारचालक संजय आहिरे (रा. , ता. मालेगाव) याचा आहे. पांगरी गावाकडे जाणाऱ्या मार्गावर सुमारे एक किलोमीटरवर पंचाळे शिवारात सुधाकर बेदरकर यांच्या शेतातील पन्नास फूट खोल विहिरीत स्विफ्ट कार आढळून आली. बेदरकर यांचा मुलगा केतन हा सकाळी मका पिकाला पाणी देण्यासाठी गेला. मोटार पाणी खेचत नसल्याने त्याने विहिरीत डोकावून बघितले. त्याला आतमध्ये कार आढळून आली. आतापर्यंत विहिरीला पाणी जास्त होते. मात्र, आता पिकांना पाणी देण्याचा हंगाम सुरू असल्याने विहिरीतील पाणी उपसा झाल्याने बुडालेली कार दिसून आली. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक दशरथ चौधरी, सहाय्यक उपनिरीक्षक गोरक्षनाथ बलक, गौरव सानप यांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने कार विहिरीतून बाहेर काढली. कारमध्ये मानवी सापळा आढळून आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सिव्हिल रुग्णालयाच्या पथकाने देखील घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ..असा झाला उलगडा संबंधित कारच्या नंबरवरून ती कार मध्य प्रदेशातील इंदूर येथील दिनेश तिवारी यांच्या मालकीची असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली. कारमध्ये त्यांच्या नावाचे ड्रायव्हिंग लायसन्स देखील पोलिसांना मिळाले. त्यांच्या पुणे येथे कामास असलेल्या मुलाने संबंधित कार पुणे येथून इंदूर येथे वडिलांकडे पोहोच करण्यासाठी संजय आहिरे नावाच्या ड्रायव्हरकडे जबाबदारी दिली होती. संजय ही कार इंदूरच्या दिशेने जात असताना पंचाळे शिवारात कारचे टायर फुटलले आणि चालकाचा ताबा सुटल्याने कार बेदरकर यांच्या शेतातील विहिरीत कोसळली असण्याची शक्यता एमआयडीसी पोलिसांनी व्यक्त केली. ही घटना काही महिन्यांपूर्वीची आहे. तिवारी यांच्याकडे कार न पोहोचल्याने त्यांच्या मुलाने पुण्यातील वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: