गोळीबार करून फरार झाला होता, ७ वर्षांनी...

म. टा. प्रतिनिधी, : परिसरातील प्रकरणात सात वर्षांपासून फरारी असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने अटक केली आहे. सोपान नारायण तावरे (वय ४०, रा. जांभळी, ता. हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. वडगाव बुद्रुक येथील शेळकेनगर येथे ७ मे २०१४ रोजी तुकाराम बाबूराव पासलकर यांच्या घरावर गोळीबार झाला होता. या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक केली होती; पण आरोपी तावरे फरारी होता. पोलिस कर्मचारी विल्सन डिसोजा यांना माहिती मिळाली, की तावरे कै. वसंतराव बागूल उद्यान येथे येणार आहे. त्यानुसार पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, उपनिरीक्षक दत्ता काळे यांच्या पथकाने त्याला अटक केली. त्याला पुढील कारवाईसाठी दत्तवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. युनिट तीनच्या पथकाने बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार सारंग विष्णू भोसले (२१, रा. पद्मावती सहकारनगर) याला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व दोन काडतुसे असा ४० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी, भोसलेविरुद्ध अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट तीनकडून सराईत गुन्हेगारांची तपासणी सुरू होती. त्या वेळी सराईत गुन्हेगार भोसले कोथरूड परिसरात आला असून, त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: