क्षेत्रफळाच्या बरोबरीने वाढले गुन्हे! वर्षभरात 14077 गुन्हे

डॉ. सूर्यकांत वरकड







नगर : राज्यात क्षेत्रफळाने सर्वाधिक मोठा असलेला जिल्हा अशी अहमदनगरची ओळख असली तरी ती आता बदलते की काय? अशी परिस्थिती निर्माण होवू पाहते आहे. गुन्हेगारीच्या आकडेमोडीत नगर राज्याच्या पटलावर झळकण्याची चिन्हे दृष्टीपथास येत आहेत. गत वर्षभरात तब्बल 14 हजार 77 विविध प्रकारचे गुन्हे घडले असून त्यातील 9 हजार 674 उघडकीस आले. उर्वरित गुन्हे ‘तपासावर’ आहेत.

खून, दरोडा, चोरी, घरफोडी, जबरी चोरी, अत्याचाराच्या घटना सर्रासपणे सुरू आहेत. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याकरीता 33 पोलिस ठाणे आहेत.


या पोलिस ठाण्यातंर्गत आकडेवारी पाहता वर्षामध्ये गंभीर स्वरूपाचे सुमारे 14 हजार 77 गुन्हे दाखल झाले तर, त्यातील 9 हजार 674 गुन्हे उघडकीस आले. गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असले तरी गुन्हे उघकीस येण्याचे प्रमाणही त्या तुलनेत चांगले, हाच काय तो दिलासा म्हणावा लागेल. राहुरी तालुक्यातील वकील दाम्पत्याचे दुहेरी हत्याकांड, श्रीगोंदा तालुक्यात प्रियकरांच्या मदतीने पत्नीने पतीचा केलेला खून असे काही गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासांत उघडकीस आणले. याशिवाय जनावरे, शेतमाल चोरणारी टोळ्यांचाही पोलिसांनी पर्दाफाश केला. खून, दरोडा, बलात्कार अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे.


2023 मध्ये खुनाचे 105 गुन्हे घडले. त्यातील सुमारे 100 गुन्ह्यांची उकल होत आरोपींना अटकही झाली. पाच गुन्ह्याचा शोध मात्र अद्यापही सुरूच आहे. फसवणुकीचे 342 गुन्हे घडले. त्यातील केवळ 274 गुन्ह्यांचा शोध लावण्यात पोलिसांंना यश मिळाले. तर, अपहराच्या 97 गुन्ह्यांनी पैकी 85 उघडकीस आणले. तर, गतवर्षांमध्ये चोरीचे 4 हजार 347 गुन्हे घडले. त्यापैकी एक हजार 62 गुन्ह्यांची उकल झाली. पोलिसांकडून गुन्ह्यांची उकल होत असली तरी गुन्हे घडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालेले आहे.


दरम्यान, नगर शहरामध्ये धारदार शस्त्राने मारहाणीच्या घटना वाढत चालल्या आहेत. तर, काही घटनांमध्ये आरोपींनी पिस्तुलाचाही वापर केला आहे. क्षुल्लक कारणावरून गोळीबार केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे दिसते. गंभीर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केल्याचे दिसून येते. त्यामुळे स्थानिक पोलिसांचे खबर्‍याचे नेटवर्क कमी पडल्याची चर्चा आहे.


ग्रामसुरक्षा दल वार्‍यावर




गावोगाव ग्राम सुरक्षा दलाची निर्मिती करण्यात आली होती. ग्रामसुरक्षा दल मित्र म्हणून काम करीत होते. रात्रीच्यावेळी गावात गस्त घालणे, गावाचे संरक्षण असे काम ग्रामसुरक्षा दल करीत होते. परंतु, आता ग्रामसुरक्षा दलही वार्‍यावर असून, त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. परिणामी शेमालाची चोरी, जनावरांची अशा घटना घडत आहेत.


हेही वाचा



* ‘आदर्श’ शाळा सहा वर्षे शिक्षकांपासून वंचित!

* भाजपकडून माझ्‍या राजीनाम्‍याची अफवा : मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू

* Accident : मुंबई-पुणे महामार्गावर तीन वाहनांचा अपघात






The post क्षेत्रफळाच्या बरोबरीने वाढले गुन्हे! वर्षभरात 14077 गुन्हे appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T3PtdC

बेलवंडीत बनावट नोटांचे घबाड! दोघा जणांना बनावट नोटांसह अटक

कोळगाव : पुढारी वृत्तसेवा : बनावट हत्यारे व अवैध दारूची चोरटी वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्याने कोळगाव शिवारात बेलवंडी पोलिसांकडून संशयित वाहनांची तपासणी सुरू होती. यामध्ये मोटरसायकलवरील दोन इसमांना थांबवून त्यांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे 5 लाख 80 हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. त्यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या बनावट नोटांचे कनेक्शन उघड होणार आहे. अजय मधुकर पुरके (वय 30, रा. पिंपळगाव भोसले, ता.आर्वी, जि.वर्धा, हल्ली रा. जयभवानीनगर, कोथरूड, पुणे) व अनिल रघुनाथ देसाई (वय 30, रा.यराडवाडी, मल्हार पेठ, ता.पाटण, जि.सातारा, हल्ली रा.जयभवानी नगर, कोथरूड, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.


नगर-दौंड महामार्गावर कोळगाव-घारगाव शिवारात अवैध दारूची व बनावट हत्याराची चोटी वाहतूक होणार असल्याची माहिती बेलवंडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष भंडारे यांना मिळाली होती. त्यानुसार बेलवंडी पोलिस ठाण्याच्या पथकाने रस्त्यावरूनद जाणार्‍या प्रत्येक संशयित वाहनांना थांबवून त्यांची तपासणी केली. रात्री आठच्या सुमारास मोटरसायकलवर दोन इसम दौंडकडून येताना दिसले. त्यांना थांबण्याचा इशारा केला असता, मोटरसायकल न थांबविता ते वेगात पुढे गेले. पोलिसांनी मोटरसायकलचा पाठलाग करून या दोघांना ताब्यात घेतले.


त्यांच्याकडे असलेल्या कापडी पिशवीत काय आहे, असे विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच पिशवीत रक्कम असल्याचे त्यांनी सांगितले. या पैशाबाबत संशय बळावल्याने पोलिसांनी अधिक चौकशी केली. पिशवीत एकाच नंबरच्या बनावट नोटा असल्याचे दिसून आले. या नोटा त्यांनी तयार केल्याचे दोघांनी सांगितले. पिशवीत पाचशे, दोनशे, शंभर रुपयांच्या एकूण पाच लाख 80 हजार रुपयांच्या बनावट नोटा असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपरिीक्षक मोहन गाजरे करत आहेत. पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक मोहन गाजरे, सहायक फौजदार रावसाहेब शिंदे, हवालदार भाऊसाहेब यमगर, शोभा काळे, अविदा जाधव, सुरेखा वलवे, बंजगे, कैलास शिंपणकर, विकास सोनवणे यांनी ही कारवाई केली.


हेही वाचा



* रेड बस अ‍ॅपला एसटी महामंडळाचा दणका; करार रद्द

* महाड : भरदिवसा अडीच लाखांची चोरी, पाच घरे फोडली

* Accident : मुंबई-पुणे महामार्गावर तीन वाहनांचा अपघात






The post बेलवंडीत बनावट नोटांचे घबाड! दोघा जणांना बनावट नोटांसह अटक appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T3MB2B

शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट रद्द करणार : मंत्री दीपक केसरकर

नगर : पुढारी वृत्तसेवा : राज्यभरातील प्राथमिक शिक्षक प्रामाणिकपणे काम करत असून मुख्यालयी राहण्याची अट कायमस्वरूपी रद्द केली जाईल, तसे आदेश देणे बाबतची कार्यवाही तातडीने केली, असे आश्वासन नगरमधील महाराष्ट्र राष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनात ऑनलाइन संबोधत करताना राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. अध्यक्षस्थानी महासंघाचे राज्य नेते संभाजीराव थोरात होते. नगरमधील कल्याण रोडवरील मंगल कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात जिल्हाभरातून आलेल्या शिक्षकांच्या भरगच्च उपस्थितीत मंत्री केसरकर यांनी उपस्थितांना संबोधित केले.


संभाजी तात्यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक शिक्षक संघ राज्यात सक्षमपणे काम करत असून संघाच्या व्यासपीठावरील प्रश्न तातडीने निकाली काढले जातील, असेही ते म्हणाले . यावेळी पुढे बोलताना केसरकर यांनी एमएससीआयटी परीक्षेबाबतीचा ही सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे असे म्हटले व प्राथमिक शिक्षकांना 10-20-30 ही आश्वासित प्रगती योजना ही तातडीने अंमलात आणली जाईल, असेही आश्वस्त केले. यावेळी खासदार सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, डॉ. सुधीर तांबे, राज्याचे नेते संभाजी थोरात, राष्ट्रीय सरचिटणीस बाळासाहेब झावरे, माजी संचालक दिनकर टेमकर, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आदीसह महिला आघाडीच्या नेत्या जयश्री झरेकर, संगीता कुरकुटे, स्वाती झावरे आदी उपस्थित होते.


खा. डॉ. विखे, आमदार जगतापांकडून ग्वाही




याप्रसंगी खासदार सुजय विखे यांनी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत स्वतः लक्ष घालून मुख्यमंत्र्यांशी बोलून मार्ग काढला जाईल, असे सांगितले. आमदार संग्राम जगताप यांनीही मी आपल्या सोबत असल्याचे आश्वासन दिले.


आमदार प्रशांत बंब यांचा बंदोबस्त करा!ञ्च्




शिक्षक नेते रावसाहेब रोहोकले यांनीही आपल्या अभ्यासपूर्ण मनोगतातून आमदार प्रशांत बंब यांचा बंदोबस्त सरकारने करण्याची आग्रही मागणी केली. शिक्षकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय! डॉ. संजय कळमकर यांनी माहिती अधिकारात काहीजण मुख्यालयाच्या प्रश्नावरून शिक्षकांना जाणीवपूर्वक अडचणीत आणत असल्याने मुख्यालयाची अट रद्द करण्याची मागणी केली.


‘या’ दोन शिक्षक नेत्यांमुळे संघास बळकटी!




राज्य सरचिटणीस आबासाहेब जगताप यांनी पाहुण्यांचे स्वागत करून डॉ. कळमकर व रावसाहेब रोहोकले सोबत आल्याने संघ बलाढय झाला असून, यापुढे जिल्ह्यातील व राज्यातील प्राथमिक शिक्षकांना आपले प्रश्न सोडवण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघ हे हक्काचे व्यासपीठ असल्याचे म्हटले. डॉ.कळमकर राज्य संपर्क पदी; रोहोकले उपनेते संजय कळमकर यांची संघाच्या राज्य संपर्क पदी व रावसाहेब रोहोकले यांची उपनेतेपदी निवड करीत असल्याची घोषणा संभाजीराव थोरात यांनी करताच सभागृहात टाळ्यांच्या गजरात त्याला अनुमोदन देण्यात आले.


शिक्षकांची प्रश्न मार्गी लावण्याचा संकल्प




मुख्यालयाची अट रद्द करणे किंवा तिला स्थगिती देणे, एमएससीआयटी परीक्षा विहित काळात न दिल्याने होणारी कपात थांबवणे व झालेली कपात शिक्षकांना पुन्हा मिळवून देणे, जिल्हातर्गत शिक्षक बदली प्रक्रिया राबवणे अशा अनेक प्रश्नांवर त्वरित बैठक पार लावून आदेश निर्गमीत करू, असे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितल्याचे राज्यनेते संभाजीतात्या थोरात यांनी सांगितले.


हेही वाचा



* एसटी सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवू : आमदार नीलेश लंके

* Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या वाटेवर तगडा पोलिस बंदोबस्त!

* आता वकिलांनाही सनद पडताळणी करून घेणे आवश्यक






 


The post शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट रद्द करणार : मंत्री दीपक केसरकर appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T3HSPB

दुष्काळाच्या झळा ! पाण्याअभावी शेती, भावाअभावी शेतकरी संकटात

कैलास शिंदे







नेवासा : निसर्गाच्या लहरीपणामुळे कधीही कोणताही ऋतू सुरू होत आहे. उन्हाळ्याला अजून महिनाभर अवधी असतानाच हिवाळ्यातच उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. यंदा तालुक्यात लवकरच पाणीप्रश्नाचा नागरिकांना सामना करावा लागणार आहे. फेब्रुवारीपासूनच दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. तालुक्यात जेमतेम पाणी पातळी असल्याने सध्या तरी टँकरची गरज नाही.

शेतकरी पिकवलेल्या शेतमालाला भाव नसल्याने आर्थिक संकटात सापडलेला आहे. कापूस, सोयाबीन मालाची वाट लागली आहे.


शेतातील बोअरवेल उन्हाळ्याअगोदरच गुळण्या मारत आहेत. तालुक्यात दमदार पाऊस न झाल्याने मार्चनंतर पाणी कमी होत असतानाच महिन्याअगोदरच पाणी संकट तालुक्यावर आल्याचे चित्र आहे. उशिरा पेरणी झालेल्या व थंडीचा मागमूसही दिसत नसल्याने गहू पिकांची स्थिती कशी होणार या चिंतेत बळिराजा सध्या दिसत आहे. पाण्याची पातळी वाढलेली नसल्याने व पावसाने दगा दिल्याने यंदा ऊस लागवडीचे क्षेत्र कमालीचे घटले आहे. आहे त्या उसाची ऊसटोळ्यांअभावी वाट लागली आहे. तालुक्यातील बाहेरील साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस पळवला आहे.


विहीर व कूपनलिकांच्या पाण्याचा भरवसा नसल्याने कमी पाण्यात आणि कमी दिवसांत येणार्‍या पिकांकडे शेतकर्‍यांचा कल वाढला आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. गहू पिकाला त्याचा फटका बसत आहे. खोडकिडा, तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. फवारणीला वेग आला आहे. चारा टंचाई निर्माण होणार आहे. गंगथडी भागातील बेलपिंपळगाव, जैनपूर, बेलपांढरी, सुरेगाव, भालगाव, वरखेड, गळनिंब, शिरसगाव, प्रवरासंगम या परिसरात जायकवाडीच्या फुगवट्यामुळे पाणी पातळी बरी आहे. या पट्ट्यात उशिरा उन्हाळा जाणवतो. धनगरवाडी, नारायणवाडी, झापवाडी, वांजळपोई, कारेगाव, मुकिंदपूर, म्हसले, गोंडेगाव, पिचडगांव, तेलकुडगाव, वडुले, चिलेखनवाडी, सोनई परिसरातील वाड्या-वस्त्यांमध्ये उन्हाळ्यातील झळा जाणवू लागल्या आहेत.


शेतकर्‍यांनी शेतातील ऊस गेल्यानंतर पाचट जाळू नये. या पाचटाचा जमिनीत खताकरिता उपयोग होईल. शेतात गारवा राहणार आहे. या उपक्रमाची सध्या जनजागृती करण्याचे काम कृषी विभागाकडून केले जात आहे.


– धनंजय हिरवे, तालुका कृषी अधिकारी, नेवासा.


उन्हाळ्याची चाहूल लागली असली, तरी पाणी टँकरची मागणी नाही. नेहमी धनगरवाडी-नारायणवाडी या भागात पाणीटंचाई जाणवत असते. त्यामुळे सध्या सार्वजनिक विहीर अधिग्रहण करण्याचे काम चालू आहे.


– संजय लखवाल, गटविकास अधिकारी, नेवासा


शेतीमालाला भाव नाही. कांद्याने वांदा केला. पावसाळ्यात दमदार पाऊस नसल्याने जमिनीतील पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. यंदाचा उन्हाळा कडक असेल.


– विनायक जाधव, शेतकरी, गोंडेगाव



हेही वाचा



* मराठा आरक्षण हा ऐतिहासिक निर्णय : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

* Jalgaon Crime : गांजा सेवन प्रकरणी तिघांवर कारवाई

* जळगाव : प्लॉट खरेदीच्या नावाखाली फसवणूक






The post दुष्काळाच्या झळा ! पाण्याअभावी शेती, भावाअभावी शेतकरी संकटात appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T3F3Gm

नगर : केडगाव अंबिकानगर परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी

नगर : केडगाव अंबिका नगर परिसरामध्ये बिबट्या दिसून आला, बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले असून दरम्यान नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात बिबट्या दिसताच नागरिकांनी वन विभागाला फोन केला परंतु वनविभागाचा थंड प्रतिसाद यामुळे वनविभागाची उदासीनता दिसून आली. सकाळी 11 वाजता नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते तेव्हा एकच खळबळ उडाली. बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी झाले असून प्रशासनाच होत जाणारं दुर्लक्ष हे नागरिकांच्या जीवावर उठलं आहे. मानव-प्राणी संघर्ष तीव्र होत चालला आहे. याकडे गांभीर्याने बघायला हवं. नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.


हेही वाचा



* K Hoysala: विजयाचे सेलिब्रेशन करताना तरुण क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

* किल्ले रायगडावर तुतारी निशाणी छत्रपतींना समर्पित

* ठाणे : रास्तारोको करणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात






The post नगर : केडगाव अंबिकानगर परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T3CHxc

पुणे-नाशिक रेल्वेमार्ग संगमनेर तालुक्यातूनच न्या! आ. सत्यजीत तांबे

नगर : पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात बदल करत हा मार्ग संगमनेर तालुक्याऐवजी शिर्डीकडे वळवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे संगमनेरकरांमध्ये प्रचंड नाराजी असून आमदार सत्यजीत तांबे यांनी याच असंतोषाचा वाचा फोडली आहे. या मार्गाच्या मूळ आराखड्यानुसार तो संगमनेर तालुक्यातून जाणं अपेक्षित असताना ऐन वेळी हा बदल का केला, असा प्रश्न उपस्थित करत आ. तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात कोणताही बदल न करता तो संगमनेरमधूनच नेण्यात यावा, अशी आग्रही मागणी करणारं पत्र त्यांनी या वेळी दिलं.


राज्य सरकारने महारेलच्या माध्यमातून सिन्नर व संगमनेर तालुक्यात भूसंपादनही केले आहे. एकट्या संगमनेरमधून 103 खरेदीखतांद्वारे थेट शेतकर्‍यांकडून जमिनी खरेदी करण्यात आल्या. असं असताना अचानक या मार्गात बदल करत तो संगमनेरऐवजी राजगुरूनगरवरून थेट शिर्डीकडे वळवण्याचा निर्णय का घेतला, याबाबतही आ. तांबे यांनी उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली.या निर्णयामुळे संगमनेरकरांचं मोठं नुकसान होणार असून जनतेत प्रचंड रोषाचं वातावरण आहे, असं आ. तांबे यांनी निदर्शनास आणून दिलं.


हेही वाचा



* आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत वडणगेच्या प्रेरणाला ब्राँझ

* दुष्काळाच्या झळा ! पाण्याअभावी शेती, भावाअभावी शेतकरी संकटात

* Jalgaon Crime News : शेतकऱ्याचे सव्वा लाख रुपयांचे सामान चोरीला






The post पुणे-नाशिक रेल्वेमार्ग संगमनेर तालुक्यातूनच न्या! आ. सत्यजीत तांबे appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T39Nn9

म्हाळुंगी पुलाच्या दिरंगाईस पालकमंत्रीच जबाबदार : शैलेश कलंत्री

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : म्हाळुंगी नदीला 2022 मध्ये आलेल्या पुरामुळे साईनगरकडे जाणारा म्हाळुंगी नदीवरील पूल खचला. हा पूल तातडीने बांधावा, याकरता निधीसाठी काँग्रेसचे नेते आ. बाळासाहेब थोरात व आ. सत्यजित तांबे यांनी सरकारकडे पाठपुरावा केला; मात्र पूल होऊ नये, यासाठी भाजप स्थानिक पदाधिकार्‍यांनी पुलाचे राजकारण केले. पालिका प्रशासन, राज्य व केंद्रातील सत्ताधारी भाजप व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी संगमनेरकरांना त्रास देण्याकरता अनेक विकासकामे रोखली. म्हाळुंगी नदी पुलाचे काम जाणीवपूर्वक रखडवले, अशी टीका माजी नगरसेवक शैलेश कलंत्री यांनी केली.


कलंत्री म्हणाले, ऑक्टोबर 2022 मध्ये म्हाळुंगी नदीला पूर आल्यामुळे साईनगर व पंपिंग स्टेशनकडे जाणारा पूल खचला. यानंतर काँग्रेसचे नेते आ. थोरात व नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी तत्काळ पाहणी करून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी पुलाची व्यवस्था केली. नवीन पुलाकरता 30 नोव्हेंबर 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे साडेचार कोटी रुपये निधीची मागणी केली. या कामास मुख्यमंत्र्यांनी निधी मंजूर केला, मात्र स्थानिक भाजप पदाधिकार्‍यांनी या कामाचे श्रेय घेण्याकरता पालकमंत्री विखे यांच्यामार्फत राजकारण केले. हे काम रखडवून स्थानिक नागरिकांच्या मनात द्वेषभावना निर्माण करण्याचा हेतू त्यांचा आहे, असा आरोप कलंत्री यांनी केला.


मागील अडीच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत. पालिकेमध्ये प्रशासक आहे. राज्यासह केंद्रात भाजप सरकारे आहेत. सत्तेच्या लालसेपोटी विखे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले. त्यांच्याकडे आता महत्त्वाचे महसूलमंत्रिपद आहे. जिल्ह्यात प्रशासनासह निधी वाटपात त्यांची सत्ता चालते. अशा वेळी त्यांनी या कामासाठी एक रुपयाही नवा निधी दिला नाही. उलट आ. थोरात यांच्या पाठपुराव्यातून तहसील कार्यालयाजवळ सुरू असलेले शॉपिंग सेंटरचे काम अर्धवट बंद करून तो निधी म्हाळुंगी नदी पुलाकरिता वळविला. खरेतर मंत्री विखे यांनी असे न करता नवीन निधी मिळवायला हवा होता, असे असताना दीड वर्षांपासून काम बंद आहे.नवीन पूल उभारणीसाठी आ. थोरात व आ. तांबे यांनी सतत सरकारदरबारी पाठपुरावा केला. स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने केली, असे कलंत्री म्हणाले.


हेही वाचा



* Lok Sabha Election 2024 : भारतीय राजकारणात पद्धतशीर भ्रष्टाचार कसा सुरू झाला?

* कांदा निर्यातबंदीबाबत अपेक्षाभंग : पारनेर बाजार समितीत आंदोलन

* हिरडा नुकसानभरपाईसाठी तळेघर येथे धरणे






The post म्हाळुंगी पुलाच्या दिरंगाईस पालकमंत्रीच जबाबदार : शैलेश कलंत्री appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T36sTQ

Shirdi: सुषमा अंधारेंनी शिर्डीत येऊन तळले 'वडे'




http://dlvr.it/T34Kgk

गवंड्याला दिले अडीच कोटींचे; कर्जतपासणी अधिकारी व थकीत कर्जदार यांना अटक

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर अर्बन बँक घोटाळ्याच्या गुन्ह्यात मंगळवारी बँकचे मुख्य कर्जतपासणी अधिकारी मनोज वसंतलाल फिरोदिया व थकीत कर्जदार प्रवीण सुरेश लहारे यांना अटक केली. ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने केली असून, आरोपींना उद्या त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. बँकेने कर्जविरण करताना गवंडी काम करणार्‍या व्यक्तीला अडीच कोटींचे कर्ज दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.


अर्बन बँक घोटाळ्याप्रकरणी माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी यांच्या फिर्यादीवरून बँकेचे तत्कालीन चेअरमन स्व. दिलीप गांधी यांच्यासह तत्कालीन संचालक, बँकेचे वरिष्ठ अधिकारी, आशुतोष संतोष लांडगे, सचिन दिलीप गायकवाड, रेणुकामाता मल्टिस्टेट सोसायटी लि., मुख्य शाखेचे व्यवस्थापक अच्युत घनश्याम बल्लाळ यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यात 150 कोटींचा घोटाळा फॉरेन्सिक ऑडिटनंतर 291 कोटींवर जाऊन पोचला. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने आतापर्यंत पोलिस तपासात शाखाधिकारी मुकेश जगन्नाथ कोरडे, प्रदीप जगन्नाथ पाटील, बँकेचे माजी संचालक मनेष दशरथ साठे (रा. सारसनगर), अनिल चंदूलाल कोठारी (रा. माणिकनगर), माजी अध्यक्ष अशोक कटारिया यांना अटक केली.


दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेचा पदाभार पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे आल्यानंतर गुन्ह्याच्या तपासाला गती आली. बँकेचे अधिकृत सीए व माजी तज्ज्ञ संचालक शंकर अंदानी याला अटक केली. आज बँकेचे मुख्य कर्ज तपासणीस मनोज वसंतलाल फिरोदिया व थकीत कर्जदार प्रवीण सुरेश लहारे यांना आज अटक केली. उद्या त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक दिवटे, पोलिस कर्मचारी दीपक गाडीलकर, जंबे, घोडके, क्षीरसागर याच्या पथकाने केली. दरम्यान, बँकेचे अधिकृत सीए व माजी तज्ज्ञ संचालक शंकर अंदानी याची पोलिस कोठडीची मुदत आज संपल्यानंतर त्यास न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


किरकोळ मिळकतीवर दिले कोटींचे कर्ज?




अर्बन बँक घोटाळ्यात आज आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने थकीत कर्जदार प्रवीण सुरेश लहारे याला अटक केली. लहारे बनावट कागदपत्रे सादर करून कर्ज घेतल्याचे फॉरेन्सिक ऑडिटमध्ये उघड झाले आहे. लहारे गवंडी काम करीत असून, त्यांच्या किरकोळ मिळकतीवर अडीच कोटींचे कर्ज काढल्याचे निष्पन्न झाले आहे.


कर्जप्रकरणासाठी बनावट कागदपत्रे




बँकेतील प्रत्येक कर्ज प्रकरणाची कागदपत्रे फिरोदिया तपासत होते. मात्र अनेक बनावट कर्जप्रकरणे फिरोदिया यांच्या तपासणीतून पुढे गेल्याचे फॉरेन्सिक ऑडिटमध्ये निष्पन्न झाले आहे.


हेही वाचा



* महापालिका थकली..! 20 तारीख उजाडली तरी कर्मचार्‍यांना पगार नाही

* Nashik News : मनपा शाळांमधील उपस्थितीत १२ टक्क्यांनी वाढ

* Amin Sayani : अमीन सयानी यांना राज्यपालांकडून श्रद्धांजली






The post गवंड्याला दिले अडीच कोटींचे; कर्जतपासणी अधिकारी व थकीत कर्जदार यांना अटक appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T34FNX

छत्रपतींना अभिप्रेत काम उभे करू : आमदार संग्राम जगताप

नगर : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार अंगीकारून समाजाप्रती असलेले कर्तव्य पार पाडत आहे. महाराजांना अभिप्रेत असे काम विकासाच्या माध्यमातून शहरात उभे करू, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण कामाचा प्रारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी खासदार सुजय विखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, आयुक्त डॉ. पंकज जावळे, बाळासाहेब पवार, निखिल वारे, ज्ञानेश्वर काळे, सागर गुंजाळ, संपत नलावडे, संजीव भोर, विवेक नाईक आदी उपस्थित होते.


आमदार जगताप म्हणाले, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मिरवणूक मार्गावरील पहिल्या टप्प्याचे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री विशाल गणपती मंदिरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरणाचे काम मार्गी लागणार आहे. श्री विशाल गणपती मंदिरात भाविक मोठ्या संख्येने येत असून, त्यांना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्याचे काम केले आहे.


माळीवाडा बसस्थानक हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून, या ठिकाणी प्रवासी, विद्यार्थी मोठ्या संख्येने येत असतात. तसेच, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यालय देखील या ठिकाणी असल्यामुळे हा रस्ता रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी शासनाच्या माध्यमातून सुमारे 5 कोटी रूपयाचा निधी प्राप्त झाला असून, नियोजनबद्ध व दर्जेदार रस्ता काँक्रिटीकरणाचे काम मार्गी लागणार आहे.


हेही वाचा



* Crime News : भरदिवसा घर फोडून दीड लाखाची रोकडलंपास

* किसान सभेच्या उपोषणास पाठिंबा; उन्हात 15 कि.मी.ची पायपीट

* वडगाव दरेकरचे काम चार महिन्यांपासून बंदच : कोटी रुपये खर्च पाण्यात






The post छत्रपतींना अभिप्रेत काम उभे करू : आमदार संग्राम जगताप appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T31Xxb

धनगर आरक्षणप्रश्नी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात चर्चा घेवून, अंमलबजावणी करा : सकल धनगर समाजाची मागणी

जामखेड; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र विधिमंडळाच्या मंगळवारी (ता. २०) होणा-या विशेष अधिवेशनात धनगर आरक्षणप्रश्नी विधिमंडळात चर्चा घेवून, धनगर समाजाला अनुसुचीत जमातीचे आरक्षण अंमलबजावणी व्हावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिका-यांना देत सकल धनगर समाजाच्या वतीने रविवारपासून सूरू असलेले ठिय्या आंदोलन सोमवारी मागे घेण्यात आले. मात्र धनगर आरक्षणप्रश्री राज्य सरकार संवेदनशील नसल्याने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.


धनगर आरक्षणप्रश्री सकल धनगर समाजातर्फे रविवारी (ता.१८) चौंडी ते मुंबई आरक्षण दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र प्रशासनाने हस्तक्षेप करत आरक्षण दिंडीला चौंडीतच रोखले. यावर आंदोलनकर्त्यांनी कालपासून चौंडीतच ठिय्या दिला होता. सोमवारी (ता.१९) तहसीलदार गणेश माळी आणि पोलीस निरिक्षक महेश पाटील यांनी चौंडीत येवून आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी यशवंतसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे, अण्णासाहेब रूपनवर, गोंविदराव नरूटे, नितीन धायगुडे, सुरेश बंडगर, घनश्याम हाके, संतोष बिचुकले,अक्षय शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित आंदोलनकर्त्यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.


या निवेदनात म्हटले आहे ,राज्यातील सुमारे ३ कोटी लोकसंख्या असलेला धनगर समाज मागील अनेक वर्षापासून अनुसूचित जमाती (एस.टी. प्रवर्ग) अंबलबजावणीसाठी आंदोलन करत आहे. विद्यमान राज्य सरकार धनगर समाज्याच्या मागणीबाबत सकारात्मक असल्याचे सांगते, परंतु समाजाला आरक्षण मिळत नाही. या संदर्भात राज्य शासनाने नेमलेल्या शिंदे समितीने अद्याप अहवाल दिलेला नाही. या पार्श्वभूमीवर २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात धनगर आरक्षण प्रश्नावर चर्चा होऊन ,आरक्षण अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी १९ फेब्रुवारी २०२४ पासून चोंडी येथे आत्मक्लेश आंदोलन करत आहोत.


शासनाने या आंदोलनाची त्वरित दखल घ्यावी. अन्यथा २१ फेब्रुवारी २०२४ पासून राज्यभर उग्र आंदोलन सुरु करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. अभ्यासगटातील दोन सदस्य आंदोलनात.


धनगर समाजाला अनुसुचीत जमातीचे आरक्षण लागु करण्यासाठी बिहार,मध्यप्रदेश व तेलंगणा या तीन राज्यांचा आरक्षण अंमलबजावणी अभ्यास करण्यासाठी तीन महिण्यापुर्वी राज्य सरकारने नेमलेल्या अभ्यासगटातील आरक्षण अभ्यासक माणिकराव दांगडे आणि गोंविदराव नरुटे हे दोघे चौंडीत ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. यावरून राज्य सरकारने अभ्यासगटाची स्थापना करून,वेळकाढुपणा करून, उघडपणे फसवणूक करत असल्याची भावना धनगर समाज बांधवांमध्ये व्यक्त होत आहे. तीन महिण्यात या अभ्यासगटाला तीन राज्यांचा अभ्यासदौरा करून, राज्य सरकारला अहवाल द्यायचा आहे. मात्र आज तीन महिण्यानंतर केवळ दोन राज्यांचा अभ्यासदौरा या अभ्यासगटाने केला आहे.


राज्य सरकारकडून धनगर समाजाची फसवणूक




धनगर आरक्षणप्रश्री चौंडीत येवूण ५० दिवसात आरक्षण अंमलबजावणी करू म्हणणारे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजण आज १५० दिवसातही काहीही कार्यवाही करताना दिसत नाही. धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी अभ्यासगटाची स्थापना केली. मात्र हा अभ्यासगटाने गेल्या तीन महिण्यात केवळ दोन राज्यांचाच दौरा केला आहे. या अभ्यासगटात सरकारनेच नेमलेले दोन अशासकीय सदस्य आरक्षणप्रश्री आंदोलनात सहभागी होत आहेत. यावरून सरकार उदासिन असल्याचे दिसत असून, सरकारचे हे अपयश मानले जात आहे. सन २०१४ पासून धनगर आरक्षणप्रश्री सरकार केवळ वेळकाढुपणा करत असल्याची भावना धनगर समाजात व्यक्त होत आहे. यशवंतसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी वरील प्रश्र उपस्थित केले आहेत


The post धनगर आरक्षणप्रश्नी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात चर्चा घेवून, अंमलबजावणी करा : सकल धनगर समाजाची मागणी appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T2yyvW

नगर : सुषमा अंधारे यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न

नगर : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे शनिवारी दुपारी जिल्हा न्यायालयात वकील बांधवांशी संवाद साधण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी यापूर्वी देव-देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले असल्याने त्यांना न्यायालयात येण्यास विरोध करण्यात आला. शिवसेनेच्या पदाधिकारी स्मिता अष्टेकर यांनी त्यांच्यावर चप्पल भिरकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी न्यायालयात गोंधळ उडाला होता. शिवसेना उद्धव ठाकरे गटाची मातृतीर्थ ते शिवतीर्थ अशी संवाद यात्रा शनिवारी नगरमध्ये दाखल झाली. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे दुपारी जिल्हा न्यायालयात वकील बांधवांशी संवाद साधण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना मनसेच्या पदाधिकारी अ‍ॅड. अनिता दिघे यांनी प्रचंड विरोध केला. सुषमा अंधारे यांनी यापूर्वी हिंदू देव-देवतांवर टीका केली.


अशा व्यक्तीला आमचा विरोध आहे. तसेच, शिवसेनेच्या पदाधिकारी स्मिता आष्टेकर यांनीही विरोध केला. न्यायालयात आरडाओरडा सुरू झाल्याने तत्काळ भिंगार कॅम्प पोलिसांनी धाव घेतली. महिला पोलिसांनी पुढे जावून दोघांना ताब्यात घेतले. त्यावेळी स्मिता आष्टेकर यांनी सुषमा अंधारे यांना चप्पल फेकून मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सुषमा अंधारे यांनी वकिलांशी अर्धा तास संवाद साधला आणि त्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाल्या. दरम्यान, न्यायालयात गोंधळ होऊनही रात्री उशिरापर्यंत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती.


हेही वाचा



* आज लढलो नाही, तर भाजप काही ठेवणार नाही : आ. रोहित पवार

* जैन संत आचार्य विद्यासागर महाराजांना राज्यपाल बैस यांची श्रद्धांजली

* Nashik | अवैध गुटखा विक्रीप्रकरणी एकास अटक






The post नगर : सुषमा अंधारे यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T2wbb7

जलयुक्त’ रुतले प्रशासकीय गाळात !

नगर : पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाचे महत्त्वाकांक्षी अभियान असलेल्या जलयुक्त शिवारचा गाडा पुन्हा एकदा प्रशासकीय गोंधळामुळे झालेल्या चिखलात रुतला आहे. पूर्वी कृषीकडून जबाबदारी काढून ती जलसंधारणकडे दिली आणि आता पुन्हा ही जबाबदारी जलसंधारणकडून कृषीकडे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र राज्यातील कृषी अधीक्षकांनीच ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ही योजना पुन्हा एकदा रेंगाळण्याची चिन्हे आहेत. जलयुक्त शिवार टप्पा दोन राज्यात राबविण्यात येत आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष आहेत. तर तालुकास्तरावर ही जबाबदारी प्रांताधिकार्‍यांकडे आहे. जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव हे मृद व जलसंधारण अधिकारी ढोकचौळे व त्यांची बदली झाल्याने प्रभारी म्हणून पांडुरंग गायसमुद्रे आहेत.


अशी आहे जिल्ह्याची सध्यस्थिती

जलसंधारण विभागाने जिल्ह्यातील 368 गावांतील कामांचा आराखडा तयार केला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी 19 कोटींच्या 239 कामांना प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत. त्यामुळे योजनेची कामे सुरू झाली आहे.


समितीत काय बदल झाला

शासनाने एक अध्यादेश काढून समितीत बदल केले आहेत. जलसंधारण अधिकारी गायसमुद्रे यांच्याकडून ही जबाबदारी काढून ती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बोराळे यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात हा निर्णय संपूर्ण राज्यासाठीच आहे. तालुकास्तरावरही ही जबाबदारी जलसंधारणकडून काढून ती त्या त्या तालुका कृषी अधिकार्‍यांकडे देण्यात आली आहे.


‘निविदा’ त्यांच्याकडे, काम यांच्याकडे?

कोणत्याही कामात निविदा आणि कार्यारंभ आदेशाला ‘मोल’ आहे. जलसंधारणच्या योजनांच्या 22 पैकी 19 कोटींच्या प्रशासकीय मान्यता, निविदा ह्या जलसंधारण विभागातून झाल्या आहेत आणि योजना राबविण्याचे काम मात्र कृषी विभागाकडे दिल्याने याबाबतही काहीशी नाराजी कानावर येत आहे.


नाहक चौकश्या लावून बदनामी : कृषीचे गार्‍हाणे !

जलयुक्त अभियानाचा पहिला टप्पा कृषी विभागाने चांगल्याप्रकारे राबविला होता. राज्य शासनाने राष्ट्रीय जल पुरस्कारानेही कृषीला गौरविले होते. त्यानंतरही शासनाने मृद व जलसंधारण विभाग कृषीतून वेगळा केला. कृषी विभागाला सापत्न वागणूक दिली गेली. जाणीवपूर्वक बदनामी केली, नाहक चौकश्या लावल्या, यामुळे जलयुक्त दोनचे सचिव पद अर्धवट अवस्थेत कृषी विभागाकडे घेण्यास खात्यातील सर्व तांत्रिक व अतांत्रिक अधिकार्‍याचा विरोध असल्याचे महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ, पुणे यांनी शासनाला पाठविले आहे


The post जलयुक्त’ रुतले प्रशासकीय गाळात ! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T2ttFj

‘रोहयो’चे ई-मस्टरची जबाबदारी आता ग्रामरोजगार सेवकावर!

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात मनरेगाची कामे रेंगाळली आहे. सहा-सहा महिने होऊनही प्रस्ताव धूळखात पडून आहेत. ई-मस्टर काढायचे कोणी, यावरूनही गटविकास अधिकारी, ग्रामसेवकांमध्ये टोलवाटोलवी सुरू होती. अखेर आता शासन आदेशानुसार रोहयो कामाच्या ई मस्टरची जबाबदारी ही त्या-त्या ग्रामपंचायतींच्या ग्रामरोजगार सेवकांकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 1329 ग्रामरोजगार सेवकच आता मागणी आणि कामाचे ई मस्टर काढणार आहेत. महाराष्ट्र राज्यात रोजगार हमीतून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू आहे.


योजना चांगली असली तरी योजना राबविताना प्रक्रियेसाठी होणारा विलंब आणि त्यामुळे रेंगाळलेली योजना, हा विचार करून यात बदल करण्यासाठी शासनाची मानसिकता होती. या प्रामुख्याने मागणीपत्र आणि ई मस्टर हे ग्रामपंचायत पातळीवरच काढले गेले तर योजनेला गती येईल, अशी खात्री शासनाला आहे. त्यामुळेच आता नवीन अध्यादेश काढून ग्रामरोजगार सेवकांवर ही जबाबदारी देण्याचा निर्णय घेतल्याचे पुढे आले आहे.


जिल्ह्यातून तक्रारींचे प्रमाण वाढते

जिल्ह्यात मनरेगाची नवीन कामांची मंजुरी ठप्प झाली आहे. सहा सहा महिने होऊनही कागदपत्रे पंचायत समिती स्तरावरच पडून आहेत. यात गायगोठा, शेळी गोठा अशा अनेक कामांचा समावेश आहे. याबाबत जिल्हा परिषदेतील मनरेगा विभागाकडेही तक्रारी वाढत्या आहेत. मात्र आता नव्या अध्यादेशानुसार मंजुरीची प्रक्रिया सुटसुटीत होणार का, याकडे लक्ष असेल.


असा होणार आता बदल!

मजुरांची मागणी प्राप्त झाल्यानंतर तालुकास्तरावर न जाता ग्रामपंचायत स्तरावरून हजेरीपट करून ई-मस्टरची प्रत वेळीच घेतल्यास ग्रामरोजगार सेवकाला तालुका स्तरावर कामाची मागणीनुसार मजुराची यादी तालुक्याला पोहचण्याकरिता लागणारा कालावधी तसेच ई मस्टर प्राप्त करून घेण्याकरिता लागणारा वेळ वाचेल. तसेच डाटा एंट्री करिता होणारा विलंब टाळता येईल. त्यानुषंगाने महात्मा गांधी नरेगाच्या कामावरील हजेरीपट निर्गमित करण्याची जबाबदारी ग्रामरोजगार सेवक यांना दिली आहे.


The post ‘रोहयो’चे ई-मस्टरची जबाबदारी आता ग्रामरोजगार सेवकावर! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T2rzxx

Nagar : शासकीय जागेवर उभारले व्यावसायिक गाळे

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यातील सारोळा कासार ग्रामपंचायत हद्दीत महाराष्ट्र शासनाच्या नावावर असलेल्या शासकीय जागेत अतिक्रमण करीत, व्यावसायिक गाळे उभारून ते भाडेतत्त्वावर देण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत गावातील माजी सैनिक शरद धामणे यांनी पुराव्यासह तक्रार करूनही, गेल्या तीन महिन्यांपासून प्रशासनाकडून कारवाईस टाळाटाळ केली जात आहे. सारोळा कासार ग्रामपंचायत हद्दीत गट नं. 1/अ/1 मधील जागा ही महाराष्ट्र शासनाची आहे. या जागेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पशुवैद्यकीय दवाखाना व आरोग्य उपकेंद्र आहे. या व्यतिरिक्त असलेल्या मोकळ्या जागेत सारोळा कासार ते अहमदनगर रस्त्याच्या पूर्व बाजूस मच्छिंद्र गणपत काळे, सुभाष मच्छिंद्र काळे, संतोष मच्छिंद्र काळे यांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम केलेले आहे. त्यात व्यावसायिक गाळे काढून ते भाडेतत्त्वावर दिलेले आहेत.


गेल्या तीन वर्षांपासून ते प्रती गाळा पाच हजार रुपये महिना या प्रमाणे भाडे वसूल करून शासनाची फसवणूक करत आहेत. शासकीय जागेतील केलेले हे अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे व त्यांच्याकडून शासनाची फसवणूक करत घेतलेले गाळे भाडे वसूल करून, ते शासनाच्या खात्यावर जमा करण्यात यावे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार या माजी सैनिकाने 7 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच ग्रामपंचायतीकडे केलेली आहे.


या तक्रारीवरून जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांनी 28 डिसेंबर 2023 रोजी नगर तालुका पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना पत्र देवून कारवाईचे आदेश दिले. गटविकास अधिकारी यांनी 10 जानेवारी 2024 रोजी सारोळा कासार ग्रामपंचायतीला पत्र देवून, सदर तक्रारी बाबत नियमानुसार कारवाई करून अहवाल त्वरित सादर करावा, असे आदेश दिलेले आहेत. त्याला महिना उलटूनही काहीही कारवाई झालेली नाही. या गंभीर प्रकाराबाबत प्रशासकीय पातळीवर केवळ कागदी घोडे नाचवित कारवाईसाठी चालढकल केली जात असल्याचा आरोप तक्रारदार माजी सैनिकाने केला आहे.


ग्रामपंचायत अधिनियम, शासन आदेशालाही केराची टोपली

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 53(2)(1), तसेच मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 53 नुसार ग्रामपंचायतींना अतिक्रमण दूर करण्याचे अधिकार आहेत. तसेच, कोणतेही अतिक्रमण ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आल्यावर अथवा निदर्शनास आणून दिल्यावर ते तात्काळ काढून टाकणे हे ग्रामपंचायतीचे कर्तव्य आहे. या शिवाय राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने 4 डिसेंबर 2010 रोजी जिल्हा परिषद/पंचायत समितीा व ग्रामपंचायतीच्या ताब्यातील खुल्या जागा व इमारती यांचे अतिक्रमणां पासून रक्षण करण्याबाबत काढलेल्या शासन निर्णयातही अतिक्रमण हटविण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत. मात्र, ग्रामपंचायतीने तीन महिन्यांनंतरही कारवाई न करता कर्तव्यात कसूर करत ग्रामपंचायत अधिनियम व शासन आदेशालाही केराची टोपली दाखविली आहे.


The post Nagar : शासकीय जागेवर उभारले व्यावसायिक गाळे appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T2my2C

मोदी गॅरंटी म्हणता म्हणता ठाकरे गॅरंटीच्या उद्घाटनाची वेळ : उद्धव ठाकरे

नगर : उद्धव ठाकरे सद्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांची अहमदनगर शहरात नुकतीच एक सभा पार पडली.. त्यावेळी ते बोलत होते.  ‘मोदी गॅरंटी म्हणता म्हणता उद्धव ठाकरे गॅरंटीच्या उद्घाटनाची वेळ त्यांच्यावर आली आहे. ही मोठी गोष्ट आहे.’ असे बोलत त्यांनी मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले.  ठाकरे पुढे म्हणाले की पक्षातून भाऊसाहेब वाघचाैरे गेले पण ते परत आले.. लोखंडे गेले ते गेलेच. वाघचाैरे आणि सदाशिव लोखंडे यांच्यामध्ये एक फरक आहे ते म्हणजे वाघचोरे यांनी पक्ष चोरीचा प्रयत्न कधी केला नाही. गद्दारांनी भगव्याला छेद देण्याचा प्रयत्न करू नये, असेही ठाकरे यांनी म्हटले.


अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाबद्दल बोलतांना ठाकरे बोलले की मोदी हे घराणेशाही विरोधात बोलतात परंतु शंकरराव चव्हाण यांचे पुत्र अशोक चव्हाण ही घराणेशाही नाही का? अजित पवार तुम्हाला चालले हे कोण आहेत? एकनाथ शिंदे आणि त्यांचा मुलगा ही घराणेशाही नाही का? असे प्रश्न ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर टीका करतांना उपस्थित केले. ज्या नरेंद्र मोदींना बाजूला सारायचा प्रयत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी केला तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी मोदींना वाचवले. याची आठवण सुद्धा ठाकरे यांनी सभेत सगळ्यांना करून दिली.


आज शेकतरी कोणत्या परिस्थितीमध्ये आहे हे कोण बघत आहे? त्यांना पीक विमा नाही, हमी भाव नाही, कर्ज माफी नाही. ज्या स्वामिनाथन यांना तुम्ही भारतरत्न दिला त्यांच काम शेतकऱ्यांसाठी आहे हे तरी तुम्हाला माहिती आहे का? भारतरत्नाचा बाजार लावल्याचा आरोप सुद्धा ठाकरे यांनी यावेळी मोदी सरकारवर केला. दिल्लीकडे येणाऱ्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांबद्दल बोलतांना ठाकरे म्हटले की जणू देशात युद्ध सुरू आहे. अशी परिस्थिती दिल्ली सीमेवर सद्या दिसत आहे. यांना जनतेने येणाऱ्या निवडणुकीत उत्तर द्यायला हवं. आपापले जाती-धर्म बाजूला ठेवून देशभक्त ही एकच जात घेऊन एकत्र या. असे आवाहनही जनतेला यावेळी उद्धव ठाकरे यांनी  केले.


हेही वाचा



* इंदापुरातील तीन पोलिसांची मूळ ठिकाणी नियुक्ती

* दौंड जलजीवन मिशन योजनेच्या भ्रष्ट  कारभारावर नागरिकांचा संताप

* Nashik Fraud News | पार्ट टाइम जाॅबचे आमिष






The post मोदी गॅरंटी म्हणता म्हणता ठाकरे गॅरंटीच्या उद्घाटनाची वेळ : उद्धव ठाकरे appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T2kM7q

नगरचं राजकारण; चर्चा तर होणारच !

गोरक्ष शेजूळ







नगर : पुढारी वृत्तसेवा :  आगामी लोकसभेसोबतच आता विधानसभेसाठीही सर्वच पक्षांकडून चाचपणीला वेग आला आहे. मिनी मंत्रालयातील कारभारात आपल्या कर्तृत्वाची छाप सोडणार्‍या लोकप्रतिनिधींच्या नावांचीही यात आपसूकच चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे येणार्‍या निवडणुकांत जिल्हा परिषदेतील काही चेहरे दिसणार का, याकडे लक्ष असणार आहे. जिल्ह्यात लोकसभेच्या दोन व विधानसभेच्या 12 जागा आहेत. यातील नगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राणीताई नीलेश लंके यांचे नाव चर्चेत आहे. त्यांनी स्वतःच निवडणूक लढविण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीविषयी उत्कंठा आहे. याशिवाय काही विधानसभा मतदारसंघांतही अनेक माजी जि.प. सदस्यांच्या नावांबाबत खलबते सुरू आहेत.


जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्या माजी सभापती अनुराधा राजेंद्र नागवडे या श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करणार असल्याची चर्चा लपून राहिलेली नाही. पहिल्या महिल्या उमेदवार हा टॅग लावून वर्षभरापूर्वीच त्यांच्या कार्यकर्त्यांनी जनसंवाद अभियान राबवले होते. जि.प. सदस्य आणि सभापती म्हणून केलेल्या कामाचे कौतुक होत आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे सभापती काशीनाथ दाते यांचा पक्ष निश्चित नसला तरी विधानसभेसाठीची सर्व तयारी झालेली आहे. त्या दिशेने त्यांनी बांधणीही सुरू केल्याचे दिसते आहे.


जिल्हा परिषदेतून मोठा निधी मतदार संघात खर्च केलेला आहे. शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा आमदार मोनिका राजळे यांनी 10 वर्षांपूर्वी पराभव केला होता. त्यानंतर जिल्हा बँकेतही त्यांचा धक्कादायक पराभव झाला. त्यामुळे या ठिकाणाहून आता त्यांच्या सौभाग्यवती जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष राजश्री घुले यांचे नाव चर्चेत येऊ शकते. राजश्री घुले यांनी अध्यक्षपदाच्या माध्यमातून दहीगावने गटासह मतदारसंघातही मोठी विकासकामे केलेली आहेत. याच मतदारसंघात प्रभावती प्रताप ढाकणे यांचेही नाव चर्चेत येताना दिसत आहे. लाडजळगाव गटाच्या माजी सदस्य हर्षदा शिवाजीराव काकडे यांचे नावही चर्चेत आहे. भाजपचे त्यांना मिळणारे तिकीट राजळेंसाठी सोडावे लागल्याची त्या वेळी चर्चा होती. तेव्हापासून त्यांनी पक्षावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या जनशक्ती विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकांची तयारी केली. आता शेतकर्‍यांच्या ताजनापूर प्रकल्पासाठी त्या आवाज उठवीत आहेत.


चर्चा निवडणुकीची म्हटल्यावर लोणी गटाच्या माजी सदस्य, तथा अध्यक्ष म्हणून दोन वेळा मिनी मंत्रालयाचा कारभार चालविलेल्या शालिनीताई विखे पाटील यांचे नाव येणारच ना! त्यांनी आपल्या टर्ममध्ये अनेक विकासकामे केली, मोठा जनसंपर्क तयार केला, शिवाय महिला बचत गटांच्या माध्यमातून गावोगावी महिला संघटन उभे केले आहे. त्यामुळेच विधान परिषदेसह नगर विधानसभा, राहुरी विधानसभा मतदारसंघातही झेडपीतील ‘या’ नावाची चर्चा आहे. भावी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे मतदार अपेक्षेने पाहत आहेत.

राजेश परजणे हे संवत्सर जि.प. गटाचे लोकप्रतिनिधी होते.


अभ्यासू आणि मुत्सद्दी नेते म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी पाच वर्षांच्या कालावधीत आपल्या गटासह मतदारसंघात अनेक कामे खेचून आणली आहेत. आता महानंदाची ताकदही त्यांना मिळाली आहे. त्यातच विखे-कोल्हेंचे राजकीय संबंधही सर्वश्रुत आहेत. त्यामुळे झेडपीतील या चेहर्‍याला कोपरगावातून पक्षाकडूनच संधी असल्याचे बोलले जाते. याशिवाय अकोल्यातून सुनीता अशोक भांगरे, नेवाशातून तेजश्री विठ्ठलराव लंघे, नगर-पारनेरमधून प्रताप शेळके, नगर-श्रीगोंदा संदेश कार्ले, राहुरीतून धनराज गाडे, कर्जत-जामखेडमधून मंजूषा गुंड अशी एक ना अनेक नावांची चर्चा आहे. अर्थात ही चर्चा असली तरी यापूर्वीचा राजकीय इतिहास पाहता जिल्हा परिषदेतूनच मंत्रालयात पोहोचण्याचा मार्गही अनेकांना फलदायी ठरल्याचे दिसले आहे.


जगताप, राजळे, पिचड, लहामटेंनंतर कोण?

2014 ला झेडपीच्या 8 सदस्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली होती. यापैकी राहुल जगताप, मोनिका राजळे, वैभव पिचड हे विजयी झाले होते. सुजित झावरे, बाबासाहेब तांबे, सत्यजित तांबे, राजेंद्र फाळके, दिलीप वाकचौरे त्या वेळी पराभूत झाले. त्यानंतर 2019 मधील विधानसभा निवडणुकीत डॉ. किरण लहामटे हे एकमेव झेडपी सदस्य थेट आमदार झाले. आता येणार्‍या निवडणुकांत आणखी काही चेहरे मैदानात आणि थेट मंत्रालयात दिसणार का, याकडे जनतेचे लक्ष असेल.


The post नगरचं राजकारण; चर्चा तर होणारच ! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T2gn5B

नागवडे-नाहटा जोडी जोरात, कार्यकर्ते नाराज !

अमोल बी.गव्हाणे







श्रीगोंदा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे यांनी काँगेसला रामराम करत आज पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये प्रवेश केला. अर्थात या संपूर्ण घडामोडीमागे राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहटा यांची स्ट्रॅटजी कामाला आली. नागवडे उभयतांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने नागवडे-नाहटा ही जोडी तालुक्यात जोरात असली तरी, नागवडे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाहटा यांच्याविषयीची नाराजी अद्याप दूर होताना दिसत नाही. नागवडे गटाच्या यंत्रणेत नाहटांंचा हस्तक्षेप कार्यकर्त्यांना न रूचणारा असल्याचे दिसून येत आहे.

सन 2024 सुरू होताच तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला. दोन वर्षांपूर्वीच नागवडे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्यांची यंत्रणाही सक्रिय झाली आहे.


गावोगावच्या ग्रामपंचायत, सेवा संस्था निवडणुकीत त्यांनी घातलेले लक्ष सर्व काही स्पष्ट करते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर नागवडे यांनी बाळासाहेब नाहटा यांच्यामार्फत पक्ष प्रवेश करण्याबाबत फिल्डिंग लावली. त्यात लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत निवडणुकीत नाहटा यांना माजी आमदार राहुल जगताप यांनी मदत न केल्याने, नाहटा-जगताप यांच्यात काही अंशी का होईना अंतर पडले. हीच बाब लक्षात घेऊन नाहटा यांनी नागवडे यांच्यासाठी स्वतःची स्ट्रॅटजी राबवित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शब्द टाकला. अन् नागवडे यांच्या पक्ष प्रवेशासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. अर्थात पवार हे नागवडे यांच्या प्रवेशासाठी अनुकूल होतेच.

नागवडे यांनी विधानसभेचा शब्द घेतल्यानंतरच हा प्रवेश निश्चित झाला असल्याचे बोलले जात आहे. अर्थात यासाठी अजून काही महिने वाट पहावी लागणार आहे. तत्पूर्वी लोकसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीवरच विधानसभा निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.


काही वर्षापूर्वी नागवडे यांच्या विरोधात रान पेटविणारे नाहटा आता नागवडे यांचे गुणगान गाऊ लागले आहेत. हा राजकारणाचा महिमा श्रीगोंदेकर नव्याने अनुभवत आहेत. मात्र, नाहटा यांच्या मध्यस्थीने नागवडे यांनी केलेला पक्षप्रवेश नागवडे गटाच्या कार्यकर्त्यांना रुचलेला नाही. नागवडे गटाच्या गोटात नाहटा यांची उठबस अनेकांना डोकेदुखी वाटत आहे. अर्थात, नाहटा यांचे राजकीय कौशल्य सर्वश्रुत आहे. नागवडे कारखाना निवडणुकीत आपण उमेदवारी करणार नाही, असे स्पष्ट करणार्‍या नाहटा यांनी थेट राजेंद्र नागवडे यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केली. एवढेच नाही तर निवडणुकीत रंगत निर्माण करत, नागवडे यांना सळो की पळो करून सोडले होते.

राजकारणात सर्व काही माफ असते, असे नेहमीच म्हटले जाते. राजेंद्र नागवडे अन बाळासाहेब नाहटा एकत्र आले, मात्र त्यांचं एकत्र येणं कार्यकर्त्यांना मान्य नसल्याचे दिसते. अर्थात राजेंद्र नागवडे कार्यकर्त्यांची कशी समजूत घालतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


 


The post नागवडे-नाहटा जोडी जोरात, कार्यकर्ते नाराज ! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T2dKls

देवेंद्र फडणवीसांनी वाचलं मोदींच रिपोर्ट कार्ड




http://dlvr.it/T2c2gy

सव्वा लाख विद्यार्थी देणार बोर्डाची परीक्षा !

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातून यावर्षी इयत्ता 12 वी आणि 10 वीचे सुमारे 1 लाख 32 हजार विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देणार आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाकडून आवश्यक सर्व तयारी पूर्ण झाली आहे. दोन दिवसांपुर्वीच पुणे विभागाचे सचिव औदुंबर उकिरडे यांनी नगरमध्ये शिक्षणाधिकारी, केंद्र संचालक, परिरक्षक यांच्यासमवेत बैठक घेवून याबाबतचा आढावा घेतला. यावेळी परीक्षार्थींना उत्साही, भितीमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी, यासाठी केंद्राची रचना, भौतिक सुविधा याबाबत सूचना करण्यात आल्याचे समजले. इयत्ता 12 वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून तर, 10 वीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होणार आहे. दोन्ही परीक्षेसाठी सुमारे 1 लाख 32 हजार परीक्षार्थी आहेत. 291 परीक्षा केंद्र आणि प्रत्येक केंद्रावर एक असे 291 केंद्र संचालक आहेत. दोन्ही परीक्षेसाठी सर्व केंद्रांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी 1, असे 14 तर नगर शहरात तीन, संगमनेरात तीन आणि नेवाशात एक असे एकूण 21 परिरक्षक आहे. यावर्षी 12 वीचे तीन परीक्षा केंद्र वाढले आहेत. तर 10 वीचे 2 केंद्र वाढल्याचे समजते. दरम्यान, परीक्षार्थींच्या व्यवस्थेबाबत गुरुवारी शहरातील एका विद्यालयात शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी केंद्र संचालक, परिरक्षक यांची बैठक घेतली. यात बोर्डाच्या वतीने सचिव औदुंबर उकिरडे यांनी स्वतः उपस्थित राहुन मार्गदर्शन केले .


भरारी पथके, पोलिस बंदोबस्तही असणार!

गेल्यावर्षी प्रशासनाने कॉपीमुक्त परीक्षा घेतल्या. यंदाही जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांचा प्रयत्न आहे. लवकरच जिल्हाधिकारी स्वतः याबाबत बैठक घेवून भरारी पथके, पोलिस बंदोबस्त इत्यादी गोष्टीबाबत मार्गदर्शन करणार आहेत.


The post सव्वा लाख विद्यार्थी देणार बोर्डाची परीक्षा ! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T2bRtw

समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात ! तीन जण जागीच ठार, दोन जण गंभीर जखमी

कोपरगाव प्रतिनिधी : समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात औरंगाबादकडून शिर्डीकडे जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने पुढे असलेल्या कंटेनरला मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. जखमींना प्रथम वैजापूर, घाटी व नंतर संभाजीनगर येथील सिग्मा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिली. अपघात इतका भयानक होता की क्रेनच्या साह्याने चक्काचूर झालेल्या कारला बाजूला करण्यात आले.  राहुल श्रीमंत राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे अशी तिघा मृत व्यक्तींचे नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर रात्री 9.30 च्या सुमारास स्विफ्ट डिझायर कारचा कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात झालेल्या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना वैजापूर येथे उपचारासाठी दाखल केले.


या अपघातातील मृत राहुल श्रीमंत राजभोज (35रा निमखेडा), उमेश दामोदर उगले (28, रा भातोडी), भाऊसाहेब नामदेव पैठणे (35)  दहेगाव हे जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील रहिवासी आहेत. ते सर्व शिर्डीकडे निघाले होते. अपघातात शिवहरी पांडुरंग फलके( वय 33,  तपोवन ) आणि नरेंद्र मनसुखलाल वाघ (55, टेंभुर्णी तपोवन ) हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल केले आहे.


अपघातांची मालिका सुरूच…


बुधवार दिनांक सात रोजी या समृद्धी महामार्गावर धोत्रे शिवारातच अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत कल्याणचे दोघेजण जागीच ठार झाले होते. त्यातच पुन्हा शुक्रवारी अपघात झाला. त्यामुळे समृद्धी महामार्गावरील अपघाताचे सत्र थांबता थांबेना. बहुतांशी वाहन चालक भरधाव वेगाने आपली वाहने चालवतात तर त्यातील काही मद्यधुंद अवस्थेत असतात, त्यामुळे असे अपघात होतात असे ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी सांगितले.


The post समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात ! तीन जण जागीच ठार, दोन जण गंभीर जखमी appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T2YWfS

नगर : कोल्हार घोटी राज्यमार्गावर राजुर जवळ मोटरसायकल ट्रकचा अपघात; तीन तरुण ठार

अकोले; पुढारी वृत्तसेवा : अकोल्याहुन मोटरसायकलहुन राजुरकडे निघालेल्या दुचाकीला ट्रकने जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात अकोले तालुक्यातील तीन तरुण ठार झाले.


याबाबत अधिक माहिती अशी की, अकोले तालुक्यातील मवेशीच्या बारववाडीतील तीन तरुण कामानिमित्त मोटरसायकलीवरुन अकोल्याला गेले होते. काम आटोपून अकोल्याहून राजुरकडे परत येताना दुचाकीला ( क्र. एम एच १७ सी यु ९४८१)  वांग्याच्या लवणामध्ये अशोक ट्रकने जोराची धडक दिली. यामध्ये तिनही तरुण गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. विलास रामा कवटे (वय २६), प्रथमेश नामदेव किरवे (वय २४), प्रवीण रामा भांगरे (वय २३) अशी तिघांची नावे आहेत. या तिघांना उपचारासाठी राजूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तर विलास रामा कवटे व प्रथमेश नामदेव किरवे हे दोघेही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच गंभीर जखमी असलेल्या प्रवीण भांगरे याला पुढील उपचारासाठी संगमनेर येथे रुग्णवाहिकेतुन नेत असताना अकोल्याच्या दरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. त्याचा मृतदेह अकोले येथील रुग्णालयात नेण्यात आले. तर विलास रामा कवठे व प्रथमेश नामदेव किरवे या दोघांच्या मृतदेहाचे राजुर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तसेच प्रवीण रामा भांगरे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अकोले ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहे. अपघातात मृत्यू पावलेल्या प्रथमेश किरवे यांच्या वडिल नामदेव किरवे यांनी राजुर पोलिसात फिर्याद दिल्यावरुन राजूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याप्रकरणी राजुर पोलिसात अज्ञात ट्रक चालकावर भा.द.वी कलम ३०४ अ २१९,३३८,३३७,४३७ व मोटर वाहन कायदा क्र.१८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कॉन्स्टेबल रोहिणी वाडेकर अशोक गाडे करत आहेत.


The post नगर : कोल्हार घोटी राज्यमार्गावर राजुर जवळ मोटरसायकल ट्रकचा अपघात; तीन तरुण ठार appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T2WCRh

मुले सांभाळत नाहीत ; साठीनंतर मोडली हक्काची काठी!

गोरक्ष शेजूळ







नगर : पुढारी वृत्तसेवा : आयुष्यभर काबाडकष्ट केले, घरदार उभे केले, मुलांना शिकवले, मुलींची लग्न केली; मात्र ऐन वयाच्या साठीनंतर आपल्याच घरातून आपल्याच मुलांनी बेदखल केल्याचे अनेक प्रकार पुढे येत आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांच्या अशा तक्रारींवर सुनावणी घेऊन, ‘त्या’ मुलांना थोडा कायद्याचा धाक दाखवून, तर कुठं डोळ्यात सामाजिक अंजन घातले गेले. त्यामुळे अशा हताश 40 हून अधिक ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचे काम प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ हे या समितीचे अध्यक्ष आहे. सचिव म्हणून समाजकल्याण सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांचाही यात समावेश आहे. सामाजिक न्याय विभागाकडे ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारीं प्राप्त झाल्यानंतर संबंधित ज्येष्ठ नागरिक आणि ज्याच्या विरोधात तक्रार आहे तो मुलगा किंवा इतर यांना समोरासमोर घेऊन सुनावणी होते, त्यातून सत्यता पडताळून निकाल दिला जातो.


किती व कोणत्या तक्रारी?

जिल्ह्यात वर्षभरात 69 ज्येष्ठ नागरिकांनी सामाजिक न्यायभवनात आपले तक्रार अर्ज केले आहेत. यात बहुतांश तक्रारी ह्या- मुलं सांभाळत नाहीत, सुनांचा त्रास सहन करावा लागतो, मालमत्तेवरून वाद घालतात, घराबाहेर काढले जाते, औषधोपचाराला पैसे देत नाहीत, अशा प्रकारच्या आहेत. याशिवाय ज्येष्ठ नागरिक असल्याचा गैरफायदा घेऊन केले जाणारे जमिनीचे वाद, शेजार्‍याचा सातत्याने होणारा त्रास याचाही या तक्रारीत समावेश असल्याचे समजले आहे.


20 अर्जावर सुनावणी सुरू

सामाजिक न्याय भवनात आलेल्या 69 तक्रार अर्जापैकी 49 ज्येष्ठ नागरिकांना सुनावण्या घेऊन न्याय देण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. तर उर्वरित 20 अर्जांवर सुनावणी सुरू असून, त्याही लवकरच निकाली निघणार असल्याचे सांगितले जाते.


मोलकरणीने घरच गिळले!

एका तक्रारीत ज्येष्ठ नागरिकाची शेजारी शेजारी दोन घरं आहेत. त्यांनी आपल्या घरात मोलकरीणीला आश्रय दिला होता. मात्र काही दिवस ते ज्येष्ठ नागरिक परदेशात मुलाकडे गेले होते. तेथून ज्या वेळी ते परतले, त्या वेळी मोलकरणीने घरावरच कब्जा करताना घर खाली करण्यास नकार दिला. यावरही आता सुनावणी सुरू असल्याचे समजले.


जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिकांसाठी तक्रार निवारण समिती कार्यरत आहे. या माध्यमातून तक्रारींचे निवारण केले जात आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांची कार्यशाळा घेतली गेली, यातही त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आहेत. तसेच त्यांच्यासाठी हेल्पलाईनही सुरू केली आहे.

                      – राधाकिसन देवढे, सहायक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग


पोलिस अधिकारी मुलाविरुद्ध तक्रार!

एका मातेचा मुलगा पोलिस अधिकारी आहे. मात्र तो औषधोपचारासाठी पैसे देत नसल्याची तक्रार प्राप्त असल्याचे सांगितले जाते. यावर सुनावणी होऊन मातेला पेन्शन असल्याने त्यावर तिचा उदरनिर्वाह होऊ शकतो, असा अभिप्राय देण्यात आल्याचे समजले.


The post मुले सांभाळत नाहीत ; साठीनंतर मोडली हक्काची काठी! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T2SnKk

आठवले यांचे पुन्हा शिर्डीतून लढण्याचे सूतोवाच

 श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा :  शिर्डीत 2009 मध्ये माझा पराभव झाला. मात्र मी पुन्हा 2024च्या लोकसभा निवडणुकीत शिर्डीतून लढण्यासाठी इच्छुक आहे. रिपब्लिकन पक्षाला शिर्डीसह दोन जागा देण्याची मागणी भाजपच्या वरिष्ठांकडे केली आहे; मात्र भाजप वरिष्ठांसह राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्णयावर ठरेल, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट करत, शिर्डीतून निवडणूक लढविण्याचे सूतोवाच पुन्हा एकदा केले. आठवले शनिवारपासून (दि.3) शिर्डीसह श्रीरामपूर, कोपरगावच्या दौर्‍यावर आले आहेत. या दौर्‍यात शिर्डी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, आठवले यांनी साईसमाधीचे दर्शन घेतले.


आठवले म्हणाले, भाजपच्या वरिष्ठांकडे रिपाइंला शिर्डीसह दोन जागांची मागणी केली आहे. शिर्डीत मी 2009मध्ये निवडणूक लढविली होती; मात्र पराभव झाला. आता मी पुन्हा 2024च्या लोकसभा निवडणुकीत शिर्डीच्या जागेकरिता इच्छुक आहे. पण भाजपच्या वरिष्ठांसह राधाकृष्ण विखे पाटील यांचा निर्णय काय होईल, त्यावर ठरेल. माझे राज्यसभा सदस्यत्व 2026पर्यंत आहे. लोखंडे हेही माझे चांगले मित्र आहेत. संध्या मी संपूर्ण देशात पक्ष वाढविण्याच्या कामात व्यस्त असून देशासह राज्यात प्रत्येक तालुक्यात पन्नास हजारांपेक्षा जास्त कार्यकर्ते रिपाइंशी जोडले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाठेब ठाकरे यांनी माझ्यासमोर शिवशक्ती व भीमशक्तीचा प्रस्ताव ठेवला, तेव्हा मी डॉक्टर, विचारवंत, पत्रकार व तळागाळातील कार्यकर्त्यांकडे गेलो. त्यांचा विचार घेऊनच पावले उचलली. त्यांचा फायदा झाला, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.


आंबेडकरांबद्दल शक्यता

‘उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडली ही मोठी चूक केली. त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचे कारनामे कळताच ते पुन्हा येणार, असा विश्वास व्यक्त करत आम्ही त्यांचे पुन्हा आल्यास स्वागतच करू,’ तसेच ‘प्रकाश आंबेडकर हे दलित नेते आहेत. त्यांनी योग्य निर्णय घ्यावा. त्यांची काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर युती होईल, असे वाटत नाही, कदाचित ते शेवटच्या क्षणी स्वबळाचा नारा देऊ शकतात,’ अशा शक्यताही त्यांनी व्यक्त केल्या.


फुले, साठे यांना ‘भारतरत्न’साठी प्रयत्न

संविधान बदलण्याच्या हालचाली झाल्यास पहिला मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असा इशारा देऊन आठवले म्हणाले की, संविधान बदलण्याची केवळ अफवा आहे. मागासवर्गीयांची दिशाभूल करण्याचे काम होत आहे. व्ही. पी. सिंह सरकारने बाबासाहेबांना ‘भारतरत्न’ दिला. आता महात्मा फुले, अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ मिळावा म्हणून प्रयत्न करणार असून लालकृष्ण आडवाणी यांना त्यांच्या पक्षकार्यास भारतरत्न मिळाला याचे स्वागतच आहे.


The post आठवले यांचे पुन्हा शिर्डीतून लढण्याचे सूतोवाच appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T2QHSv

ओबीसी-मराठा वाद लावणे हाच छगन भुजबळांचा उद्योग

नगर : पुढारी वृत्तसेवा :  राज्यभरात अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रवर्गाची प्रमाणपत्रे असून, ते ओबीसी आरक्षणाचा लाभदेखील घेतात. या नेत्यांना विरोध करण्याची तसेच त्यांच्या विरोधात बोलण्याची धमक मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये आहे का? केवळ गोरगरिब आणि गरजवंत मराठा समाजाला विरोध करून ते ओबीसी-मराठा समाजात वाद लावण्याचे उद्योग करीत आहेत. त्यामुळे सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. मंत्री भुजबळ राज्य शासनाच्या पैशातून ओबीसी एल्गार मेळावे घेऊन मराठा समाजाचा द्वेष करीत भाषणे ठोकत फिरत आहेत. शनिवारी नगर येथे त्यांनी थेट मराठा समाजावर टीका केली. त्यामुळे नगर येथील सकल मराठा समाजाचे गोरख दळवी, गजेंद्र दांगट, राम जरांगे, परमेश्वर पाटील, शशिकांत भांबरे, स्वप्नील दगडे, मिलिंद जपे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.


नगरच्या ओबीसी एल्गार मेळाव्यात मंत्री भुजबळ यांच्यासह इतरांनी मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. गावखेड्यातील बाराबलुतेदार समाज कालही आणि आजही मराठा समाजासोबत गुण्यागोविंदाने राहत असताना भुजबळ आणि त्यांनी जमा केलेले लोक गावागावांत केवळ दोन समाजात वाद लावण्याचे उद्योग करीत फिरत आहेत. असा आरोप सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी केला.


मराठा समाज आजच नव्हे तर पूर्वीपासूनच कुणबी प्रमाणपत्रे घेत आला आहे. मंत्री भुजबळ मेळाव्यातून केवळ ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहेत. मात्र गरजवंत, गरीब मराठ्यांना विरोध करून मराठा समाजाला टार्गेट करत आहेत. मंत्रिपदाची शपथ घेताना कोणत्याही जात, धर्माचा द्वेश करणार नाही, असे सांगणारे मंत्री भुजबळ संविधानाची भाषा बोलत नाहीत. त्यामुळे सरकाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


भुजबळांनी घेतली आरक्षण संपवण्याची सुपारी

ओबीसीतील अनेक जातींनी आरक्षण असले तरी सरकारदरबारी ते मागास नाहीत हे सिद्ध झालेले आहे. मध्य प्रदेशात अशाच प्रकारातून ओबीसी आरक्षण गेले. अशाच प्रकारे महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण संपवण्याची सुपारी मंत्री भुजबळ यांनी घेतली, असा आरोप या वेळी करण्यात आला.


.


The post ओबीसी-मराठा वाद लावणे हाच छगन भुजबळांचा उद्योग appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T2MWf6

काहीजण शेवटची निवडणूक म्हणून साद घालतील; भुलू नका : अजित पवार

बारामती, पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या निवडणुकीत काहीजण माझी ही शेवटची निवडणूक म्हणत तुम्हाला भावनिक साद घालतील. पण त्याला भुलू नका. माझ्याच विचाराचा खासदार बारामतीतून निवडून द्या. बारामती मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार कोणीही असू द्या, मीच उमेदवार आहे, असे समजून त्याला निवडून द्या, असे आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांच्यावर रविवारी हल्लाबोल केला.


खासदारकीला इकडे मत द्या, आमदारकीला अजितला द्या, असे ते म्हणतील. पण मला दोन्ही ठिकाणी तुमची साथ गरजेची आहे. खासदारकीला मला मिठाचा खडा लागला तर आमदारकीला मी स्वतःच वेगळा विचार करेन. कोणाच्या बापाचे ऐकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.


ते नुसतेच माझी शेवटची निवडणूक म्हणतात. पण शेवटची निवडणूक केव्हा होईल हेच समजत नाही, असा टोलाही त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता लगावला. कोणी कितीही भावनिक करायचा प्रयत्न केला तरी भावनिक होऊ नका, असे आवाहन उपस्थितांना करत त्यांनी आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले.


राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. बारामती व्यापारी महासंघातर्फे आयोजित मेळाव्यातही त्यांनी असेच आवाहन केले.


इतके दिवस तुम्ही वरिष्ठांचे (ज्येष्ठ नेते शरद पवार) ऐकत आलात. आता माझे ऐका, असे आवाहन करून अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी बोलून मतदारसंघासाठी भरीव निधी आणू शकेन, असे आश्वासन दिले. आजवर मी राज्य सरकारकडून कामे करून घेत होतो. केंद्रातूनही बारामती मतदारसंघातील अन्य तालुक्यांसाठी निधी आणत विकास करणार आहे. आतापर्यंत आपल्या आजूबाजूलाही किती आमदार आणि खासदार होऊन गेले. पण आपल्या अडचणींवेळी कोण उपयोगी पडतेय याचाही विचार आपण करा, असे सांगत त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली.


तिकडचे अनेकजण भेटतात


काहीजण मला मुंबईत भेटले. आमची चूक झाली, दादा, तुमच्याशिवाय कुणी काम करू शकत नाही, असे ते सांगतात. पण काहींची अडचण मला समजू शकते, असेही अजित पवार म्हणाले.


खा. सुप्रिया सुळे यांना टोला


आपल्या विचारांचा खासदार असेल तर कामे झपाट्याने होतील. विकासकामे करणारा खासदार आपल्याला हवा आहे.फक्त इकडे तिकडे फिरणारा नको, या शब्दांत अजित पवार यांनी खा. सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता टोला लगावला.


The post काहीजण शेवटची निवडणूक म्हणून साद घालतील; भुलू नका : अजित पवार appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T2K1rk

ओबीसी आमदार-खासदार मराठ्यांच्या मतांना घाबरतात : मंत्री छगन भुजबळ

नगर : पुढारी वृत्तसेवा : ओबीसींमधील आमदार-खासदार तथा लोकप्रतिनिधी मराठ्यांच्या मतांमुळे घाबरतात. त्यामुळे ते ओबीसी आंदोलनात येत नाहीत. मराठा समाजाची मते हातून निसटतील, अशी भीती त्यांनी वाटते, असा घणाघात करतानाच मी आधीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, असा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी येथे ओबीसी महामेळाव्यात केला.
‘या भुजबळांना मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकला’, असे म्हणणार्‍या आणि राजीनामा देण्याचा सल्ला मला विरोधी आणि स्वपक्षातीलही अनेकजण देतात.

मात्र, ओबीसींची पहिली रॅली अंबड येथे काढली, त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 16 नोव्हेंबरलाच मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला ‘वाच्यता करू नका’, असे सांगितल्याने आतापर्यंत गप्प होतो, असे  ते म्हणाले. मी ओबीसींसाठी शेवटपर्यंत लढणार, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याच्या विरोधात शनिवारी येथे झालेल्या ओबीसी एल्गार महामेळाव्यात ते बोलत होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे आम्हीही म्हणतो. मात्र, ते स्वतंत्र द्या. ओबीसींमधूनच आरक्षण द्या हा मराठ्यांचा  आग्रह अनाकलनीय आहे. त्यांनी झुंडशाहीने आरक्षण घेतले आहे. ओबीसींच्या विरोधात गावागावांत दरी निर्माण केली जात आहे. त्यामुळे धनगर, वंजारी, माळी अशा सर्वांनी झुंडशाहीच्या विरोधात एकत्र येऊन लढावे लागेल, असे आवाहन भुजबळांनी केले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले, मग ‘ते’ पुन्हा कशासाठी उपोषण करणार आहेत, असा सवाल करून भुजबळांनी मनोज जरांगे यांचा नामोल्लेख न करता टीका केली.

मंडल आयोगच संपविण्याची भाषा करणार्‍या जरांगेंचा समाचार घेताना ते म्हणाले, मंडल आयोग संपविला, तर मंडल आयोगाकडूनच मिळालेले ओबीसींचे आरक्षणही संपेल. मग त्यांना मिळालेले ओबीसी आरक्षणही राहणार नाही, एवढेही त्याला कळत नाही.
ओबीसींमधील आमदार-खासदार तथा लोकप्रतिनिधी मराठ्यांच्या मतांमुळे घाबरतात. त्यामुळे ते ओबीसी आंदोलनात येत नाहीत. मराठा समाजाची मते हातून निसटतील, अशी भीती त्यांनी वाटते. वास्तवात 80 टक्के मते ओबीसींचीच आहेत, असे सांगून आंध्र प्रदेश, झारखंड आणि बिहारसारख्या राज्यांनी जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला, तशी जातनिहाय जनगणना राज्यात आणि संपूर्ण देशातही करावी, अशी मागणीही त्यांनी केली.


त्यांची हजामत करू नका


मराठा आरक्षण मिळाल्यानंतर परभणी येथे विजयी मिरवणुकीवेळी ओबीसी महिलांना घरात घुसून मारहाण करण्यात आली. त्यांच्या घरापुढे रात्रभर डीजे वाजवला. दहशत माजविली. एका गावात त्यांनी ओबीसी व्यक्तीच्या दुकानात जाऊ नका, असे सांगितले. मग त्यांच्यापैकी एकाचीही हजामत करू नका, असे आम्ही नाभिकांना सांगितले तर, असा सवाल त्यांनी केला.


आरक्षण मिळाले, मग सर्वेक्षण कशासाठी़?


 शपथपत्रावर खोटी वंशावळ सांगून, चुकीची प्रमाणपत्रे दिली जात आहेत. दारात गाड्या उभ्या असलेलेही झोपडीत राहतो, असे सांगत आहेत. सर्वेक्षणात 180 प्रश्न असताना एका दिवसात एकजण 25 ते 50 घरांचे सर्वेक्षण कसे करू शकतो, असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले. जामखेडमध्ये सगळे कुणबी आहेत, सोलापूरच्या एका गावात खाडाखोड करून दाखल्यांवर मराठा कुणबी असे लिहिलेले आढळले, असे आरोपही त्यांनी केले.


तरुणाचा धिंगाणा, पोलिस अधीक्षक जखमी


या मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाषण सुरू असताना एका तरुणाने गर्दी घुसून चिथावणीखोर घोषणाबाजी सुरू केली. यावेळी सभेला उपस्थित असणार्‍यांनी नागरिकांनी त्याला चोप दिला. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी तत्काळ घनास्थळी धाव घेत त्या तरुणाला तेथून बाजूला नेले. यावेळी गर्दीतील लोकांनी तरुणावर दगडव पाण्याच्या बाटल्या फेकल्या. त्यात खैरे किरकोळ जखमी झाले.


भुजबळ उवाच…


ओबीसीतून मराठा आरक्षणाचा आग्रह अनाकलनीय
झुंडशाही संपवण्यासाठी ओबीसींनी एकत्र यावे
जातनिहाय जनगणना राज्यासह देशातही करावी

हेही वाचा



* Weather Update : पुणे 12.6 अंश; नीचांकी तापमान

* obesity : लठ्ठपणाचा संबंध एकटेपणाशीही?

* कोल्हापूर : मदरशाचे बांधकाम हटविण्यास विरोध : ६०० जणांवर गुन्हा






The post ओबीसी आमदार-खासदार मराठ्यांच्या मतांना घाबरतात : मंत्री छगन भुजबळ appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T2HDw7

अबब... एका वर्षात 1862 दुचाकींची चोरी ; सापडल्या अवघ्या 278

डॉ. सूर्यकांत वरकड







नगर : जिल्ह्यात दुचाकी चोरी आता नित्याचीच झाली आहे. जिल्ह्यातून दिवसाला सरासरी पाच दुचाकी चोरीला जात असल्याचा भयावह आकडा पोलिस दप्तरातून समोर आला आहे. त्यात 2023 मध्ये सुमारे 1862 दुचाकींची चोरी झाली. तर, अवघ्या 278 दुचाकी तपासाअंती मिळाल्या. त्यामुळे पोलिसाच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. जिल्ह्यात दुचाकी चोरीचे दररोज सरासरी पाच गुन्हे दाखल होत आहेत. दुचाकी चोरीला गेल्यानंतर फिर्याद एक ते दोन दिवस आधी दुचाकीचा शोध घेतात. त्यानंतर पोलिस ठाण्यात येऊन दुचाकी चोेरीला गेल्याची फिर्याद देतात. पोलिसांनीही आता दुचाकी चोरी नित्याचीच झाली आहे. फिर्याद दाखल केल्यानंतर काही दिवस फिर्यादी त्याचा पाठपुरावा करतो. मात्र, त्यानंतर तोही पोलिस ठाण्याकडे फिरकत नाही.


त्यामुळे दुचाकी चोरीचा आकडा पोलिस ठाण्यात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जिल्ह्यातील शहर दुचाकीचोरांचे अड्डे बनले आहेत. तर, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणांहूनही दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण जास्त आहे. शिर्डी, शनिशिंगणापूर, नेवासा आदी ठिकाणांहून दुचाकी मोठ्या प्रमाणात दुचाकीला जातात. दुसरीकडे पोलिस तपासातही दुचाकी मिळून येत नाही. कारण चोर दुचाकीचे स्पेअरपार्ट सुटे करून विक्री करतात. त्यामुळे गुन्ह्यातील मुद्देमालच मिळत नाही, असे तपासात समोर आले आहे.


सराईत गुन्हेगारांकडे चोरीची दुचाकी

जिल्ह्यात रस्तालूट, जबरी चोरी, धूमस्टाईल चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगारांकडेही चोरीच्या दुचाकी असल्याचे अनेक वेळा पोलिस तपासात निष्पन्न झालेले आहे. गुन्हेगार अनेक वेळा पेट्रोल संपल्यानंतर त्याच जागेवर दुचाकी सोडून दुसर्‍या वाहनाने पळ काढतात.


2 दिवसांत दुचाकी भंगारात

चोरीला गेलेली दुचाकी दोन दिवसांत भंगाराच्या दुकानात जाते. दुचाकीचे दोन्ही डिस्क काढून विकले जातात. तसेच, दुचाकी पेट्रोल टाकी काढून विकली जाते. तसेच उर्वरित स्पेअरपार्ट भंगारात नेऊन विकले जातात. भंगारात दुचाकी विकून चोरांना चांगले पैसेही मिळतात आणि पुरावाही राहत नाही, असेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.


हॉस्पिटलचेे पार्किंग स्पॉट टार्गेट

नगर शहरासह जिल्ह्यातील श्रीरामपूर, संगमनेर, शिर्डी अशी मोठ्या शहरातील हॉस्पिटल पार्किंग दुचाकी चोरांसाठी स्पॉट टार्गेट आहेत. हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चोरणे सोपे जाते. नगर शहरातील खासगी हॉस्पिटलसह जिल्हा रुग्णालयाच्या पार्किंगमधूनही दुचाकी चोरी प्रमाण जास्त आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर स्पे्र मारून दुचाकी चोरून नेली जाते.


एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात

दुचाकी चोरणार्‍या सराईत टोळ्या आहेत. नगर जिल्ह्यातून चोरलेली दुचाकी थेट पुणे, औरंगाबाद, नाशिक, बीड जिल्ह्यात नेऊन विक्री केली जाते. तर, बीड, औरंगाबाद जिल्ह्यातून चोरलेली दुचाकी नगर जिल्ह्यात आणून विक्री केल्या जातात. त्यातही दुचाकी अगदी चार ते पाच हजारात विक्री केली जाते.


The post अबब... एका वर्षात 1862 दुचाकींची चोरी ; सापडल्या अवघ्या 278 appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T2Dh7W

सीना नदीची उगमस्थानी दुरवस्था ! सीनेला अतिक्रमण व घाणीचा विळखा

शशिकांत पवार







नगर तालुका : नगर शहरात सीना नदीपात्राचे सुशोभीकरण, खोलीकरण व अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. परंतु याच सीना नदीच्या उगमस्थानी सीनापात्राची दुरवस्था झाली आहे. जेऊर परिसरात सीनामाई अखेरच्या घटका मोजत आहे. घाणीचे साम्राज्य अन् अतिक्रमणांमुळे उगमस्थानाजवळ सीना नदीपात्र गिळंकृत झाले आहे.. सीना नदीचा उगम ससेवाडी येथील सीनाशंकर डोंगरातून होतो. ससेवाडी, जेऊर, पिंपळगाव माळवी, वडगाव गुप्ता असा प्रवास करीत नदी नगर शहराकडे येते. उगमस्थानापासूनच नदीपात्र अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले आहे. जेऊर येथील सीना नदीपात्र तर घाणीचे साम्राज्य आणि अतिक्रमणांच्या विळख्यात अडकले आहे. अनेक ठिकाणी पात्र नावापुरतेच राहिलेले असून शेतकर्‍यांनी अतिक्रमणे केली आहेत. जेऊरची संपूर्ण बाजारपेठ सीनापात्रात अतिक्रमणात वसली आहे.


सीना नदीपात्राची उगम स्थानापासून मोजणी करून संपूर्ण सीनापात्र मोकळे करण्याची गरज आहे. मोजणी झाल्यानंतर हद्द निश्चित होईल. त्यानंतर सीना सोशोभीकरण, खोलीकरण करण्यात येईल. तसेच पात्रातील अतिक्रमणे हटविल्यास सीना नदी मोकळा श्वास घेणार आहे. अतिक्रमण हटविल्यानंतर नदी खोलीकरण झाल्यास परिसरातील शेतकर्‍यांचाही फायदा होणार आहे. ससेवाडी येथील उगमस्थानापासून नगर शहरापर्यंत वीस किलोमीटर अंतर असलेल्या सीना नदीपात्र अतिक्रमनांनी वेढले आहे. वडगाव गुप्ता येथे नदीपात्राचे रुंदीकरण व खोलीकरण केल्यानेे परिसरातील नागरिक, शेतकर्‍यांना त्याचा मोठा फायदा झाल्याचे पहावयास मिळते. तोच पॅटर्न जेऊर, ससेवाडी, पिंपळगाव माळवी परिसरातून जात असलेल्या नदीपात्रासाठी राबविणे गरजेचे आहे. सीना नदी, तसेच उपनदी खारोळी व इतर उपनद्यांच्या पात्रांची मोजणी करून खोलीकरण केल्यास दुष्काळी पट्ट्यातील या गावांना मोठा फायदा होईल.


इमामपूरला उन्हाळ्यात नेहमीच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. त्यामुळे सीना नदीची मुख्य उपनदी असलेल्या खारोळी नदीपात्राचे रुंदीकरण, खोलीकरण झाल्यास शेतकर्‍यांना निश्चितच फायदा होईल. त्यामुळे नदीपात्रांची मोजणी आवश्यक आहे.

                                                – भीमराज मोकाटे माजी सरपंच, इमामपूर


सर्वच नद्यांवर बहुतेक शेतकर्‍यांनी अतिक्रमण केले आहे. नदीपात्रांची मोजणी करून हद्द निश्चित करण्याची गरज आहे. शेतकरी आपले अतिक्रमण हटविण्यासाठी सहजासहजी तयार होत नाहीत. त्यासाठी वरिष्ठ पातळीवरून मोजणी करून हद्द निश्चित करावी. त्यासाठी ग्रामपंचायत सर्वतोपरी सहकार्य करेल.

                                                              – ज्योती तोडमल सरपंच, जेऊर


The post सीना नदीची उगमस्थानी दुरवस्था ! सीनेला अतिक्रमण व घाणीचा विळखा appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T2BHsF

Crime news : वकील दाम्पत्य हत्येचा तपास ‘सीआयडी’कडे

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अ‍ॅड. आढाव दाम्पत्याच्या हत्येचा तपास अखेर सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. मुंबई येथील विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी तसा आदेश निर्गमित केला आहे. अ‍ॅड राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी अ‍ॅड मनीषा आढाव यांची हत्या केल्यानंतर त्यांचे मृतदेह दगड बांधून विहिरीत टाकले होते. पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवत 5 आरोपीना तातडीने जेरबंद केले. 5 लाख रुपयांच्या खंडणीसाठी खून केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पोलिसांना माध्यमांना दिली. परंतू हत्येबाबत अनेक शंकाकुशंका व्यक्त होत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रासह राज्यातील वकील बार असोसिएशनने याबाबत आवाज उठवत घटनेबाबत दाखल गुन्हा व प्रत्यक्ष घटनेत विसंगती असल्याचा आरोप केला आहे.


त्यामुळे या प्रकरणाची सीआयडी किंवा एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी पुढे आली होती. महाराष्ट्र व गोवा वकील बार असोसिएशनने आंदोलन हाती घेतले आहे. अखेरीस गृह विभागाने या प्रकरणाची दखल घेत या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात येत असल्याचा आदेश काढला आहे. दरम्यान राहुरी येथील न्यायालय आवारात वकिलांनी कामबंद ठेवत सुरू केलेल्या साखळी उपोषणस्थळी राज्यातील नामवंत कायदेतज्ज्ञ भेटी देत आहेत. भारतीय विधीज्ञ परिषदेचे सदस्य अ‍ॅड. जयंत जायभाय यांच्यासह महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र उमाप, सदस्य अ‍ॅड. अहमदखान पठाण, नगर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. भुषण बर्‍हाटे, नाशिक जिल्हा वकील संघाचे अ‍ॅड. शिवाजी शेळके, अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. वसंतराव मानकर, अ‍ॅड. रमेश जगताप, अ‍ॅड. गोरक्षनाथ तांदळे, राहाता बार असोसिएशनेच अ‍ॅड. दिगंबर धनवटे, अ‍ॅड. विक्रम सगळगिळे, अ‍ॅड. अजित काळे, अ‍ॅड. रोहित बनसोडे, अ‍ॅड. लक्ष्मीकांत पटारे, छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाचे वकील संघाचे जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह जाधव यांनी राहुरी बार असोसिएशनच्या साखळी उपोषणाला भेट देत अ‍ॅड. आढाव दाम्पत्य हत्या प्रकरणासह वकील संरक्षण कायद्याबाबत संवाद साधला.


5 फेब्रुवारीपर्यंत सद्यस्थितीचा अहवाल

कायदा व सुव्यवस्थेचे पोलिस महासंचालक सुहास वारके यांनी तपास वर्ग झाल्याचे आदेश काढले. केस डायरीसह गुन्ह्याची कागदपत्रे प्राप्त करून घेत शीघ्रगतीने तपास करावा. तसेच 5 फेब्रुवारीपर्यंत सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेशात म्हटले आहे. नगर पोलिस अधीक्षकांनी गुन्ह्याची केस डायरीसह मुळ कागदपत्रे त्वरीत सीआयडी अप्पर पोलिस महासंचालकांकडे सोपविण्याचे आदेशात नमूद के ले आहे.


The post Crime news : वकील दाम्पत्य हत्येचा तपास ‘सीआयडी’कडे appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T27rFN