बेलवंडीत बनावट नोटांचे घबाड! दोघा जणांना बनावट नोटांसह अटक

February 28, 2024 0 Comments

कोळगाव : पुढारी वृत्तसेवा : बनावट हत्यारे व अवैध दारूची चोरटी वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्याने कोळगाव शिवारात बेलवंडी पोलिसांकडून संशयित वाहनांची तपासणी सुरू होती. यामध्ये मोटरसायकलवरील दोन इसमांना थांबवून त्यांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे 5 लाख 80 हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. त्यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या बनावट नोटांचे कनेक्शन उघड होणार आहे. अजय मधुकर पुरके (वय 30, रा. पिंपळगाव भोसले, ता.आर्वी, जि.वर्धा, हल्ली रा. जयभवानीनगर, कोथरूड, पुणे) व अनिल रघुनाथ देसाई (वय 30, रा.यराडवाडी, मल्हार पेठ, ता.पाटण, जि.सातारा, हल्ली रा.जयभवानी नगर, कोथरूड, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.


नगर-दौंड महामार्गावर कोळगाव-घारगाव शिवारात अवैध दारूची व बनावट हत्याराची चोटी वाहतूक होणार असल्याची माहिती बेलवंडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष भंडारे यांना मिळाली होती. त्यानुसार बेलवंडी पोलिस ठाण्याच्या पथकाने रस्त्यावरूनद जाणार्‍या प्रत्येक संशयित वाहनांना थांबवून त्यांची तपासणी केली. रात्री आठच्या सुमारास मोटरसायकलवर दोन इसम दौंडकडून येताना दिसले. त्यांना थांबण्याचा इशारा केला असता, मोटरसायकल न थांबविता ते वेगात पुढे गेले. पोलिसांनी मोटरसायकलचा पाठलाग करून या दोघांना ताब्यात घेतले.


त्यांच्याकडे असलेल्या कापडी पिशवीत काय आहे, असे विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच पिशवीत रक्कम असल्याचे त्यांनी सांगितले. या पैशाबाबत संशय बळावल्याने पोलिसांनी अधिक चौकशी केली. पिशवीत एकाच नंबरच्या बनावट नोटा असल्याचे दिसून आले. या नोटा त्यांनी तयार केल्याचे दोघांनी सांगितले. पिशवीत पाचशे, दोनशे, शंभर रुपयांच्या एकूण पाच लाख 80 हजार रुपयांच्या बनावट नोटा असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपरिीक्षक मोहन गाजरे करत आहेत. पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक मोहन गाजरे, सहायक फौजदार रावसाहेब शिंदे, हवालदार भाऊसाहेब यमगर, शोभा काळे, अविदा जाधव, सुरेखा वलवे, बंजगे, कैलास शिंपणकर, विकास सोनवणे यांनी ही कारवाई केली.


हेही वाचा



* रेड बस अ‍ॅपला एसटी महामंडळाचा दणका; करार रद्द

* महाड : भरदिवसा अडीच लाखांची चोरी, पाच घरे फोडली

* Accident : मुंबई-पुणे महामार्गावर तीन वाहनांचा अपघात






The post बेलवंडीत बनावट नोटांचे घबाड! दोघा जणांना बनावट नोटांसह अटक appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T3MB2B

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: