शिवसेना २०२४मध्ये दिल्लीच्या तख्तावर; आदित्य ठाकरे यांचा पुनरुच्चार

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः 'मी दिल्लीत जे बोललो ते उत्तर प्रदेशातही बोललो. इथेही तेच सांगत आहे. महाराष्ट्रातून अनेक गोष्टी हलवण्याचा डाव आखला जात आहे. पण २०२४मध्ये शिवसेना दिल्लीच्या तख्तावर बसेल आणि सगळे थांबवेल', असा पुनरुच्चार पर्यावरणमंत्री यांनी रविवारी केला. तर 'येत्या काळात शिवसेना प्रत्येक राज्याला न्याय देईल. कोणतेही राज्य केंद्रीय तपास यंत्रेणेला घाबरणार नाही किंवा झुकणार नाही', असेही ते म्हणाले. मराठी भाषा दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात आदित्य बोलत होते. प्रत्येक राज्यात शिवसेना निवडणूक लढेल व भूमिपुत्रांना न्याय देईल, असे त्यांनी यावेळी नमूद केले. 'आपण परखडपणे बोलतो. मराठीचे काय होणार याची आजच्या दिवशी चिंता करत बसण्यापेक्षा आजचा दिवस साजरा करूया. मराठी भाषा दिल्लीच्या तख्तापुढे झुकली नाही आणि आजही मराठी दिल्लीपुढे झुकणार नाही', असे मत आदित्य यांनी व्यक्त केले. तर, 'सुभाष देसाईंनी शासकीय स्तरावर मराठी भाषा सक्तीची केली आहे. ती समजायला जरा अवघड आहे. जीआर वाचायला घेतला तर समजत नाही. देसाईसरांना विनंती आहे की ती थोडी सोपी करून द्यावी', असे ते म्हणाले. 'दहावीपर्यंत मराठीत शिकवावेच लागेल' 'मराठीच्या शाळा कमी होतात की जास्त यावरून वाद सुरू असतात. पालकांचा कल सेमी इंग्रजीकडे असतो. मुंबई महापालिकेच्या शाळेत नव्या एसएससी बोर्डासह ११ शाळा 'सीबीएससी' आणि 'आयसीएससी'करिता सुरू आहेत. पालिकेच्या एक हजार २३२ शाळा आहेत. मात्र, कोणतेही बोर्ड असले तरी १०वीपर्यंत मराठी शिकवावेच लागेल', असे आदित्य यांनी यावेळी नमूद केले. 'स्वप्न काही सुटेना!' पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्लीच्या तख्तावर शिवसेना बसणारच, याचा पुनरुच्चार केल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी एक व्हिडीओ ट्वीट करीत त्यांच्यावर टीका केली. 'काही करता साधा नारळ फुटता फुटेना, पण लाल किल्ल्यावर शपथ घ्यायचे स्वप्न काही सुटेना!', अशा आशयाचे ट्वीट करत त्यांनी आदित्य यांना लक्ष्य केले.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

'अपना घर'चे स्वप्न भंगले; स्वस्तात घर देण्याच्या नावाखाली दोनशे जणांची फसवणूक

- योजनेच्या संचालकासह बँक व्यवस्थापक अटकेत - बँकेकडून पाच वर्षांत गृहकर्जवसुली; घर मात्र नाहीच - फसवणूक झालेल्यांनी संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन मुंबई : '' या नावाने वेगवेगळ्या माध्यमांमध्ये जाहिराती देऊन लोकांना आकर्षित करून स्वस्त घराचे प्रलोभन दाखवून फसविणाऱ्या दोघांना 'आरसीएफ' पोलिसांनी अटक केली आहे. 'अपना घर' योजनेचा संचालक रवी राजन पांडियन आणि द ब्ल्यू पीपल बँकेचा व्यवस्थापक सुरेश राठोड अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. घराचे बुकिंग करणाऱ्यांना दिलेले कर्ज द ब्ल्यू पीपल बँकेने पाच वर्षांत फेडून घेतले आणि घरे मात्र दिलीच नाहीत. अशाप्रकारे दोनशेहून अधिक लोकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न यांनी धुळीस मिळवले. वेगवेगळी वृत्तपत्रे आणि वाहिन्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सम्यक निवास हक्क संस्थेच्या माध्यमातून गरीब आणि गरजू लोकांना स्वस्तामध्ये घरे दिली जात आहेत, अशी जाहिरात झळकली. नवी मुंबईतील एका निवृत्त वकिलाने ही जाहिरात पाहून संस्थेचे चेंबूर येथील कार्यालय गाठले. साडेतीनशे चौरस फुटाचे घर पनवेल येथे अवघ्या आठ लाख ५७ हजार रुपयांत देणार असल्याचे या कार्यालयात उपस्थित एका महिलेने सांगितले. या महिलेने वकिलांची 'अपना घर' योजनेचे संचालक रवी पांडियन यांच्याशी ओळख करून दिली. पनवेल कोलवाडी येथील एका रिकाम्या भूखंडावर निवासी संकुल बांधण्यात येत असल्याचे या वेळी पांडियन यांनी त्यांना सांगितले. घराची रक्कम पाच वर्षे सुलभ हप्त्यांमध्ये बँकेत भरायची आणि पाच वर्षांनंतर घराचा ताबा दिला जाईल, अशी योजना असल्याचे त्यांनी सांगितले. स्वस्तात घर मिळत असल्याने निवृत्त वकिलाने पैसे भरण्याची तयारी दर्शवली. सन २०१३पासून २०१८पर्यंत पाच वर्षांत गृहकर्जाचे ६० हप्ते भरल्यानंतर वकिलाने घराच्या ताब्याबाबत विचारणा केली. तेव्हा स्टॅम्पड्युटी आणि नोंदणी, तसेच इतर फीच्या नावाखाली त्यांच्याकडून आणखी तीन लाख रुपये घेण्यात आले. यानंतरही घराचा ताबा देण्यासाठी चालढकल केली जाऊ लागली. संस्थेच्या चेंबूर येथील कार्यालयात वारंवार जात असल्याने या वकिलाची गुंतवणूक केलेल्या अन्य लोकांशी ओळख झाली. आपल्याबरोबरच इतर लोकांचीही फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुमारे ३० ते ३५ जणांनी पोलिसांत धाव घेतली. वकिलाच्या तक्रारीवरून आरसीएफ पोलिसांनी फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ तसेच इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करून पांडियन आणि राठोड या दोघांना अटक केली. पांडियनविरुद्ध वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत फसवणूक, बनावट कागदपत्रे बनविणे, मारामारी, दंगलीचे २० गुन्हे दाखल आहेत.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

शर्मिला ठाकरे म्हणाल्या, १५ वर्षांपूर्वी एक कानाखाली लगावल्यानेच...

: १५ वर्षापूर्वी एक कानाखाली लगावली म्हणून महाराष्ट्रात भाषेचा सर्व ठिकाणी समावेश करण्यात आला, असे सांगतानाच राज ठाकरे यांच्या पत्नी आणि मनसेच्या नेत्या यांनी मराठी भाषेसाठी आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांचं कौतुक केलं. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मराठी भाषा बोलण्याची काही लोकांना लाज वाटत होती, तर काहींना ती सक्ती वाटत होती. मात्र आज महाराष्ट्रात मराठी भाषेचा सर्व ठिकाणी उल्लेख केला जातो, ते फक्त मनसेमुळे शक्य झाले, असेही त्या म्हणाल्या. मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे गौरव महिलांचा या कार्यक्रमासाठी शर्मिला ठाकरे आल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. मराठी भाषा सर्वांच्या बोलण्यात आणि ऐकण्यात यावी यासाठी मनसेकडून 'खळखट्याक' आंदोलने करण्यात आली. या प्रयत्नांमुळेच आज मराठी भाषेचा समावेश महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी करण्यात आला, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या. दरम्यान जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी, आपण मराठीच बोलले पाहिजे, आपण मराठीमध्ये सवांद साधला तरच समोरची व्यक्ती मराठीत बोलू शकेल. त्यामुळे प्रत्येकाने आपले मराठीपण जपले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. जर पंधरा वर्षांपूर्वी कानाखाली लगावली नसती तर, आजही आपल्याला दुकानांवर हिंदी आणि इंग्रजीमध्येच पाट्या पाहायला मिळाल्या असत्या. १५ वर्षापूर्वी कानाखाली लगावल्यामुळेच हे शक्य झाले. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिलेला लढा याचे आज हे फळ असून, महाराष्ट्रात जर मराठी पाट्यांसाठी कोणाच्या काचा, दुकाने फोडावे लागत असतील तर ते लज्जास्पद असल्याची खंत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केली. मराठी भाषा दिन म्हणून आजच्याच दिवशी नाही तर वर्षाचे ३६५ दिवस मराठीतच बोलले पाहिजे व यापुढे सर्व नागरिकांनी मराठीतच बोलावे असे आवाहनदेखील शर्मिला ठाकरे यांनी केले आहे. तर आरक्षणांबाबत बोलताना शर्मिला ठाकरे यांनी समाजात आर्थिक दृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण दिले पाहिजे असेही त्या म्हणाल्या. लतादीदींच्या स्मारकापेक्षा त्यांच्या स्मरणार्थ मोठे संगीत विद्यापीठ सुरू करावे, असे मतही यावेळी शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केले. यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले होते. यावेळी शिक्षकांचा सत्कारही शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच मनसे मध्यवर्ती कार्यालय, विष्णूनगर येथे आयोजित केलेल्या "मराठी स्वाक्षरी " कार्यक्रमाला देखील त्यांनी हजेरी लावून स्वतः मराठीत स्वाक्षरी केली. यावेळी गडकरी रंगायतन येथील कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मनसेच्या सरचिटणीस रिटा गुप्ता, मनसे नेते अभिजित पानसे, ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रविंद्र मोरे, महिला अध्यक्ष समीक्षा मार्कंडे आदी उपस्थित होते.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

अमरावती जिल्ह्यात बालविवाहाचा विस्फोट, एकाच दिवशी गुप्तपणे होणारे ४ बालविवाह रोखले

अमरावती : कोरोना काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बालविवाहाची शृंखला सुरु झाली. ती अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये. जिल्ह्यात आज एकाच दिवशी अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरु असलेले चार थांबवत उध्वस्त होणाऱ्या आयुष्याला चाइल्ड लाईनने पुन्हा उत्कर्षाचा मार्ग दाखवला असून पालकांना निर्वाणीचा इशारा देण्यात आला. जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष बालकांच्या काळजी आणि संरक्षणाच्या संदर्भात काम पाहते. १८ वर्षांच्या आतील अल्पवयीन मुलीचं लग्न लावणे कायद्याने गुन्हा असून सुद्धा पालक आपल्या मुलींचा विवाह अल्पवयात लावत असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. अश्याच प्रकारे एकाच दिवशी चार बालविवाह थांबविण्यास बालसंरक्षण कक्षाला चाईल्ड लाईनच्या सहकार्याने यश आले. सविस्तर माहिती अशी की, अमरावती जिल्ह्यातील ग्राम उमरी ता. दर्यापूर येथील अल्पवयीन बालिका 17 वर्ष 3 महिने, बिहाली ता. चिखलदरा येथील बालिका १७ वर्षे ५ महिने, हिवरखेड ता. मोर्शी येथील बालिका १५ वर्ष, आणि घाटलाडकी ता. चांदूरबाजार येथील बालिका १५ वर्षे, या ठिकाणी बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती बाल संरक्षण कक्षाला मिळाली. प्राप्त माहिती नुसार सुनील शिंगणे, (विभागीय उपआयुक्त, महिला आणि बाल विकास विभाग, अमरावती) आणि उमेश टेकाडे (जिल्हा महिला बाल विकास अधिकारी,अमरावती) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांनी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांना सोबत घेऊन दोन पथक तयार केली. एक पथक घाटलाडकी,(चांदूरबाजार) हिवरखेड(मोर्शी) येथील अल्प वयीन मुलीचा विवाह रोखण्यात यशस्वी झाले. तर त्याचवेळी दुसऱ्या पथकाला देखील उमरी,(दर्यापुर) बिहाली(धारणी) येथील बाल विवाह रोखण्यात यश आले. सदर बाल विवाह थांबविण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले ,बालसंरक्षण अधिकारी भुषण कावरे, नम्रता कडु, विधी तथा परीविक्षा अधिकारी सिमा भाकरे, सामाजिक कार्यकर्ते किर्ती सगणे, मनिषा फुलाडी, समुपदेशक आकाश बरवट, माहिती विश्लेषक कांचन ढोके, चाईल्डलाईन समन्वयक अमित कपुर, टीम मेंबर अजय देशमुख, शंकर वाघमारे यांचे सहकार्य लाभले. महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांचा जिल्हा असलेल्या अमरावती जिल्ह्यात बालमजुरी आणि बालविवाहाच्या वाढत्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे हे बाल विवाह अत्यंत गोपनीय पद्धतीने होत असताना चाइल्ड लाईनेने पालकांना समज दिली आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

युक्रेन-रशिया युद्धाचे पडसाद; सुर्यफूल तेलाची कमतरता भासण्याची शक्यता, कंपन्यांकडूनही विक्री बंद

- युक्रेन-रशिया युद्धाचे पडसाद - आवक निम्म्याने घटली - कंपन्यांकडूनही विक्री बंद म. टा. प्रतिनिधी, नाशिक: युक्रेन-रशिया युद्धाचे परिणाम स्थानिक बाजारपेठेवर होऊन खाद्यतेलाचे दर वाढण्यास झाली आहे. गुरुवारी दिवसभरात सूर्यफूल तेल दरात तेरा रुपयांपर्यंतची वाढ झाली. युक्रेनहून येणारी सूर्यफुल तेलाची आयात बंद झाल्यानंतर आता कंपन्यांकडूनही या तेलांची विक्री थांबविण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सूर्यफुल तेलाची कमतरता जाणवू शकते, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे गुरुवारी (दि. २४) सकाळी १६२ रुपये किलो असलेले सूर्यफुल तेलाचे दर सायंकळी दहा रुपयांनी वाढून १७२ रुपये प्रतिकिलो झाले. सोयाबीन तेलाचेही दर १४७ वरून १६० रुपयांवर पोहोचले. शुक्रवारी (दि. २५) दरांत वाढ होण्याची शक्यता असतांनाच दर स्थिर राहिले. मात्र, सूर्यफुल तेल विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून तेलाचा विक्री थांबविण्यात आली आहे. नाशिकला दररोज तीन ते चार टँकर खाद्यतेल उपलब्ध होत असते. दर दररोज पंधरा किलोचे अडीच हजार डब्यांची विक्री होते. परंतु, आता केवळ दिवसाकाठी केवळ एकच टँकर उपलब्ध झाला आहे. युक्रेन आणि रशियातील युद्धामुळे गुरुवारी खाद्यतेलांच्या किंमतीत वाढ झाली होती. शुक्रवारी (दि. २५) मात्र, खाद्यतेलांचे दर स्थिर होते. तेल उत्पादक कंपन्यांनी सूर्यफुल तेलाची विक्री बंद केल्याने येत्या काही दिवसांत या तेलाची कमतरता जाणवू शकते. शहरात सध्या मागणीच्या तुलनेत निम्माच साठा उपलब्ध होत आहे. - प्रफुल्ल संचेती, अध्यक्ष, नाशिक किराणा व्यापारी संघटना

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

पुणेकरांना 'जम्बो' दिलासा! रुग्णसंख्या घटल्याने अजित पवारांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणेः जिल्ह्यातील करोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने उद्या, सोमवारपासून (२८ फेब्रुवारी) पुणे आणि पिंपरी येथील जम्बो रुग्णालय बंद करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले. याशिवाय दोन मार्चपासून जिल्ह्यातील पूर्वप्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या करोना आढावा बैठकीत जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या आणि लसीकरणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रमुख अधिकारी या वेळी उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांना माहिती देताना 'कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग' (सीओईपी) आणि पिंपरीतील अण्णासाहेब मगर स्टेडियम या दोन्ही ठिकाणची 'जम्बो' रुग्णालये बंद करणार असल्याचे पवारांनी नमूद केले. 'सीओईपी'चे मैदान पुन्हा पूर्वीसारखे करून देण्याचा आदेशही त्यांनी दिला. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत वाढत्या रुग्णांच्या तुलनेत खाटांची संख्या अपुरी असल्याने 'जम्बो' रुग्णालय उभारण्यात आले होते. मात्र, तिसऱ्या लाटेत करोनारुग्णांची संख्या वाढली नाही. या दोन्ही रुग्णालयांतील उपलब्ध खाटांपेक्षा अधिक खाटा पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ससून रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आल्या. त्यामुळे या रुग्णालयांची सर्व व्यवस्था काढून घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 'लसीकरणाला अल्प प्रतिसाद' शहर आणि जिल्ह्यातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील रुग्णांचे प्रमाण ५१ टक्क्यांनी घटले आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने लसीकरणाला मिळणारा प्रतिसाद थंडावल्याचे निरीक्षण पवार यांनी नोंदविले. अद्याप दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणे, ज्येष्ठ नागरिकांचा प्रीकॉशन डोस देण्यासाठी आणि १५ ते १८ या वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. 'राजीनाम्याचा प्रश्नच नाही' राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या दोघांनी नवाब मलिक प्रकरणात पक्षाची भूमिका स्पष्ट केली असून, त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही, असे अजित पवार यांनी ठणकावले. 'मलिक यांना जाणीवपूर्वक घेरण्यात आले आहे. सरकारमधील मंत्र्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला जात असेल, तर सर्वच मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी होईल, असे कसे चालेल,' असा सवालही त्यांनी केला. करोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने आणखी काही निर्बंध शिथिल करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. सर्व लोकप्रतिनिधी, वैद्यकीय तज्ज्ञ आणि टास्क फोर्स यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल. - अजित पवार, उपमुख्यमंत्री

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

सीमाभागाहून लांब राहा; युक्रेनमधील भारतीयांना दूतावासाच्या महत्त्वाच्या सूचना

वृत्तसंस्था, नवी दिल्लीः रशियन फौजा युक्रेनची राजधानी किव्हच्या अंतर्गत भागातही कूच करीत असतानाच तेथील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत. युक्रेन सोडण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांसोबत समन्वय न राखता सीमाभागांत जाऊ नये, असे या सूचनांमध्ये म्हटले आहे. युक्रेनमधील परिस्थिती गेल्या दोन दिवसांत चिघळली असून, अनेक ठिकाणी बॉम्बहल्ले, गोळीबार व क्षेपणास्त्रांचा मारा होत आहे. युक्रेनच्या पूर्व भागात राहणाऱ्या भारतीयांसाठी भारतीय दूतावासाने विशेष सूचना दिल्या आहेत. या भारतीयांनी सध्या राहात असलेले स्थळ सोडू नये, घरातच राहावे किंवा सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे दूतावासाने म्हटले आहे. युक्रेनमध्ये २० हजार भारतीय असून, त्यापैकी चार हजार भारतात सुखरूप परतले आहेत, अशी माहिती परराष्ट्र सचिव हर्ष शांग्रिला यांनी गुरुवारी दिली होती. 'पूर्व युक्रेनमधील आपल्या निवासस्थानी राहात असलेल्या भारतीयांनी आगामी सूचना मिळेपर्यंत बाहेर पडू नये. अन्न, पाणी व इतर ज्या काही सुविधा उपलब्ध आहेत, त्याचा वापर करीत निवाऱ्याच्या ठिकाणीच राहावे व धीर धरावा. आवश्यकता नसल्यास बंदिस्त ठिकाणाहून बाहेर पडू नये. किव्ह येथील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहावे. सीमा भागांतील तपासणी नाक्यांवरील परिस्थिती संवेदनशील आहे. युक्रेनमधील भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी किव्हमधील भारतीय दूतावास सातत्याने शेजारील देशांच्या भारतीय दूतावासांशी संपर्कात आहे. अशा वेळी आपणहून युक्रेनबाहेर पडण्य़ासाठी सीमाभागांत जाणाऱ्या भारतीयांशी संपर्क साधणे कठीण होत आहे. युक्रेनच्या पश्चिम भागांत पाणी, अन्न, निवाऱ्यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. हा भाग तुलनेने अधिक सुरक्षित आहे,' असेही या सूचनांमध्ये म्हटले आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

आणखी दोन एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू; संपावर तोडगा निघत नसल्याने आर्थिक विवंचना

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः चार महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी संपामुळे बँक खात्यात पगार नाही. त्यामुळे कुटुंबाचा खर्च पेलवत नसल्याने उस्मानाबाद विभागातील एसटीवाहक हनुमंत आकोसकर यांनी विष पिऊन जीवन संपवले, तर संपामुळे कुटुंबीयांचे भविष्य अंधारात दिसत असल्याने साताऱ्यातील एसटीचालक बाळकृष्ण पाटील यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. उच्च न्यायालयात शुक्रवारच्या सुनावणीत अहवालावर निर्णय होऊन संपावर तोडगा निघेल, अशी आशा आकोसकर यांना होती. मात्र यावेळी ११ मार्च ही पुढील तारीख देण्यात आली. यामुळे निराशा झाल्याने आकोसकर यांनी रात्री ८.३०च्या सुमारास विष पिऊन आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूनंतर सहा आणि आठ वर्षांची दोन मुले आणि पत्नी यांचे भविष्य अंधारमय झाले आहे. दुसरीकडे कराड आगाराचे चालक बाळकृष्ण पाटील संपात सहभागी होते. महामंडळाच्या अधिकारी वर्गाकडून कामावर हजर होण्याचा दबाव त्यांच्यावर होता. या तनावातच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप करण्यात येत आहे. एकीकडून मुंबई उच्च न्यायालयातून तारखांवर तारीख मिळवून संप चिघळवायचा आणि दुसऱ्या बाजूने कंत्राटी तत्त्वावर वाहतूक चालवून आपला वाटा घ्यायचा असेच सरकारचे धोरण असल्याचे सातत्याने दिसून येत असल्याचा संपकरी कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. राज्यातील मराठी एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू होत असताना सरकार निर्णय घेण्यास का विलंब लावत आहे, असा प्रश्नही त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, राज्यातील प्रवाशांच्या सुविधेसाठी खासगी चालकांना नियुक्ती पत्र देऊन वाहतूक करण्यात येत आहे. ही नियुक्ती कंत्राटी आहे. आत्महत्या झालेले कर्मचारी संपात सहभागी झाले होते. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अधिक बोलणे योग्य नाही, असे महामंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले. आणखी हजारोंची भरती! एसटी महामंडळात वादग्रस्त ठरलेल्या आणि भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या खासगी कंपनीलाच चालक पुरवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या कंपनीला मनुष्यबळ पुरवण्याचा अनुभव नाही. लवकरच हजारो वाहकांची भरती करण्याची तयारी सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

देशाचा पहिला स्वातंत्र्य संग्राम ज्यात सैनिक स्वत:चा दारूगोळा पेटवून शहिद झाले

सध्या रशिया – युक्रेनमुळे युद्ध हा चर्चेचा विषय बनलाय, त्यामुळे अनेक जुन्या घटना पुन्हा आठवल्या जातायेत, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, पानिपतची लढाई, प्लासीची लढाई. त्यावेळच्या सैनिकांच्या शौर्याचे सुद्धा गोडवे गायले जातायेत. पण या सगळ्यात हिंडनच्या नदीवर झालेला क्रांतिकारकांचा लढा मात्र विसरला जातोय.

गोष्ट 1857 च्या युद्धाची ज्याला भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम म्हटलं जातं, ही आजपर्यंतच्या जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी सशस्त्र चळवळ होती. सैनिकांबरोबरचं प्रत्येक जाती धर्माचे, पिडीत शेतकरी, मजूरांची ही सशस्त्र चळवळ होती. ज्याला युरोपाचे महान विचारवंत कार्ल मार्क्स  यांनी लभांडवलशाहीविरुद्धचा लढा असं म्हंटलं.

तो काळ सगळ्या जगासाठी अशांततेचा काळ होता, युरोपीय देशांमध्ये वसाहत करण्याची स्पर्धा तर युरोपात औद्योगिक क्रांती सुरू होती.  ब्रिटीशांकडे उत्कृष्ट शस्त्र आणि दळणवळणाची साधने होती, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ब्रिटिश सैन्याची गीनती जगातील सर्वात प्रशिक्षित सैन्यात व्हायची.

मेरठच्या कोतवालीत कोतवाल धनसिंग गुर्जर यांच्या नेतृत्वाखाली पहिले स्वातंत्र्ययुद्ध सुरू झाले, त्यानंतर दोन दिवसांनी गाझियाबाद आणि बुलंदशहरात सुद्धा याचे पडसाद उमटले आणि पाहता पाहता दादरी  बुलंदशहरच्या  क्रांतिकारकांनी सिकंदराबाद, गाझियाबाद आणि बुलंदशहर ताब्यात घेतले.

  या क्रांतिकारकांचे नेतृत्व दादरीचे राजा राव उमराव सिंग भाटी करत होते आणि दुसरीकडे त्याचा जवळचा मित्र मलागढचा नवाब वलीदाद खान करत होता.  मुघल सम्राट बहादूर शाह जफर, जो क्रांतिकारकांनी एकमताने निवडलेला नेता होता, त्याने पश्चिम उत्तर प्रदेशची कमान नवाब वलीदाद खान आणि राजा उमराव सिंग भाटी यांच्याकडे सोपवली.

इंग्रज मेरठचा पुन्हा ताब्यात घेतील याची दाट शक्यता होती, कारण मेरठ मंडळ क्रांतिकारकांना अन्नधान्य, खाद्यपदार्थ आणि इतर वस्तू पुरवत होते. व्हायचं येते झालं, लष्करी छावणीतून ब्रिटिश जनरल बर्नार्ड यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांची मोठी फौज दिल्लीवर हल्ला करण्यासाठी निघाली, पण जनरल बर्नार्डने दिल्लीवर हल्ला करण्यापूर्वी मेरठचा ताबा घेतला.

जनरल बर्नार्डने पुढचा प्लॅन आखण्यातसाठी  दूसऱ्या ब्रिटिश सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या जनरल आर्कलेड विल्सनला गाझियाबादमधील हिंडन नदी पार करून भेटण्यासाठी गुप्त संदेश पाठवला.  ही माहिती सम्राट बहादूर शाह जफरपर्यंत पोहोचली, त्याने मुघल राजपुत्र मिर्झा अबू बकर आणि नवाब वलीदाद खान यांना क्रांतिकारी राष्ट्रवादी सैन्यासह हा हल्ला थांबवण्यासाठी पाठवले.  मिर्झा अबू बकर आणि नवाब वलीदाद खान यांनी दादरीचे राजा उमराव सिंग भाटी यांच्याकडे मदत मागितली.

अशा पद्धतीने क्रांतिकारकांची राष्ट्रवादी सेना राजा उमराव सिंग भाटी यांच्या नेतृत्वाखाली हिंडनच्या काठी पोहोचली, जिथे ब्रिटिश सैन्य जनरल विल्सनसह मेरठहून येणार होते.  ब्रिटीश सैन्य नदी ओलांडू नये आणि दोन्ही ब्रिटीश सैन्याला भेटण्यापासून थांबवावे म्हणून भारतीयांनी हिंडन नदीचा पूल पाडला!

क्रांतिकारी सैन्य तेथे नदीच्या काठावरचं थांबलं होतं आणि शेवटी 30 मे 1857 रोजी ब्रिटीश सैन्य आणि क्रांतिकारक सैन्य यांच्यात मोठं युद्ध सुरू झालं.  इंग्रजांकडे तोफखाना, कुशल घोडदळ, तोफखाना, पायदळ प्रशिक्षित सैन्य अग्निशमन तोफ, दारुगोळा.

तर दुसरीकडे भारतीयांकडे होत्या फक्त मोजक्या तोफा, शेतकरी लढवय्ये, लुटलेली शस्त्रे, घोडदळ आणि पारंपारिक शस्त्रे.  उंच टेकडीवर उभे असलेले भारतीय क्रांतिकारी सैनिक इंग्रजांच्या दिशेने वळले आणि त्यांच्यावर तुटून पडले, इंग्रजी सैन्याला हे भारी पडायला लागलं.  त्यानंतर ब्रिटिश सैन्याने भारतीय सैन्याच्या डाव्या बाजूवर हल्ला केला, ज्यामुळे क्रांतिकारकांना माघार घ्यावी लागली.

पण यानंतर भारतीय सैन्याने एक रणनीती आखली, जेव्हा ब्रिटीश सैन्य तिथे पोहोचले तेव्हा काही शूर सैनिकांनी स्वतःच्या तोफगोळ्या आणि दारूगोळा पेटवला ज्यामुळे ते स्वत: शहीद झाले, परंतु त्याच वेळी अनेक ब्रिटीश सैन्य देखील जळून राख झाले. यात काही इंग्रज अधिकारी आणि सेनापती सुद्धा होते.

भारतीय सैनिकांनी ब्रिटीश सैन्यावर आपले हल्ले सुरूच ठेवले आणि इंग्रजांच्या शौर्याचा आणि श्रेष्ठत्वाचा अभिमान मातीत मिसळला, प्रचंड प्रशिक्षित ब्रिटिश सैन्याने भारतीयांच्या शूर सैन्यासमोर गुडघे टेकले आणि पळ काढला.

अशा पद्धतीने राजा उमराव सिंग आणि क्रांतिकारक सैन्याने युद्ध जिंकून केवळ विजय मिळवलाच नाही तर युरोपियन रणनीतीचाही पराभव केला.  पण भारतात या घटनेचा उल्लेख आढळत  नाही, याचं वाईट कुठेतरी वाटतं.

हे ही वाचा भिडू :

The post देशाचा पहिला स्वातंत्र्य संग्राम ज्यात सैनिक स्वत:चा दारूगोळा पेटवून शहिद झाले appeared first on BolBhidu.com.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले; जिल्हा प्रशासनाने...

डोंबिवली : रशिया आणि युक्रेन या दोन देशांदरम्यान युध्द () सुरू झाल्यानंतर भारताची चिंता वाढली आहे. युक्रेनवर रशियाकडून हल्ले होत असून तेथे अनेक भारतीय अडकले आहेत. अशा अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्याचे प्रयत्न भारत सरकारने सुरू केले आहेत. भारतीय नागरिकांप्रमाणेच अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून यामध्ये कल्याण-डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्यातील काही भागांमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे विद्यार्थी मुरबाड, भिवंडी, नवी मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली येथील आहेत. (students from kalyan dombivli and stranded in ) ठाणे जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षातर्फे युक्रेन येथे अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी दिलेल्या हेल्पलाइनवर या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संपर्क साधला आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील कोणीही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेश नार्वेकर यांनी केले आहे. क्लिक करा आणि वाचा- युक्रेनमध्ये ठाणे जिल्ह्यातील ७ विद्यार्थी अडकल्याची माहिती मिळत असून यांपैकी दोन विद्यार्थी ठाण्यातील, मुरबाड, भिवंडी, नवी मुंबई, कल्याण आणि डोंबिवलीचा प्रत्येकी एक विद्यार्थी आहे. ठाणे जिल्ह्यातील युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी १) शुभम म्हाडसे - मुरबाड २) संतोष चव्हाण - भिवंडी ३) प्रथमा सावंत - नवी मुंबई ४) चैताली संझगिरी - ठाणे ५) लक्ष संझगिरी - ठाणे ६) हेमंत नेहरे - कल्याण ७) संकेत पाटील - डोंबिवली क्लिक करा आणि वाचा- ठाणे येथील मदत कक्ष जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे फोन नं. ०२२-२५३०१७४०/ २५३८१८८६ ई मेल - thaneddmo@gmail.com क्लिक करा आणि वाचा- नवी दिल्ली येथील मदत कक्ष केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय, नवी दिल्ली, टोल फ्री क्र. 1800118797 दूरध्वनी क्र. 011-23012113 / 23014105 / 23017905 फॅक्स 011-23088124 ई मेल situationroom@mea.gov.in

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची जीभ घसरली, अमृता फडणवीसांचा केला आक्षेपार्ह उल्लेख

नवी मुंबई: नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष () यांनी केलेल्या (Amruta Fadnavis) यांच्यासंदर्भातील आक्षेपार्ह वक्तव्यावरून भाजपच्या चांगल्याच भडकल्या आहेत. गावडे यांच्या विरोधात भाजप आमदार मंदा म्हात्रे आक्रमक झाल्या आहेत. अशोक गावडे यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागावी अन्यथा तुम्हाला नवी मुंबईत महिला फिरू देणार नाहीत, अशा इशारा मंदा म्हात्रे यांनी दिली आहे. (district president of navi mumbai used offensive language about ) वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवाब मालिकांवर ईडी ने केलेल्या कारवाई विरोधात आंदोलन चालू असताना नवी मुंबईतील महाविकास आघाडीच्या विविध मुख्य पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. यात काँग्रेसचे अनिल कौशिक, शिवसेनेचे विठ्ठल मोरे, यांची देखील भाषणे झाली. मात्र राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे हे भाषण करत असताना त्याची जीभ घसरली. आमच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पत्नी अशा पध्दतीने कोठेही टीका करत नाही. परंतु ही डान्सबारमधली मात्र रस्त्यावर येऊन बोलते असे आक्षेपार्ह वक्तव्य गावडे यांनी केले. मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या धर्मपत्नीने कशा प्रकारचे वक्तव्य केले पाहिजे असे सांगत त्यांनी अक्कलही काढली. या आंदोलनावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्या देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. क्लिक करा आणि वाचा- गावडे यांच्या वक्तव्याचा भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे निषेध केला आहे. अशोक गावडे यांनी निदर्शने करता अपशब्द वापरले ते तोंडातही घेऊ शकत नाही. नवी मुंबईकरांच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करतो. महिलांना अपशब्द वापरणे हे आपल्या कोणत्या संस्कृतीत आणि संस्कारात बसते, हे त्यांनी लोकांना सागितले पाहिजे. उद्या आम्ही त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार देणारच आहोत. त्यांच्यावर अनेक गुन्हे असतानाही आज ते नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्याविरोधात ज्या तक्रारी आहेत त्या काढल्या तर कोणताही पक्ष त्यांना जिल्हाध्यक्ष करू शकत नाही, असे मंदा म्हात्रे म्हणाल्या. क्लिक करा आणि वाचा- आमदार मंदा म्हात्रे यांनी दिला इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करावी की करू नये हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मात्र, आम्ही उद्या त्यांच्याविरुद्ध पोलिस तक्रार करणार आहोत आणि त्यांना नवी मुंबईतही फिरू देणार नाही. त्यांच्या तोंडाला जर काळे फासले नाही, तर मी नावाची मंदा म्हात्रे नाही, असा इशाराही म्हात्रे यांनी दिला आहे. क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

भाजप आमदार-खासदारांचं चक्क रात्री ९ वाजता ठिय्या आंदोलन; कारण...

जळगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे मिळत नसल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेत शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ द्या, असं म्हणत खासदार उन्मेष पाटील आणि आमदार सुरेश भोळे यांच्यासह पंचायत समिती सदस्य आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना घेराव घातला व जाब विचारला. () जिल्ह्यातील १० हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित असून त्यांची ४ ते ५ कोटी रुपयांची पीक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही. मागील २४ महिन्यांपासून पाठपुरावा करुनही पैसे मिळत नसल्याचं सांगत भाजपने आक्रमक पावित्रा घेतला. शुक्रवारी रात्री चक्क ९ ते १० वाजेदरम्यान उन्मेश पाटील, सुरेश भोळे, पंचायत समिती सदस्य हर्षल पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. तसंच पीकविम्याची रक्कम देण्याबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. यादरम्यान खासदार उन्मेष पाटील यांनी कृषीमंत्र्यांशी फोनवरून संवाद साधला. मात्र लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्यानंतर एक महिन्यात जिल्ह्यातील सर्व वंचित शेतकऱ्यांचे पीक विम्याच्या नुकसान भरपाईचे पैसे मिळवून देण्याचे लेखी आश्वासन जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी पाटील यांनी दिले आणि त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. '...तर पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही' महिन्याभरात शेतकर्‍यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही तर पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा यावेळी भाजप आमदार तसंच खासदारांनी दिला आहे. शासनाकडूनच विमा कंपनीला पैसे मिळालेले नाहीत, त्यामुळे विमा कंपनी शेतकर्‍यांना पैसे दिले नाही. अखेर शासनाकडे पत्रव्यवहार करून शेतकऱ्यांना पीकविम्याचे नुकसानभरपाईचे पैसे मिळवून देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आलं आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

रशिया-युक्रेन युद्धामुळं बाजारपेठेला फटका; खाद्यतेलाचे भाव पुन्हा कडाडले

- सूर्यफुल तेलाची ९० टक्के आयात युक्रेन-रशियाहून - मागील दहा दिवसांत आयातीत घट, दरात २० टक्के वाढ - मटा विशेष chinmay.kale@timesgroup.com @ChinmaykaleMT मुंबई : रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाचे दर पुन्हा एकदा १५० रुपयांपार जात आहेत. भारतात सूर्यफुल तेलबियांची ९० टक्के आयात तिथूनच होते. त्यामुळे खाद्यतेल किमतीवर या युद्धाचे भीषण परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. भारत हा खाद्यतेलाची सर्वाधिक मागणी असलेला देश आहे. सर्वाधिक मागणी पामतेल, त्यानंतर सोयाबीन व तिसऱ्या क्रमांकावर सूर्यफुल तेलाची असते. पण मागणीच्या जेमतेम १५ टक्के तेल उत्पादन भारतात होते. त्यामुळेच भारताला दरवर्षी मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात करावी लागते. त्यामध्ये सर्वाधिक आयात पामतेलाची होत असून इंडोनेशियावरून हे तेल कच्च्या स्वरूपात मागवले जाते. सोयाबीन तेल बहुतांश प्रमाणात भारतात तयार होते. पण यंदा त्याचे गणितही बिघडलेले असल्याने सोयाबीन तेल उत्पादनात पाच टक्क्यांची घट आहे. त्यामुळे सूर्यफुल तेल आयातीवरच देशातील खाद्यतेलाची भिस्त आहे. तसे असताना रशिया-युक्रेन युद्धामुळे या तेलाची आयातदेखील संकटात आली आहे. याबाबत अखिल भारतीय खाद्यतेल महासंघाचे अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी सांगितले की, 'भारतात एकूण मागणीच्या सुमारे ३० टक्के सूर्यफुल तेल असते. पण त्यातील ७० टक्के तेलबिया युक्रेन व २० टक्के रशियाहून आयात होतात. तेथील थंडीतच हे पीक उत्तम प्रकारे येते. आता युद्ध व युद्धजन्य स्थितीमुळे मागील १५ दिवसांत युक्रेन आणि रशियातील आवक जवळपास थांबलेली आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय स्तरावरच सूर्यफुल तेलाचे दर २० टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचा परिणाम अन्य सर्व प्रकारच्या खाद्यतेलांवर दिसू लागला आहे.' याआधी मागीलवर्षी पामतेल आयातीचे गणित बिघडल्याने खाद्यतेलाच्या दरांनी १५० रुपये प्रति लिटरचा टप्पा गाठला होता. काही खाद्यतेल २०० रुपयांवर गेली होती. त्यानंतर केंद्र सरकारने तीन वेळा आयात शुल्कात कपात केल्याचे दरात २० ते २२ टक्क्यांची घट झाली. पण सूर्यफुल तेलाची आवक संकटात आल्याचे बघून इंडोनेशियाने पामतेलाचे दर वाढवले आहेत. या सर्वांच्या परिणामातून मुंबईसह सर्वत्र खाद्यतेलाच्या दरात मागील आठवडाभरातच १५ ते २० टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. ही दरवाढ आणखी होण्याची भीती निर्माण झाली आहे. खाद्यतेलाचे दर असे (रुपये/लिटर) प्रकार दहा दिवस आधी सध्या पाम ११०-११५ १३०-१३५ सोयाबीन १२५-१३० १४०-१४५ सूर्यफूल १३०-१४० १५०-१६० शेंगदाणा १६५-१९५ १७५-२०० राईसब्रान १३०-१४० १४५-१५०

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार; दक्षिण मुंबईतून अलिबाग दीड तासांत शक्य

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः दक्षिण मुंबईतून अलिबागला रस्ते मार्गाने दीड तासांत पोहोचणे लवकरच शक्य होणार आहे. करंजा ते रेवसदरम्यान धरमतर खाडीवर दोन किमीचा चारपदरी पूल उभारण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) निविदा मागवल्या आहेत. ऑक्टोबरपासून पूलउभारणीचे काम सुरू करण्याचे नियोजन आहे. कॅलिफोर्नियाच्या धर्तीवर कोकण किनारपट्टीवर रेवस ते रेड्डीदरम्यान ४४७ किमीचा सागरी महामार्ग उभारला जात आहे. या मार्गावर करंजा ते रेवसदरम्यान खाडीवर हा पूल उभारण्यात येणार आहे. १९८०च्या दशकात तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी या खाडीपुलाला मंजुरी दिली होती. मात्र तेव्हा काही कारणांमुळे तो होऊ शकला नाही. मात्र आता ४० वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली आहे. ऑक्टोबरपासून या पुलाच्या कामाला सुरुवात होणे अपेक्षित असून, तो पूर्ण होण्यासाठी तीन वर्षे लागणार आहेत. ऑक्टोबर २०२५मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. यासाठी सुमारे तीन हजार ५७ कोटी रुपये खर्च येणार आहे. याला राज्य सरकारची मान्यता मिळाली असून, आता 'एमएसआरडीसी'ने कंत्राटदाराच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या दक्षिण मुंबईतून अलिबागला जाण्यासाठी साडेतीन तासांहून अधिक वेळ लागतो. या प्रकल्पामुळे मुंबई आणि अलिबागमधील अंतर कमी होणार आहे. सध्या 'एमएमआरडीए'कडून मुंबई पारबंदर प्रकल्प (एमटीएचएल) रस्त्याचे काम सुरू आहे. २०२३मध्ये ते पूर्ण होणार आहे. या रस्त्यामुळे शिवडीवरून थेट नवी मुंबईतील चिर्ले येथे पोहोचता येणार आहेत. तर पुढे खाडीवरील नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलामुळे अलिबाग अधिक जवळ येणार आहे. कोकणात रस्ते मार्गाने पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या प्रवासवेळेत यामुळे मोठी बचत होणार असून, या भागातील पर्यटनाला चालना मिळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 'स्टील स्ट्रक्चर' बांधकाम करंजा ते रेवस खाडीवर २.०४ किमीचा पूल बांधला जाणार आहे. तर करंजाच्या दिशेला ५.१ किमी आणि रेवसच्या दिशेला १.७ किमी लांबीचा जोडरस्ता उभारला जाणार आहे. या खाडीतून मच्छिमार बोटी आणि बार्ज यांची ये-जा सुरू असते. पुलामुळे जलवाहतुकीला अडथळा येऊ नये यासाठी स्टील स्ट्रक्चर पद्धतीचे बांधकाम करण्यात येणार असून, १२० मीटर लांबीचे १७ गाळे उभारले जाणार आहेत. समुद्राच्या उच्चतम लाटेच्या तुलनेत हे गाळे ३० मीटर उंच असणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

मुंबई पोलिसांना हादरवणाऱ्या अँटिलिया प्रकरणाची वर्षपूर्ती; मात्र गूढ गुलदस्त्यातच

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः मुंबई पोलिस दलाचा नावलौकिक धुळीस मिळविणाऱ्या अँटिलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरन हत्याकांड प्रकरणाला आज, २५ फेब्रुवारीला एक वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभरानंतरही या दोन्ही प्रकरणातील बरेच काही अद्यापही गुलदस्त्यातच आहे. 'सुपर कॉप' बनण्यासाठी आणि पैसे उकळण्यासाठी सचिन वाझे आणि कंपनीने हे कांड रचले होते, असे 'एनआयए'च्या तपासातून पुढे आले असले, तरी पैसे कुणाकडून उकळण्यात येणार होते? जिलेटीनच्या कांड्या नेमक्या आणल्या कुठून? हा कट वाझे आणि इतर पोलिसांपुरताच होता का अन्य बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे? मनसुख हिरन यांची हत्या का करण्यात आली? यांसारख्या अनेक बाबी अद्याप अस्पष्टच आहेत. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवून त्यांना धमकाविण्यात आले. एक निनावी चिठ्ठी सापडल्याने एकच खळबळ उडाली. सुरुवातीला हा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे देण्यात आला. तपासादरम्यान ही कार ठाणे येथील व्यावसायिक मनसुख हिरन यांची असल्याचे समोर आले. तपासादरम्यान मनसुख हिरन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीजवळ सापडला आणि एकच खळबळ उडाली. महाराष्ट्र एटीएसने याप्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असतानाच, स्फोटके सापडल्याने दोन्ही प्रकरणांचा तपास 'एनआयए'कडे देण्यात आला. 'एनआयए'ने माजी पोलिस सहायक आयुक्त प्रदीप शर्मा तसेच सचिन वाझे, सुनील माने, रियाझुद्दीन काझी, विनायक शिंदे यांच्यासह अन्य आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले. याप्रकरणात परमबीर सिंह, उपायुक्त पराग मणेरे यांचेही जबाब नोंदविण्यात आले आहेत. 'एनआयए'ने याप्रकरणात आरोपी पोलिसांनी अटक केली, त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली, आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले. मात्र, अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याचे म्हटले जात आहे. वाझे यांनी त्यांचे साथीदार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार हे सर्व करीत होते. इतकेच नाही तर या कृत्यानंतर प्रत्येक घडामोडींची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवत होते. त्यामुळे या अधिकऱ्यांवरही संशयाची सुई अजूनही असून त्यांचा सहभाग नेमका काय होता हे स्पष्ट झालेले नाही. यापैकी काही अधिकाऱ्यांवर अटकेची टांगती तलवार कायम असल्याचे म्हटले जात आहे. आम्हाला काहीच बोलायचे नाही अँटिलियाजवळ ज्या स्कॉर्पिओमध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्या ती कार मनसुख हिरन यांची होती. या घटनेनंतर त्यांचा यामध्ये नाहक बळी घेण्यात आला. याबाबत मनसुख याचा मुलगा मित याच्याशी संपर्क साधला असता, याबाबत आम्हाला आता काहीच बोलायचे नसल्याचे तो म्हणाला. वर्षभर आम्ही खूप वेदना सहन केल्या अनेक अडचणींचा सामना करून आम्ही यातून सावरलोय. आता यावर कोणतेच भाष्य करायचे नसल्याचे तो म्हणाला. पोलिसांची प्रतिमा मलिन करणारे वर्ष हे एक वर्ष मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करणारे ठरले. स्फोटके आणि हत्येच्या कटामध्ये चार पोलिस आणि एक माजी पोलिस अधिकाऱ्याचा सहभाग आढळल्याने पोलिसांकडे सर्वच संशयाच्या नजरेने पाहू लागले. या चारही पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर मुंबई पोलिस दलामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या. तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करून हेमंत नगराळे यांच्याकडे आयुक्तपदाची धुरा सोपविण्यात आली. गुन्हे शाखेतील कर्तव्यदक्ष, खबऱ्यांचे जाळे, उत्कृष्ट तपास कौशल्य असलेल्या ६५ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. या प्रकरणानंतर परमबीर सिंह आणि इतर अधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल झाले. याच वर्षात परमबीर आणि पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांना निलंबित करण्यात आले. २५ फेब्रुवारी : अँटिलियाजवळ जिलेटीन कांड्या असलेली स्कॉर्पिओ कार सापडली ५ मार्च : स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरन याचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीकिनारी सापडला. ७ मार्च : गुन्हा दाखल करून महाराष्ट्र एटीएसने तपास सुरू केला ९मार्च : अँटिलियाजवळ स्फोटके प्रकरण : मनसुख हिरनसह स्फोटकांचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) वर्ग १३ मार्च : अँटिलियाप्रकरणी सचिन वाझेची १२ तास चौकशी व अटक १६ ते १९ मार्च : एनआयएकडून अँटिलिया प्रकरणाच्या तपासाला वेग. मनसुख हिरन यांच्या पत्नीची भेट, वाझेच्या कार्यालयातील दस्तावेजांचा तपास, गुन्ह्याचे नाटकीय सादरीकरण २४ मार्च : वाझेविरोधात बेकायदेशीर कृत्याचा गुन्हा दाखल ३० मार्च : सचिन वाझेच्या विविध गाड्या हुडकून जप्त. स्फोटके कुठून आणले, याचा तपास सुरू ४ एप्रिल : सचिन वाझे प्रकरण : सहायक पोलिस निरीक्षक रियाझुद्दीन काझीला अटक २३ एप्रिल : हिरन हत्या प्रकरण : वाझेचे मित्र निरीक्षक सुनील मानेला अटक २६ एप्रिल : सुनील मानेची गाडी जप्त ११ मे : सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे बडतर्फ २१ मे : सहायक पोलिस निरीक्षक रियाझुद्दीन काझी बडतर्फ १ जून : पोलिस निरीक्षक सुनील माने बडतर्फ २५ मे : काॅन्स्टेबल विनायक शिंदे बडतर्फ १७ जून : माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मांना अटक ३ सप्टेंबर : सचिन वाझेविरुद्ध आरोपपत्र. माजी सहायक आयुक्त प्रदीप शर्मांसह दहा आरोपी. निलंबित पोलिस सह निरीक्षक रियाझुद्दीन काझी, सुनील माने, विनायक शिंदे, नरेश गौर, संतोष शेलार, सतीश मोठकुरी, मनिष सोनी व आनंद जाधव यांचा समावेश

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Russia Ukraine War रशिया-युक्रेन युद्ध; रत्नागिरी जिल्हा प्रशासनानेही उचलले 'हे' पाऊल

रत्नागिरी: Rassia) व (Ukraine) या देशांमध्ये युद्ध सुरू झाले असून युक्रेन या देशात भारतीय नागरिक व विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका करण्याचे प्रयत्न भारत सरकारने सुरू केले आहेत. देशातील अनेक राज्यांमधील नागरिक तसेच विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. हे लक्षात घेता रत्नागिरी जिल्हा प्रशासनही सज्ज झाले आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हयातील कोणी भारतीय नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्यास त्यांच्या सहाय्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आलाय. ( ratnagiri district administration released helpline) रत्नागिरी जिल्ह्यातील कोणतेही नागरिक, विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी सुशांत खांडेकर यांनी कळविले आहे. क्लिक करा आणि वाचा- जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी फ्रोन 02352-226248/ 222233ईमेल- controlroomratnagiri@gmail.com युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांनी किंवा विद्यार्थ्यांनी जिल्हा नियंत्रण कक्षाने दिलेल्या फोन क्रमांकावर किंवा ईमेल आयडीवर संपर्क करावा असे आवाहन रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या बरोबरच नवी दिल्ली येथे नागरिकांसाठी हेल्पलाईन्स स्थापन करण्यात आलेल्या आहेत. नागरिक तेथेही संपर्क साधू शकतात असे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. क्लिक करा आणि वाचा- केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय, नवी दिल्लीफ़ोन-टोल फ्री 1800118797फोन - 011-23012113/23014105 / 23017905फॅक्स 011-23088124ईमेल- situationroom@mea.gov.in रशिया आणि युक्रेन या दोन देशांदरम्यान सुरू झालेल्या युद्धामुळे व त्याच्या परिणामांकडे अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे. भारतीय दूतावासाने यापूर्वी युक्रेन सोडण्यासाठी दोनवेळा ऍडव्हायजरी जारी केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आलेत. रत्नागिरी जिल्हा प्रशासनानेही आपत्ती व्यवस्थापनही समन्वय साधला जावा यासाठी सज्ज झाला आहे. क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्र्यांनी केल्या प्रशासनाला सूचना युक्रेनमधील युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जे नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांची तिथे काय व्यवस्था आहे ते पाहावे, तसेच त्यांना परत महाराष्ट्रात सुखरूप घेऊन येण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी व्यवस्थित समन्वय साधावा अशा सूचना मुख्य सचिवांना केल्या आहेत. विशेषत: महाराष्ट्रातील जे विद्यार्थी युक्रेनमध्ये आहेत त्यांची काळजी घेण्याच्या दृष्टीने प्राधान्याने केंद्राशी बोलावे अशा सूचनाही मुख्यमत्र्यांनी प्रशासनाला केल्या आहेत. महाराष्ट्रातून उद्योग , शिक्षण, व्यवसायनिमित्त तिथे गेलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

nawab malik arrested: शरद पवार 'वर्षा'वर दाखल, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक सुरू

मुंबई: अल्पसंख्याक मंत्री (Nawab Malik) यांच्या अटकेनंतर सिल्व्हर ओक या निवास्थानी बोलावलेल्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (Sharad Pawar) हे तातडीने यांच्या निवासस्थानी तातडीने रवाना झाली आहे. मलिक यांच्या अटकेनंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे () यांनी ही अत्यंत महत्वाची बैठक बोलावली आहे. (After the arrest of , an important meeting has started at the residence of Chief Minister Thackeray is also present at this meeting) क्लिक करा आणि वाचा- मलिक यांना अटक झाल्यानंतर ते राजीनामा देतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जर तसे झाले तर त्यांच्याकडे असलेल्या खात्यांची जबाबदारी कोणाकडे द्यावी हा अत्यंत महत्वाचा प्रश्न सरकारपुढे उभा राहणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या सिल्व्हर ओक या निवास्थानी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आदी नेते उपस्थित होते. क्लिक करा आणि वाचा- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांच्याकडील पद दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले होते. आता जर नवाब मलिक यांना राजीनामा द्यावा लागल्यास त्यांच्याकडील पदे कोणाकडे द्यावीत यावर वर्षा या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत विचारविनिमय होण्याची शक्यता आहे. क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Nawab Malik Arrested: मलिकांचा गुन्हा सिद्ध झालेला नाही, त्यामुळे राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही: भुजबळ

मुंबई: ईडीने अटक केलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक झालेली असली तरी त्यांचा न्यायदेवतेपुढे गु्न्हा सिद्ध झालेला नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे मंत्री (Chhagan Bhujbal) यांनी स्पष्ट केल आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीनंतर भुजबळ प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी उद्यापासून राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि काँग्रेसतर्फे आंदोलन पुकारण्यात आल्याचेही भुजबळ यांनी जाहीर केले आहे. (minister has said that crime of has not been proved so there is no question of his resignation) अल्पसंख्याक मंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्र्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर छगन भुजबळ प्रसारमध्यमांशी बोलत होते. नवाब मलिक याना झालेली अटक दुर्देवी आहे. हे प्रकरण पीएमएले कायदा अस्तित्वात नव्हता तेव्हाचे आहे. महाविकास आघाडी सरकारचे मंत्री केंद्र सरकार आणि भाजपच्या विरोधात बोलतात म्हणून हे ३० वर्षांपूर्वीचे प्रकरण आता बाहेर काढण्यात आल्याचे भुजबळ म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- उद्या आघाडीच्या मंत्र्यांचे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत अटक प्रकरणावर कायदेशीररित्या चर्चा करण्यात आली. या प्रकरणावर आता जनतेत जाऊन मुकाबला करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले. तसेच उद्या सकाळी १० वाजचा मंत्रालयाजवळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याशेजारी आघाडीचे सर्व मंत्री, आमदार धरणे आंदोलन करणार असल्याचेही भुजबळ यांनी जाहीर केले. तसेच परवापासून तिन्ही पक्ष शांततेच्या मार्गाने तालुका आणि जिल्हा पातळीवर मोर्चे, धरणे आंदोलन करणार असल्याचेही भुजबळ म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- 'राणेंना अटक झाली तेव्हा कुठे राजीनामा घेतला होता?' नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही असे सांगताना भुजबळ म्हणाले की केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही अटक झाली होती. मात्र त्यावेळी त्यांनी राजीनामा दिलेला नव्हता. महाविकास आघाडीचे मंत्री केंद्र सरकारविरोधात बोलत असतात त्यामुळे एकेका मंत्र्याला कोंडीत पकडून त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली आहे. क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Breaking मोठी बातमी; नवाब मलिकांना धक्का; कोर्टाने सुनावली ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री यांना न्यायालयाने ३ मार्च पर्यंत कोठडी ठोठावली आहे. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी ही ८ दिवसांची ईडी कोठडी सुनावली. ईडीने न्यायालयाकडे १४ दिवसांची ईडी कोठडीची मागणी केली होती. नवाब मलिक यांना अंडरवर्ल्डशी संबंध आणि मनी लाँड्रिंगप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) यांना अटक करण्यात आली आहे. अटकेपूर्वी ईडीने मलिक यांची तब्बल सात तास चौकशी केली. (Minority Development Minister has been remanded in till 3rd of march) अडरवर्ल्डशी संबंध आणि मनी लाँड्रिंगशी संबधित प्रकरणात ईडीने आज बुधवारी मोठी कारवाई करत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना सात तासांच्या चौकशीनंतर अटक केली. ईडीने सकाळी ७ वाजता मलिक यांच्या घरी छापा टाकला होता. राष्ट्रीय तपास संस्थेच्या एफआयआरच्याआधारे सुरू असलेल्या तपासाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. दाऊदचा भाचा अलिशाह पारकर व छोटा शकीलचा माणूस सलीम फ्रुटच्या जबानीनुसार मलिक यांना अटक केल्याची ईडीच्या सूत्रांनी माहिती दिली. क्लिक करा आणि वाचा- लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेला काश्मिरातील कारवायांसाठी आर्थिक पुरवठा करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर एनआयएने दाऊदविरुद्ध बेकायदेशीर कृत्यविरोधी कायद्यानुसार (यूएपीए) गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यासाठीचा पैसा हवालामार्फत मुंबईतून दाऊदपर्यंत किंवा दाऊदच्या सांगण्यावरुन मुंबईतून काश्मिरला पुरवला जात असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे. यांत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय असल्यानेच आता ‘एनआयए’ च्या एफआयआर आधारे ‘ईडी’ने तपास सुरू केला आहे. त्याअंतर्गतच दाऊदची बहिण हसिना पारकरच्या बंद घरावर तसेच मुंबई व ठाण्यात मिळून दहा ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. त्याअंतर्गतच अलिशाह पारकर, याची चौकशीही ईडीने केली होती. मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित काही मालमत्ता कमी किमतीत खरेदी केल्याचा आरोप ‘ईडी’ने मलिक यांच्यावर ठेवला आहे. क्लिक करा आणि वाचा- या प्रकरणी युक्तीवाद करताना अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी युक्तीवाद करताना म्हणाले की, फेब्रुवारी रोजी दाऊद इब्राहिम विरुद्ध एनआयएने एफआयआर नोंदवला, त्याला जागतिक दहशतवादी घोषित केले आहे. दाऊदचे खूप वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे आहेत, दहशतवादी कृत्ये, बनावट नोटा चलनात आणणे, अवैध पैशांचा व्यवहार, हवाला, त्याचे लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-महंमद, अल-कैदा अशा अनेक आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशीही संबंध. त्याची बहीण हसीना पारकर हिचाही गुन्ह्यात संबंध होता. कुर्ल्यामध्ये गोवावाला कंपाऊंड ही मालमत्ता हसीनाच्या मालकीची आहे. ईडीच्या तपासात असे निष्पन्न झाले की, कुर्लामधील गोवावाला कंपाऊंड मालमत्ता वारसा हक्काप्रमाणे मरियम आणि मुनिरा प्लंबर यांच्या मालकीची होती. ती मालमत्ता नवाब मलिक यांच्या मालकीच्या कंपनीने दाऊदच्या डी-गॅंगच्या लोकांशी संगनमत करून विकत घेतली. मुनिराने मालमत्ता मलिक यांच्या कंपनीला विकली, याची माहिती मरियमला प्रसारमाध्यमांच्या बातम्या पाहिल्यानंतरच समजले. मरियमने एक कुलमुखत्यारपत्र दिले होते, पण ते फक्त अतिक्रमणे हटवण्याविषयीच्या कार्यवाहीसाठी दिले होते, मालमत्ता विकण्यासाठी दिलेले नव्हते. तिने कधीही मालमत्तेवरचा हक्क सोडला नव्हता. कुलमुखत्यारपत्राचा गैरवापर करण्यात आला, असे तपासात निष्पन्न झाले. यावेळी मलिक यांना १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात यावी अशी मागणी ईडीकडून कोर्टात करण्यात आली. हसीना पारकरचा साथीदार सलीम पटेलने कुमुखत्यारपत्राचा गैरवापर करत हसीना पारकरच्या नावे मालमत्ता विक्री व्यवहार केला आणि ती तीन कोटी ३० लाख रुपयांची मालमत्ता ५५ लाख रुपयांना नवाब मलिक यांच्या कंपनीला विकली, असेही कोर्टात सांगण्यात आले. क्लिक करा आणि वाचा- यावेळी नवाब मलिक यांची बाजू मांडणारे वकील अमित देसाई यांनी युक्तीवाद करताना म्हटले की, मनी लॉ डरिंग कायदा नंतर त्याच्या खूप आधी मालमत्ता व्यवहार झाला. सन १९९९ ते २००३ मधल्या व्यवहाराचा ईडी आता फेब्रुवारीमध्ये तपास करते आणि कायद्याच्या तरतुदी खूप जुन्या व्यवहारांना कलमे लावली जातात, असा ईडीचा उघड भोंगळ कारभार सुरू आहे. अशा प्रकारच्या निराधार आरोपांवर ईडीसारखी गंभीर तपास यंत्रणा मलिक यांना भर सकाळी ६ वाजता घरातून उचलते आणि बळजबरीने ताब्यात घेऊन नंतर अटक करते, हे सर्व गंभीर आहे. मनी लॉडेरिंग कायदा हा खूप कडक आहे, त्यातील कलमे खूप कडक आहेत. त्यांचा तपास यंत्रणेने गैरवापर चालवलाय. ईडीच्या रिमांड अर्जात काहीच आधार नाहीत, तरीही लोकप्रतिनिधीला, मंत्र्याला अटक करून त्याचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांशी संबंध आहेत, असे चित्र तपास यंत्रणेकडून तयार केले जाते.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

coronavirus update करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाल्याने दिलासा; राज्यात आज १,१५१ नवे रुग्ण

मुंबई: राज्यात करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होत असली तरी कालच्या तुलनेत आज दैनंदिन रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाली आहे. मात्र, मृत्यूसंख्येत घट झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासात १ हजार १५१ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर, आज राज्यात एकूण २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात २ हजार ५९४ बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या बरोबरच राज्यात आज एकूण ११ हजार ६०४ रुग्णांवर (सक्रिय रुग्ण) उपचार सुरू आहेत. (maharashtra registered 1151 new cases in a day with 2594 patients recovered and 23 deaths today) राज्यात आजपर्यंत एकूण ७७ लाख ०२ हजार २१७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९७ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ७४ लाख ८४ हजार १४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख ६१ हजार ४६८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १०.१५ टक्के इतके आहे. सध्या राज्यात १ लाख ६४ हजार ०५० व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ९२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. क्लिक करा आणि वाचा- याबरोबरच, राज्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ४३ हजार ६५६ इतकी आहे. मुंबईत आज १६८ नवे रुग्ण मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आज बुधवारी १६८ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर, मुंबईतील करोना बाधितांची आजपर्यंतची एकूण संख्या १० लाख ५५ हजार ०४२ इतकी झाली आहे. तसेच मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये एकाही करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. तर, आजपर्यंत मुंबईत करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १६ हजार ६९० इतकी आहे. क्लिक करा आणि वाचा- ठाणे जिल्ह्यात आज एकूण ५८ नवे रुग्ण ठाणे जिल्ह्यात आज बुधवारी ५८ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. यांपैकी ठाण्यात ०९, ठाणे महापालिका क्षेत्रात १४, नवी मुंबई मनपा क्षेत्रात २०, कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात ०९, तर उल्हासनगर मनपा क्षेत्रात ०२, भिवंडी निजामपूर महानगरपालिका क्षेत्रात ०, मिरा-भाईंदर मनपा क्षेत्रात ०४ रुग्ण आढळले आहेत. क्लिक करा आणि वाचा- तर, पालघरमध्ये आज १२ रुग्ण आढळले असून, वसई विरार मनपा क्षेत्रात ०६, रायगडमध्ये २९ आणि पनवेल मनपा क्षेत्रात १७ नवे रुग्ण आढळले आहेत.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

sameer wankhede: समीर वानखेडे यांची कोपरी पोलिसांकडून आठ तास चौकशी

म. टा. प्रतिनिधी, ठाणे प्रतिज्ञापत्रावरील खोट्या माहितीच्या आधारे तसेच वयाबाबतच्या अटींचे उल्लंघन करुन प्राप्त केल्याच्या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबईचे माजी विभागीय संचालक यांची बुधवारी कोपरी पोलिसांनी आठ तास चौकशी केली. वानखेडे यांचा जबाब नोंदवण्यात आला असून विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मुद्देसूद उत्तरे दिल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. आवश्यकता वाटल्यास चौकशीसाठी वानखेडे यांना पुन्हा बोलवले जाईल असेही अधिकाऱ्याने सांगितले. (Kopari police interrogated for eight hours) उत्पादन शुल्क विभागाच्या तक्रारीनंतर वानखेडे यांच्याविरुद्ध १९ फेब्रुवारी रोजी ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांना हंगामी संरक्षण देत २८ फेब्रुवारीपर्यंत अटकेची कारवाई न करण्याविषयी न्यायालयाने निर्देश दिल्याने वानखेडे यांना दिलासा मिळाला आहे. परंतु, या गुन्ह्याप्रकरणी कोपरी पोलिसांनी चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्याविषयी वानखेडे यांना नोटीस पाठवली होती. तसेच त्यांना गुन्ह्याच्या तपासामध्ये अडथळा येईल असे कृत्य करू नये, गुन्ह्यातील साक्षीदारांवर दबाव आणू नये किंवा त्यांना प्रलोभन देऊ नये, पुरावा नष्ट करू नये, जेव्हा चौकशीसाठी बोलवले जाईल तेव्हा उपस्थित राहण्याच्या सूचनाही पोलिसांनी या नोटीसद्वारे दिल्या होत्या. त्यानुसार बुधवारी सकाळी ११.३० वाजता वानखेडे चौकशीसाठी कोपरी पोलिस ठाण्यात हजर झाले. क्लिक करा आणि वाचा- वानखेडे यांच्या सोबत त्यांचे वकील देखील पोलिस ठाण्यात आले होते. परंतु, वकिल पोलिस ठाण्याच्या बाहेरच थांबले होते. अखेर आठ तासांच्या चौकशीनंतर सायंकाळी ७.३० वाजता वानखेडे पोलिस ठाण्यातून बाहेर पडले. वानखेडे यांचा पोलिसांनी जबाब नोंदवला असून हा जबाब पाच ते सहा पानांचा असल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. वानखेडे यांना विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मुद्देसूद उत्तर दिली असून ते तपासाला सहकार्य करीत असल्याचे या पोलिस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. आवश्यक वाटल्यास वानखेडे यांना परत पोलिसांकडून बोलवण्यात येणार आहे. परंतु, चौकशीमध्ये नेमके त्यांनी पोलिसांना काय सांगितले याविषयी समजू शकले नाही. क्लिक करा आणि वाचा- पोलिस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर माध्यमांनी समीर वानखेडे यांना या प्रकरणाविषयी विचारले असता, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून याबाबत काही सांगता येणार नाही. मी तपासामध्ये सहकार्य करीत असल्याचे ते म्हणाले. तर, ईडीने अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्याच्या प्रकरणात वानखेडे यांनी बोलण्यास नकार दिला. क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

मालिकांच्या अटकेचं महाविकास आघाडीकडून राजकारण पण गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे... : रावसाहेब दानवे

औरंगाबाद: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री यांना आज सकाळीच ईडीने ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना अटक करत कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया येत असताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांनी, नवाब मालिकांच्या अटकेच राष्ट्रवादी-काँग्रेस आणि शिवसेना राजकारण करत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना दानवे म्हणाले की, मला वाटते नवाब मलिक यांना झालेली अटक ही राजकीय दृष्ट्या झालेली अटक नाहीत. देशातील जनतेला माहीत आहे की, मुंबईतील बॉम्बस्फोट मागे दाऊद इब्राहीमचा हात होता. अनेक लोकांचे बळी गेले होते आणि त्यानंतर दाऊद इब्राहिम भारत सोडून बाहेर गेला होता. पण त्यांची बेनामी मालमत्ता इथेच होती, जी इकबाल कासकर आणि दाऊद याची बहीण हसीना पारकर यांच्या ताब्यात होती. दरम्यान जेलमध्ये गेलेल्या इकबाल कासकर याने चौकशीत दिलेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांनी त्या बेनामी मालमत्ता खरेदी केल्या. मलिक यांच्या माणसांनी अवघ्या ३०-४० लाखात त्या घेतल्या आणि त्याआधारे मलिक यांना अटक करण्यात आल्याचे दानवे म्हणाले. तर पुढे बोलताना दानवे म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते म्हणत आहे की, त्यांना माहीत होते मलिक यांना अटक होणार होती. कारण ते भाजप विरोधात बोलतात. पण तसं नसून इकबाल कासकर याने जेलमध्ये मलिक याचं नाव घेतल्याने ते जेलमध्ये जाणार हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना माहीत असल्याने ते तसं म्हणत असावे. त्यामुळे या अटकेमागे कोणतीही राजकारण नसून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने ईडी कडून ही अटक झाली असल्याचं दानवे म्हणाले. नवाब मलिकांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाने ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी मलिकांना ८ दिवसांची ईडी कोठडी सुनावली. ईडीने न्यायालयाकडे १४ दिवसांची ईडी कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ३ तारखेपर्यंत मलिकांना ईडी कोठडी सुनावलीय. नवाब मलिक यांना अंडरवर्ल्डशी संबंध आणि मनी लाँड्रिंगप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) यांना अटक करण्यात आली आहे. अटकेपूर्वी ईडीने मलिक यांची तब्बल सात तास चौकशी केली. ज्यानंतर ईडीने त्यांना अटक केली.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

'किंगमेकर नव्हे, किंग व्हायचे आहे'; मुंबईसाठी मनसेचा नवा आराखडा

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने योजनाबद्ध आराखडा आखला आहे. निवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करणे, विभागवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या समितींचे गठन करणे, त्याचबरोबर मतदारांबरोबर कशा प्रकारे संवाद साधायचा, यांसारख्या अनेक बाबींवर भर देण्याची सूचना कार्यकर्त्यांना मंगळवारी करण्यात आली. मुंबई महानगरपालिका निवडणुकींसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहनही मनसेकडून करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे नुकतेच जाहीर केले. त्यानुसार नेतेमंडळींची विशेष बैठक नुकतीच पार पडली. त्यानंतर आता मनसेच्या पदाधिकाऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबीर मंगळवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात झाले. यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसााई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या मार्गदर्शन शिबिरात निवडणूक आयोगाच्या आजी-माजी सदस्यांसह इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. मनसे अध्यक्ष यांच्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पण अनेक वेळा त्यांचे मतांमध्ये रूपांतर होत नाही. त्यासाठी मनसेने विशेष लक्ष देण्याचे ठरविले आहे. यासाठी मतदार नोंदणीसह निवडणूक प्रक्रियेतील इतर बारकाव्यांची माहिती कार्यकर्त्यांना देण्यात आली. त्याचप्रमाणे प्रत्येक विभागात तेथील स्थानिक रहिवाशांची माहिती लक्षात घेऊन विशेष टीम स्थापन करण्यात येणार आहे. त्यांच्यावर स्थानिकांशी संवाद साधण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती कार्यकर्त्यांकडून देण्यात आली. मुख्य म्हणजे, येत्या दोन दिवसांनंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी एक ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. 'किंगमेकर नव्हे, किंग व्हायचे आहे' आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे किंगमेकरच्या भूमिकेत असेल, असे भाकित अनेकांकडून वर्तवण्यात येत आहे. मात्र या निवडणुकीत मनसेला किंगमेकर नाही, तर किंगच्या भूमिकेत राहायचे आहे, अशी ठाम भूमिका मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मांडली.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

कोल्हापुरात तरुणीला हॉटेलवर नेऊन केले अत्याचार; आरोपीविरोधात गुन्हा दाखल!

: वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या युवतीवर लैंगिक अत्याचार करून तिच्या अंगावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देणाऱ्या संशयितांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोमेश सुभाष कांबळे (रा. देगलूर जि. नांदेड ) असं संशयिताचं नाव आहे. () शाहूपुरी पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली. मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील एका हॉटेलसह शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जानेवारी २०२१ ते १६ फेबुवारी २०२२ या कालावधीत युवतीवर अत्याचार करण्यात आला आहे. पीडित युवती व संशयित कांबळे यांची ओळख झाल्यावर जानेवारी २०२१ मध्ये संशयित तरुणाने वेळोवेळी पीडित युवतीला फोन करून ‘तू मला आवडतेस, मी तुला भेटण्यासाठी कोल्हापूर येणार आहे, असं म्हणून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. नांदेडहून संशयित कांबळे तिला भेटण्यासाठी कोल्हापुरात आला. त्याने पीडितेला मध्यवर्ती बस स्थानक परिसरात एका हॉटेलमध्ये नेले. संशयिताने पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबध ठेवले. तिचे मोबाईलवर अर्धनग्न फोटो काढून तिला मारहाण केली. तिच्या गळ्यातील अर्धा तोळ्याची सोन्याची चैन काढून घेऊन, तिला रात्रभर हॉटेलमध्ये थांबवून ठेवले. या घटनेनंतर धक्का बसलेल्या पीडितेने संशयितांशी बोलणे टाळले. बोलणे टाळल्याचे लक्षात आल्यावर संशयिताने युवतीच्या अंगावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिली. याबाबत पीडित युवतीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात संशयित सोमेश कांबळे याच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी कांबळे याच्यावर बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील करत आहेत.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

संजय दत्त यांच्यासह तिघांवर मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल; दत्त यांनी आरोप फेटाळले

डोंबिवली: गॅस सिलिंडर वितरणाचे काम करणाऱ्या दीपक निकाळजे या २७ वर्षीय तरुणाला धमकी देऊन मारहाण केल्याच्या आरोपाखाली काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार आणि अन्य तिघांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तुला घरातून उचलून घेऊन जाईन. तू माझे भीषण रूप पाहिलेले नाहीस. मी कोणत्याही थराला जाऊ शकतो, अशी धमकी दत्त यांनी मोबाइलवरून दिल्याची आणि दत्त यांच्या सांगण्यावरून तीन अनोळखी व्यक्तींनी मारहाण केल्याची तक्रार निकाळजे याने केली. (former congress mla and three others have been charged with assault dutt denied the allegations) क्लिक करा आणि वाचा- हा मारहाणीचा प्रकार रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास कल्याण पूर्वेतील पिसवली परिसरात घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळू वंजारी हे पुढील करत आहे. क्लिक करा आणि वाचा- दत्त यांनी आरोप फेटाळले दरम्यान, माजी आमदार दत्त यांनी निकाळजे याचे आरोप फेटाळले आहेत. माझ्याविरुध्द खोटी तक्रार दाखल केली आहे. निकाळजे गैस सिलिंडरकरिता जादा पैसे उकळत असल्याबाबत अनेक ग्राहकांच्या तक्रारी येत होत्या. यामुळे आमच्या एजन्सीची बदनामी होत होती. त्यामुळे त्याला कामावरून काढून टाकले आहे. परंतु तो आता आमच्या अन्य कामगारांना काम करू नका, अशी दमदाटी करु लागला. त्याबाबत त्याला समजावले असता त्याने खोटी तक्रार दिल्याचे दत्त म्हणाले, २०२१ मध्येही मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

१३६ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असताना चौकशी का नाही?,उच्च न्यायालयाची ईडीला नोटीस

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : जिल्हा परिषदेच्या तत्कालीन जिल्हा जल संधारण अधिकाऱ्यांवर १३६ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असताना या प्रकरणाची चौकशी का केली नाही, अशी विचारणा करीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एन्फोर्समेंट डायरेक्टरेट () ला नोटीस बजावली आहे. घोटाळ्याविरुद्ध तक्रार करूनही चौकशी न केल्याने नानक कन्स्ट्रक्शनचे भागीदार रोशन पाटील व पंजाब पाटील यांनी नागपूर खंडपीठामध्ये धाव घेतली. या प्रकरणी न्यायमूर्ती ए. एस. चांदुरकर व न्यायमूर्ती जी. ए. सानप यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, तत्कालीन जिल्हा जल संधारण अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विरुद्ध आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचाराची पोलिस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक नागपूर यांचेकडे सुद्धा तक्रार दिली. त्यानंतर, ईडी आणि सीबीआय यांच्याकडे सुद्धा रमेशकुमार गुप्ता आणि कमलकिशोर फुटाने यांच्याविरुद्ध तक्रार केली. परंतु, त्या तक्रारीवरून काय कारवाई केली हे तक्रारदाराला कळवलं नाही. शिवाय, त्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. ईडीने फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून कायदेशीर पुढील कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली. याचिकाकर्त्यातर्फे केलेला युक्तिवाद, अभिलेखावरून पुरावे व तक्रारी लक्षात घेऊन न्यायालयाने इडी व इतर प्रतिवाद्यांना नोटीस बजावलेली आहे. सदर याचिकेमध्ये आरोपींनी भ्रष्टाचार करून बेनामी संपत्तीचा भ्रष्टाचार केलेला असून त्यांनी मनीलॉन्ट्रींग अधिनियमांतर्गत गुन्हा केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. तसेच, गैरअर्जदार रमेश गुप्ता यांच्याकडे १५० कोटींची संपत्ती असून त्याची चौकशी करण्याची गरज असल्याचे नमूद केलेले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अँड. अनिल ढवस यांनी बाजू मांडली.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

शहापूरात जिल्हा प्रशासनाचे बर्डफ्लू मोहीम सुरुच; डुकरांच्या रक्ताचे नमुने घेतले

ठाणे: येथील वेहळोली गावात १७ फेब्रुवारीला बर्ड फ्लूची लागण होऊन ३०० कोंबड्या दगावल्याची घटना घडली होती. त्यानंतर प्रशासनाकडून कॉम्बिंग ऑपरेशन करत आजूबाजूच्या एक किलोमीटर परिसरातील किमान १५ हजारहून अधिक कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र, आता या परिसरात एकही कोंबडी बर्डफ्लू बाधित आढळून आली नाही. पुढचे सतर्कतेच पाउल उचलत प्रशासनाकडून निर्जंतुकीकरण करत परिसरातील परिसरातील ६० पाळीव डुकरांच्या रक्ताचेही नमुने घेण्यात आले असून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच येथील रहिवाशांपैकी कुणाला तापाची लक्षणे आळल्यास त्यांच्यांही रक्ताचे नमुने तातडीने घेण्याच्या सुचना संबंधित आरोग्य यंत्रणेला देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे. सध्या जिल्ह्यात कुठेही नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरु नये. पण सतर्क राहणे गरजेचे असून कुठेही बर्डफ्लू सदृष्य लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. (district administration's campaign continues in shahapur pig blood samples were taken) जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वासिंद येथील वेहळोली गावातील गेल्या आठवड्यात १७ फेब्रुवारी रोजी ३०० हून अधिक कोंबड्या अचानक दगावल्या होत्या. या कोंबड्यांची चाचणी केली असता त्यांना बर्डफ्लूची लागण झाल्याचे अहवालात निष्पन्न झाले होते. त्यानंतर ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आधिसुचना काढत वेहळोली आणि आजूबाजूच्या एक किलोमिटर परिसरातील संसर्ग बाधित म्हणून घोषीत केला होता. त्यानंतर तातडीने कुक्कुट पक्षांचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या मार्फत एक मोहीम हाती घेत एक किलोमीटर अंतरातील १५ हजार हून अधिक कोंबड्या, अंडी देण्यायोग्य ७ हजार ९६२ कोंबड्या, २० बदके, ९८० हून अधिक अंडी, खाद्य नष्ट शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची मोहिम हाती घेतली. या सर्व कोंबड्यांना संसर्ग नव्हता. पण बर्ड फ्लूला हद्दपार करण्यासाठी त्यांना नष्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- आजच्या घडीला या परिसरातील कोंबड्यांची सर्व खुराड रिकामी झाले असून वेळीच पाऊले उचलल्याने जिल्ह्यात कुठेही बर्ड फ्लू नसल्याचा दावा ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात आला आहे. तसेच कोंबड्या, अंडी नष्ट करण्याची कारवाई केल्यानंतर सर्व पोल्ट्री फार्म आणि चिकन सेंटर बंद ठेवण्याच्या सुचना जिल्ह्याधिकारी यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. मात्र तरीही काही ठिकाणी चोरी छुपे व्यवहार सुरू आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी विशेष पथकाद्वारे पुन्हा वेहळोली गावासह परिसरात कोम्बिंग ऑपरेशन केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. क्लिक करा आणि वाचा- यावेळी कुठेही कोंबड्या सापडल्या नाहीत. पण हा संसर्ग माणसांपर्यंत पोहचला की नाही याची तपासणी करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या कामगारांची तपासणी आरोग्य विभागाकडून सुरु आहे. या शिवाय पाळीव ६० डुकरांचेही रक्ताचे नमुने सावधगिरीचे उपाय म्हणून घेण्यात आले आहेत. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य सेवकांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून कुणीही संशयीत आढळल्यास तत्काळ रक्ताचे नमुने घेण्याच्या सुचना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

firing in mulind: मुलुंड परिसरात गोळीबार; पोलिस आणि आरोपींमध्ये झाली झटापट

म. टा. खास. प्रतिनिधी, मुंबई मुंबई अहमदाबाद मार्गावर सुमारे एक कोटीच्या सुपारी असलेला कंटेनर पळविणाऱ्या दरोडखोरांच्या टोळीला मुलुंड आणि मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी मुंलुड येथून अटक केली. या कारवाईदरम्यान दरोडेखारांनी केलेला हल्ला परतावून लावण्यासाठी पोलिसांना हवेत करावा लागला. सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी झाले नाही. ( firing reported at in ) क्लिक करा आणि वाचा- मॅंगलोरहून गुजरातच्या दिशेने सुपारी घेऊन जाणाऱ्या कंटेनरला अडवून १८ फेब्रुवारीला मध्यरात्री सहा जणांनी कंटेनर घेऊन पळ काढला. चोरी करण्यात कंटेनर आणि सुपारी मुलुंड येथील एका गोदामात लपवून ठेवला असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी या दरोडखोरांना पकडण्यासाठी मुलुंड पोलिसांची मदत घेतली. क्लिक करा आणि वाचा- मुलुंड काॅलनीमधील साईबाबा मंदिराच्या मागील मैदानात असलेल्या गोदामामध्ये सुपारी ठेवण्यात आली होती. याच गोदामात पोलिसांनी छापा टाकला असता दरोडखोरांना चाकू, तलवारीने पोलिसांवर हल्ला केला. हा हल्ला परतावून लावण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. दरोडखोरांना चोख प्रत्युत्तर देत पोलिसांनी तिघांना अटक केली. या तिघांवर २५ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; लोकलप्रवासाबाबत आज सरकार भूमिका मांडणार

तत्कालीन मुख्य सचिवांनी काही आदेश काढताना कृती दलाच्या शिफारशींचाही विचार केला नाही आणि मनमानी पद्धतीने आदेश काढले. परिणामी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब झाला नसल्याचे स्पष्ट होते; उच्च न्यायालय म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः 'मुंबई लोकलमधून प्रवास करण्यासाठी करोना लशीच्या दोन्ही मात्रा घेणे बंधनकारक करणारा राज्याच्या तत्कालीन मुख्य सचिवांचा आदेश हा कायदेशीर प्रक्रियेला धरून नसल्याचे दिसते. त्यामुळे तो मागे घेणार का?', अशी विचारणा करत याविषयी आज, मंगळवारी भूमिका स्पष्ट करण्याचे तोंडी निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिले. 'करोना लस ऐच्छिक असल्याचे खुद्द केंद्र सरकारनेच स्पष्ट केले असताना लोकल प्रवासासाठी लससक्ती म्हणजे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे', अशा आशयाच्या जनहित याचिका फिरोज मिठिबोरवाला व योहान टेंग्रा यांनी केल्या आहेत. 'काही निर्णय राज्याच्या कार्यकारी समितीने नव्हे तर समितीचे अध्यक्ष या नात्याने तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी एकट्यानेच घेतले. त्यामुळे ते अवैध ठरतात', असा युक्तिवादही याचिकादारांतर्फे अॅड. नीलेश ओझा यांनी मांडला होता. त्यामुळे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने विचारणा केल्यानंतर बैठकींचे इतिवृत्त नसल्याची कबुली सरकारतर्फे देण्यात आली होती. त्याचवेळी इतिवृत्त असणे बंधनकारक नाही आणि करोनासंकट काळात वेळोवेळी बदलत्या स्थितीचा विचार करत कार्यकारी समितीच्या सदस्यांनी बैठकांमध्ये विचारविमर्श केल्यानंतरच निर्णय घेतले, असे स्पष्टीकरण विशेष सरकारी वकील अनिल अंतुरकर यांनी मांडले. 'काही आदेशांवर केवळ तत्कालीन मुख्य सचिवांच्या सह्या असल्या तरी निर्णय चर्चेअंतीच घेतले होते. नंतर समितीच्या सदस्यांची औपचारिक संमती घेणे राहून गेले असले तरी निर्णय जनहितासाठीच होते', असे स्पष्टीकरणही सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे दिले. मात्र, 'तत्कालीन मुख्य सचिवांनी काही आदेश काढताना कृती दलाच्या शिफारशींचाही विचार केला नाही आणि मनमानी पद्धतीने आदेश काढले. परिणामी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब झाला नसल्याचे स्पष्ट होते', असे निरीक्षण खंडपीठाने अभिलेख पाहिल्यानंतर नोंदवले. त्यानंतर 'आता परिस्थितीत सुधारणा झाली असल्याने विद्यमान मुख्य सचिवांना दोन-तीन दिवसांत बैठक घेऊन नव्याने निर्णय घेण्यास सुचवू', असे अंतुरकर यांनी न्यायालयाला सांगितले. मात्र, 'नवा निर्णय घेणार असला तरी जुना आदेश मागे घ्यायला हवा. त्याविषयी आज, मंगळवारी भूमिका स्पष्ट करा', असे तोंडी निर्देश खंडपीठाने सरकारला दिले. परिस्थिती का ओढवून घेता? 'करोनाचे संकट महाराष्ट्र सरकारने चांगल्या पद्धतीने हाताळले आहे. मग कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब टाळून घेतलेले ते आदेश कायम ठेवून राज्याच्या प्रतिमेला धक्का बसेल, अशी परिस्थिती का ओढवून घेत आहात?', असा सवाल खंडपीठाने सरकारसमोर ठेवला. त्याचवेळी 'ही जनहित याचिका नकारात्मक नाही. त्यामुळे झाले ते झाले. यापुढे नव्याने सुरुवात करू या', असे मतही खंडपीठाने व्यक्त केले. प्रमाणपत्राबाबत भिन्नता करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमध्ये केवळ लसधारकांनाच लोकलप्रवास मुभा देण्यात आली. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवासासाठी अशी सक्ती नाही. तर विमानाने आंतरराज्य प्रवास करण्यासाठी लशीच्या दोन मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा ७२ तासांतील आरटीपीसीआर अहवाल सक्तीचा आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

ऐन लग्नसराईत ग्राहकांना मिळणार दिलासा; खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता

वृत्तसंस्था, नवी दिल्ली जागतिक स्तरावर अनेक बाबतींत सध्या उलथापालथ होत आहे. त्याचा परिणाम म्हणून देशात दिवसेंदिवस महाग होत चालले आहे. याची गंभीर दखल घेत सॉल्व्हन्ट्स एक्स्ट्रॅक्टर्स ऑफ इंडियाने (एसईए) आपल्या सदस्या व्यापाऱ्यांना खाद्यतेलाचे भाव किलोमागे तीन ते पाच रुपयांनी कमी करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे येत्या काळात खाद्यतेल स्वस्त होणार आहे. ऐन लग्नसराईत हा मोठाच दिलासा ग्राहकांना मिळणार आहे. कमाल किरकोळ किंमत अर्थात एमआरपी कमी करा असे आवाहन एसईएने दुसऱ्यांदा आपल्या सदस्य व्यापाऱ्यांना केले आहे. याआधी दिवाळीनिमित्त, नोव्हेंबर २०२१ मध्ये एसईएने व्यापाऱ्यांना खाद्यतेलाच्या किंमतीत प्रति किलो तीन ते पाच रुपयांची कपात करावी, असे आवाहन केले होते. जागतिक स्तरावर कमालीची अशांतता असली तरी देशातील खाद्यतेलाचे आयातदार खाद्यतेलाचा पुरवठा सुरळित व्हावा यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. केंद्र सरकारनेही खाद्यतेलाच्या पुरवठ्यात सातत्य ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे सरकारच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी भाव कमी करावेत, असे एसईएचे म्हणणे आहे. एसईएने आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, देशात मोहरीचे पिक जोम धरत आहे. त्यामुळे मोहरीच्या खाद्यतेलाचे भाव सुसह्य होण्यास मदत मिळणार आहे. त्यातच सरकारने पामतेलाच्या आयातीवरील शुल्कात अडीच टक्क्यांनी कपात केल्याचाही फायदा भाव खाली येण्यासाठी होईल, असे एसईएचे म्हणणे आहे. पामतेलासाठी परवाना? खाद्यतेलाचे भाव सातत्याने वाढत आहेत. सर्वसामान्यांसाठी तसेच एफएससीजी उद्योगांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या पामतेलाचे भावही भडकले आहेत. त्यातच पामतेल मोठ्या प्रमाणावर आयात केले जाते. इंडोनेशियासारख्या पामतेलाची निर्यात करणाऱ्या देशांनी या तेलाचे बाव बेसुमार व मनमानी पद्धतीने वाढू नयेत यासाठी पामतेलाचा परवाना देण्यास सुरुवात केली आहे. या परवाना पद्धतीमुळे पामतेलाचे उत्पादन, निर्यात यांचे काही प्रमाणात नियमन होण्यास मदत मिळणार आहे. एसईएने आपल्या निवेदनात याकडे लक्ष वेधले आहे. जागतिक स्थिती - जगभरात खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. - रशिया व युक्रेन यांच्यात तणावपूर्ण वातावरण असल्यामुळे काळ्या समुद्रालगतच्या प्रदेशात अशांतता आहे. - काळ्या समुद्रालगतच्या प्रदेशातील सूर्यफूल तेल उत्पादन संकुलाला मोठी आग लागल्यामुळे सूर्यफूल तेलाचा प्रचंड मोठा साठा भस्मसात झाला. - ब्राझीलसह लॅटिन अमेरिकेमध्ये अल् निना या हवामान बदलाचा परिणाम दिसू लागला असून तेथील सोयाबिनचे पिक मोठ्या प्रमाणावर घटले आहे. त्यामुळे सोयाबिन तेलाच्या उत्पादनाव परिणाम होणार आहे. - आयात केल्या जाणाऱ्या खाद्यतेलाच्या पुरवठ्यात वारंवार खंड पडत आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

गोव्याहून मुंबईत येणाऱ्या विमानात माथेफिरू प्रवाशाचा गोंधळ; विमानाच्या आकाशात घिरट्या

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः एका माथेफिरू प्रवाशाने घातलेल्या गोंधळामुळे इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला मुंबईच्या आकाशात घिरट्या घालाव्या लागल्याची घटना समोर आली आहे. गोव्याहून मुंबईत येणाऱ्या विमानातील या प्रवाशाला बॅग घेऊन बाथरूममध्ये जाण्यापासून रोखल्याने त्याने चिडून गोंधळ घातला. विमान उतरण्याची वेळ आली, तरी हा प्रवासी जागेवर बसेना. एकदा तर विमान खाली आणून पुन्हा उड्डाण घ्यावे लागले. अखेर इतर प्रवाशांच्या मदतीने या प्रवाशाला जबरदस्तीने सीटवर बसवून पट्ट्याने बांधण्यात आले. त्यानंतरच या विमानाचे लँडिंग झाले. इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने २० फेब्रुवारी रोजी सकाळी ६.५५ मिनिटांनी गोव्याच्या दाबोलिम विमानतळावरून मुंबईसाठी उड्डाण केले. काही वेळाने सलमान खान हा प्रवासी जागेवरून उठला आणि पाठीवरील बॅगसह बाथरूममध्ये जाऊ लागला. बॅग घेऊन बाथरूमला जाण्याची परवानगी नसल्याने विमानातील कर्मचाऱ्यांनी त्याला रोखले व बॅग सीटवर ठेवण्यास सांगितले. सलमान कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालू लागला व वैमानिकांच्या केबिनमध्ये जाण्याची मागणी करू लागला. त्यावरूनही त्याने भांडण सुरू केले. विमानाच्या गॅलीमध्ये उभे न राहण्याचा नियमही त्याने धुडकावला. आपले आसन बदलावे, अशीही मागणी त्याने सुरू केली. सर्व आसने आरक्षित असल्याने कर्मचाऱ्यांनी त्यास नकार दिला. तोपर्यंत विमान मुंबईच्या आकाशात दाखल झाले. विमान उतरण्याची वेळ झाल्याने कर्मचाऱ्यांनी सर्वांना जागेवर बसून पट्टा बांधण्यास सांगितले. मात्र सलमान गॅलीमध्येच उभा असल्याने वैमानिकाने उतरण्यासाठी खाली आणलेले विमान पुन्हा आकाशात झेपावले. पोलिसांच्या ताब्यात सलमानला वारंवार सांगूनही तो ऐकत नसल्याने या विमानाला मुंबईच्या आकाशातच काही वेळ घिरट्या घालाव्या लागल्या. सलमानच्या या कृत्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका असल्याने कॅप्टनने इतर प्रवाशांच्या मदतीने त्याला सीटवर जबरदस्तीने बसविले आणि पट्टा लावला. त्यानंतर त्याला विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्याविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

एसटी पूर्ण क्षमतेने सुरू होणार?; संपप्रकरणी न्यायालयात आज सुनावणी

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे १४ हजार गाड्या स्थानक आणि आगारात उभ्या आहेत. दोन हजार गाड्यांच्या माध्यमातून राज्यात केवळ दहा टक्के एसटी फेऱ्या सुरू आहेत. आज, मंगळवारी संपप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी असून एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळणार का, याकडे जवळपास लाखभर एसटी कर्मचाऱ्यांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी २७ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाची हाक दिली. करोनाकाळ नियंत्रणात आल्याने रेल्वेच्या प्रतीक्षायादीत मोठी वाढ होत असताना सर्वसामान्यांची एसटी पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. सध्या कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांसह एकूण ६० हजारांहून अधिक कर्मचारी संपावर ठाम आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात सरासरी साडेसहा लाख प्रवाशांनी प्रवास केला. या प्रवाशांकडून महामंडळाला सरासरी रोज चार कोटींचे उत्पन्न मिळाले. कर्मचारी संपावर ठाम राहिल्याने खासगी चालकांच्या मदतीने एसटी वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे, असा दावा एसटी महामंडळातर्फे करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रीसदस्यीय समितीचा अहवाल न्यायालयात सादर झाला आहे. या अहवालात नेमके काय आहे हे आज, मंगळवारी स्पष्ट होईल. यामुळे तूर्त या प्रकरणी बोलणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका एसटी महामंडळाने घेतली आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

भारतातील एक अशी पायऱ्यांची विहिर ज्यात एक सिक्रेट बोगदाही आहे

आपल्या ग्रामीण भागात आजही बऱ्याच वाड्यात आड- विहिरी असतात. पूर्वीच्या काळात घरो-घरी जसं लोकं आप-आपल्या परीने आड-विहीर बांधत असत.

त्याचप्रमाणे पाण्याची कमतरता भासू नये म्हणून जुन्या काळी राजा-महाराजा आपल्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी विहिरी खोदत असत. भारतात अशा हजारो विहिरी आहेत, ज्या शेकडो वर्षे जुन्या आहेत तर काही हजार वर्षांच्याही पेक्षा जुन्या. आज आम्ही तुम्हाला अशाच एका विहिरीबद्दल सांगणार आहोत, ज्याचे नाव आहे ‘रानी की बावडी‘. वास्तविक बावडी म्हणजे पायरी विहीर. 

गुजरातच्या पाटण जिल्ह्यात असलेली ‘रानी की वाव’ ही जलसंधारणाच्या प्राचीन परंपरेचे अनोखे उदाहरण आहे. असे म्हटले जाते की राणी की वाव/बावडी १०६३ मध्ये सोळंकी वंशाचा राजा भीमदेव प्रथम याच्या स्मरणार्थ त्यांची पत्नी राणी उदयमती हिने बांधली होती. राणी उदयमती ही जुनागढचा राजा चुडासामा रा खेंगरची मुलगी होती.

 ‘राणी की वाव’ हा उत्कृष्ट वास्तुकलेचा जिवंत आणि अद्वितीय नमुना मानला जातो. 

हि राणी की वाव ६४ मीटर लांब, २० मीटर रुंद आणि २७ मीटर खोल आहे. ही भारतातील सर्वात अनोखी वाव आहे. त्याच्या भिंती आणि खांबांवर अनेक कलाकृती आणि शिल्पे अतिशय सुंदरपणे कोरलेली आहेत. यातील बहुतेक कोरीव काम भगवान विष्णू, भगवान राम, वामन, नरसिंह, महिषासुरमर्दिनी, कल्की इत्यादी विविध रूपांमध्ये आहेत.

ही सात मजली वाव मारू-गुर्जरा स्थापत्य शैलीची साक्ष आहे. सरस्वती नदी गायब झाल्यानंतर सुमारे सात शतके ते गाळात गाडली गेली होती. भारताच्या पुरातत्व खात्याने ती पुन्हा शोधून स्वच्छ केली. आता येथे मोठ्या प्रमाणात लोक फिरायला येतात.

या वावमध्ये ३० किमी लांबीचा रहस्यमय बोगदाही आहे.

असे म्हटले जाते की या जगप्रसिद्ध पायरीच्या खाली एक छोटा दरवाजा देखील आहे, ज्याच्या आत सुमारे ३० किमी लांबीचा बोगदा आहे. पाटणमधील सिद्धपूर येथे हा बोगदा उघडतो. असे मानले जाते की या गुप्त बोगद्याचा वापर राजा आणि त्याचे कुटुंब युद्धात किंवा कोणत्याही कठीण परिस्थितीत करत होते. सध्या हा बोगदा दगडफेक आणि चिखलामुळे बंद आहे.

‘रानी की बावडीचा इतिहास ९०० वर्षांहून अधिक जुना असून येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देण्यासाठी येतात. २०१४ मध्ये युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेय. युनेस्कोने याला तांत्रिक विकासाचे अलौकिक उदाहरण म्हणून मान्यता दिली आहे. यामध्ये जलव्यवस्थापनाच्या उत्तम व्यवस्थेबरोबरच कारागिरीचे सौंदर्यही दिसून येते. ‘रानी की वाव’ ही संपूर्ण जगात एकमेव अशी पायरी विहीर आहे ज्याचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. प्राचीन भारतातील जलव्यवस्थापनाची व्यवस्था किती उत्कृष्ट होती याचाही तो पुरावा आहे.

 जुलै २०१८ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने १०० च्या नोटेवर ती वैशिष्ट्यीकृत केली होती.

या वाव ११ व्या शतकातील भारतीय भूगर्भीय वास्तू रचना आणि जल व्यवस्थापनात भूजल संसाधनांचा वापर करण्याच्या तंत्राचे सर्वात विकसित आणि व्यापक उदाहरण आहेत.

राणी की वाव ऐतिहासिक तथ्ये देखील पाहणे गरजेचं आहे, भारतात पायऱ्यांच्या बांधकामाचा आणि वापराचा मोठा इतिहास आहे. या विहिरी आपल्या देशाच्या मौल्यवान आणि अविभाज्य वारशाचे प्रतीक आहेत, असे बोलले जाते. या विहिरी पाणी व्यवस्थापनाच्या जुन्या पद्धतींपैकी एक आहेत, त्यांचे जतन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून महत्त्वपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. त्यांचे जतन करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे.

हे हि वाच भिडू :

The post भारतातील एक अशी पायऱ्यांची विहिर ज्यात एक सिक्रेट बोगदाही आहे appeared first on BolBhidu.com.