रशिया-युक्रेन युद्धामुळं बाजारपेठेला फटका; खाद्यतेलाचे भाव पुन्हा कडाडले

February 25, 2022 0 Comments

- सूर्यफुल तेलाची ९० टक्के आयात युक्रेन-रशियाहून - मागील दहा दिवसांत आयातीत घट, दरात २० टक्के वाढ - मटा विशेष chinmay.kale@timesgroup.com @ChinmaykaleMT मुंबई : रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाचे दर पुन्हा एकदा १५० रुपयांपार जात आहेत. भारतात सूर्यफुल तेलबियांची ९० टक्के आयात तिथूनच होते. त्यामुळे खाद्यतेल किमतीवर या युद्धाचे भीषण परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. भारत हा खाद्यतेलाची सर्वाधिक मागणी असलेला देश आहे. सर्वाधिक मागणी पामतेल, त्यानंतर सोयाबीन व तिसऱ्या क्रमांकावर सूर्यफुल तेलाची असते. पण मागणीच्या जेमतेम १५ टक्के तेल उत्पादन भारतात होते. त्यामुळेच भारताला दरवर्षी मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात करावी लागते. त्यामध्ये सर्वाधिक आयात पामतेलाची होत असून इंडोनेशियावरून हे तेल कच्च्या स्वरूपात मागवले जाते. सोयाबीन तेल बहुतांश प्रमाणात भारतात तयार होते. पण यंदा त्याचे गणितही बिघडलेले असल्याने सोयाबीन तेल उत्पादनात पाच टक्क्यांची घट आहे. त्यामुळे सूर्यफुल तेल आयातीवरच देशातील खाद्यतेलाची भिस्त आहे. तसे असताना रशिया-युक्रेन युद्धामुळे या तेलाची आयातदेखील संकटात आली आहे. याबाबत अखिल भारतीय खाद्यतेल महासंघाचे अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी सांगितले की, 'भारतात एकूण मागणीच्या सुमारे ३० टक्के सूर्यफुल तेल असते. पण त्यातील ७० टक्के तेलबिया युक्रेन व २० टक्के रशियाहून आयात होतात. तेथील थंडीतच हे पीक उत्तम प्रकारे येते. आता युद्ध व युद्धजन्य स्थितीमुळे मागील १५ दिवसांत युक्रेन आणि रशियातील आवक जवळपास थांबलेली आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय स्तरावरच सूर्यफुल तेलाचे दर २० टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचा परिणाम अन्य सर्व प्रकारच्या खाद्यतेलांवर दिसू लागला आहे.' याआधी मागीलवर्षी पामतेल आयातीचे गणित बिघडल्याने खाद्यतेलाच्या दरांनी १५० रुपये प्रति लिटरचा टप्पा गाठला होता. काही खाद्यतेल २०० रुपयांवर गेली होती. त्यानंतर केंद्र सरकारने तीन वेळा आयात शुल्कात कपात केल्याचे दरात २० ते २२ टक्क्यांची घट झाली. पण सूर्यफुल तेलाची आवक संकटात आल्याचे बघून इंडोनेशियाने पामतेलाचे दर वाढवले आहेत. या सर्वांच्या परिणामातून मुंबईसह सर्वत्र खाद्यतेलाच्या दरात मागील आठवडाभरातच १५ ते २० टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. ही दरवाढ आणखी होण्याची भीती निर्माण झाली आहे. खाद्यतेलाचे दर असे (रुपये/लिटर) प्रकार दहा दिवस आधी सध्या पाम ११०-११५ १३०-१३५ सोयाबीन १२५-१३० १४०-१४५ सूर्यफूल १३०-१४० १५०-१६० शेंगदाणा १६५-१९५ १७५-२०० राईसब्रान १३०-१४० १४५-१५०


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: