धमक्यांना भीक न घालता एकनाथ शिंदे गडचिरोलीत; जवानांसोबत केली दिवाळी साजरी

गडचिरोली। दोन दिवसांपूर्वी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे नक्षलवाद्यांकडून ही धमकी दिली असल्याचं बोललं जात आहे.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे फक्त एकनाथ शिंदे यांनाच नाहीतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची माहिती समोर आली होती. मात्र या धमक्यांना न घाबरता एकनाथ शिंदे यांनी शनिवारी जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील दोदराज पोलीस स्टेशनला भेट देऊन जवानांसोबत दिवाळ साजरी केली.

तसेच सिरोंचा तालुक्यातील जिमाका येथील जंगलात ओरीसा आणि छत्तीसगड येथून आलेल्या जंगली हत्तींना संरक्षण मिळवून देण्यासाठी आढावा बैठक घेऊन चपराळा येथील अभयारण्याची पाहणी एकनाथ शिंदे यांनी केली.

नक्षली कारवायांमुळे अतिसंवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भगात सणवार सोडून आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस जवानांना यावेळी दिवाळीच्या खास शुभेच्छा देऊन फराळाचे वाटप केले. यावेळी गडचिरोलीचे पोलिस उपमहानिरीक्षक संदिप पाटिल, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलिस अधीक्षक अंकित गोयल हेदेखील उपस्थित होते.

मंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. जिल्ह्यातील काही परिसर नक्षलग्रस्त भागात मोडतो. जिल्ह्यात शिंदे यांच्यातर्फे मोठ्या प्रमाणात मुलभूत सुविधा वाढवण्यात आल्या. पक्क्या रस्त्यांची तसेच इतर विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरू झाली.

जिल्हातील नक्षलवाद्याच्या उपद्रवामुळे बंद झालेले काही Mining projects शिंदे यांनी पुन्हा सुरू केले. त्याचा राग नक्षलवाद्यांमध्ये आहे. शिंदे यांना मिळालेल्या धमकीविषयीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनादेखील देण्यात आली आहे. धमकीच्या पत्राबाबत ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

मलिकांचा आता वानखेडेंवर वैयक्तिक हल्ला? यास्मिन वानखेडेंचा ‘तो’ फोटो ट्विट करत मोठा गौप्यस्फोट

मुंबई। अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे दिवसेंदिवस एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यांबद्दल नवनवीन खुलासे करत असून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देत आहेत. नवाब मलिक सोशल मिडियाद्वारे नवाब मलिक वानखेडे यांच्यांवर वेगवेगळे आरोप करत आहेत. एकीकडे मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तुरुंगाबाहेर आला आहे.

दुसरीकडे मात्र नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधत आहेत. मलिकांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी एका अनोळखी व्यक्तीचा फोटो शेअर करून समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडेही मुस्लिम असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केलाय.

ओळख लपवण्यासाठी समीर वानखेडेंनी भावोजीला तुरूंगात डांबण्याची धमकी दिली. समीर वानखेडेंच्या पहिल्या पत्नीशी झालेल्या निकाह नाम्यातही अब्दुल अझीजचं नाव आहे, पण अब्दुल मूळचा सुरतचा असल्याचं ते म्हणालेत. ट्विट करत त्यांनी या प्रकरणात आणखी एक गंभीर आरोप केलाय.

मिळालेल्या माहितीनुसार यास्मिन खान हिचं खान अब्दुल अझीजसोबत लग्न झालंय. ओळख लपवण्यासाठी अब्दुल अझीजसोबत घटस्फोट झाला असल्याची सूत्रांकडून समोर येत आहे. त्यामुळे आता हे प्रकरण दिवसेंदिवस वेगवेगळं वळण घेत आहे.

आता मलिक हे सातत्याने एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना लक्ष्य करत आहेत. वानखेडे यांच्यावर मलिक यांनी वैयक्तिक आरोपही केले असून हे आरोप खोटे ठरल्यास मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन, अशी घोषणाच आता मलिक यांनी केली आहे.

मी वानखेडे कुटुंबाची मानहानी करत आहे, असे वाटत असेल तर माझ्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करा, असे आव्हानही मलिक यांनी दिले. त्यामुळे हे आरोप खरे आहे की खोटे हे लवकरच समोर येणार आहे.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

इंदिरा गांधींनी दूरदृष्टीने उभारलेल्या संस्थेमुळे खेड्यापाड्यात वीज पोहचली..

आज देशभरात मेट्रोचं जाळं पसरतयं. इंटरनेट आणि नवीन तंत्रज्ञानामुळे जवळपास सगळ्याच गोष्टी सहज आणि सोप्या झाल्यात. आणि महत्त्वाचं म्हणजे हे फक्त शहरापुरते मर्यादित न राहता अगदी खेड्यापाड्यात जाऊन पोहोचलं आहे. खेडोपाडी पोहचलेल्या या विजेमुळे शेतकऱ्यांपासून ते ग्रामीण अर्थकारणाला बळ मिळाले. शेतकरी सुखी झाला.

पण आजचं हे चित्र जर आपण काही वर्षे मागे जाऊन पाहिलं. तर मोठी तफावत पहायला मिळेल. म्हणजे ग्रामीण भाग शहराच्या प्रकाश झोतापासून बराच लांब होता. त्यामुळे विकासही तितकाच लांब.

इंग्रजांच्या काळात भारतात वीज आली पण ती फक्त शहरांपुरती मर्यादित होती. ब्रिटिश सरकारला भारताचा विकास करायचा नव्हता तर इथली पिळवणूक करून भारताचा पैसा इंग्लंडला न्यायचा होता. त्यामुळेच त्यांनी भारतात मोजक्याच सोयीसुविधा निर्माण केल्या आणि त्याही स्वतःच्या फायद्याच्या.

स्वातंत्र्यानंतर मात्र ही परिस्थिती बदलू लागली. नवं भारताचे निर्माते असलेले नेहरू, सरदार पटेल, लालबहादूर शास्त्री  यासारख्या नेत्यांनी विकासाची गंगा देशाच्या कानाकोपऱ्यात न्यायच ठरवलं. त्यासाठी त्यांना शेकडो वर्षांचा अनुशेष भरून काढायचा होता. अनेक नव्या संस्थांची निर्मिती केली.

विकासासाठी मूलभूत असलेल्या रस्ते , धरणे, वीज या गोष्टींच्या उभारणीकडे आवर्जून लक्ष देण्यात आले.

स्वातंत्र्याच्या दहा पंधरा वर्षात देशाचं चित्र पालटू लागलं. अनेक सोयीसुविधा उभ्या राहिल्या पण ग्रामीण भागात वीज पोहचवण्याची गती अतिशय धीमी होती. कित्येक गावात रस्ते पोहचत होते पण वीज पोहचत नव्हती. देशाच्या तिसऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधी या जेव्हा पहिल्यांदा सत्तेत आल्या तेव्हा त्यांनी हि पारिस्थिती बदलण्यासाठी काही मोठे निर्णय घ्यायचे ठरवले. 

यातूनच देशातील ग्रामीण विद्युतीकरण प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि वित्तसहाय्य करण्यासाठी जुलै १९६९ मध्ये नवी दिल्ली येथे संपूर्णत: सरकारी मालकीच्या ग्रामीण विद्युतीकरण महामंडळाची अर्थात ‘रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन’ची स्थापना करण्यात आली.

स्वतः इंदिरा गांधींनी लक्ष देऊन आपल्या अखत्यारीत या प्रकल्पाचे काम सुरू केले.

भारतासारख्या खंडप्राय देशात सर्वदुर पसरलेल्या, डोंगर-दऱ्यांमध्ये. दाट जंगलांमध्ये वसलेल्या लक्षावधी खेडयांपर्यंत वीज पोहोचवणं हे एक प्रचंड आव्हान होतं. हे आव्हान पेलण्यासाठी घटक राज्यांमधील वीज मंडळांनी ग्रामीण विद्युतीकरणाच्या व्यापक मोहिमा हाती घेतल्या.

मात्र त्या पार पाडण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज निर्माण झाली.

ही गरज पूर्ण करण्याकरता जुलै १९६९ मध्ये नवी दिल्ली इथे ग्रामीण विद्युतीकरण महामंडळा (रुरल इलेक्ट्रिफिकेशन कार्पोरेशन)ची स्थापना करण्यात आली. देशभरात ग्रामीण विद्युतीकरण प्रकल्पांना प्रोत्साहन आणि वित्तसहाय्य देण्याची जबाबदारी सोपवून या कंपनी कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या या महामंडळाची देशभरात १७ प्रकल्प कार्यालयं सुरू करण्यात आली.

या महामंडळाने राज्य सरकारांच्या अखत्यारीतील वीज प्राधिकरणं, वीज मंडळं, तसंच ग्रामीण विद्युत सहकारी संस्था यांना ग्रामीण विद्युतीकरण प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीसाठी कर्ज उपलब्ध करण्याकरता विविध योजना राबवल्या.

ग्रामीण विद्युतीकरण व्यवस्थेची उभारणी, आधुनिकीकरण, विस्तार, शेतीसाठी विहिरींवरील विद्युतपंपांना वीजपुरठा, दलित वस्त्या-झोपडपट्ट्या आदींना वीजपुरवठा मीटर्स, ट्रान्सफॉर्मर्स, कपॅसिटर्स, कंडक्टर्स आदी साधनसामग्रीच्या खरेदीकरता वित्तीय सहाय्य असा विविध कामांना या महामंडळाने चालना दिली.

महामंडळाने बजावलेल्या या कामगिरीमुळे ग्रामीण विद्युतीकरणाला गती मिळून ग्रामीण क्षेत्राच्या आर्थिक विकासाला हातभार लागला. इंदिरा गांधींनी घेतलेल्या दूरदर्शी निर्णयामध्ये या महामंडळाचा समावेश होतो.

हे ही वाचं भिडू : 

The post इंदिरा गांधींनी दूरदृष्टीने उभारलेल्या संस्थेमुळे खेड्यापाड्यात वीज पोहचली.. appeared first on BolBhidu.com.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

समीर वानखेडेंसाठी मनसे उतरली मैदानात, जाहीर पाठींबा देत म्हणाले…

मुंबई | 3 ऑक्टोबरला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक झाली. या प्रकरणामुळे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे चांगलेच चर्चेत होते. त्यांच्यावर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहे. नवाब मलिक यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून एनसीबीच्या कारवाईचे समर्थन केले जात आहे. समिर वानखेडेंवर, त्यांच्या कुटुंबावर, जातीवर हल्ले होत आहेत. अनेक लोकांनी देखील समीर वानखेडे यांना पाठिंबा दर्शवला आहे. यातच आता मनसेने देखील समीर वानखेडे यांना पाठिंबा दर्शवत सूचक ट्विट केले आहे. अमेय खोपकर, संदीप देशपांडे यांनी ट्विट केले आहे.

मुंबई क्रिकेट संघटनेच्या वतीने शुक्रवारी वानखेडे स्टेडियवर लिटील मास्टर सुनील गावसकर यांच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला ५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमाचा फोटो शेअर करत मनसे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांनी ‘वानखेडेला शुभेच्छा’ असे सूचक ट्विट केले आहे.

यानंतर मनसेचा समीर वानखेडे यांना पाठिंबा असल्याच्या चर्चा होत आहे. याआधी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी गरज भासल्यास मनसे क्रांती रेडकर यांच्या पाठिशी उभी राहणार असल्याचे म्हंटले होते.

समीर वानखेडे आणि त्यांची बहीण आणि मनसेच्या पदाधिकारी असलेल्या जास्मिन वानखेडे यांचा मनसेने बचाव केला होता. तसेच जास्मिन वानखेडे या आमच्या पक्षात काम करतात याचा अभिमान आहे, असे मनसे नेते अमेय खोपकर यांनी म्हटले होते. तदनंतर वानखेडेंबाबत मनसेने घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अमेय खोपकर यांनी क्रांती रेडकर ला सुद्धा पाठिंबा दिला होता. ते म्हणाले होते की, गरज भासल्यास क्रांती रेडकर यांच्या पाठिशी मनसे उभी राहिल. एकीकडे बॉलिवूडमधील कलाकार शाहरूख खानला पाठिंबा दर्शवत होते पण एनसीबीच्या बाजूने कोणीच उभे राहत न्हवते तेव्हा मनसेने क्रांती रेडकर यांना पाठिंबा दर्शवला आहे.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

मोहम्मद शामीसाठी विराट मैदानात; धर्मावरून ट्रोल करणारांना झाप झाप झापले..

टी-20 विश्वचषकात रविवारी भारत व न्यूझीलंडचा सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहली मोहम्मद शमीबाबतच्या वादावर म्हणाला की, आमचे लक्ष पूर्णपणे सामन्यावर आहे. बाहेर काय बोलले जातं आहे याकडे आम्ही लक्ष देत नाही.

कर्णधार विराट कोहली म्हणाला की, “सोशल मीडियावर असे काही लोक आहेत जे आपली ओळख लपवून अशी कृत्ये करतात, हे आजच्या काळात रोजच होत आहे. ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात खालची पातळी आहे, जेव्हा ते एखाद्याला अशा प्रकारे त्रास देतात,” असं तो म्हणाला आहे.

“आम्ही आमच्या ड्रेसिंग रूममध्ये वातावरण योग्य ठेवतो आणि आमच्या खेळाडूंना एकत्र ठेवतो. बाहेर जे काही नाटक रचले गेले, त्यात त्यांच्या चुका पूर्णपणे दिसून येतात. कोणत्याही व्यक्तीला त्याच्या धर्माच्या आधारावर टार्गेट करणे चुकीचे आहे. मी कधीच कोणाशी भेदभाव केला नाही, हे फक्त काही लोकांचे काम आहे. जर कोणाला मोहम्मद शमीच्या खेळात पॅशन दिसत नसेल तर मला माझा वेळ वाया घालवायचा नाही,” असं त्याने म्हटलं आहे.

विराट कोहलीने पत्रकार परिषदेत हार्दिक पांड्याच्या फिटनेसबद्दलही सांगितले. विराट म्हणाला की, “हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त आहे, जर सहाव्या गोलंदाजाची गरज असेल तर तो हार्दिक असू शकतो किंवा तो मी असू शकतो. त्याचवेळी विराट कोहली शार्दुल ठाकूरबद्दल म्हणाला की तो नक्कीच आमच्या प्लॅनमध्ये आहे, पण प्लेइंग-11 सामन्याच्या स्थितीनुसार ठरवला जाईल.”

२४ ऑक्टोबरला आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळाला. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने होते. हे दोन्ही संघ जेव्हा समोरासमोर येत असतात, त्यावेळी चाहत्यांना रोमांचक सामना पाहायला मिळत असतो. या सामन्यात भारताचा पराभव झाला.

या पराभवाचे कारण मोहम्मद शमीला ठरवले जात आहे. सोशल मीडियावर त्याच्या विरुद्ध अपशब्दांचा देखील वापर केला जातोय. त्याला चांगलाच ट्रोल केल जातं आहे. अशातच अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी त्याला पाठिंबा दिला आहे.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि चोरांना तर नाहीच नाही; नवाब मलिकांचा विरोधकांना टोला

मुंबई। सध्या एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यातील आरोप प्रत्यारोप दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. नवाब मलिक समीर वानखेडे यांच्यांबद्दल नवनवीन खुलासे करत आहेत. दरम्यान नवाब मलिक यांनी गोंदियाच्या दौऱ्यावर असताना पुन्हा एकदा विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

सोशल मिडियावर लाल कपडे टाकून नवाब मलिक घाबरतील… आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि चोरांना तर नाहीच नाही अशा शब्दात नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दौऱ्यावर असताना मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, या देशात कायद्याने माझ्या परिवाराला व्यापार करण्याचा अधिकार आहे.

माझ्याकडे आहे ते सर्व कागदोपत्री आहे. ज्यांच्या बेनामी संपत्ती आहेत. सोशल मीडियावर लाल गाठोड दाखवत आहेत असे चोर लोकच माझ्याकडे बोट दाखवत आहेत, अशी टीका मलिक यांनी केली. मी भंगारवाला आहे… अशा रद्दी माझ्याकडे दहा – वीस आणि शंभर टन आहेत.

आम्ही चोर नाही… आम्ही डाकू कडून सोनं घेतलं नाही… बँका बुडवल्या नाहीत… त्या वानखेडेशी कुणाचा काय संबंध आहे… कुठल्या हॉटेलचे कोण मालक आहे… त्या हॉटेलमधील वस्तू क्रुझवर कशा गेल्या… क्रुझवरील कॅटरिंग मध्ये ड्रग्ज कसे गेले… आता नावं घ्यायला सुरुवात केलेली आहे… इतकं का घाबरताय असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

आर्यनला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले होते. त्याला आधीच जामीन मंजूर व्हायला हवा होता. एनसीबीने खोटी कारवाई करण्यासाठी प्रायव्हेट आर्मी तयार केली होती. निष्पाप लोकांना फसवले जात होते. यामध्ये समीर वानखेडेंसोबत काशिफ खानही होता. त्यामुळे येणाऱ्या काळात काशिफ खानविरुद्ध पुरावे सुद्धा देणार आहोत, असा दावाही त्यांनी केला.

गेल्या अनेक दिवसांपासून नशिबी खोट्या केसेस तयार करून कारवाई करत आहेत. समीर वानखेडेंनी जवाबदारी स्वीकारल्या नंतर बोगस केस तयार करून पब्लिसिटी करीत होते. पण नंतर हळूहळू हा खोटारडेपणा आम्ही उघडा केला आणि गोसावीच्या सेल्फीनंतर एकएक बाजू समोर आणली. जे आज बाहेर होते ते आज जेलमध्ये आहेत. मात्र, मी एनसीबीची पोलखोल करतच राहणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

‘आता तरी मुलांना नीट सांभाळा..’ आर्यनच्या सुटकेनंतर शाहरूखला सहकलाकाराचा परखड सल्ला

मुंबई। बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझवरील ड्रग्स पार्टीत ताब्यात घेतल्यानंतर अटक करण्यात आली. मात्र शाहरुखने केलेल्या अथक प्रयत्नानंतर अखेर 26 दिवसानंतर जामीन मिळाला आहे. ड्रग्स केस प्रकरणी 2 ऑक्टोबर रोजी एनसीबीने ताब्यात घेतलं होतं.

अखेर 26 दिवसांनंतर आर्यन जेलमधून बाहेर आला आहे. आर्यन बाहेर आल्यामुळे शाहरुख, गौरी आणि त्यांचे चाहते आनंदी आहे. ज्यावेळी आर्यनला अटक करण्यात आली त्यावेळी अनेक बॉलीवूड कलाकारांनी आर्यन आणि शाहरूखला सपोर्ट केला.

मात्र यापैकीच बऱ्याचशा कलाकारांनी या काळात शाहरुख आर्यनवर निशाणा साधल्याचेही पाहायला मिळाले आहे. दरम्यान शाहरुखचा सहकलाकार अभिनेता पियुष मिश्रा याने शाहरुखच्या सहकलाकाराने त्याला आता तरी मुलांना सांभाळ… असा सल्ला दिला आहे.

अभिनेता पियुष मिश्राने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत शाहरुखला सल्ला दिला आहे. पियुष म्हणाला, ‘माझ्या प्रतिक्रिया काय असेल? त्याने केलं… त्याला बेल मिळाली… बाहेर तो आला… आता याबद्दल शाहरुख आणि त्याचा मुलगा बघून घेईल… समीर वानखेडे बघून घेतील… जे काही आहे ते ठीक आहे..तुम्ही जे केलंय त्याची फळ भोगावीच लागणार… फक्त तुझ्या मुलांना नीट सांभाळ…’ पियुषचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

सांगायचं झालं तर, पियुष शर्मा आणि शाहरुखने 1998 साली ‘दिल से’ चित्रपटात एकत्र स्क्रिन शेअर केली होती. चित्रपटात पियुषने सीबीआय अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. आर्यनच्या जामिनानंतर सेलेब्सनी आनंद व्यक्त केला आहे.

कोर्टाचा निकाल लागताच अभिनेता आर माधवनने एक ट्विट केले, ज्यामध्ये त्याने देवाचे आभार मानले. त्याचवेळी स्वरा भास्करनेही ट्विटमध्ये ‘FINALLY’ लिहून आनंद व्यक्त केला आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार सलमान खान, अक्षय कुमार, सुनील शेट्टी यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी शाहरुखला तात्काळ फोन करून अभिनंदन केले.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

पुणेकरांनो सावधान! चोरीसाठी महिलेची हत्या, खून करून पावणे २ लाखांचे दागिने लंपास

पुणे : सिंहगड रस्त्यावरील हिंगणे परिसरात ७० वर्षीय महिलेचा खून करून घरातून पावणे दोन लाखांचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. सिंहगड रस्ता परिसरातील हिंगणे येथे घरात घुसलेल्या चोरट्यानी ७० वर्षीय महिलेचा खून करून पावणेदोन लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शालिनी बबन सोनावणे (वय ७०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. हा प्रकार शनिवारी सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत घडला आहे. सोनावणे या घरात एकट्याच राहत होत्या. तर, त्यांच्या समोरील सोसायटीत त्यांचा मुलगा राहत होता. मुलगा रात्री आईकडे आला, तेव्हा हा प्रकार उघड झाला. मुलानेदिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरातून कपाटात ठेवलेली रोख रक्कम आणि सोने चोरून नेले आहे. मात्र, सोनावणे यांच्या अंगावरील चार ते पाच तोळे सोने तसेच आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

जगाला अँटीव्हायरस देणाऱ्या मॅकफिला स्वतःच्या आयुष्यातला निगेटिव्ह व्हायरस संपवता आला नाही….

जर तुम्ही 90 च्या दशकाच्या उत्तरार्धात किंवा 2000 च्या सुरुवातीच्या काळात मोठे झाला असाल तर तुम्हाला McAfee अँटीव्हायरस हा काय विषय आहे हे माहिती असेल. जॉन मॅकफी या सॉफ्टवेअर निर्मात्याबद्दलची ही गोष्ट ज्याने हजार भानगडी करून अँटीव्हायरस जगाला दिला पण त्याच्या पर्सनल आयुष्यातला व्हायरस त्याला संपवता आला नाही. तर जाणून घेऊया नक्की काय मॅटर आहे हा.

इंग्लंडच्या ग्लुसेस्टशायर मध्ये 1945 साली जॉन मॅकफीचा जन्म झाला. कॉलेजनंतर जॉनने नासा आणि झेरॉक्ससह अनेक कंपन्यांमध्ये काम केले. पण या काळात तो सतत नोकर्‍या गमावत होता कारण तो मुळात दारूच्या नशेत होता आणि सर्व वेळ बाहेर पडला होता. खरं तर तो एका वेळी कोकेन विकत होता, आणि एकदा त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले कारण त्याने DMT या अत्यंत शक्तिशाली औषधाचं सेवन करून तो काम करत होता.

काहीतरी करायला पाहिजे म्हणून त्याने 1987 साली मॅकफी असोसिएट्स स्थापना केली. 80 च्या दशकात संगणकांवर व्हायरसने हल्ला केल्यामुळे त्याचा मोठा ब्रेक आला आणि जॉनने ह्याच संधीचा फायदा मिळवण्याचं ठरवलं. त्याने अँटीव्हायरस तयार करण्याचा निर्णय घेतला आणि मॅकॅफी असोसिएट्सचा जन्म झाला.

एका क्षणी त्याने अँटीव्हायरस मार्केटचा 67% नियंत्रित केला. सुरवातीला स्वतःच्या नावावरून त्याने कंपनीला नाव दिलं. मॅकफीने कंपनीच्या एका भागाला सायबर सुरक्षेचं स्वरूप दिलं.

पर्सनल कॉम्प्युटर बूम झाल्यावर मॅकफि अँटी व्हायरसने मार्केटमध्ये आपली दहशत निर्माण केली. 80-90 च्या दशकात बऱ्याच फॉर्च्युन 100 कंपन्यांनी मॅकफिने तयार केलेला अँटी व्हायरस वापरायला सुरवात केली. 1994 साली त्याने कंपनीला राजीनामा दिला पण तो कंपनीशी संलग्न होता.

जॉन मॅकफी हा तसा डेंजर गडी होता. तो स्वतःला क्रिप्टओकरन्सी एक्सपर्ट समजायचा. त्यानुसार त्याने भरपूर कमाई केली पण त्याने टॅक्स भरला नाही. सायबर सेक्युरिटी कंपनी बनवण्याबरोबरचं मॅकफिने बऱ्याच गोष्टी केल्या होत्या. एकदा तर थेट एअरपोर्टवर तो बॉम्ब घेऊन चालला होता तेव्हा त्याला पकडण्यात आलं होतं. टॅक्स न भरल्याच्या कारणावरून त्याच्या कंपनीला मोठं नुकसान सहन करावं लागलं. मग त्याने अँटी बायोटिक्स बनवण्याचा प्लॅन केला.

त्यानंतर त्यांनी बेलीझला जाण्याचा निर्णय घेतला, जिथे त्यांनी ‘ऑरगॅनिक अँटीबायोटिक्स’ बनवण्यास सुरुवात केली. हे मुळात ड्रग मॅन्युफॅक्चरिंग हब होते आणि अधिकाऱ्यांनी त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यावर कधीही आरोप झाले नाहीत.
बेलीझमधील या काळात जॉन अधिकाधिक विक्षिप्त होऊ लागला आणि त्याने MDPV सारख्या धोकादायक बाथ सॉल्ट्समध्ये गुंतण्यास सुरुवात केली. हे असे औषध होतं जे वरवर पाहता तुम्हाला लैंगिक शौकीन बनवते आणि जॉनने असा दावा केला होता की त्याने ज्या इतर लोकांनी या ड्रग्जचं सेवन केले त्यांच्यापैकी काहींनी त्याच्या कुत्र्यांशी लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.

2012 मध्ये, मॅकॅफीला अमेरिकन प्रवासी ग्रेगरी व्हिएंट फॉलच्या हत्येप्रकरणी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. फॉल, जो बंदुकीच्या गोळीने मरण पावला होता, तो मॅकॅफीचा शेजारी होता. त्याऐवजी, मॅकॅफी देशातून पळून गेला. मॅकॅफीने दावा केला की त्याला वाटत होते की पोलीस त्याला मारतील आणि म्हणून तो निसटला, जरी ही नेहमीची चौकशी होती. तो ग्वाटेमालाला पळून गेला, जिथे त्याला बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल अटक करण्यात आली.

71 वर्षाच्या जॉन मॅकफिने 34 वर्षाच्या वेश्येसोबत लग्न केलेलं होतं. तिच्यासोबत त्याने सेक्स केला आणि मियामी बीचवरच्या एका कॅफेमध्ये लग्नाची बोलणी करून टाकली होती. पण जेलमध्ये अनेक केसेसमध्ये तो अडकला होता सलग 9 महिने तो जेलमध्ये राहिला आणि नैराश्य नावाचा व्हायरस त्याच्या डोक्यात घुसला आणि नैराश्याच्या कंटाळून त्याने आत्महत्या केली.

हे ही वाच भिडू :

The post जगाला अँटीव्हायरस देणाऱ्या मॅकफिला स्वतःच्या आयुष्यातला निगेटिव्ह व्हायरस संपवता आला नाही…. appeared first on BolBhidu.com.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

मी जेव्हा मरेन तेव्हा माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब आणि थेंब देशाला बळकट करेल

इंदिरा गांधी यांची हत्येच्या दिवशी काय घडलं होतं??????

पंतप्रधानांच्या सफदरजंग मार्गावरील निवासस्थानी शाळेत जाण्यापूर्वी सकाळी राहुल आणि प्रियांकाने आपल्या आजीचे चुंबन घेतले, तेव्हा दोघांना किंचितही अशी कल्पना की आपल्या प्रिय आजीबरोबरची ही आपली अखेरची भेट असेल. हि भेट शेवटचीच ठरली आणि सेंट कोलंबिया व जीझस अँड मेरी कॉन्व्हेंट शाळेतलाही त्यांचा आपला शेवटचा दिवस होता. 

इंदिराजींचा जणू मनोमन साक्षात मृत्युसोबतच संवाद सुरू असावा असं त्यांच वागणं होतं. आजीने राहुल आणि प्रियांकाला रोजच्या दिवसांपेक्षा आज आपल्याला अधिक घट्ट मिठी मारली, हे मात्र दोघांनाही  जाणवले होते.

जवळच्या सहकाऱ्यासोबत बोलतांना इंदिराजी म्हणायच्या. “मला आजकाल अत्यंत अस्वस्थ करणारी वाईट स्वप्ने आणि प्रसन्नतेची जाणीव करून देणारी शांत स्वप्ने अशी दोन्ही प्रकारची स्वप्ने मला पडत असतात”. 

‘त्या’ दिवशी सकाळी राहुलला आलिंगन देतांना इंदिराजी त्याच्या कानात कुजबुजल्या काही अनपेक्षित अन् विपरीत घडलेच, तर घरातल्या परिस्थितीच्या नियंत्रणाची सूत्रे तू हाती घे. 

राहुल गांधी तेंव्हा जेमतेम चौदा वर्षांचे होते. आपल्या संभाव्य मृत्युविषयी इंदिराजी काही पहिल्यांदा बोलल्या नव्हत्या. काही दिवस अगोदरच राहुलला त्या म्हणाल्या, माझे आयुष्य जगून झाले आहे. माझे अंतिम संस्कार व त्याची व्यवस्था कशी असावी, याविषयी माझ्या काही कल्पना आहेत. 

इतकंच नव्हे राहुलसाठी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी म्हटले, 

“समजा हिंसक पद्धतीने चुकून माझा मृत्यु ओढवलाच तर हिंसा माझ्या मृत्युत नव्हे तर माझे प्राण घेणाऱ्यांच्या विचारांमध्ये असेल. कोणताही द्वेष इतका गडद नक्कीच असू शकत नाही, की ज्याची छाया देश आणि देशबांधवांविषयी मला वाटणाऱ्या प्रेमावर अतिक्रमण करू शकेल. कोणत्याही शक्तीत इतका दम खचितच नाही की भारताला प्रगतीपथावर नेण्याचा माझा दृढसंकल्प आणि त्या दिशेने मी चालवलेल्या प्रयत्नांना तो मुरड घालू शकेल”.

इतकंच नाही तर आदल्या दिवशी केलेल्या भाषणात त्या म्हणाल्या,

“मी आज इथं आहे, पण उद्या नसेनही. मला याची काळजी नाही. माझं जीवन मोठं राहिलं आहे आणि मला याचा अभिमान आहे की मी माझं आयुष्य तुम्हा लोकांच्या सेवेत व्यतीत केलं आहे. मी माझ्या शेवटच्या श्वासपर्यंत तुमची सेवा करत राहीन. मी जेव्हा मरेन तेव्हा माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब आणि थेंब भारताला बळकट करण्यासाठी खर्ची पडेल.”

त्या दिवशी सकाळी…..नातवंडांना निरोप देऊन इंदिराजींना थोडा नाश्ता केला आणि १ अकबर रोडवर निवासस्थानाला जोडूनच असलेल्या कार्यालयाच्या दिशेने चालू लागल्या. आयरिश टीव्ही नेटवर्कसाठी विख्यात कलाकार आणि चित्रपट निर्माता पीटर उस्तिनोव्ह याला इंदिराजींची मुलाखत रेकॉर्ड करायची होती. आपल्या युनिटसह तो त्यांची वाट पहात थांबला होता.

मुलाखतीची वेळ ठीक ९ वाजता होती. उस्तिनोव्हने घड्याळाकडे पाहिले. वेळेबाबत अत्यंत वक्तशीर असणाऱ्या पंतप्रधान इंदिराजींना आज चक्क १२ मिनिटे उशीर का झाला, याचे त्याला आश्चर्य वाटले.

नारिंगी रंगाची रूंद काळ्या बॉर्डरची कॉटनची साडी परिधान करून, पिकेट गेटने इंदिराजी घराबाहेर पडल्या. डोक्यावर फेटा घातलेल्या सरदार गार्डने स्मितहास्य करीत त्यांना सलामी दिली. स्मितहास्यानेच त्या देखील त्याला प्रतिसाद देत असतांना, अचानक आपल्या बंदुकीतून इंदिराजींवर त्याने बुलेटसचा वर्षाव सुरू केला. इंदिराजींबरोबर छत्री घेऊन चालणाऱ्या अटेंडंट नारायणने भेदरलेल्या अवस्थेत हातातली छत्री फेकली आणि मदतीसाठी जोरजोरात किंचाळू लागला पण तोपर्यंत फारच उशीर झाला होता. 

६६ वर्षांच्या इंदिराजींवर ३१ बुलेटस झाडण्यात आल्या होत्या. त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्याच्यावर होती त्यांनीच हे घृणास्पद कृत्य केले होते. इंडो तिबेटन बॉर्डर फोर्सच्या गार्डसनी आपल्या बळाचा वापर सुरू करण्याआधी, अवघ्या काही सेकंदात बेअंतचा जोडीदार सतवंतही त्याच्या मदतीला धावला. त्यानेही आपल्या बंदुकीतून पूर्णत: घायाळ अवस्थेतल्या इंदिराजींवर पुन्हा गोळ्या झाडल्या.

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान रक्ताच्याया थारोळ्यात पडल्या होत्या. एका शक्तिशाली युगाचा अंत झाला होता..

हे ही वाच भिडू:

The post मी जेव्हा मरेन तेव्हा माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब आणि थेंब देशाला बळकट करेल appeared first on BolBhidu.com.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

मुंबई चार गाड्यांचा भीषण अपघात, एकामागोमाग धडकल्याने कांजुर मार्गवर वाहतूक कोंडी

मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर सध्या मुंबईत गर्दी पाहायला मिळते. अशात मुंबईतल्या कांजुर मार्ग भागात ब्रिजवर मोठा अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. चार गाड्या एकमेकांना एका मागोमाग धडकल्यामुळे हा भीषण अपघात घडला. यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे समोर येत आहे. खरंतर, दिवाळीच्या तोंडावर मुंबईत मोठी वर्दळ असते. अशात अपघात झाल्यामुळे सुट्टीच्या दिवशी मुंबईत गर्दी पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हीएलआर ब्रिब्रिजवर रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात घडला. यामध्ये पाच ते सहा जण जखमी झाले असून त्यांना तातडीने महात्मा फुले या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, पोलीस आणि मदतकार्य घटनास्थळी दाखल झाले असून अपघाती वाहनांना रस्त्याच्याकडेला नेण्याचं काम सुरू आहे. तर वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी ही पोलिस काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

यंदाच्या दिवाळीत सोनं महाग की स्वस्त? सोनं खरेदी करण्याआधी वाचा मार्केटमधील ट्रेंड

मुंबई : कमोडिटी मार्केट तज्ज्ञांच्या मते, येत्या १२ महिन्यांत सोन्याचा भाव ५२-५३ हजारांपर्यंत पोहोचू शकतो. २०२१ मध्ये आतापर्यंत सोन्याचा ४७ हजार ते ४९००० च्या दरम्यान सतत व्यवहार होत आहे. सोन्याच्या वाढत्या किंमतींवर नजर टाकल्यास २०१९ मध्ये ५२ टक्के आणि २०२० मध्ये २५ टक्के वाढ झाली होती. त्यामुळे यंदाही सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. IANS मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या कमोडिटी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दिवाळीपासून या दिवाळीपर्यंत सराफाचे दर एकत्र केले तर अमेरिकन डॉलर आणि रोख बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याच्या किमतीवर दबाव दिसून येत आहे. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत आर्थिक सुधारणांचा वेग अपेक्षेपेक्षा चांगला होता. त्यामुळे सोन्याबाबत गुंतवणूकदारांची उत्सुकता थंडावली होती. दुसऱ्या सहामाहीत जागतिक अर्थव्यवस्था अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत नसल्यामुळे अशा स्थितीत पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढून त्याची किंमत वाढण्यास सुरुवात होईल, असे कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे मत आहे. दिवाळीत मागणीत वाढ होण्याची शक्यता दिवाळीनिमित्त शुभ खरेदी म्हणून सोन्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. गेल्या वर्षी दिवाळीबद्दल बोलायचे झाले तर देशाच्या कानाकोपऱ्यात निर्बंध होते. यंदा तसे नाही. दुकाने उघडी आहेत आणि निर्बंध नगण्य आहेत. या वर्षी सप्टेंबरपर्यंत ७४० टन सोने आयात करण्यात आले आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा सोने आयात करणारा देश आहे. सोन्याची मागणी ४७ टक्क्यांनी वाढली जागतिक गोल्ड परिषदेच्या ताज्या अहवालानुसार, सप्टेंबरच्या तिमाहीत देशातील सोन्याच्या मागणीत वार्षिक तुलनेत ४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूण मागणी १३९.१० टन इतकी होती. सप्टेंबर २०२० च्या तिमाहीत हा आकडा ९४.६० टन होता. इतकंच नाहीतर दागिन्यांची मागणीही ५८ टक्क्यांनी वाढून ९६.२० टन झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही महिन्यांत सोन्याचा दर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बाजारात २००० च्या पुढे जाईल.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

विराट अनुष्काला मिळाला नवा शेजारी; बॉलिवूडच्या नव्या फेव्हरेट जोडीने शेजारीच घेतले घर

मुंबई। बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ सध्या चर्चेत आहेत. दोघेही ते लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. दोघे अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र स्पॉट झालेत, त्यानंतर सर्वत्र एकच गोष्ट आहे की, ते एकमेकांना डेट करत आहेत.

असे म्हटले जात आहे की दोघे 7 ते 9 डिसेंबर दरम्यान लग्नगाठ बांधणार आहेत. त्यातच दोघेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप सक्रिय आहेत. दरम्यान आणखी एक माहिती समोर येत आहे. लग्नानंतर विकी आणि कतरिना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे यांचे शेजारी बनणार आहेत.

म्हणजेच विराट-अनुष्काच्या हे दोघे घर घेणार आहेत. दोघेही लग्नानंतर नवीन घरात राहण्याचा विचार करत आहेत. जुहूतील एका अत्यंत आलिशान इमारतीमध्ये फ्लॅट खरेदी केला आहे. हा फ्लॅट अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या सेलिब्रिटी जोडीच्या शेजारीच असल्याची माहिती समोर आली आहे.

विकी आणि कतरिनाच्या नात्याच्या अफवा पसरल्यापासून दोघांनीही यावर मौन बाळगले आहे. मात्र दोघेही सध्या लग्नाच्या खरेदीत व्यस्त असल्याचे म्हटले जात आहे.विकी आणि कतरिनाने लग्नाची तयारी सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार “दोघांचे लग्नाचे कपडे सब्यसाचीने डिझाइन केले आहेत. सध्या ते ड्रेसचे फॅब्रिक निवडत आहेत. कतरिनाने तिच्या पोशाखासाठी रॉ सिल्क नंबर निवडला आहे, जो लेहेंगा असेल. लग्न नोव्हेंबरमध्ये किंवा डिसेंबर होणार असल्याचे म्हटले जात आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कतरीना आणि विकी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील Six Senses Fort Barwara या र रिसॉर्टमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. अर्थात या वृत्ताला कुणीही दुजोरा दिलेला नाही.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

बिग बॉसच्या घरात होणार नवी वाईल्ड कार्ड एन्ट्री! ‘ही’ अभिनेत्री घालणार घरात धुमाकूळ

मुंबई। बिग बॉस मराठी सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कलर्स मराठीवर १९ सप्टेंबरपासून हा शो सुरु झाला आहे. या शोच्या पहिल्या दिवसापासूनच स्पर्धकांमध्ये वाद बघायला मिळाला आहे. बऱ्याचदा तर काही कारण नसतानाही स्पर्धक भांडताना दिसत आहे.

या घरातलं आयुष्य हे जगाशी जरा वेगळं असल्यामुळे कधी कधी कोणाशी पटवून घ्यावं लागतं तर कधी वाद घालावा लागतो. अशात सुरुवातीलाच स्पर्धकांमध्ये झालेली भांडणं पाहून प्रेक्षकांनाही पुढे काय होणाच याची उत्सुकता लागलेली आहे.

दरम्यान या शोमध्ये आता छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेण्यासाठी सज्ज झाली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री नीता शेट्टी ‘बिग बॉस’मराठीमध्ये एन्ट्री करणार आहे.

अभिनेत्री नीता शेट्टी मालिका परावतार श्री कृष्ण आणि घर की लक्ष्मी बेटियामध्ये झळकली आहे. तसेच ती गंदी बात ४ या वेबसीरिजमध्ये दिसली आहे. या सीरिजनंतर ती खूप चर्चेत आली होती. नीताने फुगे या मराठी चित्रपटातही काम केले आहे

याची नेमकी हिंट तिने स्वतः आपल्या इन्स्टाग्रामवरून दिली आहे. नीता शेट्टीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आपला एक फोटो शेअर करत बिग बॉसच्या लोगोमध्ये जे डोळ्याचं फेमस चित्र आहे, ते लावलं आहे आणि सोबतचं ‘आय एम वेटिंग’ असं म्हटलं आहे.

कलर्स वाहिनीने देखील त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये एक अभिनेत्री बिग बॉसच्या मंचावर एन्ट्री डान्स करताना दिसत आहे. मात्र ती पाठमोरी असल्याने ती कोण आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. परंतु ही अभिनेत्री नीता शेट्टीच असल्याचा दावा काही युझर्सनी केला आहे.

बिग बॉसच्या घरातून आतापर्यंत अक्षय वाघमारे, सुरेख कुडची, आदिश वैद्य या तिघांना बाहेर पडावे लागले आहे. तर कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी तब्येतीच्या कारणामुळे घराबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र आता आदिशनंतर नीता या घरात धुमाकूळ घालणार आहे. त्यामुळे चाहत्यांना आता उत्सुकता लागली आहे.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

NCB – मलिकांचा वाद वैयक्तिक म्हणणारे राष्ट्रवादीचे नेते पडले तोंडावर, पुरावे निघाले ठोस

क्रुझ ड्रग्स प्रकणावरुन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहे. समीर वानखेडे मुस्लिम असून त्यांनी दलित असल्याचे सांगत नोकरी मिळवली आहे, असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

त्यांनी एका दलिताचा हक्क हिसकावून घेतला आहे. समीर वानखेडे हे मुस्लीम आहेत आणि त्यांच्या वडीलांचे नाव दाऊद आहे असा दावा नवाब मलिकांनी केला होता. अशात या वादावर राष्ट्रवादीचे नेते प्रतिक्रिया देण्यास टाळत होते. पण नवाब मलिकांचे पुरावे ठोस निघाल्याने राष्ट्रवादीची नेतेमंडळी बॅकफुटवर गेली आहे. त्यामुळे मलिकांचे वन मॅन आर्मी असे कौतूक केले जात आहे.

नोव्हेंबर २०२० पासून नवाब मलिक विरुद्ध एनसीबी असा संघर्ष सुरु आहे. ड्रग्स प्रकरणात नवाब मलिकांच्या जावयाला अटक करण्यात आली होती. त्यामुळे एनसीबीचा आणि नवाब मलिकांचा हा संघर्ष वैयक्तिक आहे, अशी भुमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडली होती.

आपल्याकडे ठोस पुरावे आहे. या प्रकरणात समीर वानखेडे तुरुंगात जाऊ शकतो, असे नवाब मलिकांनी म्हटले होते. त्यानंतर प्रकरण लावून धरण्याविषयी शरद पवारांनी सांगितले होते, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे ६ ऑक्टोबरपासून मलिकांनी वानखेडेंविरोधात मोहिम सुरु केली होती.

असे असले तरी गृहविभाग सुस्त असल्याचे दिसून येत होते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बिल्कूल अंगावर घ्यायचे नाही, असे सांगितले जात होते. त्यामुळे या प्रकरणावर गृहविभागाकडून कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया मिळाली नव्हती.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही यावर भाष्य करणे टाळले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व्यतिरिक्त नवाब मलिकांना राष्ट्रवादीतून पाठिंबा मिळत नाहीये, असे समजत होते, पण ते सर्व नेते मंडळी तोंडघशी पडले आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुढच्या सामन्यात कोण असणार शार्दूल ठाकूर की हार्दीक पांड्या?; विराट कोहली म्हणाला…
पाकड्यांचा माज उतरेना; विराटनंतर अफगाण कॅप्टनला बोलला असा काही की त्याने पत्रकार परीषदच सोडली
VIDEO: पाकने अफगानिस्तानच्या तोंडातला घास ओढला; ‘या’ फलंदाजाने ओव्हरमध्ये ४ सिक्स मारत मॅच जिंकवली

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

महिला बँक अधिकाऱ्याने केली आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहलेली नावं वाचून पोलिसही हादरले

अयोध्या : अयोध्येतील (Ayodhya) पंजाब नॅशनल बँकेत () प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सुसाईड नोटमध्ये (Suicide Note) मुलीने तिच्या एक्स नवऱ्यासोबतत ३ जणांना जबाबदार धरले आहे. याप्रकरणी यूपीचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी चौकशीची मागणी केली आहे. अयोध्येत पंजाब नॅशनल बँकेत पब्लिक ऑफिसर म्हणून काम करत असलेल्या एका तरुणीचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत एका टाक्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. मुलीच्या खोलीतून सुसाईड नोटही सापडली आहे. यामध्ये तिने तीन जणांना मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे. यामध्ये एक नाव विवेक गुप्ता यांचे आहे, ज्याच्यासोबत मुलीचे लग्न ठरले होते. पण नंतर विवाह तुटला. तर सुसाईड नोटमधील उर्वरित २ नावं धक्कादायक आहेत. यामध्ये पहिले नाव आशिष तिवारी एसएसएफ प्रमुख लखनऊ असे लिहिले आहे, तर दुसरे नाव अनिल रावत पोलीस फैजाबाद असे लिहिले आहे. अयोध्या पोलिसांनी विवेक गुप्ता याला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. अखिलेश यादव यांनी केली चौकशीची मागणी या प्रकरणी अखिलेश यादव यांनी ट्विट करून अयोध्येतील पंजाब नॅशनल बँकेच्या महिला कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये ज्याप्रकारे पोलिसांवर थेट आरोप केले जात आहेत, ते तेथील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे कटू सत्य असल्याचे म्हटले आहे. यामध्ये थेट आयपीएस अधिकाऱ्याचे नाव घेणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. याची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. २ दिवसांनी शेजाऱ्यांनी उघडला दरवाजा श्रद्धा गुप्ता असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे. तिचा मृतदेह शनिवारी तिच्या खोलीत ओढणीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तिच्या घराचा दरवाजा २ दिवस उघडला नाही आणि फोनही उचलला नाही तेव्हा शेजाऱ्यांनी घरमालकाला माहिती दिली आणि त्याने पोलिसांना बोलावले.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन, 'खड्डा तेथे दिवा' लावून केली दिवाळीची सुरूवात

अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात राष्ट्रवादी युवा काँग्रेसने एक अनोखे आंदोलन केले. गेल्या अनेक दिवसापासून अकोट शहरातील अनेक प्रमुख रस्त्यावर खड्डे निर्माण झालेले आहेत़. त्यामुळे शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे खड्डे बूजवीन्यात यावे. नागरिकांना रस्ते सुविधा नगर पालिकेने द्यावी या साठी आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने खड्डा तेथे दिवा लावून खड्डे समस्यांवर प्रकाश टाकला. दिवाळी पूर्वीच शहरातील प्रमुख मार्गावरील खड्ड्यावर दिवे लावून राष्ट्रवादी युवा काँग्रेसने अनोखे आंदोलन केले. गेल्या अनेक दिवसापासून शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे निर्माण झाले आहेत़. या खड्ड्यामुळे वाहनधारकांना व पादचारी नागरिकांना याचा नाहक त्रास सहन होत आहे. अनेकदा वाहनधारकांचे अपघात झाले व होत अजूनही आहेत़. त्यामुळे शारीरिक इजा होऊन वाहनाचे नुकसान झाले आहे. शहरातील मार्गांवर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत , या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत . त्यामुळे घराच्या बाहेर निघताना आणि बाहेरून घरी जाताना आपण सलामत राहू की नाही याची शाश्वती राहिलेली नाही. नगरपरिषदेने गेल्या अनेक वर्षांच्या कार्यकाळात अजूनही अनेक रस्त्यांची खड्डे समस्या मिटवली नाही. या खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांच्या संतप्त भावना लक्षात घेता राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आजचे आंदोलन जनहितासाठी केले असे यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष राम म्हैसने यांनी सांगितले आहे. शहरातील जिजामाता चौक येथून प्रारंभ झालेले हे दिवे लावा आंदोलन शिवाजी चौक, सोनू चौक मार्गे नरसिंह रोड या रस्त्यांवर करण्यात आले. या आंदोलनामुळे एक दिवा रस्त्यावरील खड्ड्यांसाठी शहराच्या विकासासाठी असे चित्र रस्त्यांवर दिसून आल्यामुळे नगर परिषदेची उदासीनता दूर होईल अशी अपेक्षा नागरीकाना आहे. मात्र अनेक दिवसांपासून नगरपरिषदेला हे खड्डे दिसत नाहीत का...? असाही प्रश्न नागरिकांना पडला आहे. रस्त्यांचे स्वरूप बदलावे सुविधांनी युक्त रस्ते नागरिकांना मिळावे हाच आजच्या आंदोलनाच्या मागचा उद्देश दिसून आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने याबाबत पुढाकार घेतलेला आहे. या आंदोलनानंतर प्रशासनाच्या डोळ्यात उजेड पडावा रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावे एवढीच आमची अपेक्षा आहे. त्यासाठीच राष्ट्रवादी युवक काँग्रेस सदैव तत्पर राहील असेही राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे अकोट तालुका अध्यक्ष राम म्हैसने यांनी यावेळी म्हटले आहे. आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम भैया गावंडे, विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी, जिल्हाध्यक्ष शिवा भाऊ मोहोड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळला: अनेक जण अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू

: पुण्यातील बालेवाडी परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. बालेवाडीतील पाटील नगर येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी स्लॅब () कोसळला. या दुर्घटनेत काही जण जखमी झाल्याची आणि अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या ६ फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वी १२ जणांना जखमी अवस्थेत दवाखान्यात नेलं असल्याचं स्थानिक लोक सांगत आहेत. दरम्यान, या परिसरात प्रशासनाकडून बचावकार्य सुरू असून स्लॅबखाली अडकेल्या इतर लोकांना बाहेर काढलं जात असल्याची माहिती आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

धक्कादायक! किरकोळ वादातून दोघांचा खून; हत्याकांडाने तालुका हादरला

सांगली : किरकोळ मारहाणीच्या प्रकरणातून कडेगाव तालुक्यातील विहापूर येथे दुहेरी खुनाची (Sangali Double ) घटना घडली. मारामारीत संदीप भानुदास चव्हाण (वय ३४) आणि विजय नानासाहेब माने (वय ३५, दोघे रा. विहापूर) या दोघांचा खून झाला. तसंच गणेश सतीश कोळी (वय-२६) व गोरख महादेव कावरे (वय-३०,दोघे रा.विहापूर) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी मधुकर उत्तम मोरे (वय-२८) व विशाल तानाजी चव्हाण (वय-२९दोघे रा.विहापूर) यांच्याविरोधात कडेगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी संशयित आरोपी मधुकर मोरे याला अटक केली आहे, तर विशाल चव्हाण हा फरार आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २९ ) रात्री उशिरा घडली असून, या दुहेरी खून प्रकरणाने तालुका हादरला आहे. कडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विहापूर येथील गणेश सतीश कोळी, गोरख महादेव कावरे व विजय नानासाहेब माने यांनी शुक्रवारी (ता.२९) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरुन या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मधुकर मोरे याचे वडील उत्तम मोरे यांना मारहाण केली होती. हीच मारहाण दोघांच्या जीवावर बेतली. गणेश, विजय व गोरख या तिघांनी मिळून आपल्या वडिलांना मारहाण केल्याची माहिती मधुकर मोरे याला मिळाली. त्यामुळे संतापलेल्या मधुकर याने आपला मित्र विशाल चव्हाण याला सोबत घेऊन विजय माने, गणेश कोळी, गोरख कावरे यांना लाकडी दांडके, काठी व ऊसाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तर विजय, गणेश व गोरख या तिघांचा मित्र असलेला संदीप चव्हाण याला त्याच्या घरातून बाहेर बोलवून घेतले व संशयित मधुकर मोरे व विशाल चव्हाण या दोघांनी त्याला लाकडी दांडके, काठी व ऊसाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. मारहाणीत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने संदीप चव्हाण यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर विजय माने हेही गंभीर जखमी झाल्याने नातेवाईकांनी त्यांना सांगली येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या खून प्रकरणाची माहिती मिळताच कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे व सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांच्यासह पोलीस पथकाने विहापूर येथे घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसंच या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मधुकर उत्तम मोरे यांच्या मुसक्या आवळल्या, तर दुसरा संशयित आरोपी विशाल तानाजी चव्हाण यांच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना केली. या खून प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे हे करत आहेत.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

यात्रेसाठी चालत जाणाऱ्या भाविकांना कारने चिरडले; ३ जागीच ठार

: हुलजंती (ता. मंगळवेढा) येथे महालिंगराया यात्रेसाठी चालत जाणाऱ्या भाविकांना एका चारचाकी गाडीने धडक दिल्याने तिघे जागीच ठार झाले आहेत. अपघातात ठार झालेले तिघेही कर्नाटकातील रहिवासी आहेत. बसवराज उर्फ बसाप्पा दुर्गाप्पा चिंचवडे (वय ३२, रा. यदभावी ता. लिंगसूर), नागप्‍पा सोमाण्णा अचनाळ (वय ३४) आणि म्हानाप्पा दुर्गप्पा गोंदीकल (वय ४०, दोघे रा. देवभुसर ता. लिंगसूर जि. रायचूर) अशी ठार झालेल्या भाविकांची नावे आहेत. हा अपघात उमदी-मंगळवेढा रस्त्यावर शनिवारी सायंकाळी सहा वाजता झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, हुलजंती येथे महालिंगराया व बिरोबा गुरू शिष्य भेटीचा पालखी सोहळा आठवडाभर सुरू असतो. या पालखी सोहळ्यासाठी , आंध्रप्रदेश, तेलंगणा, गोव्यासह इतर राज्यातील भाविक मोठ्या संख्येने जात असतात. शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कर्नाटकमधून उमदी यामार्गे हुलजंतीला भक्त जात होते. दरम्यान, पुण्याहून रायचूरला जाणाऱ्या एका चार चाकी गाडीचे टायर फुटले. टायर फुटल्याने कार अनियंत्रित झाली आणि रस्त्याने चालत जाणाऱ्या बसवराज उर्फ बसाप्पा दुर्गाप्पा चिंचवडे, नागप्‍पा सोमांना अचनाळ व म्हानाप्पा दुर्गप्पा गोंदीकल या भक्तांना चिरडले. यात जागीच तिघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. या घटनेचा अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

'या व्यक्तीचे वानखेडेंशी नाते काय'?; एक फोटो ट्विट करत नवाब मलिकांचा सवाल

मुंबईः कार्डिलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात () राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री (Nawab Malik) एनसीबीचे विभागीय संचालक (Sameer Wankhede) यांच्यावर दिवसागणिक नवनवे आरोप करत आहेत. वानखेडे हे ड्रग्ज प्रकरणात निरपराध लोकांना फसवण्यासाठी स्वत:च्या आर्मीचा वापर करतात असा गंभीर आरोप केल्यानंतर मलिक यांनी आता नवे ट्विट करत नवा चेहरा समोर आणला आहे. ही व्यक्ती कोण आहे? या व्यक्तीचे दाऊद वानखेडे आणि समीर वानखेडे यांच्याशी काय नाते आहे, याबाबत कृपया माहिती द्यावी, असे मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. (In the case of and Drugs Party, Minister has brought a new face by tweeting) मंत्री नवाब मलिक गेले काही दिवस ज्या प्रमाणे एखादा मुद्दा उपस्थित करत नंतर त्यांचा खुलासा करत आहेत, त्यानुसार ही व्यक्ती कोण आहे याचा खुलासाही ते लवकरच करतील अशी शक्यता आहे. नवाब मलिक या ट्विटमधील या व्यक्तीबाबत काय खुलासा करणार हे सांगणे कठीण असले तरी देखील त्या व्यक्तीचे समीर वानखेडे किंवा त्यांच्या कुटुंबीयांशी नाते आहे का?, असल्यास ते काय नाते आहे हे स्पष्ट झाल्यानंतरच मलिक यांना काय सांगायचे आहे हे स्पष्ट होणार आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा- मलिकांनी वानखेडेंवर केला गंभीर आरोप अमली पदार्थविरोधी कारवाई करताना समीर वानखेडे यांनी आतापर्यंत शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी सोबत न घेता त्यांनी प्रायव्हेट आर्मी तयार करुन दहशत निर्माण केली होती, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. हे मी भविष्यात सिध्द करून दाखवेन असेही मलिक यांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- एका रेस्टॉरंटमधून क्रूझवर गेले ड्रग्ज- मलिक मुंबईतील क्रुझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीमध्ये एका रेस्टॉरंटमधून आलेल्या जेवणासोबतच ड्रग्ज नेले गेले होते आणि याचे सगळे पुरावे माझ्याकडे असून मी ते उघड करणार आहे, असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे. इतकेच नाही, तर आपल्याकडे असलेले सर्व पुरावे आपण एनसीबीच्या महासंचालकांना देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

कोल्हापुरात दहशत माजवणाऱ्या 'या' कुख्यात गँगवर 'मोक्का'ची कारवाई

: कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, गर्दी, हाणामारी, हत्यारे बाळगून दहशत माजवणे असे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या आर.सी. गँगला पोलिसांनी मोक्का लावला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मोक्काच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या टोळीच्या दहशतीमुळे शहरातील नागरिक, व्यापारी, व्यावसायिक हतबल झाले होते. आर.सी. गँगचा म्होरक्या रवी सुरेश शिंदे, प्रदीप रामचंद्र कदम, संदीप मोतीराम गायकवाड, जावेन इब्राहिम सय्यद, सागर सुरेश जाधव, प्रकाश कुबेर कांबळे, अक्षय ऊर्फ आकाश अशोक कदम, अजय सुनील माने, योगेश मानसिंग पाटील, विकी माटुंगे (सर्व रा. जवाहरनगर) यांच्यावर कारवाई झाली आहे. या टोळीवर गंभीर स्वरूपाचे ३७ आणि अदखलपात्र ८ गुन्हे दाखल आहेत. शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत खंडणी उकळणे, सुपारी किंग, भूखंड माफिया म्हणून आर.सी. गँगने वर्चस्व निर्माण केले. तसंच मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ उठवण्याचा प्रयत्न केला आहे. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी मोक्काचा प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे पाठवला होता. दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी मोक्काच्या प्रस्तावातील त्रुटी दूर करून हा प्रस्ताव मंजुरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे पाठवला आणि त्यांनी शुक्रवारी रात्री प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

रत्नागिरीत मासेमारी करण्यासाठी गेलेली बोट बेपत्ता; शोध मोहीम सुरू

: रत्नागिरीतील जयगड येथील करणारी 'नावेद २' ही झाली आहे. नासीर हुसैनमियाँ संसारे यांच्या मालकीची ही बोट असून २६ ऑक्टोबरपासूनच ही बोट बेपत्ता आहे. बेपत्ता बोटीत एकूण ६ जण असून बोटीचे मालक संसारे यांनी याबाबत आज प्रशासनाला माहिती दिल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. खोल समुद्रात प्रशासनाच्या तीन स्पीड बोटी, कोस्टगार्डची एक स्पीड बोट व काही खासगी बोटी यांच्याकडून युद्धपातळीवर बेपत्ता बोटीचा शोध घेतला जात आहे. मात्र अद्याप कोणताही संपर्क झाला नसल्याने चिंतेचं वातावरण आहे. 'नावेद २' ही बेपत्ता असलेली ही बोट २६ ऑक्टोबर मंगळवारी सायंकाळी उशिरा जयगड येथून मासेमारीसाठी समुद्रात गेली होती. तब्बल पाच दिवसानंतरही बोट बेपत्ता आहे. सदर नौका किनाऱ्यावर आलेली नाही व कोणत्याही प्रकारे संपर्क होत नसल्याने मालक संसारे यांनी जिल्हा प्रशासनाला याची माहिती दिली आहे. या बोटीमध्ये सहा जणही होते. त्यांचा शोध सुरू आहे. बोटीमध्ये असलेल्या व्यक्तींमध्ये दगडू तांडेल नामक मुख्य चालक असून गोविंद नाटेकर, दत्ता, सूर्या, अनिल, अमोल या नावाच्या चार जणांचाही समावेश आहे. हे सगळे गुहागर तालुक्यातील रहिवासी आहेत. दरम्यान, रात्री उशिरा एक मृतदेह हाती लागला असून तो नक्की बेपत्ता बोटीमधील व्यक्तीचाच आहे की अन्य कोणाचा आहे, याबाबतची खातरजमा करण्याचे काम सुरू आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

तक्रार देणाराच निघाला दरोड्याचा मास्टरमाईंड; असा झाला उलगडा

यवतमाळ /प्रतिनिधीः अकोलाबाजार ते तळणी रोडवरील पेट्रोलपंपाच्या समोर दुचाकीने जात असताना एका ऊस तोडणी मुकादमास तसेच त्याच्या एका साथिदारास सहा जणांनी लुटल्याची तक्रार त्यांनी वडगाव जंगल पोलिसात दिली. त्यावेळी त्यांच्याजवळून सहा जणांनी तीन लाख २० हजार लुटले तसेच त्यांना मारहाणही केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. परंतु पोलिसांनी चौकशी केल्यावर तक्रार देणाराच दरोड्याचा मास्टरमाईड असल्याचे निष्पन्न झाले. यातील पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले असून, दोन आरोपी फरार आहेत. अजय राजु तायकोटे (२७) रा. सावरगड, ता.जि. यवतमाळ असे या मास्टरमारमाईचे नाव आहे. अजय तायकोटे हा ऊस तोडणी मुकादम असून, तो व त्याचा एक साथीदार दुचाकीने साळभावाने दिलेला कामगारांचा अ‍ॅडव्हान्स देण्यासाठी जात होते. तेव्हा त्यांना अकोलाबाजार ते तळणी रोडवर लुटल्याचं सांगत वडगाव जंगल पोलिसात तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपासाला गती दिली. तसेच अजय तायकोटे व त्याच्या साथिदाराची चौकशी केली असता त्यांच्या देहबोलीत व बोलण्याच्या पद्धतीत तफावत दिसून येत होती. तेव्हा पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांनी मित्रांच्या मदतीने हा कट रचल्याचे कबूल केले. वाचाः पोलिसांनी राजू तायकोट व त्याच्या साथिदाराला ताब्यात घेऊन इतर आरोपींचा शोध सुरू केला. या गुन्ह्यातील पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले असून, दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन राठोड, विवेक देशमुख, विनोद राठोड, उल्हास कुरकुटे, सलमान शेख, किशोर झेंडेकर, निखील मडसे, मंगीलाल राठोड, अक्षय डोंगरे, निलकमल भोसले, संतोष ढाले अवधूतवाडी ठाण्यातील सागर चिरडे, समाधान कांबळे सहभागी झाले. वाचाः

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

काँग्रेसच्या अब्रूची लख्तर वेशीवर टाकून, मधल्या काळात विनोद राय कुठ गायब होते?

दोन दिवसांपूर्वी कॅगच्या विनोद रायनी आपण खोटारडेपणा केला असल्याचे मान्य करून सपशेल माफी मागितली. रायनी युपीए सरकारवर केलेले आरोप कोर्टातही सिद्ध झाले नाहीत. मात्र मनमोहनसिंग पंतप्रधान असताना त्यांच्या आरोपांचा आधार घेत भाजपने साप साप म्हणून भुई बडवत आख्खा देश तेव्हा डोक्यावर घेतला होता.

त्यावेळी शरद पवार म्हटले होते,

हा भाजपने सत्तेसाठी रचलेला बनाव आहे. पुढे सगळ्यांच्या लक्षात येईल की असा काही स्कॅम झालेलाच नाही.

आज त्यांचं ते स्टेटमेंट आठवलं. आणि दोन दिवसांपूर्वी विनोद राय यांची माफी. अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर अख्या देशाने भाजप सरकारला सत्तेवर बसवलं आणि युपीए सरकारला सपशेल नाकारलं, त्याच्या मागची ही गोष्ट सांगावीच लागेल.

मार्च २०१२ ची ही गोष्ट. कॅग (Comptroller and Auditor General) यांचा एक ड्राफ्ट रिपोर्ट आला. या रिपोर्ट मध्ये २००४ पासून ते २००९ पर्यंतच्या कोळसा ब्लॉक वाटप प्रक्रियेत काहीतरी गडबड असल्याचं म्हंटल गेलं. या एका रिपोर्टमुळे काँग्रेसच्या जहाजाला भगदाड पडलं, ज्याची परिणीती काँग्रेस डुबण्याच्या दिशेकडे होऊ लागली. आणि यामागे मास्टर माईंड कोण होत ? तर विनोद राय..

आधी विनोद राय कोण आहेत हे समजून उमजून घ्या. कारण पुढं वाचताना समजेल काय बिलंदर आहे हा माणूस..

विनोद राय यांचा जन्म २३ मे १९४८चा. उत्तरप्रदेशातल्या गाजीपुरातला. आता यूपी बिहारची पोर तशी अर्थशास्त्रीच म्हणावी लागतील. तसेच हे विनोद राय अर्थशास्त्रातील प्रतिभावंत. ज्यांनी ११वे कॅग म्हणून सलग पाच वर्षे काम केलं. त्यांनी दिल्लीच्या कॉलेजातून बॅचलर्स तर हार्वर्ड युनिव्हर्सिटी मधून आपलं मास्टर्स पूर्ण केलं. १९७२ साली ते आयएएस झाले. केरळ मध्ये त्यांची पहिली पोस्टिंग होती. पुढं अर्थमंत्रालयाच्या अधीन असलेल्या बँका, इन्श्युरन्स कंपन्या अशा विविध पदांवर काम करत पुढं ते भारताचे ११ वे कॅग झाले.

CAG चं काम काय असतं ?
तर असं समजा कॅग सरकारच्या आर्थिक गोष्टींवर नजर ठेवणारा चौकीदार आहे. पडद्याआड राहून सरकारी आर्थिक धोरण कशी आहेत, सरकारचा परफॉर्मन्स कसा आहे हे बघतात. थोडक्यात सरकारने आर्थिक उचपत्या करू नये म्हणून हे कॅग असतात. सरकारी उचपत्या झाल्याच तर त्या त्यांच्या रिपोर्ट मध्ये दिसतात. आणि हे रिपोर्ट जनहितार्थ असतात. असेच काही रिपोर्ट विनोद राय यांनी तयार केले ज्यात युपीए सरकारने उचपत्या केल्यात असं प्रथमदर्शनी निदर्शनास आलं.

असं म्हणतात की विनोद राय हे अशा अधिकाऱ्यांपैकी होते, ज्यांना सरकारची लालफीतशाही टाळून काम कसं करायच हे माहीत होत. त्यांची कॅग म्हणून नियुक्ती झाली तेव्हा त्यांना तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा पाठिंबा होता. नंतर मात्र त्यांनी असे रिपोर्ट बाहेर काढले की, ज्यामुळे युपीए सरकारचा बाजार उठला. काँग्रेसच्या अधोगतीला जबाबदार असलेले अनेक घोटाळे त्यांच्या कार्यकाळात उघड झाले.

यात,

2G स्पेक्ट्रम घोटाळा: 2G स्पेक्ट्रम घोटाळा उघड करण्याच संपूर्ण श्रेय विनोद राय यांना जात. मोबाईल कंपन्यांना टूजी स्पेक्ट्रम वाटपात गडबड आढळून आली. सीबीआयने २ एप्रिल २०११ रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, या घोटाळ्यामुळे देशाचे सुमारे ३० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले.

कोळसा घोटाळा: राय यांनी यूपीए सरकारला आणखी एक मोठा दणका दिला होता. विनोद राय यांच्या म्हणण्यानुसार २००४ ते २००९ दरम्यान कोळसा खाणीचे परवाने मनमानी पद्धतीने वाटण्यात आले. खाणींतील कोळसा लिलाव न करता अत्यंत स्वस्त दरात काढण्याचे कंत्राट खासगी कंपन्यांना देण्यात आले. यामुळे सरकारी तिजोरीचे अंदाजे १.८६ लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

दिल्ली कॉमनवेल्थ घोटाळा: २०१० साली दिल्लीत झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता. वस्तू त्यांच्या किंमतीपेक्षा कितीतरी जास्त किमतींनी विकत घेतल्या गेल्या. काही वेळा, एखादी वस्तू खरेदी करता येईल त्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट रक्कम फक्त भाड्याने दिली जात असे. त्यात या खेळांचे अध्यक्ष असलेले सुरेश कलमाडी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकले आणि नंतर तुरुंगात गेले.

विनोद राय यांनी त्यांच्या कार्यकाळावर ‘नॉट जस्ट अॅन अकाउंटंट’ हे पुस्तक लिहिल. त्यात त्यांनी म्हंटल की, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ठरवलं असतं तर ते हे घोटाळे थांबवू शकले असते, पण त्यांची तशी कधी इच्छाच नव्हती.

आता अशी पुस्तक लिहिली तर काय होणार ? व्हायचं तेच झालं. भाजपने काँग्रेसच्या या घोटाळ्यांना केंद्रस्थानी ठेवून अक्षरशः काँग्रेसला पळता भुई थोडी केली. या सगळ्यात आरोपांच्या काळात विनोद राय दिसलेच नाहीत.

ते काय करत होते ? तर जानेवारी २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल न्यायालयाने BCCI अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना पदावरून हटवल. त्यांच्या जागी हंगामी अध्यक्ष म्हणून विनोद राय यांची निवड करण्यात आली. सध्या ते या पदावर आहेत.

त्याचबरोबर सध्या ते संयुक्त राष्ट्रांच्या बाह्य लेखापरीक्षकांच्या पॅनेलचे अध्यक्ष आहेत.

हे ही वाच भिडू:

The post काँग्रेसच्या अब्रूची लख्तर वेशीवर टाकून, मधल्या काळात विनोद राय कुठ गायब होते? appeared first on BolBhidu.com.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

शेवटच्या क्षणी हसत डान्स करत असताना काळाची झडप, पुनीत राजकुमारचा व्हिडिओ व्हायरल

साऊथचा सुपरस्टार पुनीत राजकुमार याचं नुकतेच निधन झाले. २९ ऑक्टोबरला जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यामुळे त्याच्या चाहत्यांना एकच धक्का बसला. त्याचे लाखो चाहते होते. ४६ व्या वर्षी पुनीतने या जगाचा निरोप घेतला. यामुळे कन्नड चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

पुनीत राजकुमारने त्याच सकाळी ट्विट करून चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. ६ तासांपूर्वी त्याचे शेवटचे ट्विट पाहून, अभिनेता आता या जगात नाही यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. पुनीतच्या निधनावर सर्व दिग्गज सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. अनेकांना यावर विश्वास बसत नव्हता.

सध्या पुनीतच्या चाहत्यांकडून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पुनीतच्या मृत्यूच्या काही तास आधीचा आहे. या व्हिडीओमध्ये पुनीत सुपरस्टार यशसोबत डान्स करताना दिसत आहे. KGF स्टार यश आणि पुनीत राजकुमार यांचा एकत्र असलेला हा शेवटचा व्हिडीओ होता.

हा व्हिडिओ बघून अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे. अनेकांना तो या जगात नाही, यावर विश्वास बसत नाही. पुनीतचा हा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ काल रात्रीच्या ‘बजरंगी 2 ‘च्या प्रमोशन इव्हेंटचा आहे.

या कार्यक्रमात पुनीत राजकुमार ‘KGF-2’ स्टार यशसोबत स्टेजवर मस्ती करताना आणि नाचताना दिसत आहे. काल जेव्हा हा व्हिडीओ काढला गेला तेव्हा कोणीही असा विचार केला नसावा की, हा हसता खेळता चेहरा असा अचानक काळाच्या पडद्याआड जाईल.

अनेकांनी त्याच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. अभिनेता सोनू सूदने लिहिले, ‘हृदयभंग. भाऊ तुझी नेहमी आठवण येईल. तसेच क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागसह सर्व सेलिब्रिटींनी ट्विट करून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

धक्कादायक! गेम खेळता खेळता झाला मोबाईलचा ब्लास्ट, चिमुकल्यांच्या शरीरात घुसले बॅटरीचे तुकडे

सध्याच्या काळात मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनातला अविभाज्य भाग बनला आहे. तरुण पिढीतर सऱ्हासपणे मोबाईलचा वापर तर करतच आहे. पण आता लहान मुलांनाही मोबाईलचे वेड लागले आहे. त्यामुळे ते दिवसभर मोबाईल गेम खेळत असतात, व्हिडिओज बघत असतात.

दिवसभर मोबाईल वापरल्याने मुलांवर वाईट परीणामही होत असतो. पण असे असतानाच मध्य प्रदेशच्या दतिया जिल्ह्यात एक भयानक घटना घडली आहे. इथे तीन लहान मुले मोबाईल खेळत असताना त्या मोबाईला स्फोट झाला आहे, या स्फोटामुळे मुले जखमी झाली होती, त्यानंतर त्या मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मोबाईलच्या बॅटरीशी खेळणे तीन मुलांना चांगलेच महागात पडले आहे. खेळादरम्यान बॅटरीचा स्फोट होऊन तीन मुले जखमी झाली. जखमी मुलांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिन्ही मुले एकाच कुटुंबातील आहेत. सध्या तिघांचीही प्रकृती ठीक आहे.

तलैया वस्तीत राहणाऱ्या धर्मेंद्र श्रीवास्तव यांच्या घरातील तीन मुले बुधवारी सायंकाळी मोबाईलच्या बॅटरीशी खेळत होती. खेळत असताना अचानक मोबाईलची बॅटरी जोरात फुटली. बॅटरीचा स्फोट झाल्याने ११ वर्षीय सुमित, ७ वर्षीय गौरव आणि ६ वर्षीय रमन हे गंभीर जखमी झाले.

स्फोटाचा आवाज ऐकून घरातील सदस्य मुलांकडे धावले आणि जखमी मुलांना पाहताच त्यांनी आरडाओरडा सुरू केला. यानंतर जखमी मुलांना तातडीने रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, तेथे मुलांवर उपचार सुरू आहेत. बॅटरीचे तुकडे मुलांच्या शरीरातही घुसले, जे उपचारादरम्यान डॉक्टरांनी बाहेर काढले.

सध्या तिन्ही मुले सुखरूप असली तरी त्यांच्या अंगावरील जखमा तशाच असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे याआधीही मध्यप्रदेशात मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होऊन लोक जखमी झाले आहेत. काही वेळा तर लोकांना या स्फोटात जीवही गमवावा लागला आहे.

महत्वाच्या बातम्या-
आर्यनविरोधात व्हाट्सएप चॅटसारखा मोठा पुरावा असतानाही एनसीबीचा युक्तिवाद कुठे कमी पडला?
भररस्त्यात दोन तरुणी भिडल्या, फ्री स्टाईल मारामारीचा व्हिडीओ व्हायरल; कारण ऐकून धक्का बसेल
दिवाळीच्या मुहूर्तावर अमृता फडणवीस यांचं नवीन गाणे; एकदा झलक पहाच

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

आता पुरूषांसह महिलांनाही वापरता येणारं कंडोम, तज्ञांनी बनवले जगातले पहिले युनिसेक्स कंडोम..

महिला आणि पुरुषांच्या बाबतीत एक वेगळी बातमी समोर येत आहे. मलेशियातील एका शास्त्रज्ञाने जगातला पहिला युनिसेक्स कंडोम तयार केला आहे. हा युनिसेक्स कंडोम स्त्री आणि पुरुष दोघेही वापरू शकणार आहेत. याचे अनेक फायदे देखील आहेत. तसेच ते सुरक्षित देखील आहे.

हे गर्भनिरोधक तयार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की हे तयार करण्यासाठी मेडिकल ग्रेड साहित्याचा वापर करण्यात आला आहे. साधारणपणे या साहित्याचा वापर जखमेच्या ड्रेसिंगसाठी केला जातो. हे सर्वात सुरक्षित कंडोम आहे.

या युनिसेक्स कंडोममुळे लोकांचे सेक्सुअल हेल्थ सुधारेल. युनिसेक्स कंडोमचा महिला आणि पुरुष दोघांनाही फायदा होईल. तसेच हे वापरायला देखील सोपे आहे याचे कोणतेही इतर इफेक्ट नाहीत, असेही सांगितले आहे.

या कंडोमच्या मदतीने लोक जन्मदरावर नियंत्रण ठेवू शकतात. याशिवाय यौन सुरक्षाही होईल. यामुळे याचे अनेक फायदे आहेत. हे साधारण कंडोम प्रमाणेच असून यात चिकटणारी कव्हरिंग आहे. ती महिला आणि पुरूषांच्या प्रायव्हेट पार्ट्सना चिटकते. याच्या एक्स्टा प्रोटेक्शनमुळे जास्त सुरक्षा मिळते.

याला दोन्ही बाजूंनी वापरता येऊ शकते. या कंडोमची चाचणीसुद्धा करण्यात आली होती. बाजारात पुढील महिन्यात हे लॉन्च केले जाणार आहे. तुम्ही ट्विन कॅटलिस्टच्या वेबसाईटवर जाऊन हे कंडोम विकत घेऊ शकता. याची किंमत १४.९९ रिंगिट म्हणजेच सुमारे २७० रुपये असेल.

युनिसेक्स कंडोम इतके पातळ आहे की, जेव्हा तुम्ही ते घालाल तेव्हा तुम्हाला समजणारही नाही. हे ड्रेसिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या मटेरियलपासून बनवण्यात आले आहे. अनेक क्लिनिकल रिसर्च आणि चाचणीनंतर युनिसेक्स कंडोम तयार करण्यात आले आहे.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

आर्यनविरोधात व्हाट्सएप चॅटसारखा मोठा पुरावा असतानाही एनसीबीचा युक्तिवाद कुठे कमी पडला?

गेल्या एक महिन्यापासून राज्यभरात ड्रग्स क्रूझ प्रकरणाची जोरदार चारचा होती. या प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. २६ दिवसांपासून तो जेलमध्ये होता, अखेर त्याचा जामीन न्यायलायने मंजूर केला आहे.

आर्यन खानसोबतच मूनमून धमेचा आणि अरबाज मर्चंट या दोघांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. मागील तीन दिवसांपासून या प्रकरणावर सुनावणी होत होती, पण अखेर न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे.

या सुनावणी दरम्यान एनसीबीकडून अनेक युक्तिवाद मांडण्यात आले होते. आर्यन खान ड्रग्स डीलर असून त्याला जामीन दिली तर तो त्याच्याविरोधातले सर्व पुरावे नष्ट करेल असाही युक्तिवाद एनसीबीने मांडला होता. विविध मुद्यांना अनुसरून दोन्ही पक्षांनी युक्तिवाद मांडला होता. पण गुरुवारी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत आर्यन खानचा जामीन मंजूर केला आहे.

जेव्हा आर्यन खानची एनसीबी चौकशी करत होती, तेव्हा त्यांनी आर्यन खानचा फोन जप्त केला होता. त्यामध्ये त्यांना व्हाट्सएप चॅट मिळाल्या होत्या. एनसीबीकडे आर्यन विरोधात हा मोठा पुरावा होता, त्यामुळे त्याला जामीन कसा मिळाला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण याबाबत नवीन माहिती समोर आली आहे.

आर्यन आणि अरबाजच्या वकिलांनी व्हाट्सएप चॅटवरही युक्तिवाद केला आहे. यावर आर्यन खान आणि अरबाजच्या वकिलांनी हे चॅट जुनं असल्याचे म्हटले आहे. या चॅटवरून ते कोणताही मोठा प्लॅन करत आहे, असा संदर्भ लागत नाही, असा युक्तिवाद वकिलांनी मांडला होता.

एका चॅटचा दुसऱ्या चॅटशी काही संबंध नाही. आजची तरुणाई हे शब्द शॉट्स फॉर्ममध्ये किंवा वेगवेगळ्या पद्धतीने वापरत असतात. ड्रग्सशी संबंधित शब्द ते कधी कधी वापरतात, त्यामुळे असा गौरसमज होऊ शकतो असेही वकिलांनी म्हटले आहे.

तसेच इलेक्ट्रॉनिक पुरावे घ्यायचे असतील, तर त्यासाठी एनसीबीकडे त्यासाठीचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. पण एनसीबीकडे ते प्रमाणपत्र नाही. त्यामुळे त्याला जामीन मिळाला पाहिजे असे आर्यनच्या वकिलांनी म्हटले होते. हा युक्तिवाद न्यायालयाने मान्य करत त्याचा जामीन मंजूर केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
भररस्त्यात दोन तरुणी भिडल्या, फ्री स्टाईल मारामारीचा व्हिडीओ व्हायरल; कारण ऐकून धक्का बसेल
महिलेने आपल्याच बॉयफ्रेंडला जीवंत जाळले, कारण ऐकून पोलिसही हादरले
दिवाळीच्या मुहूर्तावर अमृता फडणवीस यांचं नवीन गाणे; एकदा झलक पहाच

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

भररस्त्यात दोन तरुणी भिडल्या, फ्री स्टाईल मारामारीचा व्हिडीओ व्हायरल; कारण ऐकून धक्का बसेल

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ अपलोड होत असतात. पण काही व्हिडिओ हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. तरुणांच्या भांडणांचेही बऱ्याचदा व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण सध्या काही तरुणींच्या भांडणाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

भररस्त्या दोन मुलींच्या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील असल्याचे तपासात समोर आले आहे. मुलींनी रस्त्यावर एकच गोंधळ घातला.

लखनऊच्या एका रस्त्यावर एका मुलीने दुसऱ्या मुलीला मारहाण केली आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगी दुसऱ्या मुलीला मारहाण करताना दिसत आहे आणि इतर मुली तिला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. हे प्रकरण लखनऊच्या आशियाना भागातील असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या बहाण्याने एका मुलाने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर त्याच्या मैत्रिणीने तिला मारहाण केल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. हायव्होल्टेज ड्रामानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनंतर १५ दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध लैंगिक छळ आणि अत्याचाराच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अन्य दोन मुलींवरही गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, लखनऊमधील मधल्या रस्त्यावरील भांडण पाहून घटनास्थळी गर्दी जमली आणि लोकांनी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली.

व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे तरुणीने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३७६, ५०४, ५०६, ३०७, ३५२ आणि ४२३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल. त्यांना पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-
भररस्त्यात दोन तरुणी भिडल्या, फ्री स्टाईल मारामारीचा व्हिडीओ व्हायरल; कारण ऐकून धक्का बसेल
महिलेने आपल्याच बॉयफ्रेंडला जीवंत जाळले, कारण ऐकून पोलिसही हादरले
भावाला जामीन मिळताच अबरामचे हटके सेलिब्रेशन, मन्नतच्या छतावर गेला अन्…; पहा व्हिडिओ