काँग्रेसच्या अब्रूची लख्तर वेशीवर टाकून, मधल्या काळात विनोद राय कुठ गायब होते?

October 30, 2021 , 0 Comments

दोन दिवसांपूर्वी कॅगच्या विनोद रायनी आपण खोटारडेपणा केला असल्याचे मान्य करून सपशेल माफी मागितली. रायनी युपीए सरकारवर केलेले आरोप कोर्टातही सिद्ध झाले नाहीत. मात्र मनमोहनसिंग पंतप्रधान असताना त्यांच्या आरोपांचा आधार घेत भाजपने साप साप म्हणून भुई बडवत आख्खा देश तेव्हा डोक्यावर घेतला होता.

त्यावेळी शरद पवार म्हटले होते,

हा भाजपने सत्तेसाठी रचलेला बनाव आहे. पुढे सगळ्यांच्या लक्षात येईल की असा काही स्कॅम झालेलाच नाही.

आज त्यांचं ते स्टेटमेंट आठवलं. आणि दोन दिवसांपूर्वी विनोद राय यांची माफी. अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर अख्या देशाने भाजप सरकारला सत्तेवर बसवलं आणि युपीए सरकारला सपशेल नाकारलं, त्याच्या मागची ही गोष्ट सांगावीच लागेल.

मार्च २०१२ ची ही गोष्ट. कॅग (Comptroller and Auditor General) यांचा एक ड्राफ्ट रिपोर्ट आला. या रिपोर्ट मध्ये २००४ पासून ते २००९ पर्यंतच्या कोळसा ब्लॉक वाटप प्रक्रियेत काहीतरी गडबड असल्याचं म्हंटल गेलं. या एका रिपोर्टमुळे काँग्रेसच्या जहाजाला भगदाड पडलं, ज्याची परिणीती काँग्रेस डुबण्याच्या दिशेकडे होऊ लागली. आणि यामागे मास्टर माईंड कोण होत ? तर विनोद राय..

आधी विनोद राय कोण आहेत हे समजून उमजून घ्या. कारण पुढं वाचताना समजेल काय बिलंदर आहे हा माणूस..

विनोद राय यांचा जन्म २३ मे १९४८चा. उत्तरप्रदेशातल्या गाजीपुरातला. आता यूपी बिहारची पोर तशी अर्थशास्त्रीच म्हणावी लागतील. तसेच हे विनोद राय अर्थशास्त्रातील प्रतिभावंत. ज्यांनी ११वे कॅग म्हणून सलग पाच वर्षे काम केलं. त्यांनी दिल्लीच्या कॉलेजातून बॅचलर्स तर हार्वर्ड युनिव्हर्सिटी मधून आपलं मास्टर्स पूर्ण केलं. १९७२ साली ते आयएएस झाले. केरळ मध्ये त्यांची पहिली पोस्टिंग होती. पुढं अर्थमंत्रालयाच्या अधीन असलेल्या बँका, इन्श्युरन्स कंपन्या अशा विविध पदांवर काम करत पुढं ते भारताचे ११ वे कॅग झाले.

CAG चं काम काय असतं ?
तर असं समजा कॅग सरकारच्या आर्थिक गोष्टींवर नजर ठेवणारा चौकीदार आहे. पडद्याआड राहून सरकारी आर्थिक धोरण कशी आहेत, सरकारचा परफॉर्मन्स कसा आहे हे बघतात. थोडक्यात सरकारने आर्थिक उचपत्या करू नये म्हणून हे कॅग असतात. सरकारी उचपत्या झाल्याच तर त्या त्यांच्या रिपोर्ट मध्ये दिसतात. आणि हे रिपोर्ट जनहितार्थ असतात. असेच काही रिपोर्ट विनोद राय यांनी तयार केले ज्यात युपीए सरकारने उचपत्या केल्यात असं प्रथमदर्शनी निदर्शनास आलं.

असं म्हणतात की विनोद राय हे अशा अधिकाऱ्यांपैकी होते, ज्यांना सरकारची लालफीतशाही टाळून काम कसं करायच हे माहीत होत. त्यांची कॅग म्हणून नियुक्ती झाली तेव्हा त्यांना तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा पाठिंबा होता. नंतर मात्र त्यांनी असे रिपोर्ट बाहेर काढले की, ज्यामुळे युपीए सरकारचा बाजार उठला. काँग्रेसच्या अधोगतीला जबाबदार असलेले अनेक घोटाळे त्यांच्या कार्यकाळात उघड झाले.

यात,

2G स्पेक्ट्रम घोटाळा: 2G स्पेक्ट्रम घोटाळा उघड करण्याच संपूर्ण श्रेय विनोद राय यांना जात. मोबाईल कंपन्यांना टूजी स्पेक्ट्रम वाटपात गडबड आढळून आली. सीबीआयने २ एप्रिल २०११ रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, या घोटाळ्यामुळे देशाचे सुमारे ३० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले.

कोळसा घोटाळा: राय यांनी यूपीए सरकारला आणखी एक मोठा दणका दिला होता. विनोद राय यांच्या म्हणण्यानुसार २००४ ते २००९ दरम्यान कोळसा खाणीचे परवाने मनमानी पद्धतीने वाटण्यात आले. खाणींतील कोळसा लिलाव न करता अत्यंत स्वस्त दरात काढण्याचे कंत्राट खासगी कंपन्यांना देण्यात आले. यामुळे सरकारी तिजोरीचे अंदाजे १.८६ लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

दिल्ली कॉमनवेल्थ घोटाळा: २०१० साली दिल्लीत झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता. वस्तू त्यांच्या किंमतीपेक्षा कितीतरी जास्त किमतींनी विकत घेतल्या गेल्या. काही वेळा, एखादी वस्तू खरेदी करता येईल त्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट रक्कम फक्त भाड्याने दिली जात असे. त्यात या खेळांचे अध्यक्ष असलेले सुरेश कलमाडी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकले आणि नंतर तुरुंगात गेले.

विनोद राय यांनी त्यांच्या कार्यकाळावर ‘नॉट जस्ट अॅन अकाउंटंट’ हे पुस्तक लिहिल. त्यात त्यांनी म्हंटल की, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ठरवलं असतं तर ते हे घोटाळे थांबवू शकले असते, पण त्यांची तशी कधी इच्छाच नव्हती.

आता अशी पुस्तक लिहिली तर काय होणार ? व्हायचं तेच झालं. भाजपने काँग्रेसच्या या घोटाळ्यांना केंद्रस्थानी ठेवून अक्षरशः काँग्रेसला पळता भुई थोडी केली. या सगळ्यात आरोपांच्या काळात विनोद राय दिसलेच नाहीत.

ते काय करत होते ? तर जानेवारी २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल न्यायालयाने BCCI अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना पदावरून हटवल. त्यांच्या जागी हंगामी अध्यक्ष म्हणून विनोद राय यांची निवड करण्यात आली. सध्या ते या पदावर आहेत.

त्याचबरोबर सध्या ते संयुक्त राष्ट्रांच्या बाह्य लेखापरीक्षकांच्या पॅनेलचे अध्यक्ष आहेत.

हे ही वाच भिडू:

The post काँग्रेसच्या अब्रूची लख्तर वेशीवर टाकून, मधल्या काळात विनोद राय कुठ गायब होते? appeared first on BolBhidu.com.



Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: