धक्कादायक! गेम खेळता खेळता झाला मोबाईलचा ब्लास्ट, चिमुकल्यांच्या शरीरात घुसले बॅटरीचे तुकडे

October 30, 2021 , 0 Comments

सध्याच्या काळात मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनातला अविभाज्य भाग बनला आहे. तरुण पिढीतर सऱ्हासपणे मोबाईलचा वापर तर करतच आहे. पण आता लहान मुलांनाही मोबाईलचे वेड लागले आहे. त्यामुळे ते दिवसभर मोबाईल गेम खेळत असतात, व्हिडिओज बघत असतात.

दिवसभर मोबाईल वापरल्याने मुलांवर वाईट परीणामही होत असतो. पण असे असतानाच मध्य प्रदेशच्या दतिया जिल्ह्यात एक भयानक घटना घडली आहे. इथे तीन लहान मुले मोबाईल खेळत असताना त्या मोबाईला स्फोट झाला आहे, या स्फोटामुळे मुले जखमी झाली होती, त्यानंतर त्या मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मोबाईलच्या बॅटरीशी खेळणे तीन मुलांना चांगलेच महागात पडले आहे. खेळादरम्यान बॅटरीचा स्फोट होऊन तीन मुले जखमी झाली. जखमी मुलांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिन्ही मुले एकाच कुटुंबातील आहेत. सध्या तिघांचीही प्रकृती ठीक आहे.

तलैया वस्तीत राहणाऱ्या धर्मेंद्र श्रीवास्तव यांच्या घरातील तीन मुले बुधवारी सायंकाळी मोबाईलच्या बॅटरीशी खेळत होती. खेळत असताना अचानक मोबाईलची बॅटरी जोरात फुटली. बॅटरीचा स्फोट झाल्याने ११ वर्षीय सुमित, ७ वर्षीय गौरव आणि ६ वर्षीय रमन हे गंभीर जखमी झाले.

स्फोटाचा आवाज ऐकून घरातील सदस्य मुलांकडे धावले आणि जखमी मुलांना पाहताच त्यांनी आरडाओरडा सुरू केला. यानंतर जखमी मुलांना तातडीने रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, तेथे मुलांवर उपचार सुरू आहेत. बॅटरीचे तुकडे मुलांच्या शरीरातही घुसले, जे उपचारादरम्यान डॉक्टरांनी बाहेर काढले.

सध्या तिन्ही मुले सुखरूप असली तरी त्यांच्या अंगावरील जखमा तशाच असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे याआधीही मध्यप्रदेशात मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होऊन लोक जखमी झाले आहेत. काही वेळा तर लोकांना या स्फोटात जीवही गमवावा लागला आहे.

महत्वाच्या बातम्या-
आर्यनविरोधात व्हाट्सएप चॅटसारखा मोठा पुरावा असतानाही एनसीबीचा युक्तिवाद कुठे कमी पडला?
भररस्त्यात दोन तरुणी भिडल्या, फ्री स्टाईल मारामारीचा व्हिडीओ व्हायरल; कारण ऐकून धक्का बसेल
दिवाळीच्या मुहूर्तावर अमृता फडणवीस यांचं नवीन गाणे; एकदा झलक पहाच


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: