NCB – मलिकांचा वाद वैयक्तिक म्हणणारे राष्ट्रवादीचे नेते पडले तोंडावर, पुरावे निघाले ठोस

October 31, 2021 , 0 Comments

क्रुझ ड्रग्स प्रकणावरुन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहे. समीर वानखेडे मुस्लिम असून त्यांनी दलित असल्याचे सांगत नोकरी मिळवली आहे, असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

त्यांनी एका दलिताचा हक्क हिसकावून घेतला आहे. समीर वानखेडे हे मुस्लीम आहेत आणि त्यांच्या वडीलांचे नाव दाऊद आहे असा दावा नवाब मलिकांनी केला होता. अशात या वादावर राष्ट्रवादीचे नेते प्रतिक्रिया देण्यास टाळत होते. पण नवाब मलिकांचे पुरावे ठोस निघाल्याने राष्ट्रवादीची नेतेमंडळी बॅकफुटवर गेली आहे. त्यामुळे मलिकांचे वन मॅन आर्मी असे कौतूक केले जात आहे.

नोव्हेंबर २०२० पासून नवाब मलिक विरुद्ध एनसीबी असा संघर्ष सुरु आहे. ड्रग्स प्रकरणात नवाब मलिकांच्या जावयाला अटक करण्यात आली होती. त्यामुळे एनसीबीचा आणि नवाब मलिकांचा हा संघर्ष वैयक्तिक आहे, अशी भुमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडली होती.

आपल्याकडे ठोस पुरावे आहे. या प्रकरणात समीर वानखेडे तुरुंगात जाऊ शकतो, असे नवाब मलिकांनी म्हटले होते. त्यानंतर प्रकरण लावून धरण्याविषयी शरद पवारांनी सांगितले होते, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे ६ ऑक्टोबरपासून मलिकांनी वानखेडेंविरोधात मोहिम सुरु केली होती.

असे असले तरी गृहविभाग सुस्त असल्याचे दिसून येत होते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बिल्कूल अंगावर घ्यायचे नाही, असे सांगितले जात होते. त्यामुळे या प्रकरणावर गृहविभागाकडून कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया मिळाली नव्हती.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही यावर भाष्य करणे टाळले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व्यतिरिक्त नवाब मलिकांना राष्ट्रवादीतून पाठिंबा मिळत नाहीये, असे समजत होते, पण ते सर्व नेते मंडळी तोंडघशी पडले आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुढच्या सामन्यात कोण असणार शार्दूल ठाकूर की हार्दीक पांड्या?; विराट कोहली म्हणाला…
पाकड्यांचा माज उतरेना; विराटनंतर अफगाण कॅप्टनला बोलला असा काही की त्याने पत्रकार परीषदच सोडली
VIDEO: पाकने अफगानिस्तानच्या तोंडातला घास ओढला; ‘या’ फलंदाजाने ओव्हरमध्ये ४ सिक्स मारत मॅच जिंकवली


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: