नगर: ‘त्या’आरोपींवर कठोर कारवाई करा, महसूलमंत्री विखे यांचे आदेश; रेशन प्रकरणातील जखमी तरुणाची भेट
https://ift.tt/DMbfIOq
कुकाणा, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील भानसहिवरा येथे सरकारी रेशनचा माल पकडून देताना मारहाणीत जखमी झालेल्या सुरेशनगर येथील सतीश नानासाहेब क्षीरसागर या तरूणाची महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना यावेळी दिले.
सतीश क्षीरसागर व सुरेशनगर येथील ग्रामस्थांनी महसूलमंत्र्यांना लेखी निवेदन दिले. गावातील स्वस्त धान्य दुकानदार सुरेश दगडू उभेदळ हा स्वस्त धान्य वाहतूक ठेकेदार असून, तो स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा अध्यक्ष आहे. नेवासा तालुक्यात त्याची एवढी दहशत आहे की, हा माणूस गावात तीन-तीन महिने रेशन देत नाही. गावात अंत्योेदयच्या जास्त शिधापत्रिका आहेत. त्याचा गैरफायदा घेऊन तो लोकांच्या घरी जाऊन लाभधारकांचे अंगठे (थम्ब) घेतो, थम्ब न दिल्यास दमदाटी करतो, मारहाण करण्याची धमकी देतो.
गावातील शिधा हा शुक्रवारी (दि.21) येथे न उतरविता भानसहिवरा येथे खासगी गोदामात उतरविण्यास विरोध केला असता, सुरेश दगडू उभेदळ, त्याचा मुलगा आणि इतरांनी लोखंडी गज, लाकडी दांडे यांनी मारहाण केली. त्यामुळे संपूर्ण गाव दहशतीखाली आहे. या माणसापासून मी व माझ्या सहकार्यांच्या जीवितास धोका आहे. त्यामुळे त्याचा नेवासा तालुका वाहतूक पुरवठा परवाना रद्द करावा, स्वस्त धान्य दुकान परवाना रद्द करावा आणि धान्य दुकान दुसर्या गावातील इतर लोकांना देऊन आमचे गाव दहशतमुक्त करावे, अशी मागणी केली आहे. निवेदनावर सतीश क्षीरसागर याच्यासह 25 ते 30 ग्रामस्थांच्या सह्या आहेत. दरम्यान, महसूलमंत्री विखे यांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या. अनेक कुटुंबियांना स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य मिळत नसल्याच्या तक्रारीबाबतही कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.
The post नगर: ‘त्या’आरोपींवर कठोर कारवाई करा, महसूलमंत्री विखे यांचे आदेश; रेशन प्रकरणातील जखमी तरुणाची भेट appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/tDN8rxe
via IFTTT
0 Comments: