अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, तर एक गंभीर जखमी
https://ift.tt/8ndJ2qA
जामखेड; पुढारी ऑनलाइन डेस्क: आष्टी तालुक्यातील चिंचपूर जवळ अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरात धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना २६ ऑक्टोबरला रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, जामखेड तालुक्यातील धनेगाव येथील तरुण आदेश किसान काळे हा गेल्या काही वर्षांपासून पुणे येथील एका कंपनीत काम करत होता. दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी तो आपल्या मित्राबरोबर भाऊबीजेच्या निमित्ताने पुण्याहून गावी जात असताना आष्टी तालुक्यातील चिंचपूर जवळील वळणावर अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरात धडक दिल्याने मोटारसायकलवरील आदेश किसन काळे (वय ३२) रा. धनेगाव ता. जामखेड हा जागीच ठार झाला.
तर नवनाथ मछिंद्र काळे (वय ३६ ) रा. मोशी, ता. हवेली, जि. पुणे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मयत आदेश काळे यांचा आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी पो.हे. कॉ. विकास राठोड यांनी पंचनामा केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदरसनाखाली राठोड करत आहेत
The post अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, तर एक गंभीर जखमी appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/m4p7Jr8
via IFTTT
0 Comments: