राहुरी : ‘मुळाखोरे’च्या माध्यमातून सहकार टिकवा, गोरक्षनाथ गाडे यांचे दूध उत्पादकांना आवाहन; सभासदांना रिबेट वाटप
https://ift.tt/bwaKYUW
राहुरी, पुढारी वृत्तसेवा: सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी मुळाखोरे खोलेश्वर दूध संस्थेचे संचालक मंडळ कटिबद्ध आहे. खासगी क्षेत्रातील दूध उद्योग व्यवसायाशी स्पर्धा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मुळाखोरे खोलेश्वर दूध संस्थेने यंदाही दिवाळी सणाचे औचित्य साधत रिबेट वाटप केले आहे. दूध उत्पादकांनी सहकाराला बळकटी मुळाखोरे दूध संस्थेला दूध पुरवठा करावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष गोरक्षनाथ गाडे यांनी केले.
राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर मुळाखोरे खोलेश्वर दूध संस्थेच्या वतीने दूध उत्पादक शेतकर्यांना रिबेट वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे शिवाजीराजे पवार हे होते. बाळासाहेब मंडलिक, संजय देवकर,सुनिल मंडलिक, लक्ष्मण बाचकर, बाळासाहेब यादव मंडलिक, कैलास गाडे, मच्छिंद्र गोपाळे या दूध उत्पादकांनी सर्वाधिक रिबेट घेतले. 1 रुपयाला 75 पैसे, असे एकूण 1 रुपये 75 पैसे असे 6 लक्ष रुपयांचे रिबेट वाटप झाले.
दूध उत्पादकांना उपाध्यक्ष सुनिल मंडलिक, कैलास गाडे, विलास गाडे, दिलीप गाडे, सुधाकर पवार, रावसाहेब पवार, नुराभाई देशमुख, महेंद्र गाडे, गंगाधर गाडे, आदिनाथ कोहकडे, सोमनाथ कोहकडे, शशिकांत गाडे, किशोर भालेराव, बाबासाहेब देवकर, गोरख गोपाळे, प्रमोद ढुमणे,सुजित आघाव, आदी संचालक मंडळाच्या हस्ते दूध उत्पादकांना रिबेट वाटप झाले.
कार्यक्रमासाठी पंढरीनाथ पवार, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रभाकर गाडे, माजी सरपंच जयश्रीताई गाडे, सोपानराव गाडे, माजी उपसरपंच युवराज गाडे, कैलास पवार, भास्कर गाडे, दीपक पवार, रफिक इनामदार, प्रा. इजाज सय्यद, रावसाहेब मंडलिक, सचिन मंडलिक, भास्कर भालेराव आदींची उपस्थिती होती.
The post राहुरी : ‘मुळाखोरे’च्या माध्यमातून सहकार टिकवा, गोरक्षनाथ गाडे यांचे दूध उत्पादकांना आवाहन; सभासदांना रिबेट वाटप appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/JYPxHIm
via IFTTT
0 Comments: