ग्रहणामुळे श्रीसाईबाबा मंदिर कार्यक्रमांमध्ये बदल
https://ift.tt/nsmJdfH
शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने (दि. 25) ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण (ग्रस्तास्त) असल्यामुळे श्रीसाईबाबा समाधी मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमांच्या वेळेत बदल केला आहे. दुपारी 4.40 ते सायंकाळी 6.31 यावेळेत श्रींसमोर मंत्रोच्चार होईपर्यंत भाविकांना समाधी मंदिराचे सभा मंडपापासून दर्शन सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
बानायत म्हणाल्या, (दि.25) ऑक्टोबर रोजी दुपारी 4.40 ते सायंकाळी 6.31 यावेळेत खंडग्रास सूर्यग्रहण (ग्रस्तास्त) आहे. यामध्ये 4.40 वाजता श्रींचे दर्शन बंद होईल. दुपारी 4.50 वाजता समाधी मंदिरात मंत्रोच्चार सुरू होईल. सायंकाळी 6.31 वाजता मंत्रोच्चार संपल्यानंतर सायंकाळी 6.40 वा. श्रींचे मंगलस्नान होईल. यानंतर सायंकाळी 6.55 वा. श्रींची ‘शिरडी माझे पंढरपूर’ ही आरती तर 7.15 वा. श्रींची धुपारती होईल. आरतीनंतर भाविकांना दर्शनासाठी दर्शनरांगा पूर्वीप्रमाणे सुरू होतील. ग्रहण काळात श्रींसमोर मंत्रोच्चार होईपर्यंत भाविकांना समाधी मंदिराचे सभा मंडपापासून दर्शन सुरू असेल. साईभक्तांनी सहकार्य करावे, असे आवाहन बानायत यांनी केले आहे.
The post ग्रहणामुळे श्रीसाईबाबा मंदिर कार्यक्रमांमध्ये बदल appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/6A0db9G
via IFTTT
0 Comments: