नगरः कारची काच फोडून पावणेतीन लाख लंपास
https://ift.tt/YcxJiCl
नगरः पुढारी वृत्तसेवा : दुकानासमोरील पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या कारची काच फोडून चोरट्याने दोन लाख 75 हजारांची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि.18) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तोफखाना पोलिस ठाण्यात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गौरव विनोद मोरे (स्वामी समर्थ मंदिराजवळ, नगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नगर-औरंगाबाद रोडवरील इंद्रायणी हॉटेलजवळील भगवती ग्रेनई या दुकानासमोर असलेल्या पार्किंगमध्ये सायंकाळी त्यांची चारचाकी कार (एम.एच.16 सी.सी. 7574) पार्क केली होती. त्यानंतर घरी जाण्यासाठी परत आले असता कारच्या मागची काच फोडून 2 लाख 75 हजार रूपये असलेली बॅग त्यांना आढळून आली नाही. रक्कम चोरीला गेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
The post नगरः कारची काच फोडून पावणेतीन लाख लंपास appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/SIZql8f
via IFTTT
0 Comments: