नगर : साखर, चना, पोहोचले, पामतेल मात्र रस्त्यातच
https://ift.tt/NJRpqFj
नगर : पुढारी वृत्तसेवा : गोरगरिबांची यंदाची दिवाळी गोड व्हावी, यासाठी शासनाने केवळ शंभर रुपयांत एक किलो डाळ, साखर, रवा आणि एक लिटर पामतेल असे चार वस्तूंचे किट देण्याचा निर्णय घेतला. मात्र, दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली तरीही, किट गोरगरीब जनतेला उपलब्ध झाले नाहीत. नगर जिल्ह्यासाठी बुधवारी दुपारपर्यंत 40 टक्के पुरवठा झाला. त्यात रवा, साखर व चणाडाळ आली, पण पामतेलचा पत्ताच नाही. पामतेलच्या गाड्या नगरच्या दिशेने निघाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्हाभरात ‘दिवाळी किट’चे शुक्रवारपासून वाटप सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले.
शिंदे-फडणवीस सरकारने अंत्योदय आणि अन्न सुरक्षा तसेच प्राधान्य कुटुंब योजनेतील रेशनकार्डधारकांना एक किलो साखर, रवा व चणाडाळ तसेच 1 लिटर पामतेलाचे दिवाळी किट अवघ्या शंभर रुपायात देण्याची घेषणा केली. त्यासाठी एका फेडरेशनला पुरवठा करण्याचा ठेका दिला. जिल्ह्यातील एकूण 6 लाख 92 हजार रेशनकार्डधारकांना दिवाळी किटची प्रतिक्षा लागली. मात्र, दिवाळी दोन दिवसांवर आली तरीही स्वस्तधान्य दुकानांत शासनाचे कीट काही दिसेनासे झाले. त्यामुळे यंदाची दिवाळी साजरी होणार की नाही अशी शंका निर्माण झाली.
दरम्यान, बुधवारी दुपारपर्यंत जिल्ह्यासाठी रवा, साखर व चणाडाळ या तीन जीन्साचा 40 टक्के पुरवठा उपलब्ध झाला, पण त्यात पामतेलाचा अद्याप पत्ताच नाही. उर्वरित किट जिल्ह्यातील स्वस्तधान्य दुकानांवर दिवाळी सणापूर्वी पोहोचेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.पोहचलेला माल स्वस्तधान्य दुकानांना पोहोच होऊन शुक्रवारपासून वाटप सुरु होणार आहे. दिवाळी किटचे वाटप करण्यासाठी स्वस्तधान्य दुकाने दिवाळी सुट्टीतही खुली राहाणार आहेत.
The post नगर : साखर, चना, पोहोचले, पामतेल मात्र रस्त्यातच appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/eVME7tW
via IFTTT
0 Comments: