नगर : गुंगीचे औषध पाजून महिलेवर अत्याचार
https://ift.tt/gJcfLyi
पाथर्डी तालुका, पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील एका अंगणवाडी सेविकेला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करून अश्लिल छायाचित्रे सोशल मीडियावर टाकल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात सचिन मोहन सारुक (रा. येळी, ता. पाथर्डी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर दीड महिन्यापूर्वी आरोपीची या महिलेची ओळख झाली. त्यानंतर एकमेकांच्या मोबाईल क्रमांकांचे आदान-प्रदान झाले. हळूहळू दोघांची ओळख वाढत गेली. दि. 6 जुलै 2022 रोजी दोघे पाथर्डीमध्ये एकत्र भेटले. तेथून दोघे जेवायला एका हॉटेलमधे गेले. तेथे त्याने महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध पाजले. त्यानंतर महिलेला गुंगी आली. आराम करण्यास सांगत आरोपीने तिला हॉटेलमधील लॉजच्या रूममध्ये नेले. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. तिची अश्लिल छायाचित्रे काढून ती सोशल मीडियावर व्हायरल केली.
अंगणवाडी सेविकेच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून आरोपी सारुक पसार आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण करीत आहेत.
The post नगर : गुंगीचे औषध पाजून महिलेवर अत्याचार appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/NHW682p
via IFTTT
0 Comments: