नगर : ‘स्वयंभू’ला दोन लाखांचा दंड ! घनकचरा विभागाकडून प्रस्ताव
https://ift.tt/NZdsXRl
नगर : पुढारी वृत्तसेवा : सावेडी उपनगरातील कचरा सहा-सात दिवस पडून राहतो, या तक्रारीमध्ये महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांना तथ्य आढळून आले आहे. त्यांनी तसा अहवाल घनकचरा विभागाला दिला आहे. त्यानुसार घनकचरा विभागाने कचरा उचलणारी खासगी कंपनी स्वयंभू ट्रान्सपोर्टवर दोन लाखांचा दंड प्रस्तावित केला आहे. उपायुक्तांनी ‘स्वयंभू’कडून खुलासा मागविला आहे. नगर शहरातील दररोजचा कचरा उचलण्याचा ठेका स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीला देण्यात आलेला आहे.
त्यासाठी महापालिकेने कचरा उचलण्यासाठी वाहने पुरविली आहेत. ही वाहने दररोज शहरातील विविध विभागातून कचर्याचे संकलन करतात. मात्र, सावेडी उपनगरामध्ये अनेक विभागात सहा ते सात दिवस कचर्याची वाहने येत नाहीत. तशा तक्रारी नागरिकांनी महापालिकेकडे केल्या होत्या. तर, स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांनी सावेडी उपनगरामध्ये कचर्याची वाहने येत नाही. कचर्याची वाहने केवळ हॉटेलसमोर थांबतात, असा आरोप केला होता.
त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांनी सावेडी उपनगरामध्ये तपासणी केली. त्यात काही ठिकाणी कचर्याचे वाहन जात नसल्याचे निर्दशनास आले. त्यानुसार कचरा संकलन करणार्या स्वयंभू कंपनीवर दोन लाखांचा दंड प्रस्तावित केला आहे. सध्या त्याची फाईल उपायुक्तांच्या दालनात आहे. उपायुक्तांनी स्वयंभू कंपनीकडून खुलासा मागविला आहे. मात्र, कंपनीने अद्यापपर्यंत खुलासा दिलेला नाही, अशी माहिती सूत्रांकडून समजली.
The post नगर : ‘स्वयंभू’ला दोन लाखांचा दंड ! घनकचरा विभागाकडून प्रस्ताव appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/jIBF8oV
via IFTTT
0 Comments: