नगर : अंबिकामाता भंडार्यास भाविकांचा प्रतिसाद
https://ift.tt/4qj5exr
संगमनेर शहर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील माताडे मळा येथील श्री अंबिका माता तरुण मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री अंबिका माता भंडारा उत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानिमित्त देवीच्या मंदिरात विविध कार्यक्रम पार पडले.
माताडे मळा परिसरातील देवीच्या मंदिरात दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. शहरातील कुरण रोड येथे पूर्वी मंदिर होते. कालांतराने त्याचे माताडे मळा परिसरात स्थलांतर करण्यात आले. या ठिकाणी देवीचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरात नवरात्र उत्सवामध्ये दररोज पूजा पाठ करण्यात येतात. याशिवाय दरवर्षी भंडारा उत्सव आयोजित करण्यात येतो. यावर्षीही भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. परिसरातील महिलांनी कलश मिरवणूक काढली होती. पूजेनंतर दिवसभर भंडार्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री अंबिका माता तरुण मित्र मंडळ व पावबाकी परिसरातील श्री गुरुदत्त मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष माताडे, पोपट माताडे, विजय माताडे, दगडू माताडे, बाळासाहेब माताडेे, आकाश माताडेे, रवि माताडे, शुभम माताडे आदींनी प्रयत्न केले.
The post नगर : अंबिकामाता भंडार्यास भाविकांचा प्रतिसाद appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/N1yIe9X
via IFTTT
0 Comments: